बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कूक गावाला गेलाय आणि भूक लागलीये. रूमवर भाज्या नाहीत पण बाकी सर्व आहे, काय बनवता येईल?
लवकर बनेल आणि नवशिक्या माणसाला बनवता येईल असे सांगा.

तिखट मीठाच्या पुर्‍या, फोडणीचा भात व लोणचे, भजी - पाव , फोडणीचे पोहे (कांदा न घालता) , खिचडी, उपमा, मॅगी, चहा ब्रेड

पिठलं भात (कांदा चिरायचा नसल्यास तो वगळून), ब्रेड ऑम्लेट / भुर्जी, सँडविच, शेंगदाणा कूट - तूप - गूळ / साखर / पिठीसाखर घालून दाण्याचा लाडू.

पण बाकी सर्व आहे, काय बनवता येईल?
लवकर बनेल आणि नवशिक्या माणसाला बनवता येईल असे सांगा.>>>

आमसुलाच्या पाण्यातल्या चिकुल्या! पोटभर टेस्टी! माझा एकटा असताना काही बनवायचा कंटाळा आली की हा झटपट जेवनाचा बेत असतो बर्‍याचदा!
कुठल्याही पाककलेच्या सुगरणपणाची आवश्यकता नाही!! फक्त तिखट मीठाचा अंदाज हवा!

फोडणीचा भात करायचा प्रयत्न केला, आणि काहीतरी तैयार झालं........फोटो नीट दिसत नाहीये.
आमसुलाच्या पाण्यातल्या चिकुल्या काय असतात?

आमसुलाच्या पाण्यातल्या चिकुल्या >>> हे काय आहे? कसे करतात>>>>

पोळ्यांसारखी कणिक (२-३ पोळ्या होतील इतपत) भिजवावी भिजवताना कणकेत चवीपुरते मीठ आणि ओवा हातावर रगडून चिमुटभर घालायचा!

कणिक भिजवून ठेवली की एकीकडे कढई/ पातेले ह्यात तेल मोहरी जिरे हिंग फोडणी करुन त्यात ३-४ आमसुलं घालायचे किंचित परतून साधारण ग्लास दिड ग्लास पाणी घालायचे हळद तिखट गोडा मसाला चवी पुरता आणि किंचित साखर पाणी उकळू लागले की त्यात कणकेची पोळी लाटून करंजीच्या कातणीने मोठ्या शंकरपाळ्याच्या आकाराचे तुकडे कापून उकळत्या आमसुलाच्या पाण्यात सोडायचे. साधारण ५-१० मिन शिजतात वरुन छान सुक्या खोबर्‍याचा किंवा ओल्या नारळाचा कीस टाका आणि गरमा गरम साजुक तूप घालून खा!
पोटभर आणि झटपट!

कृष्णा,
नवशिक्या माणसाला बनवता येईल असे सांगा. >> हे वाचले नाहीत काय? तुम्ही नवशि़क्या माणसाला डायरेक्ट कणिक मळून पोळ्या बनवायला सांगताय Happy

माणसाला डायरेक्ट कणिक मळून पोळ्या बनवायला सांगताय>>

अहो ह्यात पोळ्या गोलाकार नाही जमल्या तरी चालतील! वाकड्या तिकड्या जगाच्या नकाश्यात कुठल्याही देशाचा नकाशा होवो! नंतर कापूनच पाण्यात सोडायचे आहे! Happy

आणि लहाणपणी चिखलाचे गोळे केलेच असतील तसेच कणकेचे गोळे बनवायचे! Wink

मसाला खिचडी करा. डाळ तांदूळ धुवून घ्या, कुकर मध्ये फोडणी करा त्यात थोड्या आवडत्या भाज्या घाला, कांदा, लसूण वगैरे घाला, थोडा मसाला टाका, मीठ तिखट टाका. मग डाळ तांदूळ थोडे परतून घ्या आणि दुप्पट पाणी टाकून शिजवून घ्या.

मस्त लागते. वरती थोडे तूप घ्या सोबतीला पापड आणि लोणचे !

धन्यवाद धनि......किचनमध्ये पहिल्यांदा काल गेलो तर प्रत्येक वस्तू टाकतांना भीती वाटत होती..मीठ आणि तिखट टाकतांना तर प्रॅक्टिकली ५ मिनिटं विचार करावा लागला......

तरी बरं !तुम्ही तुमच्याच किचन मध्ये होतात आणि शिजवलेलं जे काय चांगलं-वाईट होईल ते फक्त तुम्हालाच खायचे होते Happy

.किचनमध्ये पहिल्यांदा काल गेलो तर प्रत्येक वस्तू टाकतांना भीती वाटत होती..मीठ आणि तिखट टाकतांना तर प्रॅक्टिकली ५ मिनिटं विचार करावा लागला......>>>>

पद्मराव काळजी नका करु एवढी! आपण केलेला पदार्थ आपल्यालाच खायचाय! कुणी नावं ठेवणार नाही!
आणि एक लक्षात ठेवा आपली निर्मिती ही आपल्याला छानच वाटते! त्यामुळे बिन्धास्त बनवा पदार्थ!

जेंव्हा तुम्हाला आत्मविश्वास वाढेल की दुसर्‍यांना चव द्यायला हरकत नाही तेंव्हा सांगा! पुण्यात असलो
पेठ अवसरी घाटातून जा - ये असते माझी! आवर्जून थांबेन तुमचा पाहुणचार स्विकारायला! Wink

सँडविच करा. ब्रेड स्लाईसला एका बाजूने आवडीनुसार लोणी / तूप फासा, त्यावर काकडी - टोमॅटो - कांदा - उकडलेला बटाटा यांच्या चकत्या पसरा, त्यावर केचप / टोमॅटो सॉस घाला, मीठ मिरपूड हवी असेल ती भुरभुरा, चीजचा एखादा क्यूब / पातळ स्लाईस असेल तर ती जरा मोडून व्यवस्थित पसरा, वरून दुसर्‍या ब्रेड स्लाईस हा सर्च सरंजाम झाका. नंतर गॅसवर तवा ठेवा, गॅसची ज्योत मध्यम किंवा बारीक असू देत. तवा जरा तापला की त्यावर तेल / तूप / लोणी सोडून हा सँडविच अलगद ठेवा. हवं तर एका झाकणाने झाका. २-३ मिनिटांनी सँडविचची तव्याला चिकटलेली बाजू चेक करा. ती तांबूस सोनेरी झाली असेल तर अलगद सँडविच पलटून दुसरी बाजू भाजून घ्या. असे २-३ सँडविच एका वेळेची भूक नक्की भागवतील.

एका अमेरिकन सहकार्याच्या घरी पॉट-लक पार्टी ला जायचे आहे २५-४० लोक असतील..
बहूतेक सगळे अमेरीकन....काय नेउ करून ?
सोप्पे, लौकर होनारे, कमि तिखट असे काय काय करता ये ईल ?

तिलापिया किंवा तत्सम मासा हळद, तिखट, मीठ लावुन रव्यात घोळवुन बेक करुन न्या. सोबत लिंबाच्या फोडी, कुठलेही डिपिंग ऑइल/बॅल्समिक. मी प्रत्येक अमेरिकन पॉटलकला हेच नेते आणी ते नेल्यानेल्या अर्ध्या तासात संपतेच.

वेज हवे असेल तर पनीर. दीपचे समोसे, कचोर्या. छोले चाट.

Pages