दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी पुस्तकात सुंदरलाल बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनावर एक धडा होता. भावपूर्ण श्रद्धांजली.

हि नावं सगळी शालेय वयात असताना ओळख झालेली. झाडं तोडायला कुणी आलं की हे आंदोलनकर्ते झाडांना मिठी मारून उभे राहात असं ऐकल्यावर फार अप्रूप वाटलं होतं.

राम-लक्ष्मण Sad __/\__ एक काळ गाजवला होता. दादा कोंडके यांची गाणी म्हणजे संगीतकार राम-लक्ष्मण हे ठरलेले.

मिल्खा सिंग यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन _/\_
(विशेष म्हणजे मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर यांचे ५ दिवसांपूर्वीच कोरोनामुळे दुःखद निधन झाले)

दिलीपकुमार Sad
राज-दिलीप-देव मधला अखेरचा मोहरा. एक प्रदीर्घ पर्व संपलं. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

_/\_

दिलीपसाब - भारतीय सिनेसृष्टितला अभिनयाचा मापदंड. बच्चनसाहेबांनी ट्विट मधे नेमकं लिहिलंय - अ‍ॅन इंस्टिट्युशन हॅज गॉन; व्हेनेवर ए हिस्टरी ऑफ इंडियन सिनेमा इज रिटन, इट शॅल ऑल्वेज बि "बिफोर दिलीप कुमार, अँड आफ्टर दिलीप कुमार"...

भावपूर्ण श्रद्धांजली

दानिश Sad
अफगाणिस्तानचा अष्मयुगाकडे उलट प्रवास सुरु झालाय. तेथील सामान्य जनता आणि आपल्या देशाचीही चिंता वाढवणाऱ्या घडामोडी वेगाने घडत आहेत.
तिकडे दक्षिण आफ्रिकेत गुप्ताकांडामुळे भारतीय मंडळींना खुप त्रास सहन करावा लागत आहे. तिथे राहणारे मायबोली सदस्य कोणी काही सांगु शकेल का जास्त यावर ?

>> सुरेखा सिक्री
>> Submitted by मनिम्याऊ on 16 July, 2021 - 16:49

हो ना, "बालिका वधू" मधल्या आज्जी. RIP.

>> दानिश सिद्दिकी
Sad RIP.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने , दरड कोसळणे आदि नैसर्गिक आघातांमध्ये बळी पडलेल्यांना श्रद्धांजली Sad

सतीश काळसेकर -

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक , कवी प्राचार्य गोपाळराव मयेकर. त्यांनी लिहिलेलं "चंद्र वाटेवरी एकटा चालतो" हे गीत आकाशवाणीवर वाजवले जाते.

श्रद्धांजली Sad !
एकिकडे पूर, दुसरीकडे आग, करोनाने घेतलेले जीव , अनाथ झालेली मुलं आणि बिकट केलेली अर्थव्यवस्था.... कलेक्टीव ट्रॉमा Sad

Pages