Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुल्फी पण करता येईल आणि
कुल्फी पण करता येईल आणि करंज्या,लवंगलतिका लिहीता लिहीता सूचलं …
गाजर/ दुधी हलवा,
गाजर/ दुधी हलवा,
मसालेभात करताना थोडा ( दोन तीन चमचे) खवा घातला तर भात चांगला मऊ, मोकळा होतो.
साखर न घालता थोडा खवा हाताने मोकळा करून त्याचे ब्रोकोली, कॉर्न, रंगीत सिमला मिरची ई ई.. घालून सलाड कसे लागेल असा विचार करतेय..!
मावा केक / कपकेक्स, विविध
मावा केक / कपकेक्स, विविध बर्फ्या करता येतील खव्याच्या.
खवा तुपावर परतुन साखर टाकुन
खवा तुपावर परतुन साखर टाकुन खात नाही तुमच्याकडे?
फायनली खव्याचे काय केले?
फायनली खव्याचे काय केले?
गुजा केलेच कारण सर्वांना आवडतात. शुद्ध खवा असल्याने पहिला तळायला टाकल्यावर हसला. मग चार टेस्पून मैदा मिसळला व फ्रीजमध्ये मिश्रण दडपून ठेवले. दुसर्या दिवशी मस्त तोंडात विरघळणारे गुलाबजाम तयार झाले.
अमितव धन्यवाद. तुमच्या सुचनेनुसार खव्याच्या पोळ्याही केल्या.
सर्वांचेच आभार…
MazeMan : २ पानं मागे तुम्ही
MazeMan : २ पानं मागे तुम्ही उंबराची आमटी सुचवली आहे. ती कशी करतात? खरी खरी उंबरं घालतात की काय?
नाही खरी उंबरं नाही. ही
नाही खरी उंबरं नाही. ही म्हाळसाने लिहिलेली मोदकाची आमटीची रेसिपी. एक मैत्रिण उंबराची आमटी म्हणून आणायची. मस्त झणझणित होते.
https://www.maayboli.com/node/76236?page=2#comment-4551182
ओह असंय होय!
ओह असंय होय!
नमस्कार,गणपती साठी साधारण ७०
नमस्कार,गणपती साठी साधारण ७० लोकांसाठी काय करता येईल?पुलाव/चित्रान्न , बटाटा सुखी भाजी / रस्सा , पोळी , ढोकळा/खस्ता कचोरी ,श्रीखंड / गुलाबजाम? पुऱ्या फार तेलकट असतात म्हणून नको वाटताहेत. कचोरी , पोळी बाहेरून मागवावी . कांदा - लसूण शक्यतो नको. मदतीसाठी धन्यवाद :)
बटाटा सुखी भाजी , एखादी उसळ
बटाटा सुखी भाजी , एखादी उसळ किंवा मटकी मसाला भाजी , भरली भेंडी / वांगी , पुलाव / मसाले भात , काकडी कोशिंबीर / बुंदी रायता , कोथिंबीर वडी किंवा ढोकळा , घरी केल्यास श्रीखंड / खीर / लापशी ...गुलाबजाम आणि पोळ्या बाहेरून
साधा वरण-भात-तूप/नारळी भात
साधा वरण-भात-तूप/नारळी भात/काश्मिरी पुलाव/जर्दा राईस, काश्मिरी दम आलू (कांदा लसूण विरहित असते), मक्याचे सुंदल, कोथिंबीर/ अळू/पालक वडी व पोळी बाहेरून आणा. साधा भात असेल तर मँगो शिरा/दुधी हलवा
धन्यवाद नम्रता निकम. MazeMan
धन्यवाद नम्रता निकम. MazeMan : )
मेन कोर्स मिसळ आणि स्वीट डिश
मेन कोर्स मिसळ आणि स्वीट डिश केक असेल तर स्टार्टर काय हवं?
इथे प्रचंड थंडी आहे त्यामुळे ताक,दहीबुती नकोच आहे. पिणारी लोकं पण आहेत तर ते चकना आणि दारू मधेच खूश असतील. त्यांचं होऊन जेवण सुरू करेपर्यंत न पिणाऱ्यांना फार बोअर होतं दाणे आणि डाळ खायला तर त्यांच्यासाठी काय असा विचार करते आहे.
मला फ्रोजन भारतीय काहीच मिळू शकत नाही कारण वेळ कमी आहे हातात. नवऱ्याला स्प्रिंग रोल नाही आवडत त्यामुळे ते बाद.
तर वेज मधे सांगा काही तरी जे पटकन होईल. मिसळीचा घाट बराच आहे.
मेन कोर्स मिसळ आणि स्वीट डिश
मेन कोर्स मिसळ आणि स्वीट डिश केक असेल तर स्टार्टर काय हवं?
इथे प्रचंड थंडी आहे त्यामुळे ताक,दहीबुती नकोच आहे. पिणारी लोकं पण आहेत तर ते चकना आणि दारू मधेच खूश असतील. त्यांचं होऊन जेवण सुरू करेपर्यंत न पिणाऱ्यांना फार बोअर होतं दाणे आणि डाळ खायला तर त्यांच्यासाठी काय असा विचार करते आहे.
मला फ्रोजन भारतीय काहीच मिळू शकत नाही कारण वेळ कमी आहे हातात. नवऱ्याला स्प्रिंग रोल नाही आवडत त्यामुळे ते बाद.
तर वेज मधे सांगा काही तरी जे पटकन होईल. मिसळीचा घाट बराच आहे.
कटलेट,पॅटीस,को.वड्या,कोबीच्या
कटलेट,पॅटीस,को.वड्या,कोबीच्या वड्या(मस्त लागतात).आधी करून आयत्यावेळी मायक्रोवेव्ह करू शकतेस.
पनीर,सिमलामिरचीचे छोटे तुकडे तळून टूथपिक लावून ठेवायचे.
कोथिंबीर वड्या खरच मस्त ऑप्शन
कोथिंबीर वड्या खरच मस्त ऑप्शन आहे पण व्याप खूप आहे. कोथिंबीर आणून निवडण्यापासून. पुन्हा २५ जणांसाठी फारच क्वांटिटी लागेल.
कोबीच्या वड्या रेसिपी बघते.
कटलेट आणि patties हेवी नाही होणार मिसळ सोबत?
क्रिस्पी कॉर्न जातील का ? पनीर नाहीये घरात आणि माझ्या इथे मिळत नाही.
मसाला खाखरा- मसाला पापडासारखा
मसाला खाखरा- मसाला पापडासारखा.. कांदा टोमॅटो टाकून..
गरम गरम कांदा भजी
क्रिस्पी कॉर्न जातील का.....
क्रिस्पी कॉर्न जातील का..... पळतील.
कटलेट आणि patties हेवी नाही होणार मिसळ सोबत?...... खणाऱ्यांच्या पोटावर अवलंबून आहे.तसेही छोटे आकाराचे करायचे,कारण स्टार्टर आहे.
कोबीची वडी
https://www.maayboli.com/node/43470
यात थोडा कांदा चिरून घातला तर अजून मस्त होतात.
मसाला पापड, यात चिंटू पापड
मसाला पापड, यात चिंटू पापड मिळाले तर त्यावर ही करता येईल. क्रॅकर्स वरही जमेल हा प्रकार.
पनीर + भाज्या असा टिक्का, आधी मॅरिनेट करून ठेवता येईल
मसाला पुरी
दही पुरी
मसाला पापडी
गाजर, काकडी, एखादं फळ टूथपीकेत ओवून ते ही ठेवता येऊ शकेल.
कटलेट, कोथिंबीर वडी, खेकडा भजी, इतरही भजी प्रकार करता येऊ शकतील
सुकी भेळ किंवा ओली भेळ लहानश्या क्रॅकर् कप्स मध्ये
आलू टूक
यातले बहुतेक प्रकार आधी करून ठेवता येण्यासारखे किंवा आपल्या त्या ह्यांच्याकडून करून घेता येण्यासारखे (atleast असेंबलिंग तर नक्कीच) आहेत.
आमच्याकडे आपले ते हे आम्हीच!
आमच्याकडे आपले ते हे आम्हीच!
क्रिस्पी कॉर्न, कोबी वडी, मसाला पापड आणि मसाला पुरी जमू शकते.
पुऱ्या टाळण्याऐवजी बेक केल्या तर? डॉलर साईज कट करेन आणि अवन मधे टाकेन. जमेल का हे ?
खाकरा आहे तो ही ठेवू शकते.
आलू टुक काय आहे? बघते.
चाट आयटम्स साठी लागणाऱ्या चटण्या आणि सामग्री दोन्ही उपलब्ध नाही. ही लास्ट मिनिट आलेली जाग आहे.
मला मिसळीसोबत जाणारे पदार्थ कधीच सूचत नाहीत कारण नेहमी लोकांच्या पोटाची काळजी वाटत रहाते. त्यातच अर्धे स्टार्टर बाद होतात माझे.
मोस्टली सध्या च्या मूड नुसार क्रिस्पी कॉर्न, मसाला पापड, खाकरा आणि कोबी वड्या ठेवेन असं वाटतंय कारण इतरा बरीच कामं आहेत त्यामुळे जितकं बल्क मधे गोष्टी होतील तितक्या बऱ्या.
तुमच्या इथे nacho chips
तुमच्या इथे nacho chips रेडिमेड मिळतील का ? तर त्यावर पेपेरोनी, boiled मक्याचे दाणे(रेडिमेड ) , व melt होणारे चीज असे घालून ओव्हन ला ५ min गरम करायला / भाजायला(?) ठेवायचं वाढवायचं असेल तर त्यावर किडनीबीन (रेडिमेड ) सुद्धा टाकायचे.
मक्याचे दाणे थोड्याश्या तेलावर किंवा तुपावर पॅन मध्ये परतायचे ते आधीच boiled असतील तर अजून सोप्प... फक्त चटका द्यायचा त्यात मेतकूट, आवडत असेल तर चाट मसाला भुरभुरवायचा, लाल तिखट मीठ सुद्धा चवीनुसार घालायचं.. आयत्या वेळी मावे मध्ये गरम करायचं मात्र हे फिंगर फूड नाही चमचा चमचा वाढून घ्यावं लागणार
चेरी टोमॅटो अर्धे अर्धे चिरायचे व मोझेरेल्ला बॉल्स पण मिनी असतील तर अर्धे अर्धे चिरायचे , मोठे असतील तर अंदाजाने चिरायचे .. हे दोन्ही एक आड एक टूथपिक मध्ये ओवायचे ..असेल तर ऑ ऑ स्प्रे करायचे व ओरेगानो मीठ मिरीपूड भुरभुरावाची- पण हे जरा काम पडेल
तुम्हालाही वेळ मिळायला हवा सतत किचन मध्येच असे नको व्हायला
नाचोज आत्ताच झाले क्रिस्मसला.
नाचोज आत्ताच झाले क्रिस्मसला.
मी हा मेनु फायनल करेन मोस्टली -
क्रिस्पि कॉर्न
मसाला पुरी
मसाला खाकरा (विकतचा आहे तोच ठेवणार)
कान्दा, टोमॅटॉ, काकडी, शेव असं कापुन ठेवणार मीठ आणि लाल तिखट घालून मग ज्याला हवं त्याने पुरीत घालून खावं नाही तर खाकर्यावर टाकून खावं
कोबी वडी. हे कित्पत ताकद रहाते त्यावर अवलम्बुन राहिल.
वरती मी पुरी बेक करेन लिहिलं आहे कारण माझा मेंदु मसाला पुरी आणि तिमि पुर्यांमधे घोळ घालत होता. आता मसाला पुरी म्हणजे काय ते डोक्यात आलं.
क्रिस्पी कॉर्न चांगली आयडिया
क्रिस्पी कॉर्न चांगली आयडिया आहे, चटपटे आलू/रताळे किंवा पुदिनावाले आलूही चालतील. बेबी पोटॅटो अवनमध्ये रोस्ट करून हव्या त्या मसाल्याने कोट करायचे. किंवा तंदूर मसाल्यामध्ये मॅरीनेट करून रोस्ट करायचे..
कॅरमलाईज्ड मखाणे - तूपावर थोडेसे भाजून गुळ वितळवून ओतायचा मखाण्यावर. सुकायच्या आत तीळ, बडीशेप मिक्स करायची.
क्रिस्पी कॉर्न म्हणजे काय पण
क्रिस्पी कॉर्न म्हणजे काय पण ? शॉर्ट मध्ये रेसिपी टाका ना ..
Sankranti chya haladi
Sankranti chya haladi kunkwala kaay dyawa sagalayana bara..
इथे इवल्याश्या function at()
इथे इवल्याश्या function at() { [native code] }तर (भारतिय) कुप्या मिळतात $३ ला. - काय मस्त वास असतो बाप रे. अस्सल केवडा, हीना, चंदन, मोगरा.
ते वाण लुटू शकाल जर न्यू जर्सीत असाल तर.
पण मला वाटतं तुम्ही मुंबईत आहात. हाऊ अबाऊट लहानसुंदर ईयररिंग्ज? मला ईयर रिंग्ज जीव का प्राण आहेत त्यामुळे मला हेच सुचतय.
कुंकवाचे किंवा हळदी-कुंकवाचे
कुंकवाचे किंवा हळदी-कुंकवाचे करंडे - यात बर्याच व्हरायट्या मिळतील
कोबीचा /फ्लॉवर चा गड्डा (हो. देतात हे ही)
पाव पाव किलो च्या साखरेचे पाकिटं किंवा गुळाच्या लहान लहान भेल्या
मॉईश्चरायझर
हेअर ऑईल
मध्यम मोठे असे स्कार्फ्स
हे सध्या आठ्वलेले, अर्थात यातले बरेच (खरंतर सगळे) प्रकार आईला, बायडीला वाणात मिळालेले पाहिलेत
कंगवा, साबणाची वडी, सुटे पैसे
कंगवा, साबणाची वडी, सुटे पैसे ठेवायची छोटी पाऊच, ट्रॅडीशनल हेअरपिस हे सगळे मिळाले आहे.
नेल पॉलिश, लिप बाम हे आईने लुटले आहे.
मला वाटले की त्या काही तरी
मला वाटले की त्या काही तरी खायचा बेत विचारात आहेत
Ho waanache suggestions
Ho waanache suggestions mastach..
Snacks box madhe kaay deu shakto sankranti la saajesa.. Kinva ajun kaahi menu suchawata aala tar haldi kunkawasathi
Pages