दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भंडारा: कल्पनासुद्धा करता येणार नाही इतकी ह्र्दय विदारक घटना !! Sad >>> खरंच फार भयानक घटना आहे. सगळ्या बाबतीत माझं इमॅजीनेशन जरा जास्त असतं, त्यामुळे या घटनेचा विचार करून फार त्रास होतो आहे.

Sad
भंडारा घटना भयंकर आहे. परत असे कधीही काहीही न होवो इतकंच म्हणता येतं.

इंडोनेशिया विमान दुर्घटनेतल्या ७० जणांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

अघोरी विद्येच्या नादात प्राचार्य वडील आणि गणितात गोल्ड मेडलिस्ट आईने स्वतःच्या दोन तरुण मुलींची निर्घृण हत्या केली. निःशब्द झालो वाचून. शिक्षणाचा आणि सारासार विवेकाबुद्धीचा सम्बन्ध नसतो हेच दिसते यातून.
https://www.ndtv.com/india-news/andhra-pradesh-couple-allegedly-kills-da...

रणधीर कपूर व ऋषी कपूरच्या सर्वात धाकट्या भावाचे राजीव कपूर चे निधन. रणधीर च्या नशीबी दोन्ही लहान भावांचे म्रुत्यू पहाण्याची शिक्षा..!!

राजीव कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!

ओह... श्रद्धांजली !!
राजीव कपूर म्हटले कि "राम तेरी..." मधले 'मुझको देखोगे जहां तक' गाणे आठवते.

श्रद्धांजली

रणधीर कपूरचे दोन भाउ आणि १ बहिण ( अमिताभ - जयाच्या विहिणबाई) एकामागोमाग फार लवकर गेले. फार दु:खद

https://www.loksatta.com/pune-news/pune-marathi-instagram-star-sameer-ga...
हे आपल्या ओळखीचे कोणी नसावे अशी अपेक्षा Sad
नम्र श्रद्धांजली.
(यातून 'ओळखीचे असले तरच श्रद्धांजली' असा अर्थ निघत असला तरी मनात तसे नाहीये.खूप लोकप्रिय इन्स्टा टिकटॉक स्टार सध्या हे पाऊल उचलतायत. प्रसिद्धी, गुण सर्व असताना असं का करावं वाटतं कळणार नाही. :()

>>>>प्रसिद्धी, गुण सर्व असताना असं का करावं वाटतं कळणार नाही.>>> खरे आहे Sad त्यांनी आजच सकाळि म्हणे एक व्हिडिओ पोस्ट केला होता. किती विरोधाभासी आहे या २ कृती.

आधी फोटो पाहीलाच नव्हता. समीर गायकवाड म्हणल्यावर धक्काच बसला, कारण आपल्या मायबोलीचे सामाजीक कार्यकर्ते यांचे नाव पण हेच आहे. पण फोटो पाहील्यावर सविस्तर कळले, तरी वाईट वाटले. Sad कशाचा एवढा टोकाचा निर्णय घेतात ही मुले ? आई बापाची काय अवस्था असेल ? Sad

वामनराव अभ्यंकर - ज्ञानप्रबोधिनी चे हृषीतुल्य व्यक्तिमत्त्व!

मुथुट फायनान्स चे चेअरमन जॉर्ज मुथुट Sad
श्रीकांत मोघेना श्रद्धांजली. तया निमित्ताने जुने वाऱ्यावरची वरात च्या क्लिप परत पाहिल्या.देखणे अभिनेते होते.

साप्ताहिक सकाळचे माजी संपादक सदा डुंबरे यांचं फेब्रुवारी अखेरीस कोविडमुळे निधन झालं. त्यांना श्रद्धांजली _/\_

संध्या टाकसाळे यांनी त्यांच्यावर लिहिलेला लेख इथे वाचता येईल.
https://weeklysadhana.in/

Submitted by हरचंद पालव on 11 March, 2021 - 03:38
>> ज्यांच्या कामामुळे/ संशोधनामुळे आपल्या आयुष्यात मोठा आनंद आपण घेतला आहे किंवा आपलं आयुष्य अधिक सुखाचं, सोयीचं झालं आहे, अशा कित्येकांची आपल्याला नावंही माहिती नसतात याची नव्याने जाणीव झाली Sad
लू ऑटेन्स यांना श्रद्धांजली. _/\_

>> ज्यांच्या कामामुळे/ संशोधनामुळे आपल्या आयुष्यात मोठा आनंद आपण घेतला आहे किंवा आपलं आयुष्य अधिक सुखाचं, सोयीचं झालं आहे, अशा कित्येकांची आपल्याला नावंही माहिती नसतात

+१११ अगदी मनातले! मला खरेच वाटले मीच आधी लिहिलेले आहे कि काय. परवाच यावर मित्रांसोबत चर्चासुद्धा झाली. टेबल फॅन पासून जेट इंजिन पर्यंत, रोजच्या आयुष्यात आजूबाजूला ज्या गोष्टी दिसतात (अगदी साध्या साध्या जसे कि रेझर ब्लेड, टॉयलेट पेपर इत्यादी) त्यातल्या अनेकांमागे संशोधने आहेत, पेटंटस आहेत, कहाण्या आहेत. बहुमुल्य वेळ/आयुष्ये खर्ची घातलेली आहेत संशोधकांनी. आपल्याला फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे माहित असतात.

लू ऑटेन्स यांना श्रद्धांजली. _/\_

>> सदा डुंबरे... कोविडमुळे निधन

ओह! सदा डुंबरे म्हटल्यावर अजूनही साप्ताहिक सकाळच आठवतो (and vice-versa). श्रद्धांजली. _/\_

टेबल फॅन पासून जेट इंजिन पर्यंत, रोजच्या आयुष्यात आजूबाजूला ज्या गोष्टी दिसतात (अगदी साध्या साध्या जसे कि रेझर ब्लेड, टॉयलेट पेपर इत्यादी) त्यातल्या अनेकांमागे संशोधने आहेत, पेटंटस आहेत, कहाण्या आहेत. बहुमुल्य वेळ/आयुष्ये खर्ची घातलेली आहेत संशोधकांनी. आपल्याला फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे माहित असतात.>>> हो ना.

ज्यांच्या कामामुळे/ संशोधनामुळे आपल्या आयुष्यात मोठा आनंद आपण घेतला आहे किंवा आपलं आयुष्य अधिक सुखाचं, सोयीचं झालं आहे, अशा कित्येकांची आपल्याला नावंही माहिती नसतात >> अगदी खरं आहे! असं कुणाचं नाव वाचण्यात आलं की अचानक जाणीव होते. एरवी आपल्या आयुष्यात सुतराम ओळखीची नसणारी ही माणसं निधनानंतर ओळखीची व्हावीत, हे जरा चटका लावून जातं.

Pages