Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नम्रता तुम्ही पुण्यात आहात मग
नम्रता तुम्ही पुण्यात आहात मग सिताफळ रबडी वैगरेही जमुन जाइल.
मी houston texas ला आहे गेली
मी houston texas ला आहे गेली १० वर्षे ..मला profile update करायचा आहे
प्राजक्ता , धन्यवाद ..मेनू
प्राजक्ता , धन्यवाद ..मेनू छान वाटतोय
मस्त! Happy
मस्त! Happy
अशी थीम्ड जेवणं करणं ही किती छान कल्पना आहे आपल्या पूर्वजांची!
ग्रेट.
आपण त्यात अजून नाविन्य पूर्ण भर घालू शकतो
उदा
कोवळ्या उन्हातले
सागर किनार्या वरचे
वनातले / टेंट मधले
होडीतले>>>>
बागेतले, झोपाळ्यावरचे, ई. डोहाळ जेवणे बघीतली आहेत.
एक तर फारच मस्त होते - मोगरा डोहाळजेवण. डेकोरेशन, डोहाळतुळीला दागिने - सगळं मोगरयाचं.
कोथिंबीर वडी, फिश फिंगर्स्
कोथिंबीर वडी, फिश फिंगर्स्/चिकन कबाब..स्टार्टर
मींट लिंबू सरबत्/जलजिरा
दाल फ्राय, जिरा राईस, दम आलू/आपली पिवळी बटाटा भाजी, चिकन टिक्का मसाला किंवा मस्त बांगडा कालवण, अज्वाईन पराठा/चपात्या, मठ्ठा.
गोड- शेवया खीर/शिरा आवडते अमराठी लोकांना. बाकी गुजा, हलवा त्यांच्या साठी तसे नेहमीचेच आहे. आयते रसमलाई/मलाई सँड्वीच पण ठेवू शकता. किंवा व्हॅनिला आईस क्रीम्+ब्राऊनी
झाली का तुमची पार्टी? कि येत्या वीकेंड ला आहे?
पार्टी पुढल्या रविवारी आहे..
पार्टी पुढल्या रविवारी आहे.. पण मला guests पैकी एका ने फोन करून झणझणीत मिसळ ची फर्माईश केली आहे म्हणून खालील मेनू ठरवला आहे..थोडा मिक्स न मॅच टाईप झालाय...
कोथिंबीर वडी
छोले - आलू टिक्की चाट
चिकन अँपेटीझर (मेनली फॉर kids )
व्हेज बिर्याणी
रायता / सालन
मिसळ पाव
रायता केला नाही तर थोडा दही भात
sweet - कॉम्बिनेशन ऑफ गाजर हलवा , गुलाब जाम (विकत आणून) , वॅनिला आईस्क्रीम
मस्त menu आहे, तो पा सु
मस्त menu आहे, मेहनत करावी लागेल
तो पा सु
पण मला guests पैकी एका ने फोन
पण मला guests पैकी एका ने फोन करून झणझणीत मिसळ ची फर्माईश केली आहे >>> अरे वा भारीच.
सर्व मेन्यू मस्त आहे.
नम्रता तुमच्याकडे यायला
नम्रता तुमच्याकडे यायला पाहिजे पार्टिला, मेनु भारी आहे.
मस्त मेनू. एंजॉय.
मस्त मेनू. एंजॉय.
बटाटेवड्यांची पण येते फर्माईश पण भारी कुटाणा पडतो..
धन्यवाद किल्ली , अन्जू ,
धन्यवाद किल्ली , अन्जू , प्राजक्ता आणि aashu29 ..
प्राजक्ता , नक्की ये houston ला आलीस कि , मला मनापासून आवडते पाहुणचार करायला आणि खवय्ये असतील तर अजूनच मजा येते .. btw पार्टी झाली कि इथे फोटो टाकते
माझ्या मैत्रिणीला 150 जणा
माझ्या मैत्रिणीला 150 जणा साठी पालक पनीर ची ऑर्डर आहे. इफ्तार पार्टी आहे. ही एकच veg dish आहे बाकी सगळ नॉन वेज आहे. तर पनीर आणि पालक च प्रमाण किती लागेल. सोमवारची ऑर्डर आहे. Please मदत करा.
1 जुडी पालक आणि 200 ग्रॅम
1 जुडी पालक आणि 200 ग्रॅम पनीर या प्रमाणात केलेल्या भाजी 4 जणांना सहज पुरते.त्यावरून 150 लोकांना किती साहित्य लागेल हे पाहायला सांगा.
नाही तसे calculation करून
नाही तसे calculation करून जमणार नाही. सर्वजण पालक पनीर खातीलच असेही नाही. त्यामुळे जर (फक्त) पालक पनीर चीच भाजी आहे असे समजून अंदाज काढला तर खूप जास्त होईल.
120 जणांना ... आठ जुड्या पालक व दोन किलो पनीर पुरे व्हावे.
आंगो सारखंच सुचवीन. दोन
आंगो सारखंच सुचवीन. दोन जुड्यांची प्युरी व पनीर जास्तीचं फ्रीजमध्ये ठेवायचं ... कमी वाटलं तर लगेच करता येईल.
जनरल गेट टुगेदर साठी टोटल ७
जनरल गेट टुगेदर साठी टोटल ७ जण येणार आहेत.. साधारण बेत खालील प्रमाणे आहे.
स्टार्टर : बटाटे वडे, एअर फ्रॉईड फ्राईस विथ Belgium sauce
मेन: मिसळ पाव, मसाले भात
जोडीला ताक, चिप्स, सलाड असं चाऊ म्याऊ..
मिसळीसाठी किती मटकी लागेल.? ४०० ग्राम भिजत घातलिये.. ती जास्तच होईल असं वाटतंय..
आणि बटाटे वड्यांसाठी किती बटाटे? मध्येच आहेत हे consider करून
बटाटे वडे व फ्राइज एकच
बटाटे वडे व फ्राइज एकच आयटेमचे पक्षी बटाट्याचे होइल का? त्या ऐवजी कोथिंबीर वडी व फ्राइज करता येइल.
एक किलो बटाटे उकडून त्याचे सारण आदल्या दिवशी बनवून ठेवावे फ्रिज मध्ये. लागेल तसे घ्यावे आयत्यावेळी तळायला.
मटकी अर्धा किलो तरी लागेल.
मसाले भात छानच आहे पण उन्हाळ्यात पोटाला जड असे वाटले तर छान पैकी दही बुत्ती करा. बाकी अनुभवी माबोकरणी करेक्ट प्रमाण सांगतीलच.
गोडात काय करणार? मँगो श्रीखंड/ आमरस/ फ्रुट सलाड नाहीतर गरम गुलाब जामुन व व्हॅनिला आइसक्रीम / गाजर हलवा व व्हॅनिला आइसक्रीम / रसमलाई केक.
धन्यवाद अश्विनी मामी.. दोन्ही
धन्यवाद अश्विनी मामी.. दोन्ही आयटेम बटाट्याचे होत आहेत हा चांगला पॉइंट सांगितला तुम्ही.. fries फ्रोजन होते म्हणून add केले .. ऐन वेळी फक्त seasoning करून एअर फ्राय केले की झालं.. वडे गाळते मग.. कोथिंबीर वडी हे चांगलं ऑप्शन आहे..
कांदा भजी हे एक आत्ता सुचलं.. बघुया काय सोपं जाईल..
दही दोघा तिघांना आवडत नाही.. नाहीतर मिसळीला सोबत काहीतरी थोडं कमी मसालेदार चा ऑप्शन दही बुत्तीचा छान च होता..
गोडाचे ऑप्शन पण छान सुचवले तुम्ही..
ते out source केले आहे.. येणारे खीर बनवून आणणार आहेत.. नंतर समारोप मिल्कशेक नी करू.. चॉकलेट किंवा मँगो
बाकी ईथे अजूनही जाड जॅकेट घालावे लागत आहेत हो.. उन्हाळ्याची मनापासून वाट बघत आहे..
सत्यनारायण पूजेच्या तीर्थ
सत्यनारायण पूजेच्या तीर्थ-प्रसादाला येणाऱ्यांसाठी पोटभरीची काय डिश करता येईल? कार्यक्रम संध्याकाळचा आहे शक्यतो मराठी आणि सहसा न केले जाणारे पदार्थ करायची इच्छा आहे. इथे आत्ता थंडीचे दिवस आहेत. मटार उसळ, ब्रेड, भाजणीचे वडे, पुलाव आणि प्रसादाचा शिरा हे डोक्यात आहे पण अजून चांगला पर्याय मिळाला तर छान होईल. कारण मटार उसळ खूप पुणेरी ममव होईल असा वाटतंय . मदत करा लोकहो.
मराठी मेनू हवा तर ब्रेड नको,
मराठी मेनू हवा तर ब्रेड नको, आणि पुलावाऐवजी मसालेभात करा. जोडीला कोथिंबिरीच्या किंवा अळूच्या वड्या, खमंग काकडी, पापड असं करता येईल.
होय.. आणि थोड्या तिखट
होय.. आणि थोड्या तिखट मिठाच्या पुर्या, चटणी, मसालेभात, खमंग काकडी, लोणचे, प्रसादाचा शिरा!
गरम हवेच असल्यास टोमॅटो सार/ कढी
(इथे उकाडय़ामुळे गरम सार कल्पनेतही नको वाटतेय!!)
मिसळ पाव, दही बुत्ती, पाटवडी
मिसळ पाव, दही बुत्ती, पाटवडी.
किंवा गरम पोहे वर शेव,
किंवा गरम पोहे वर शेव, बटाटेवडे, शिरा
खवा पोळी , बटाटेवडे चटणी ,
खवा पोळी , बटाटेवडे चटणी , दहीभात/मसालेभात . एका केळवण साठी केला होता . खवा पोळी आणि बटाटेवडे ऑर्डर केले होते . भात घरी आधी करून ठेवला .
पल्लवी, ढोकळा चटणी, शेव पुरी
पल्लवी, ढोकळा चटणी, शेव पुरी हे चांगले ऑप्शन आहेत.
>>>>>>>गरम पोहे वर शेव,
>>>>>>>गरम पोहे वर शेव, बटाटेवडे, शिरा
बेस्ट!!
धन्यवाद स्वाती, आंबट-गोड, अमा
धन्यवाद स्वाती, आंबट-गोड, अमा, अश्विनी९, आशु आणि सामो! खूप छान छान पर्याय आहेत. मला ढोकळा, पोहे असा कमी तेलकट आणि पोटभरीचं आवडला असतं , पण आई बाबा सध्या इथे आहेत आणि त्यांना हे फार साधं वाटतंय. मिसळ पाव(म्हणजे ज्यांना पाव नाही खायचा ते नुसती मिसळ खातील), दही बुत्ती आणि गरम गरम गाजर हलवा हा बेत बहुदा फायनल होईल. मिसळ करून देणारं कोणीतरी मिळायला हवं
11 लोकांच्या पावभाजी साठी
योग्य धाग्यावर प्रश्न हलवला आहे
अंदाज किती घ्यावा? https:/
अंदाज किती घ्यावा? https://www.maayboli.com/node/57552
पावभाजी १४ किलो भाज्यांची https://www.maayboli.com/node/72251
धन्यवाद भरतदादा
धन्यवाद भरतदादा
Pages