दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक ऋषितुल्य, तेजस्वी व्यक्तीमत्त्व आपले कार्य संपवून पंचतत्त्वात विलीन झाले. श्रद्धांजली >>> अगदी अगदी.

फेफ यांनी मिपावर लिहीलेले वाक्य एकदम पटले म्हणून ते येथे:

सार्वजनिक जीवनात एखाद्याच्या निधनानं इतकं वैय्यक्तिक दु:ख वाटावं अशी माणसं विरळा

बाबासाहेब पुरंदरे, भावपूर्ण श्रद्धांजली.

हा धागा चर्वितचरणाचा नाहि, पण कोणि दुसरा धागा काढला तर माझं मत मांडेन. लेनचं पुस्तक खूप पुर्वी वाचलेलं आहे…

१९९३ च्या दरम्यान दूरदर्शनवर दर आठवड्याला प्रक्षेपित होणाऱ्या "परख" या कार्यक्रमातून विनोद दुआ यांची बहुतेकांना ओळख झाली. अतिशय संयमित आणि नेमकेपणाने मुद्द्यावर बोलणारा पत्रकार म्हणून ते तेंव्हा अल्पावधीतच लोकप्रिय झाले. तेंव्हा आम्ही विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात परख सारखा कार्यक्रम केला होता. विनोद दुआ यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

विनोद दुआ यांचे निवडणूकां बद्दलचे विश्लेषण (प्रणव रॉय सोबत) आवडीने बघायचो. त्यांच्या मुळेच मला निवडणूका निकालांबद्दल आवड निर्माण झाली.

अभ्यासू पत्रकार होते आणि हिंदी तसेच इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. : अरेरे: गेले कळल्यावर वाईट वाटले.

श्रद्धांजली.

त्यांचा भटकंती फूड शो पण मला आवडायचा. वेगवेगळ्या ठिकाणचे खाद्यपदार्थ त्यात होते. नाव विसरले.

भारताचे सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलिकॉप्टरमधील एकूण १४ व्यक्तींपैकी १३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh/iaf-helicopter-carrying-gen-bipin-r...

हेलिकॉप्टर दुर्घटना फार वाईट Sad श्रद्धांजली . रावत लवकर बरे होऊदेत.

नागालँड सामान्य नागरिकांचा दुर्दौवी मृत्यु >>> Sad श्रद्धांजली.

जायका इंडिया का. >>> हो बरोबर.

रावत पण गेले असं आत्ता डिकलेअर केलं, त्यांच्या पत्नीही होत्या सोबत Sad श्रद्धांजली .

जनरल बिपीन रावत, ब्रिगेडीअर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, नायक विवेक कुमार, नायक बी. साई तेजा, हवालदार सतपाल, अपघातग्रस्त इतर संरक्षण कर्मचारी व श्रीमती मधुलिका रावत यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली…

लष्कराच्या सर्वोच्च पदावरच्या अधिकार्‍याचा असा अपघाती मृत्यु होणं खुपच दु:खदायक आहे.
सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.

>> जनरल बिपीन रावत, ब्रिगेडीअर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, नायक विवेक कुमार, नायक बी. साई तेजा, हवालदार सतपाल, अपघातग्रस्त इतर संरक्षण कर्मचारी व श्रीमती मधुलिका रावत

धक्कादायक! भावपूर्ण श्रद्धांजली Sad

जनरल बिपीन रावत, ब्रिगेडीअर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, नायक विवेक कुमार, नायक बी. साई तेजा, हवालदार सतपाल, अपघातग्रस्त इतर संरक्षण कर्मचारी व श्रीमती मधुलिका रावत यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली…. >>>> भावपूर्ण श्रद्धांजली! __/\__

डॉ सुरेश जाधव
Dr Jadhav was instrumental in setting up the Developing Countries Vaccine Manufacturing Network. He represented Serum Institute of India on the GAVI board and was also instrumental in liasioning with national and international regulatory authorities. He played a pivotal role in getting WHO pre-qualifications for several products,.
Besides his role in quality control and regulatory affairs, he was the international face of Serum Institute of India
Jadhav was instrumental in the development of Covishield vaccine

Pages