दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> आंदोलनातून पुढे आलेल्या नेतृत्वाची वयोपरत्वे अखेर होण्यास सुरुवात झाली आहे

लढवय्या व्रतस्थ पत्रकार दिनू रणदिवे मागच्या जून मध्ये गेले. "सिंहासन" मधली निळू फुलेंचे "दिगू" हे पात्र त्यांच्यावर आधारित होते.

https://marathi.thewire.in/dinu-randive-journalist-by-virtue

.

RIP

ओह! Sad
भावपूर्ण श्रद्धांजली शॉन आणि अ‍ॅलेक्स.
अ‍ॅलेक्स म्हणजे घराघरात पोहोचलेला चेहरा जो ऑलमोस्ट तीन पिढ्यांना आपलासा वाटला.

अ‍ॅलेक्स ट्रिबेक... हे लिहीताना मझ्या डोळ्यात अश्रु आहेत.

त्याच्याशिवाय... जेपर्डी हा माझा सगळ्यात आवडता गेम शो बघताना ..त्याचाच आवाज व चेहरा सतत डोळ्यासमोर येइल. १९८५ ला मी माझा पहिला जेपर्डी शो बघितला.. व इन्स्टंटली मी त्या शोच्या व अ‍ॅलेक्स ट्रिबेकच्या.. नो नॉन सेंस व कमांडींग होस्टींग स्टाइलच्या प्रेमात पडलो.

माझ्या लहानपणी मी भारतात असताना रेडिओवर.. कॅटबरी स्पॉन्सर्ड.. बॉर्नव्हिटा क्विझ काँटेस्ट हा रडिओ शो.. (अमिन सायानी त्याचा होस्ट होता).. दर रविवारी दुपारी ऐकायचो.. इथे अमेरिकेत शिकायला आल्यावर.. जेपर्डी शो बघताना मला त्या बॉर्नव्हिटा क्विझ शोची आठ्वण यायची.

व्हॉट अ होस्ट! रेस्ट इन पीस अ‍ॅलेक्स!

अरेरे...
चांगले अभिनेते होते.
काय पो चे आणि ब्लॅक फ्रायडे मधले काम आठवते.

ओह Sad

ओह
नाव माहिती नव्हते पण यांची कामं आठवतात खूप हिट पिक्चर्स मध्ये.जब वी मेट मध्ये चमाट दो म्हणणारा स्टॉल वाला.
चांगले अभिनेते होते.

असिफ बसरा यांचा फोटो बघून 'कुठेतरी काम बघितलंय' असं वाटत होतं. आता वाचल्यावर आठवलं की ताशकंत फाईल्समध्ये एडिटरचा मोठा आणि महत्वाचा रोल त्यांनी फार सुरेख केला होता. गुणी अभिनेता होता. भावपूर्ण श्रद्धांजली.

Tarun Gogoi

ओह मॅराडोना! अत्यन्त हलाखीच्या परिस्थितीतून ते विख्यात फुटबॉलपटू. नन्तर त्याचा डाऊनफॉल, ड्रग्स, अतिस्थूलता, त्यातूनही बाहेर येणे, मग घरगूती हिंसाचारची केस... अशा अनेकविध चढउतार मधून गेलेले वादळ. अखेर लयास गेले Sad

वरुण बडोलाचे वडील नट होते हे आत्ता समजले, ते गेल्यावर. मुन्ना भाई मध्ये कोणती भूमिका केली होती त्यांनी.
भावपूर्ण श्रद्धांजली.

भारत भालके पैलवान होते.राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार होते.भावपुर्ण श्रद्धांजली!

Pages