दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ज्यांच्या कामामुळे/ संशोधनामुळे आपल्या आयुष्यात मोठा आनंद आपण घेतला आहे किंवा आपलं आयुष्य अधिक सुखाचं, सोयीचं झालं आहे, अशा कित्येकांची आपल्याला नावंही माहिती नसतात >>
अगदी खरं आहे! असं कुणाचं नाव वाचण्यात आलं की अचानक जाणीव होते. एरवी आपल्या आयुष्यात सुतराम ओळखीची नसणारी ही माणसं निधनानंतर ओळखीची व्हावीत, हे जरा चटका लावून जातं. >>

------- सहमत

पुण्यातल्या पंचशील रिऍलिटी चे मुख्य श्री. अभय चोरडिया यांचे निधन. निधन १६ मार्च ला झाले पण बातमी आज आली आहे.
मटा आणि टी ओ आय ला.

अत्यंत दुर्दैवी घटना - रिजर्व बँकेची परीक्षा द्यायला आलेल्या नगरमधल्या एक ऊसतोड कामगाराच्या अपंग मुलाची औरंगाबादमध्ये क्रुर हत्या. यांची परिस्थिती एवढी हलाकीची आहे की त्याला परीक्षेला जायला कुठूनतरी पैसे घ्यावे लागले. घरच्यांना औरंगाबादहून त्याचा मृतदेह आणायला गावकऱ्यांनी पैसे दिले आणि तिकडून येताना रुग्णवाहिकेसाठी पोलिसांनी पैशाची मदत केली. एका होतकरू पोराचा असा दुर्दैवी अंत चटका लावून गेला Sad
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/auran...

So sad.

Sad ... माणसाचे मन अघोरी होऊ नये याकरताही एक लस निघावी असं नेहमी वाटतं अमानुषपणाच्या बातम्या वाचलं की.

होय, हीच बातमी वाचली आत्ता Sad अत्यंत आशयघन चित्रपट देणाऱ्या सुमित्रा भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
त्यांच्या आजाराविषयी काहीच कल्पना नव्हती त्यामुळे बातमी वाचून चांगलाच धक्का बसला!

अरे बापरे! खूपच वाईट बातमी! त्यांचे चित्रपट प्रचंड आवडतात. श्रद्धांजली _/\_
त्यांच्या आजाराविषयी काहीच कल्पना नव्हती त्यामुळे बातमी वाचून चांगलाच धक्का बसला! >> +१

श्रद्धांजली
आवडत्या दिग्दर्शिका आणि व्यक्तिमत्व

अरे बापरे! खूपच वाईट बातमी! त्यांचे चित्रपट प्रचंड आवडतात. श्रद्धांजली _/\_
त्यांच्या आजाराविषयी काहीच कल्पना नव्हती त्यामुळे बातमी वाचून चांगलाच धक्का बसला! >> +१

Pages