बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पदार्थ जमलेत.खुप मस्त आयडिया मिळाल्या.धन्यवाद.
भाजी पोळी प्रकार शक्यतो करणार नाहीये कारण डोहाळतुली ला नको आहे.
खालचा मेनु फायनल करतेय. -
इडली,पांढरी नारळ चटणी ( सांबार ला पर्याय नाही. फोटो मधे बाजुला ठेवेन Wink )
पांढरा रवा ढोकळा
पांढरा पुलाव, भरपुर दही घालुन काकडी कोशिंबीर ( यातच थोड्या बुंदी ढकलेन )
कुरडया, बटाटा पापड, साबुदाणा पापड.
खवा पोळ्या, मलाई बर्फी
व्हाईट सॉस पास्ता भाज्या घालुन
पुलाव सोबत खायला हॉटेल मधे देतात तशी थोडी ग्रेव्ही ( कांदा, टोमॅटो, काजु, क्रीम ) अशी करेन.सांबार आहेच.
एवढं बास होईल बहुतेक.
आईस्क्रीम नाहीच सध्या ( पुण्यात भयंकर थंडी आहे आणि आम्ही गच्चीत बसणार आहोत.) पब्लीक डीमांड आली तर जेवणानंतर मसाला दुध किंवा कॉफी ची तयारी ठेवेन.

पांढरा ड्रेस कोड, मिळाले तर गजरे ई ई..
पदार्थांचे फोटो पाठवते कार्यक्रम झाला की.परत एकदा सर्वांचे आभार.

छान मेनु, उत्साही आहात सगळ उत्तमच होइल.फोटो टाका.
डोहाळतुली>> हा शब्द माहिती नव्हता पहिल्यादाच ऐकला.

इथल्या बायका फक्त हरहुन्नरीच नाहित तर प्रचंड डोकेबाज ही आहेत! किती पटपट पांंढरे पदार्थ सुचवलेत वाह तोड च नाही.
एकदम च प्राऊड Happy Happy

शेगडीची व्यवस्था करता आली तर
काजू + लसूण पेस्ट + थोडी मिरपूड + मीठ असे मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे ग्रिल करता येतील. थंडीचे दिवस आहेत तर शेगडीच्या आसपास उभे राहून खायला मजा येईल

हळदीकुंकू साठी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास , २० बायकांसाठी खालील मेनू कसा वाटेल? कृपया बदल / नवीन कल्पना सुचवा

रगडा पॅटीस
दडपे पोहे
ढोकळा
तीळ लाडू
चहा / कॉफि

थंडी चे गार पदार्थ शक्यतो टाळता येईल का? दडपे पोहे तसे कोरडे वाटतात,कितीही खोबरं, दही घातलं तरी

मिनी बटाटे वडे -कोणी मदतीला असेल तर ऐन वेळी,किंवा मावेत गरम करता येतील

मटरचा सिझन आहे तर मटार उसळ -पाव

समोसा-चाट पण चांगला पोटभरीचा होतो

रगडा पॅटीस
दडपे पोहे
ढोकळा
तीळ लाडू
चहा / कॉफि>>> हाच मेनु छान आहे की, पोहे पोटभरिचे होतात त्यामुळे मलातरी आवडला, रगडा पॅटिस मधले पॅटिस घरी करायचा पसारा नको असेल तर समोसा-छोले चाट ठेवा.समोसे विकतचे आणले की झाल.

समोसे विकतचे आणले की झाल. >>> हे रगड्याबरोबर पण चालतील, रगडा समोसा पण फेमस डीश आहे. त्यामुळे रगडा करुन पॅटीस न करता, सामोसे विकत आणले तर पोटभरीची डीश होईल.

समोसे / पॅटीस /हॅश ब्राउन पॅटीज बाहेरून आणून त्या रगडा सोबत सर्व्ह करते मग...धन्यवाद !! Happy

नम्रता पोहे जरा ऑड वाटत आहेत..शिवाय ते गार आणि कोरडे होतील जरा.
बाकिच्यांनी सजेशन्स दिले आहेत च.
स्मॉल कचोर्या -चटणी असं ही ठेवू शकता इतर मेनू बरोबर

अमराठी पन भारतिय २ कुटुंबाना बोलविले आहे. हा मेनू कसा वाटतो?

पापडी चाट
साबू. वडे (आप्पे पात्रात)- चटणी
मटकी उसळ
पुरणपोळ्या
हिरवी मसाला रस्सी(पातळ) भाजी
पुदिना काजू पुलाव
बुंदी रायता

गोडात आधीच पुपो असल्याने अजून काही ठेवले नाही. सर्व घरी करणार आहोत.

@ नम्रता,
रगडा पॅटीस
दडपे पोहे
ढोकळा
तीळ लाडू
चहा / कॉफि >> मला आवडला हा मेनु. भरपुर ओलं खोबरं घातलेले पोहे मस्त मौसुत होतात. खरतर साड्या दागिने घातले की कितीही थंडी असो उकडायला लागतं त्यामुळे पोहे चालुन जातील.तयार सामोसा रगडा आयडीया मस्त.

@आशु२,
पुरणपोळी असेल तर संपुर्ण महाराष्ट्रीयन मेनु करता येइल की.
पुरणपोळी, कटाची आमटी, मसालेभात, पालक बटाटा मिक्स भजी, मटकी उसळ्/बटाट्याची तिखट भाजी, वरण भात, चटणी, काको ई ई
कुठल्याही गृहिणीला गरम गरम आयतं पुरणाचा स्वयंपाक जेवायला खुप आवडतं असा माझा अनुभव. स्वतः पुरणाचा स्वयंपाक करुन जेवायला तेवढी मजा येत नाही Wink
पुपो सोबत पापडी चाट, पुलाव, साबु वडे हे सगळं पुपो सोबत केलंत तर पुपो बाजुला पडेल आणि हेच जास्त खाल्ले जाईल असं मला वाटतंय

"अमराठी भारतीय" हे आता वाचलं . मग तुमचाच मेनु छान आहे Happy पुलाव च्या ऐवजी मसालेभात खपुन जाइल मात्र. आवडेल पण त्या लोकांना कदाचित.पुलाव तर ते नेहेमिच खात असतील.

चांदण्यातले डोहाळेजेवण मस्त झाले. सर्वांना मनापासुन धन्यवाद. मेनु सगळ्यांनाच आणि मुख्य डोहाळतुलीला आवडला.
थंडी खुप होती म्हणुन घरीच जेवुन मग टेरेस वर जाउन ओटी भरली.
हा घ्या फोटो
Rasika_food.png

मस्त! Happy
अशी थीम्ड जेवणं करणं ही किती छान कल्पना आहे आपल्या पूर्वजांची!
ग्रेट.
आपण त्यात अजून नाविन्य पूर्ण भर घालू शकतो
उदा
कोवळ्या उन्हातले
सागर किनार्‍या वरचे
वनातले / टेंट मधले
होडीतले

अशी थीम्ड जेवणं करणं ही किती छान कल्पना आहे आपल्या पूर्वजांची!
ग्रेट.
आपण त्यात अजून नाविन्य पूर्ण भर घालू शकतो >>
हो अगदी खरं.
मी गरोदर असताना माझ्या आजीला भयंकर उत्साह होता डोहाळेजेवण करण्याचा. तिनं माझ्यासाठी कर्‍हाडच्या प्रितीसंगमावर नावेतलं डोहाळेजेवण केलं होतं अगदी आदल्या दिवशी जाउन नाव ठरवुन वगैरे केलं होतं. नदीपात्रात मधे गेल्यावर माझी नावेतच ओटी भरली होती आणि लोकांना खायला नारळ्याच्या करंजा, वाटली डाळ असं काय काय आणलं होतं
तसंच एक औध च्या यमाई च्या डोंगरावर डोंगरावरचं डोहाळेजेवण पण केलं होतं तिनं आणी माझ्या सगळ्या हौशी मावशा माम्यांनी. भरलं वांगं, भाकरी, मटकी उसळ, आळुवड्या, मुगाची खिचडी, दहीभात, लोणची, चटण्या कोशिंबीर, सगळे डबे भरुन नेले होते. जवळजवळ ३०-४० लोकांची मस्त पिकनिक माझ्या आजीने प्लॅन केली होती तेव्हा.
याशिवाय कोवळ्या उन्हातलं... त्यात सगळे केशरी पिवळे पदार्थ.

पुर्वीच्या लोकांनी खरच मस्त कल्पना शोधुन काढल्या होत्या गरोदर स्त्री चे लाड पुरवायला. आजकाल वेळ, माणसं आणि जागा सगळच कमी पडतं त्यामुळे हॉल घेउन डोजे केली जातात. त्यातपण वेगळी मजा आहेच म्हणा. फोटोशुट वगैरे बघायला मस्त वाटतं

मस्त बेत स्मिता! डोहाळजेवण सोडून एरवीही गंमत म्हणून असे पांढऱ्या रंगाचे पदार्थ करून चांदण्यात जेवायला छान वाटेल.

स्मिता मस्त बेत फोटो सुंदर.
आम्ही एकदा कोवळ्या उन्हातलं म्हणजे सकाळी सकाळी केलं होतं .सगळे पदार्थ पिवळे होते. म्हणजे केशरी भात, ब वडे, हळदीची फोडणी घालून चटणी, ओल्या हळदीच लोणचं, पिवळा सांजा, चहा असे सगळे पिवळे पदार्थ. डोहाळतुलीच्या पानाला महिरप ही पिवळ्या शेवंतीची, तिच्या ओटीचा खण पिवळा , आमच्या साड्या पिवळ्या ...असं सगळं पिवळं पिवळं .

वाह स्मिता मस्त बेत केलात, छान आहे फोटो.

तुमची (खरोखर नावेतलं आणि डोंगरावरचे डो जे) आणि हेमाताईंची डो जे पोस्टही मस्त.

कालच (गुरुवारी) भाचेसुनेचे डो जे आम्ही सासरच्या सर्वांनी मिळून पुण्यात केलं. स्वस्तिश्री हॉल बुक केलेला आणि त्यांचं जेवण अप्रतिम होतं, थोडा बेत भोगीचा होता पण उत्सवमुर्तीला खायला गुळाच्या पोळ्या उष्ण होतील म्हणून गुलाबजाम, पुरी, जिलबी मठ्ठा ठेवलेला, मिनी बटाटेवडे, पंचामृत, मटकी उसळ, भोगीची भाजी, खिचडी, कढी, अजून एक भाजी असा मिश्र बेत होता. झोपाळा नव्हता तिथे त्यामुळे झोपाळा दिसेल असं खुर्चीला डेकोरेशन केलेलं. चंद्र चांदण्या पुठ्ठ्याच्या केलेल्या, मी आयत्यावेळी डोंबिवलीतून गेलेले, सगळी तयारी आमच्या हौशी पुणेकर नातेवाईकांनी केलेली. अर्थात हॉल घेतल्याने जेवणाचं कॉंट्रॅक्ट त्यांनाच दिलेलं. एकंदरीत सजावट तिची साडी असा वेगवेगळे कलर मिक्स कलरफुल होतं सर्व.

Pages