Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ति सोडावॉटर आणि पजो आल्या
ति सोडावॉटर आणि पजो आल्या दोघी परत.
अजूनही आपली सुटकाच नाही म्हणजे.
100 वा आला की सांगा, बड्डे
100 वा आला की सांगा, बड्डे केक खायला जायचय, सरप्राईज planned केलंय ना बर्वे आणि मुलांनी.
तो वॉर्डबॉय महेश पण ढगात!
तो वॉर्डबॉय महेश पण ढगात!
त्या निरुच्या आईला काय सर्वात
त्या निरुच्या आईला काय सर्वात शेवटी डिजर्ट म्हणून खायला ठेवलंय काय मंगल ने
बघ की सर्वात जास्त खुन्नस
बहुतेक ती रिव्हर्स ऑर्डरमध्ये
बहुतेक ती रिव्हर्स ऑर्डरमध्ये जातेय. म्हणजे जिने तिला चुकीचं इंजेक्शन दिलं त्या ज्युनियर नर्सला आधी गायब केलं. मग मेल नर्सला कोमात पाठवलं. मग मेट्रनबाईला. मग जिने कारने उडवलं तिला. निरुमातेने घराबाहेर काढणं ही चेन रिअॅक्शनची पहिली कडी होती. त्यामुळे तिचा नंबर शेवटचा.
प्रियांका खूप इरिटेटिंग आहे. परवाच्या भागात तिने आणि निरूमातेने सिद्धार्थबाळाचा अंत पाहिला.
आणि आपली एंगेजमेंट झाली नाही यासाठी ती बया सिद्धार्थला गिल्ट देतेय. माझ्या आईवडिलांशी बोललास का म्हणतेय? पण फ्लाइट डिले झाल्याने वेळेवर न येऊ शकलेले तिचे आईवडील अजूनही आलेलेच नाहीएत.
शिवाय आपण मंगलच्या मृत्यूला कारण आहोत, याचं जराही गिल्ट तिला नाही. या साखळीतल्या कोणालाही नाही.
मध्येच ते कुठलं गाव , प्रा शारंगपाणी, तो चिंचाबोरंवाला भाऊ यांचा ट्रॅक आणलेला तो सोडूनच दिला.
हो ना. आणि ती काय म्हणाली तू
हो ना. आणि ती काय म्हणाली तू जर होस्पिटलला गेला नसतास तर महेश मेला नसता ?
त्या निरुच्या आईला काय सर्वात
त्या निरुच्या आईला काय सर्वात शेवटी डिजर्ट म्हणून खायला ठेवलंय काय मंगल ने >>>> मी ते चुकून डिटर्जन्ट अस वाचल.
मध्येच ते कुठलं गाव , प्रा शारंगपाणी, तो चिंचाबोरंवाला भाऊ यांचा ट्रॅक आणलेला तो सोडूनच दिला. >>> आणि ती चन्दी? तिच काय झाल?
ती अनु मेली. तिला सिद्ध
ती अनु मेली. तिला सिद्ध बाळाच्या डस्ट र ने उडवले. रमा बै गाडी धुत होत्या काल. मग त्या गाडीला कव्हर घालुन झोपवली
मला आवडते ही मालिका. दुसरं
मला आवडते ही मालिका. दुसरं काहीच नसतं पाहण्यासारखं. (डान्स महाराष्ट्र डान्स सोडून)
पल्लवी जोशीचं आकारमान आणि तपकिरी केसांचा टोप यामुळे ती विचित्र दिसते. तिची भुरळ बिरळ पडावी अशी ती राहिलीय का हे डोळ्यांना समजावूनही ते समजून घेत नाहीत. त्यामुळे मालिकेतल्या बेसिक अपेक्षांशी जुळवून घ्यायला वेळ लागला. एकदा जुळवून घेतलं की कुठलीही मालिका चांगली वाटू लागते.
भीती वाटली नाही तेव्हां मी लहान मुलांना समजावलं की सस्पेन्स म्हणून पहा. मुलांनी विचारलं की सस्पेन्स काय आहे.. मग मी म्हटलं .. पल्लवी जोशी भूत आहे कि नाही हे सस्पेन्स आहे. मग मालिकेनेच हेल्प केली. आता मंगल आली आहे. ती हॉस्पिटलमधे रिसेप्शनिस्ट असल्याप्रमाणे दिसते. निरंजनचा शहाळे विकायचा धंदा असावा बहुतेक आणि त्याच्या आईचे भजनी मंडळ असणार.
साठ्ये काकांनी ज्योतिषविद्येच्या तुटपुंज्या विद्येवर एव्हढे मोठे घर बांधले. त्यामुळे करीअर साठी विचार करायला हरकत नसावी. साळवी नावाच्या एका बेरोजगाराने पण असेच धाडस केले होते.
२४ मधे काम केलेला एक अभिनेता यातही आहे. यापूर्वी अस्मिता मधे त्याने भिका-याचे काम केले होते. यात तो हिंदी बोलतो आणि झाडूवाल्यासोबत झोपडीत राहतो. त्याचा काळ्या विद्येचा अभ्यास आहे असे एकदा लेखकाने म्हटले होते. नंतर कामाच्या रगाड्यात लेखक विसरला असेल.
जर आठवलेच तर शेवटचा क्लायमॅक्स उत्कटबिंदूला पोहोचला असता त्याची एण्ट्री दाखवता येईल.
पूर्वी वाटले तसे वेळेचा तिढा वगैरे काही नाही यात. धारपांच्या कुठल्या तरी एका कथेत होतं .
समजा जर कथा नियंत्रणा बाहेर गेली तर धारपांचा आत्मा येऊन कथेत प्राण ओतेल हा विश्वास आहे. त्यामुळे मालिका बघणे सोडत नाही. कदाचित एक दहा वीस... शंभर दोनशे.. पाचशे भागात शेवट होऊनही जाईल.
बहुतेक चॅनल ने लेखकाला दम
बहुतेक चॅनल ने लेखकाला दम दिला.. आता पुरेझालां भिरभिरणं.. १० पात्रे आहेत २० भाग देत आहोत, संपवा! त्यामूळे दोन भागात एक पात्रं गचकतय.. अशा वेगाने सुटले आहेत. आधी गचकवतो मग ऊलगडवतो एव्हडेच काय ते कंसेशन मिळाले असावे लेखकाला.
बरे आहे.. सुटेल एकदाचे ग्रहण!
आमच्या कडे दिवे गेले आहेत.
आमच्या कडे दिवे गेले आहेत. एखादे अॅप आहे का लाईव्ह पाहण्यासाठी?
या महिन्यातच ग्रहण सुटणारे
या महिन्यातच ग्रहण सुटणारे एकदाचं. ( १०० च भाग आहेत असे वाचल्याने दिवस मोजत बसले) धारपांच्या कथा कधीच वाचल्या नव्हत्या. ( आम्ही आपले सुशि आणी पोलिसी कथा वाचणारे )
या महिन्यातच ग्रहण सुटणारे
या महिन्यातच ग्रहण सुटणारे एकदाचं>> यापेक्षा दुसरी आनंदाची बातमी अजून तरी ऐकली नाही आजच्या दिवसात.
मी कधीच पहायची सोडून दिली
मी कधीच पहायची सोडून दिली कारण जिथवर पहात होते तिथवरही शेवट शेवटचे (मी पाहिलेल्यापैकी) काही भाग मला कळलेच नाहीत.
आज आहे. 10. 30 चा गजर लावावा
आज आहे. 10. 30 चा गजर लावावा लागेल.
आज शेवटचा भाग आहे ???
आज शेवटचा भाग आहे ???
शेवट काय झाला ते इथे लिहायला
शेवट काय झाला ते इथे लिहायला विसरु नका. रमा कोण असते? भूत का माणूस? तिच शेवटी काय होत? ते कळायला हव शेवटच्या एपिसोडमध्ये.
आज संपणारे ही मालिका?
आज संपणारे ही मालिका?
मला बेसिक प्रश्ण पडतोय, मंगल परत येऊ शकते तर तिने मारलेली सगळी माणसं का नाहीत? हॅरी पॉटर मध्ये नाही का येतं एन्ड्ला ?
तुमची सोडा वॉटर आता पोलिस कस्टडीत आहे ना? पुढं एका भागात कसं संपेल?
अजुन १०० भाग आहेत असं असणार!
८ जुन चा एपिसोड ७२ वा होता,
८ जुन चा एपिसोड ७२ वा होता, आता अजुन २८ भाग आहेत
आज संपेल असे वाटत नाही. काल
काल मी आठवड्याभराच्या ब्रेक नंतर पाहिले. थोडीफार स्टोरी सरकली पुढे, पण अजून एन्ड जवळ आला असे अजिबात वाटले नाही.
प्रियांका आधी मंगल ला आणि आता अनु ला गाडीने उडवून मारायला जबाबदार आहे असे कळूनही त्या बावळट सिद्धू ला काहीच शॉक बसत नाही, आता पुढे काय याचे टेन्शन येत नाही की काहीच चलबिचल होत नाही! तुझी चूक नाही असे सहज म्हणतो अगदी!! त्याचे नॅचरल इन्स्टिन्क्ट जो कोणी जास्त विअर्ड वागेल त्याला प्रोटेक्ट करणे असे असावे. कोण कुठल्या रमाला पण काही कारण नसताना स्वतःच्या फियान्से आणि मावशी यांच्या विरुद्ध जाऊन प्रोटेक्ट करतो सतत.
आजच्या भागात धारप काकांचे भूत
आजच्या भागात धारप काकांचे भूत निर्माता दिग्दर्शक यांना उठाबशा काढताना दाखवणारा आहेत.
अरे ही मालिका १०० भागांची आहे
अरे ही मालिका १०० भागांची आहे असे मागे कोणीतरी लिहीले होते. ही मालिका १९ मार्चला सुरु झाली म्हणून मी जून मध्ये संपेल असे लिहीले, आज नाही.
कोण कुठल्या रमाला पण काही
कोण कुठल्या रमाला पण काही कारण नसताना स्वतःच्या फियान्से आणि मावशी यांच्या विरुद्ध जाऊन प्रोटेक्ट करतो सतत.>>>>>>>>>>> निरूबाबा झालाय त्याचा आता.
नवीन Submitted by maitreyee
नवीन Submitted by maitreyee on 11 June, 2018 - 18:04

आजच्या भागात धारप काकांचे भूत निर्माता दिग्दर्शक यांना उठाबशा काढताना दाखवणारा आहेत. >>>>
निरूमाईला वेड लागले असं
निरूमाईला वेड लागले असं दिसतंय
झालं म्हणजे संपत आली तर
झालं म्हणजे संपत आली तर सिरियल
रमाच्या रूम मध्ये सर्व
रमाच्या रूम मध्ये सर्व भुतांची मीटिंग सुरु होती आज !
सर्व गोंधळ आहे !
(No subject)
रमाच्या रूम मध्ये सर्व
रमाच्या रूम मध्ये सर्व भुतांची मीटिंग सुरु होती आज ! >>> ठरलेला रोल मधेच कापल्याने ते सर्व पैसे मागायला आले होते. तर दिग्दर्शकाने त्यांना खोलीत थांबायला सांगितले आणि त्याचा पण एपिसोड केला.
Pages