बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो! तुम्ही पण ज्येना होणार आहात ते लक्षात ठेवा! मूग डाळ खिचडी आणि वरण भात बेत सुचवाल तर देव बघतोय हा! ..... Lol

अगदी खरे आहे.ज्ये ना चाट items, पिझा आवडत नाही त्यांच्यावर लादलेले आहे.आमची ज्यें ना आवडीने हे खाते पचवते.

नाहीतर सरळ त्यांनाच विचारा काय आवडेल Happy
पहिल्या दिवशी खिचडी खाऊ दे(मी काय खिचडी चा मुद्दा सोडत नै बघा), मग पोट आणि झोप सेट झाली की द्या पाहिजे तितके पिझ्झा टाको क्वासेडिया Happy

पिझ्झा बेस वर मुगाची खिचडी, तूप, चीझ आणि टॉपिंगला सन ड्राइड टोमॅटोज्, ऑलिव्ह्ज, बेल पेपर्स वगैरे घालून मांडवली करून टाका.

ओहो बरीच मते व मेन्यू आले!! धन्स सगळ्यांना. रात्रीच्या जेवणाचे निम्मे प्रकार मी दुपारीच करून ठेवणार आहे फक्त आयत्यावेळी भात लावणार व कोणाला हव्या असल्या तर पोळ्या/ फुलके करणार (मी माझा नवरा व एक भाची मिळून टोटल ९ लोक जेवायला असणार आहेत )
आमटी, भाजी व शिरा हे दुपारीच करणार आहे. कणिक भिजवून ठेवीन , ते लोक आल्यानंतर त्यांच्या घोळात मला आयत्यावेळी उपमा , पोहे तत्सम काही बनवा हे जमणार नाही मला ते करायचेच नाहीये, बाकरवडी इथे(मी जिथे राहते तिथे केवळ एक तामिळ श्रीलंकन स्टोर आहे ) सर्रास मिळत नाही, आणि त्यातले स्वतःच पुण्याहून बाकरवडी आणणार आहेत Proud
कुरमुऱ्याची भडंग करून ठेवेन आज
या आधी कधी परदेश प्रवास / परदेशी खाणे जास्त खाल्ले नसल्यास चीझ आणि कच्चे टॉमेटो / बेसिल हे अगदी पहिल्या दिवशी देऊ नका.>> जोरदार सहमत जरीही यातले सर्वच्या सर्व लोक नियमित परदेशवारी करणारे आहेत, तरी हा option नकोच (पैकी ३ ज्ये ना पुढे २ weeks नी अमेरिकेला रवाना होणार आहेत)

तात्पर्य : कोथिबिर वड्या (उंडा आदल्या दिवशी उकडून सकाळी वड्या पाडून ते येण्याच्या आधी शॅलो फ्राय करून ठेवेन ), शिऱ्याच्या छोट्या मुदी , खारी /टोस्ट ,बिस्किट जरा जास्त चहा हे करेन.
येणारे सर्व लोक टिपिकल कोल्हापुरी देशस्थ घोळेश्वर आहेत, (दिवा व त्यांच्या अगणित माळा घ्याच )इतके कि जेवायचे कुठे व काय याची २ तास चर्चा करून चप्पल घालून आता बाहेर जायला निघाल्यावर बेत रद्द होऊन घरीच जेऊ या असे ठरते. त्यामुळे wish me luck Proud and stay tuned हाहा Lol

अंजली शेवटचा पॅरा बेस्ट आहे. मस्त ठरवलं आहेस , पाव्हणे घोळ वाले असले आणि नसले तरी जास्तीत जास्त ते यायच्या आधी करून ठेवायला फारच अनुमोदन , मी हेच करते. पाव्हणे आले की काही सुचत नाही. एकदा आयत्या वेळी भात लावू या म्हणून कुकर तयार करून ठेवला , सगळे आल्यावर बोलण्याच्या नादात सरबसरले आणि विसरले . जेवताना कुकर उघडला तर नुसते तांदुळ Happy नशीब जेवायला बसायच्या आधी उघडून बघितला. तेव्हा पासून कुकर ही करून ठेवते नाहीतर फोन मध्ये reminder तरी लावून ठेवते.
अनु तू खिचडी खिचडी म्हणतेयएस पण त्यातले काही शुगर वाले असतील तर ? हा पॉईंट आहे ना

ममो >> Lol !!
तुम्ही सगळे कसली खिचडी म्हणताय ते कळले नाही >> साखि असेल तर अजिबात शक्य नाही कारण इथे साबुदाणे मिळत नाहीयेत गेले काही महिने.. ते बारीक असतात तसले मिळतायत
आणि साधी(मूग डाळ खिचडी) खिचडी व टोमॅटो सार हा option बरा आहे पण ९ जणांची खिचडी आयत्या वेळी मला जमेल कि नाही शंका आहे कारण मी कधीच बाहेर पातेल्यात अशी खिचडी केली नाहीये इतके मोठं पातेले हि नाहीय , आणि लोक सतत आत येऊन ढवळी पवळी करणार .. नकोच ते
मी कायम कुकर मध्येच केली आहे खिचडी ते हि max ३-४ लोकांसाठी तेवढ्याने माझा कुकर भरतो (साडे ३ ltr चा आहे बहुतेक )

मी dinner ही बेताचेच करणार आहे अगदी एखादा bowl प्रत्येक गोष्टीचा शिल्लक राहील इतकेच, त्यातून उरले तरी दुसऱ्या दिवशी दुपारी जेवायला त्यातले ४ लोक नसणार आहेत so उरलेले लंच मध्ये संपून जाईल ५ जणांच्यात
शुगर वाले कोणी नाहीयेत

बाप्रे.. अचानक इतक्या कमेंट बघुन उत्साहाने बघायला आले मी काय विशेष घडलं म्हणुन.
६ ज्येनां ची परदेशवारी आणि त्याबद्दल होस्ट ची तयारी वाचुन मजा आली.
अंजली, तुम्ही ठरवलेला मेनु छानच आहे... प्रवासात कंटाळल्यामुळे फार खाल्ला गेला नाही तरी रात्री जेवणात पण खपुन जाईल.
आणी शिवाय वेळी अवेळी प्रवास, विमानात खाणं झालंय आता भुक नाही असं पाहुणे म्हणले तर उगीच दुसरे काही पदार्थ करुन वाया जायला नको.

एकांनी सीमांत पूजनात खिचडी कढी चा मेनू ठेवला होता.लोकांनी नावं ठेवली >> कोणतं म्हणे हे शहर ? आमच्या इथे सातारा,कर्‍हाड,सांगली भागात खास कढी खिचडी, अननस शिरा, वांग्याची भाजी, दाण्याची चटणी असाच मेनु असतो सिमांत पुजनाला. आणि कार्यालयातली कढी खिचडी सारखी चव घरी येत नाही असं माझं ठाम मत आहे. Wink

रच्याकने, ज्यांना भात गरम लागतो/करायचा/ठेवायचा आहे आणि राईस कुकर नाहीय/वापरला नाही; त्यांच्या करता - नेहेमीप्रमाणे भात, पुलाव खिचडी इ. करून घ्यायची अन ज्यावेळी खायला वाढायला घ्यायचं आहे त्यावेळी मोजून ४-५ मिनिटं मोठ्या आचेवर गरम करायचा कुकर.
आतला पदार्थ चांगला गरम होतो, तळाला लागत वगैरे नाही.

अमा 2 गोष्टी

1. कांदा पातळ कापून कुरकुरीत तळून टप्परवेअर मध्ये फ्रीज मध्ये ठेऊन द्या
बिर्याणी वर घालून खायला मस्त लागतात.

2. कांद्याची पावडर बनवा. रेसिपी गूगल वर मिळून जाईल. पास्ता आणि बऱ्याच रेसिपी मध्ये घालता येईल....

काल या धाग्याची आठवण झाली.माझ्याकडेही पांढऱ्या कांद्याची माळ आली चिमुकले आहेत.मोत्याचा घोस दिसावा तसे दिसताहेत.
आधी 5-६ किलो कांदे आहेत.आता हे किलोभर असावेत.पण रहातात.

भारी! मला फार आवडतात ते पांढरे कांदे (आणि त्यांची माळ बघायलाही - मोत्यांचा घोस अगदी बरोब्बर म्हणालात!) Happy
उन्हाळ्यात मऊ भात, दही आणि कच्चा पांढरा कांदा ही आवडती आणि जीव थंड करणारी न्याहारी असायची! मुगाच्या खिचडीतही अख्खे घातलेले बेष्ट लागतात ते!

मित्रहो, पोचपावती देते की..
मागच्या गुरुवारी आलेल्या सर्व ज्ये ना नातेवाईकांनी थोडा जास्त चहा बिस्किटे व कोथिंबीर वडी या बेताचा नावाजून नावाजून फन्ना उडवला Lol
त्यांना विमानात अगदी छान आणि व्यवस्थित जेवण मिळाल्यामुळे खूप भूक नव्हती सो गोडाच्या शिऱ्याच्या मुदी रात्री जेवताना आमटी भातासोबत वाढल्या
प्रवासाचा शीण आलेला त्यामुळे आमटी भात खाऊन सर्वजण गुडूप झोपले!!
पुन्हा एकदा टिप्स साठी सगळ्यांना thanks!! _/\_

Happy छान , अंजली... !! ..
मला असे वाटत होते की कदाचित ते लोक भुकेले असतील तर हा मेनू पुरणार नाही....

21 तारखेला पंधराजण जेवायला आहेत. सर्वजण 13 च्या पुढे आणि मराठी आहेत. मदत उपलब्ध आहे. काहींचा श्रावण आहे काहींचा नाही. 2 मुले ग्रॅजुएट झाल्यानिमित्त पार्टी आहे. सो प्लिज मेनू सुचवा.
नेहमीचे यशस्वी पदार्थ, मिसळ, ब वडे, इडली सांबर चाट वगैरे नको आहे. कोथिंबीर वडी पण नकोय कारण ती पण 1/2 दा करून झाली आहे. ड्रिंक्स बरोबर स्नॅक्स पण पाहिजे आहेत. लोकहो मदत करा.

भाजणीचे वडे, मटकीची उसळ हा बेत मेन म्हणून आवडेल का. टिपिकल श्रावण मेन्यू आहे कोकणातला, फक्त जास्त करून डाळिंब्या उसळ करतात पण त्या सोलणे त्रासदायक, त्यामुळे मटकी सुचवली, ती ही छान लागते.

भाजणी ऐवजी मिक्स पीठ वडे किंवा ति मि पुऱ्याही चालतील.

सोबत मसाले भात किंवा पुलाव, कोशिंबीर वगैरे.

अजून बरेच जण छान सुचवतील, मला पटकन हे आठवलं.

दही वडे, आलू पराठे- पुदिना चटणी, पुलाव, गुलाबजाम.
आलू पराठे गरम करावे लागतात...त्यामुळे ते जमणार नसल्यास मेथी/ पालक पराठे, टोमॅटो सूप वगैरे.
स्नॅक्स मध्ये - ढोकळा, मक्याचा चिवडा, खेकडा भजी,

टीपिकल महाराष्ट्रीयन जेवण हवे असेल तर मग
खव्याच्या पोळ्या, मसाले भात, फ्लॉवर रस्सा, पापड कुरडया, मूग वडे- वडे हिरवी चटणी असेही चांगले वाटेल.

मराठी मेनू नको असेल तर स्प्रिंग रोल्स, व्हेज मन्चुरिअन विथ ग्रेव्ही, फ्राईड राईस, ऍपल/पीच/बेरी पाय

अगदीच चायनीज नको असेल तर पाटवडी रस्सा/उंबराची आमटी, जिरा राईस, कोथिंबीर/पालक पराठे, रसमलाई

ड्रिंक्स बरोबर कॉर्न चाट, तंदूरी आलू/रताळे/कॉर्न/पायनॅपल (बार्बेक्यू नेशन मध्ये स्टार्टर म्हणून सर्व करतात तसे), कुरडया तळून त्यावर तिखट-मीठ, चाट मसाला पेरून

पंधरा लोक्स, १३ वर्षे आणि पुढे म्हणजे यंग लोक्स आहेत. त्यामुळे बर्‍यापैकी अ‍ॅपेटाईट वाला गृप असा अंदाज. + मदत आहे म्हणता तर -
- आलू पराठे गरमगरम करून देता येतील सोबत कचुंबर, पुलाव
- छोले भटुरे, पांढरा पुलाव (म्हणजे हाही ग्रेव्हीसोबत खाता येइल)
- बिर्यानी-सालन (यात नॉन व्हेज खात असाल तर धावेल)
- विमानं उंच ऊडणार असतील तर Wink - दालखिचडी सारखा सोपा प्रकार नाही Light 1
- टिपिकल मराठी - थालीपीठ-लोणी, मसाले भात, कढी/मठ्ठा किंवा भाकरी-ठेचा-वांग्यांच भरीत; खिचडी
- बिहारी - लिट्टी-चोखा, पुलाव किंवा दुसरा कुठला भाताचा प्रकार
- चायनिज मध्ये - नुडल्स, फ्राईडराईस, मंचुरीअन ग्रेव्ही
- कांदा लसूण खात नसतील तर नेहेमीचा यशस्वी मेनू - बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड, मसालेभात, काकडीची कोशिंबीर, मटकीची उसळ, काही तळण. यातलाच दुसरा मेनू - पातळ भाजी, फ्लॉवरची परतून सुकी भाजी, गाजराची कोशिंबीर, चपाती, मसालेभात किंवा वरण/आमटी-भात

- जरा नॉनव्हेज-
अंडा करी - पोळी, तवा पुलाव
चिकन ग्रेव्ही - तांदुळ भाकरी / भात
मटण बिर्यानी
फिश आयटेम्स - स्टार्टर्स म्हणून उजवे सो ते तिथे सर्व करता येतील

काही अजून स्टार्टर्स -
तळली मूगडाळ्/चणाडाळ मिळते त्यात कांदा-टोमॅटो- हिरवी मिरची-कोथिंबीर अन लिंबू असं घालून उत्तम लागतं
आपल्या त्या ह्यांची ती ही सुद्धा छान लागेल चखणा म्हणून (कानफूजला असाल तर - बाकरवडी Biggrin )
मिनि कचोरी
खारवलेले काजू
पिठात घोळून तळलेले शेंगदाणे
सोया स्तिक्स

उकडलेली अंडी
फिश फ्राय
क्रिस्पी चिकन विंग्स
बर्रा कबाब्स
फिश कटलेट्स पण चखणा म्हणून उत्तम
नेहेमीचं सॅलड - ककडी, प्याज, टमाटर काटके निंबू छिडकके Happy

यातले बरेचसे पदार्थ आधी करून ठेवता येतील. आयते काही आणता किंवा वेळेवर मागवता येतील. मदत असेल तर गॅसपाशी राहून गरमा-गरम सर्व करता येईल Happy
हॅपी होस्टिंग!

खव्याच्या पोळ्या, मसाले भात, फ्लॉवर रस्सा, पापड कुरडया, मूग वडे- वडे हिरवी चटणी >>>> वॉव तळं सुटलं तोंडाला Happy
ह्यात मठ्ठा हवाच.

स्नॅक्स- व्हेज काठी रोल्स/ आलू-काजू-मटार पॅटीस्/सुरळी वडी/अळू वडी/चिज कॉर्न बॉल्स्/ब्रेड पकोडे. चटणी किंवा वेगळे म्हणुन कसडिला खूप मस्त लागतात. एकीने ढोकळा, कसडिला, राजमा चावल & खीर असा बेत केला होता. खूप च आवडला आम्हाला.

जबरदस्तच मेनु एकेकः

मी सकाळ पासून विचार करत होते काय करावे? तर मसाले भात इथे सायो रेसीपी आहे. तो. इलेक्ट्रिक कुकर मध्ये तयार होउन गरम राहील.
गरम गरम टोमॅटो चे सार. फ्लावर बटाटा मटार रस्सा भाजी. मटकी उसळ लोणचे च टणी. डाळिंबाची कोशिंबीर. डाळिंबाचे दाणे, ओले खोबरे, मिरची कोथिंबीर मीठ साखर. दिसायल छान दिसते. पुर्‍या गरम आयत्यावेळी तळायच्या. गोडात श्रीखंड गुलाबजाम.

पुणेरी पद्धतीची मटार करंजी बारक्या शेप मध्ये. ( कॉकटेल करंजी - हे एक छान कथेचे नाव होउ शकेल. ) पांढरा ढोकळा. / सुरळी वडी.
एक साधा स्टार्टर आहे. मी फार बनव त असे.
ब्रेड चे कडा काढून चार तुकडे करून सोनेरी तळून घ्यायचे. अंडे फोडून मीठ मिरेपूड टाकून स्क्रँबल करुन घ्यायचे. आता ब्रेडच्या तुकड्यावर
थोडे थोडे व्हाइट यलोइश अंडे ठेवायचे. व वरून केचप एक ठिपका. मुलांना आवडते. असेच मोनाको बिस्किट वर चीज चा तुकडा / व वरुन केचप. बीअर बरोबर मस्त लागते.

अमा अंडे कच्चेच?>> नाही नाही. समजा दोन अंडी आहेत फोडून फेटायची. मीठ मिरेपूड घालायचे चवी पुरते. तव्यात तेल सोडून स्क्रँबल करुन घ्यायचे. गार झाले की ब्रेड वर ठेवायचे चमचा चमचा.

धन्यवाद अंजु, आंबट गोड, 96क, माझे मन, योकु, आशु, आणि अश्विनी मामी. मस्त मेनु आहेत एकेक. किल्ली खरं आहे अगदी.
एकदा श्रावण, कांदा लसूण वगैरे विचारून मग मेनु फायनल करते.
पण इथले सगळे मेनू घरी तरी ट्राय करणार आहेच. नाहीतरी जेवायला काय करू हा प्रश्न असतोच.
शिवाय ऑगस्ट मध्ये घरी पुजा पण आहे. तेंव्हाही इथल्या काही आयडिया उपयोगी पडणार आहेत.
मनापासून धन्यवाद. इथे पोचपावती देईनच.
रच्याकने पाटवडी रस्सा आणि खवापोळीची रेसिपी आहे का इथे? असेल तर प्लिज लिंका द्या. मला दिसल्या नाहीत.

Pages