Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सरिताज किचन वाली चा पा ट
सरिताज किचन वाली चा पा ट वडी रस्सा छान आहे. खवा पोळी केलीत की इथे रेसीपी लिहा नक्की.
पाटवडी रस्साची मायबोलीवरील
पाटवडी रस्साची मायबोलीवरील रेसिपी
https://www.maayboli.com/node/55913
अंडी चालणार असतील तर उकडून
अंडी चालणार असतील तर उकडून घ्यायची. गार झाल्यावर सालं काढून आडवं मध्ये चिरुन दोन भाग करायचे. त्या आधी कांदा, भोमि, कॉर्न वगैरे हवं असल्यास सगळं तेलावर परतून हवे ते मसाले घालून तयार ठेवावं. अंड्याचा पिवळा भाग काढून टाकून त्या खळग्यात हे वरचं मिश्रण भरुन अॅपेटायर्स मध्ये सर्व करता येईल.
किंवा उकडलेल्या अंड्याचे उभे चार भाग करुन वर तेलावर बाकी भाज्यांबरोबर परतून सर्व करता येईल.
सध्या आमच्याकडे चान्गलाच
सध्या आमच्याकडे चान्गलाच उन्हाळा सुरु झालाय...कुलिन्ग मेनु सुचवा...अभारतिय /भारतिय्/व्हेज/नॉन व्हेज चालतिल
दही वडे, लस्सी, भेळ - पाणी
दही वडे, लस्सी, भेळ - पाणी पुरी, सगळेच चाट आयटेम, विविध सलाड्स, मेथी/ आलू पराठे आणि बुंदी रायता, चित्रांन , सँडविच विथ कोल्ड कॉफी, फ्रूट सलाड, दही भात बुत्ती, दडपे पोहे आणि आईस्क्रीम....
छान. चित्रान्न थोडे तसेच आणि
छान. चित्रान्न थोडे तसेच आणि थोडे दही घालुन हे लाईट वन डिश मिल पण होते.
आता टोमॅटो वगळून पाककृती असा
आता टोमॅटो वगळून पाककृती असा धागा यायला हवा भारतात राहणार्यांसाठी
दाणे लाऊन,
चिंच गुळ घालून
कोकम घालून
नुसतेच मिर्ची लसूण ठेचा वापरून
कांदा , मिर्ची तीळ घालून
वगैरे ..
बिना टोमॅटो चिकन करी बनते का?
बिना टोमॅटो चिकन करी बनते का? कमी मसाले वाली..
हो.आमच्याकडे कांदा खोबरे वाटण
हो.आमच्याकडे कांदा खोबरे वाटण असते.त्यात टोमॅटो नसतो.
चिकन,मटण त्या वाटणात करते.
बिना टोमॅटो चिकन करी बनते का
बिना टोमॅटो चिकन करी बनते का - दही वापरून.
आता टोमॅटो वगळून पाककृती असा
आता टोमॅटो वगळून पाककृती असा धागा यायला हवा भारतात राहणार्यांसाठी>> मेरे पास केचप का बडा बॉटल है.
बिना टोमॅटो चिकन करी बनते का?
बिना टोमॅटो चिकन करी बनते का? >> आम्ही बिना टोमॅटोच बनवतो. टोमॅटोला एक गोडसर चव असते. चिकनमधे ती आम्हाला आवडत नाही. आपल्या लहानपणी कुठे एवढा टोमॅटोचा वापर जेवणात होता. गेल्या काही वर्षांत वाढलाय.
निशा मधुलिका यांच्या काही
निशा मधुलिका यांच्या काही रेसिपीज बघितल्यावर मी काहीही बनवायचे म्हटले की आधी टोमॅटो घ्यायचो काही प्युरी बनवायला आणि काही बारीक चिरून घ्यायला.
मग हळुहळु इतर पध्दतीने करायला शिकलो.
पण टोमॅटोचा सढळ वापर असला तरी चांगल्या आहेत त्यांच्या रेसिपीज.
टोमॅटो ला दमदार रिप्लेसमेंट्स
टोमॅटो ला दमदार रिप्लेसमेंट्स आहेत - आमचूर पावडर, कोकम, चिंच, दही, लिंबू, लिंबूसत्व, विनेगर, गुजरातींमध्ये ओट का काय, नक्की नाव आठवेना मला वापरतात आंबटपणाकरता.
थँक्स सर्वांना!
थँक्स सर्वांना!
काल चिकन फिले दह्यात मॅरीनेट करून स्टर फ्राय केले..
कांदा, आल, लसूण,दहि वापरून ही करी करता येईल.. किंवा काजू.
देवकी, आम्ही ही शेव भाजी ह्या वाटणाची करतो, पण वीकडे साठी सोपी अशी बिना टो. घालून हवी होती ती वरील पद्धतीने जमेल
मेरे पास केचप का बडा बॉटल है>>> अमा, केचप करीत घालाल?
आपल्या लहानपणी कुठे एवढा
आपल्या लहानपणी कुठे एवढा टोमॅटोचा वापर जेवणात होता. गेल्या काही वर्षांत वाढलाय.>>> खरंय.. महाराष्ट्रीयन पद्धतीत फार टोमॅटो असतोच असं नाही.. साऊथ पण फार नाही. नॉर्थ वाल्यांना अगदीच चालत नाही..ज्यात त्यात कांदा-टोमॅटो घालतात.
मेरे पास केचप का बडा बॉटल है>
मेरे पास केचप का बडा बॉटल है>>> अमा, केचप करीत घालाल?
मी टोमाटो बेस्ड करी फार बनवत नाही. रेड पास्ता बनवला तर त्यात केचप दोन चमचे चालून जाते. माझे कंझ्प्शन फार नाही टोमाटोचे. आठव्ड्याला पावकिलो. तितके अजून परवडते आहे. सहा मिडिअम साइज टोमाटो दहा दिवस जातात. त्यात बिग बास्केट वर रेट कमी आहे.
एक किलो १६३.९० रु आहे. दिल्लीत २७० पर किलो टच केले आहे. हिरवे टोमाटो ११८ रु प्रति किलो भाव आहे आजचा.
वर योकू ने लिहिले आहे त्याप्रमाणे इतर बर्याच ऑप्शन आहेत आंबट पणा आणायला. मी पुणेरी पद्धतीचा स्वयंपाक करीत असल्याने
ओले खोबरे, टोमाटो फार कमी वापर. साध्या फोडणीचा स्वयंपाक अस्तो. पं जाबी करी नाही बनवत. मूड आला तर पनीर बटर मसाला/ कधीतरी बटर चिकन ऑर्डर करते ते मला सोपे पडते. पण सध्या पाउस अस्ल्याने बाहेरचे खाणे ऑर्डर कमी आहे. डिलिव्हरीवाल्याला त्रास नको.
अजून एक पर्याय म्हणजे टोमाटो सूप ची पाकिटे ठेवते घरी. खावेसे वाटले तर. एका पाकिटात तीन कप तरी सूप होते मला.
मी टोमॅटो फार कमी वापरते, 15
मी टोमॅटो फार कमी वापरते, 15 दिवसांपूर्वी 20 रु पाव मिळाले, चारातले दोन अजूनही आहेत. त्याआधीही कितीतरी दिवस आणले नव्हते. केचप मध्यम पाऊच आणून ठेवलेला असतो, नवऱ्याला आवडतो, मी खात नाही.
काल मला 160 रु किलो सांगितले
काल मला 160 रु किलो सांगितले भाजीवल्यानं.... कोल्ह्याला द्राक्षे आंबट या न्यायाने मी ही बोलले, हम तो खाते ही नही ये...
चिकन मध्ये आम्ही पण नाही घालत टोमॅटो.... फिश करी मध्ये लागतो मालवणी पद्धतीत पण नसला तरी हरकत नसते. मला चिंच घालून उत्तम कालवण जमते....
टोमॅटोच्या नाकावर टिच्चून आम्ही चविष्ट स्वयंपाक बनवतो.....
टोमॅटोच्या नाकावर टिच्चून
टोमॅटोच्या नाकावर टिच्चून आम्ही चविष्ट स्वयंपाक बनवतो.....++++ आम्ही पण..
डिलिव्हरीवाल्याला त्रास नको..
डिलिव्हरीवाल्याला त्रास नको......
टोमॅटो ला पर्याय म्हणून घरी
टोमॅटो ला पर्याय म्हणून घरी तयार प्युरे (डाबर होममेड ची) आणून ठेवली आहे.. २६ रुपयांना २०० ग्रम मिळते. बर्यापैकी कॉन्सन्ट्रेटेस असते त्यामुळे कमी पुरते.
15 दिवसांपूर्वी 20 रु पाव
15 दिवसांपूर्वी 20 रु पाव मिळाले,>> अंजू मारावी का फेरी डोंबिवलीला
आज फ्रीज मधला शेवटचा टोमॅटो
आज फ्रीज मधला शेवटचा टोमॅटो वापरला.खपवून टाकला म्हणणे जास्त योग्य होईल.बिग basket ki kisan कनेक्ट वरून मागवले होते.पण चवच नव्हती.
पण सध्या पाउस अस्ल्याने
पण सध्या पाउस अस्ल्याने बाहेरचे खाणे ऑर्डर कमी आहे. डिलिव्हरीवाल्याला त्रास नको.>> सो स्वीट
टोमॅटोच्या नाकावर टिच्चून आम्ही चविष्ट स्वयंपाक बनवतो>>> माबो वाले असेही कायम कोणाच्या ना कोणाच्या नाकावर टिच्चूनच असतात
कवे ये की, लेटेस्ट भाव माहिती
हाहाहा कवे ये की, लेटेस्ट भाव माहिती नाही. त्यावेळी त्याने 25 रु पाव चे वीसला दिलेले, त्याच्याकडून मी नेहेमी कांदे बटाटे घेते, एरवीही मी टोमॅटो कमीच घेते, फार लागत नाहीत स्वस्त असले तरी.
घरी जरा जास्त खवा आलेला आहे.
घरी जरा जास्त खवा आलेला आहे. गुलाब जाम तर होतीलच. पण अजून काय काय करता येईल?
खव्याची पोळी नको कारण गुजा आणि खवा पोळी म्हणजे जरा जास्तच होईल.
गुजा ऐवजी खव्याची पोळी करा.
गुजा ऐवजी खव्याची पोळी करा.
गुजा अती परिचयात एकदम डाउन मार्केट वाटतात. खव्याची पोळी फारच क्वचित मिळत असल्याने एकदम एक्झॉटिक वगैरे वाटेल.
मस्त खमंग पेढे पण करा.
ज्यात क्रीम वापरतात अशा
ज्यात क्रीम वापरतात अशा कुठल्याही ग्रेव्हीत घालता येईल.
Methi malai mutter
Methi malai mutter
Pages