Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह, माय गॉड!!
ओह, माय गॉड!!
श्रद्धान्जली __/\__
(No subject)
चंद्रपूर: आनंदवन येथील
चंद्रपूर: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/dr-...
दुःखद आणि धक्कादायक..
दुःखद आणि धक्कादायक..
श्रद्धांजली.
डॉक्टर शीतल यांच्या मायबोली वरील पाऊलखुणा
https://www.maayboli.com/user/11571/created
खूपच वाईट घटना.
खूपच वाईट घटना.
दुःखद घटना. आनंदवनाचा वाद
दुःखद घटना. आनंदवनाचा वाद इथपर्यंत जाईल असे वाटले नव्हते.
उमेदीतल्या माणसांनी आत्महत्या
उमेदीतल्या माणसांनी आत्महत्या करणे वाईट.शितल आमटे यांना श्रद्धांजली!!
लोकसत्ता मधील फोटो फीचर
लोकसत्ता मधील फोटो फीचर बघितले तर त्या सुइसाइडल मनोवृत्तीच्या आजिबात वाटत नाहीत. श्रद्धांजली. काय प्रेशर पडले असेल डोक्यावर कोण जाणे.
शॉकींग
शॉकींग
फारच दुःखद घटना आमटे
फारच दुःखद घटना आमटे कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळो ही प्रार्थना __/\__
आपण मानसिक आरोग्याविषयी खूप जास्त जागरूक असायला हवंय.
फारच धक्कादायक आणि दु:खद
फारच धक्कादायक आणि दु:खद त्या मायबोलीवर होत्या हे माहित नव्हते.
या वर्षीच्या फेब्रुवारी मधला त्यांचा हा व्हिडीओ:
डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं? डॉ. शीतल आमटे
श्रद्धांजली _/\_
नुकताच तो चित्र काढून स्ट्रेस
नुकताच तो चित्र काढून स्ट्रेस घालवावा हा व्हिडीओ बघितला होता. फारच दुःखद . श्रद्धांजली.
बापरे हे मी आजच वाचतोय.
बापरे
धक्कादायक आणि दुःखद
फारच दु:खद आणि धक्कादायक!
फारच दु:खद आणि धक्कादायक! श्रद्धांजली! विडीओत त्या पोस्टपार्टम डिप्रेशन बाबत बोलल्या आहेत, तसेच खेड्यात थेरपिस्ट उपलब्ध नाही तेव्हा तणावावर उपाय आर्ट थेरपी असेही म्हणतात. पुढे या पँडेमिकच्या काळात योग्य मदत मिळणे अजूनच कठीण झाले असावे का? त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सोसायला बळ मिळो.
फारच दु:खद आणि धक्कादायक!
फारच दु:खद आणि धक्कादायक! श्रद्धांजली!
डॉ शीतल यांची बातमी फारच
डॉ शीतल यांची बातमी फारच शॉकिंग ! श्रद्धांजली!
डाॅ शीतल आमटे ह्यांना विनम्र
डाॅ शीतल आमटे ह्यांना विनम्र श्रध्दांजली ! खूपच वाईट बातमी!
फारच वाईट आणि धक्कादायक
फारच वाईट आणि धक्कादायक
भयंकर बातमी. डॉ शीतल याना 6-7
भयंकर बातमी. डॉ शीतल याना 6-7 वर्षाचा लहान मुलगा आहे. त्याचं स्क्रीन एडिक्शन त्यांनी कसं सोडवलं याबद्दलचा त्यांचा लेख व्हॉट्सअपवर वाचला होता.
ही बातमी ऐकल्यावर पहिल्यांदा त्या लेकराचाच विचार डोक्यात आला. डॉ शीतल RIP.
डॉ. शीतल आमटे यांना
डॉ. शीतल आमटे यांना श्रद्धांजली... हे आत्महत्या वगैरे करूच शकत नाहीत, नेहमी positive attitude आणि नेहमी खूप उत्साही होते वगैरे अस काही नसतं हे यातून लक्षात येतं. मानसिक स्थिती बदलूही शकते.
एक चक्रव्यूह, मनाच्या आत का
एक चक्रव्यूह, मनाच्या आत का मनाच्या बाहेर, स्वरचित का परनिर्मित, कौरव कोण आणि पांडव कोण? We shall never know! I hope you have found your answers or peace you were seeking. I hope you have broken the Chakravyuha! Sheetal Amte...gone too soon
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/thane-news/laxman-murdeshwar-owner-of-mamledar-... *ठाण्यातील नामवंत मामलेदार मिसळ चे मालक लक्ष्मण मुरडेश्वर यांचे निधन.*
*झणझणीत आणि लालभडक तर्री असलेली मिसळ सातासमुद्रापार पोहोचवणारे ठाण्याचे प्रसिद्ध मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुरडेश्वर यांचं निधन झालं आहे. ठाण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अल्पशा आजाराने त्यांचे दु:खद निधन झाले आहे.*
*ठाणे स्टेशन परिसरात जिल्हा परिषद कार्यालयाजवळ एका छोट्याश्या जागेतून मुरडेश्वर यांनी मामलेदार मिसळला सुरुवात केली होती.*
*सुमारे १९९२ साली ठाण्यातील मामलेदार कचेरीबाहेर असलेली कॅन्टीन ही नरसिंह मुरुडेश्वर यांना ९९ वर्षांच्या करारावर मिळाली होती.*
*अवघ्या सुमारे ४० स्क्वेअरफुटांच्या जागेतून सुरू झालेला हे उपहारगृह आता ५०० स्क्वेअरफुटाच्या जागेत गेली आहे.*
*मामलेदार कॅन्टीनमध्ये दिवस पहाटे ४ ला सुरू होतो, कँन्टीन जवळपास ७ ला सुरू होते आणि रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असते. दररोज २ ते ३ हजार ग्राहक मिसळ खाऊन जातात. शनिवारी-रविवारी हा आकडा ४ हजारांच्या पुढे जातो. आतापर्यंत १६ ठिकाणी मामलेदार मिसळीच्या फ्रँचाईजी सुरू झाल्या आहेत. एवढंच नाहीतर मामलेदारची मिसळ मंत्रालयातून, जेट एअरवेजसारख्या कंपन्यातून महिन्यातून एकदा तरी मागवली जाते. खास पुणेकर ग्राहक सुद्धा आवर्जुन मामलेदार मिसळ खाण्यासाठी येत असता आणि जाताना सोबत पार्सल सुद्धा घेऊन जातात. पुण्यात सुद्धा मामलेदारची मिसळीच्या फ्रँचाईजी देण्यात आल्या आहेत.*
*मामलेदारची मिसळ खाण्यासाठी स्थानिकच नाहीतर राजकीय आणि परदेशातील नागरिक सुद्धा येत असतात. विधानसभा निवडणुकीच्या काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमित ठाकरे यांच्यासह येऊन मामलेदार मिसळीवर ताव मारला होता.*
*गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण मुरडेश्वर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांनी ठाण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे ठाण्यातील व्यापाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.*
*भावपूर्ण श्रद्धांजली.*
*#कळवा_न्यूज_नेशन #मामलेदार #ठाणे*
विनम्र अभिवादन आणि
विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली _/\_
या मिसळ ला `मामलेदार` नाव कसे मिळाले त्यामागची कहाणी मटा बातमी मधून:
लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांनी १९४६ मध्ये तेव्हाच्या ठाणे मामलेदार कचेरीबाहेरची जागा व्यवसायासाठी शासनाकडून भाडेतत्वावर घेतली होती. तिथे त्यांनी कँटीन सुरू केले आणि अवघ्या सहा वर्षांनी म्हणजेच १९५२ मध्ये नरसिंह मुर्डेश्वर यांचे निधन झाले. त्यानंतर कँटीनची सारी जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर पडली. कँटीनमध्ये अन्य पदार्ध मिळत असले तरी मिसळ ही या कँटीनची ओळख होती. खवय्यांना त्यांच्या मागणीनुसार कमी वा जास्त तिखट मिसळ मिळू लागली आणि बघता बघता या मिसळची चव सर्वत्र पसरली. त्यातूनच या कँटीनला 'मामलेदार मिसळ' असे नावही पडले.
दुःखद
दुःखद
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/at-least-110-civilians-killed-...
नायजेरिया : दहशतवाद्यांनी ११० शेतमजुरांची गळा चिरुन केली हत्या; महिलांना पळवून नेलं
नायजेरियामधील दहशतवादी संघटना बोको हरमने पुन्हा एकदा मोठं हत्याकांड घडवून आणलं आहे. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार बोको हरम या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेने शेतात काम करणाऱ्या ११० लोकांची निर्दयीपणे हत्या केली आहे. बोको हरमच्या दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने केलेल्या या हल्ल्यामध्ये सर्व पुरुषांची गळा चिरुन हत्या करण्यात आली. त्यानंतर या दहशतवाद्यांनी काही महिलांना पळवून नेलं.
(No subject)
MDH मसालेवाले, महाशय धरमपाल
MDH मसालेवाले, महाशय धरमपाल गुलाटी!
धरमपाल गुलाटी यांनी
धरमपाल गुलाटी यांनी श्रद्धांजली!
२०२० साल मरावे असे वाटत आहे.मानवजातीला सगळ्यात जास्त त्रास देणारे साल.
धर्मपाल यांची स्टोरी वाचली
धर्मपाल यांची स्टोरी वाचली होती.जाहिरातीत पाहून पण मस्त वाटायचं.(जाहिरातीत पाहूनच कुतूहल वाढलं.)
श्रद्धांजली. 98 पर्यंत अत्यंत परिपूर्ण आयुष्य ते जगले असावेत अशी आशा.
MDH मसालेचा चेहरा असणारे
MDH मसालेचा चेहरा असणारे आजोबा श्री. धरमपाल गुलाटी यांचे निधन
फाळणीच्या वेळी नेसत्या वस्त्रानिशी भारतात आलेल्या या टीनेजरने अथक कष्टांच्या जोरावर ‘मामे दी हट्टी’ हा उद्योग निर्माण केला. अमृतसरच्या पार्टीशन म्युझिअममधे त्यांची यशोगाथा लिहीली आहे.
सलाम धरमपाल गुलाटी...
Pages