दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

MDH चा विस्तार ‘महाशयां दी हट्टी’ असा आहे. धरमपाल गुलाटी यांच्या श्रद्धांजलीच्या पोस्टमधे तो उलेलेख चुकीने ‘मामे दी हट्टी’ असा केला होता.

श्रद्धांजली
खूप मस्त प्रेमळ बाप चेहरा होता यांचा

त्यांचा आवाज अतिशय distinct होता.
मला ढगांच्या गडगडाटासारखा वाजवायचा.
सोहराब मोदींसारखा.

अरेरे! रवी पटवर्धन गेले Sad घरी टीव्ही नवीनच आला होता तेंव्हा "आमची माती आमची माणसं" मधल्या "गप्पागोष्टी" मधले त्यांची भूमिका अजूनही आठवते. रुबाबदार आवाज भारदस्त व्यक्तिमत्व. त्यांचे नाव माहित नव्हते तरीही ह्या व्यक्तिरेखे साठी तो कार्यक्रम आवर्जून बघितला जायचा.

नरेंद्र भिडे कॉलेजमधे सिनिअर होता, फिरोदिया , पुरूषोत्तम करंडक स्पर्धा गाजवणारा.
फिरोदियात त्यानं गायलेलं गाणं अजूनही डोळ्यासमोर आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली

जॉन ले कार Sad
द रायटर व्हू केम इन फ्रॉम द रिअल वर्ल्ड! श्रद्धांजली Sad

एरोस्पेस इंजिनीअरिंग क्षेत्रातील प्रथितयश संशोधक, पद्मविभूषण प्रोफेसर रोद्दम नरसिंह यांचं दुःखद निधन झालं. भारतातील अगदी मोजक्या फेलोज ऑफ दि रॉयल सोसायटी पैकी ते एक होते. याशिवाय Indian Academy of Sciences, US national Academy of Science, US national academy of engineering, AIAA ह्या सर्वांचे ते fellow होते. बंगलोरला आय आय एस सी मध्ये वातावरण आणि समुद्री विज्ञान विभाग उभा करण्यात आणि नावारूपाला आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

आधुनिक मूत्रपिंडशास्त्राचे पितामह म्हणून गौरविलेले डॉ.
Donal O'Donoghue यांचे नुकतेच कोविडमुळे निधन झाले. त्यांना संशोधन कार्याबद्दल २०१८ मध्ये ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर हा मानाचा पुरस्कार मिळाला होता.

आदरांजली.

https://www.loksatta.com/maharashtra-news/fire-brokeout-in-bhandara-dist...

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अत्यंत दुःखद घटना. मन अगदी सुन्न झालंय. मागे पण नागपुरात अशीच घटना घडली होती म्हणे. असं कसं अचानक शॉर्ट सर्किट होऊ शकतं? असं टाळण्यासाठी काही उपाययोजना का नाही करत ही मोठी हॉस्पिटल्स? त्या बाळांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी जीव तुटला अगदी. देवा अशी वेळ कोणावरही नको आणू.

Pages