Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुळात पुऱ्या तेलकट व तिखट
मुळात पुऱ्या तेलकट व तिखट आहेत
म्हणून रायते किंवा दही बेस आयटेम बॅलन्स होईल
हो, ते खरं आहे.बेस व्हर्जन
हो, ते खरं आहे.बेस व्हर्जन दही पण चांगले लागेल.किंवा पब्लिकला चालत असेल तर टोमॅटो केचप.
टोमॅटो किंवा फुटाण्याची चटणी,
टोमॅटो किंवा फुटाण्याची चटणी, बुंदी रायता हे ऑप्शन छान वाटताहेत.
अमा : बेडमी पुरी आणि बटाट्याची भाजीची आयडीआ मस्त. ही पण एकदा ट्राय करणार.
ज्येंना कधी असले खात नाहीत ना
ज्येंना कधी असले खात नाहीत ना.>>>> आमच्या ज्येला फार आवडतात असले पदार्थ!पिस्ता,पास्ता,चीझ गर्लिक ब्रेड,पाणीपुरी आदी चाट आय्टेम हे जेवणापेक्षा प्रिय आहेत.
साधे मॅक अॅ ड चीज, गार्लिक
साधे मॅक अॅ ड चीज, गार्लिक ब्रेड व छान पैकी गरम टोमाटो सूप. थिओ ब्रोमा मधून तिरामिसू ऑर्डर करायचे. आमच्या इथे एक ग्रॅन्ममाज कॅफे आहे तिथे पहिले दोन मस्त मिळते. सूप घरी बनवायचे.
ज्येना पण भारी असतात एक एक.
ज्येना पण भारी असतात एक एक. तुम्ही कराल भरपूर कौतुक आणि खर्च आणि मग कोणीतरी एक
"बाईंनी आम्हाला घरी बोलवून असलं कायसंसं खायला घातलं" म्हणेलच.
आमच्याकडे ज्ये.ना अजिबात खात
आमच्याकडे ज्ये.ना अजिबात खात नाहीत असले पदार्थ.. ..हॉटेल मध्ये गेलो कधी पंजाबी खायला तर पोळ्या घरातून घेऊन जातात..
आमची ज्ये.ना. टी पार्टी मस्त
आमची ज्ये.ना. टी पार्टी मस्त झाली. तुम्हां सर्वांना धन्यवाद.
मऊ उपमा
खांडवी (बाहेरून मागवलेली)
मिनी गुलाबजाम
बनाना-आमंड शॉर्टब्रेड स्लाइसेस (घरी केल्या. सुपरहिट झाल्या)
नारळाची चटणी, हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी
ज्यांचे दात शाबूत होते त्यांच्यासाठी कुरकुरीत कांदा पकोडे (गार्डनचे) थोडं खट्टा मीठा नमकीन
आणि चहा
सर्वांना आवडला बेत.
मस्त बेत आहे.
मस्त बेत आहे.
बेत मस्तय आहे.
बेत मस्तच आहे..
सालाबादप्रमाणे यंदाही
सालाबादप्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणपती येणार आहेत आणि सालाबादप्रमाणे मी ही तुमच्याकडे स्वयंपाकाबद्दल प्रश्न घेऊन आली आहे

यंदाचा संध्याकाळचा बेत भाकरी, भरली वांगी, वरण भात, गुजा आणि पापड, लोणचे हा ठरला आहे तर मला विचारायचे होते की भाकरीसोबत अजून कोणती भाजी जाईल. मला तर पिठल, ठेचा आणि पालेभाजी शिवाय काही सुचत नाहीये
६०-७० जण असणार आहेत जेवायला त्यानुसार एखादी भाजी सुचवा लोकहो. दरवर्षी वेज कुर्मा खाऊन कंटाळा आलाय.
जास्त प्रमाणात पटकन करायची
जास्त प्रमाणात पटकन करायची असेल तर शेवभाजी. रस्सा बनवून ठेवून ऐनवेळी टाकली की झालं.
किंवा मस्त आंबट गोड आमटी, थोडी घट्ट करुन भाजी सारखी.
मृण्मयीच्या रेसिपीने
मृण्मयीच्या रेसिपीने भोपळ्याची बाकर भाजी करता येईल. भाकरीसोबत छान लागते ती भाजी. थंडीचे दिवस आहेत तर फ्लावर वटाणा बटाटा रस्सा भाजी पण जमू शकेल. फक्त एवढ्या लोकांसाठी मटार सोलायची एक पार्टी ठेवावी लागेल एक-दोन दिवस आधी
खूपजण आहेत तर उसळ सोपी पडेल
खूपजण आहेत तर उसळ सोपी पडेल करायला, कडधान्ये भिजवता येतील किंवा भिजवलेली विकतही मिळतात.
भाकरी बरोबर उसळ चांगली लागेल
भाकरी बरोबर उसळ चांगली लागेल का? मिळून येत नाही, कितीही रस्सा केला तरी कोरडी वाटेल असं वाटलं.
पनीर ग्रेव्हीवाले सुद्धा
पनीर ग्रेव्हीवाले सुद्धा चांगले लागते भाकरी बरोबर.
एक प्रश्न हा साठ सत्तर
एक प्रश्न हा साठ सत्तर लोकांचा सैपाक तुम्ही घरी करणार आहात की outsource करणार आहात ? Outsource असेल तरच फॅन्सी काही करणे शक्य होईल.
भाकरीसोबत कोणतीही रस्सा भाजी.
भाकरीसोबत कोणतीही रस्सा भाजी.. पाटवडी रस्सा, काळ्या वाटाण्याची आमटी, चणा बटाटा रस्सा भाजी, मटकी ची उसळ
पाटवड्या, डाळ-मेथी, शेवभाजी,
पाटवड्या, डाळ-मेथी, शेवभाजी, जरा मऊ शिजवलेली उसळ, ताकातली पालक यातलं काहीही चांगलं लागेल भाकरीबरोबर. लसूण चालणार आहे का?
पालकची डाळ घालून भाजी.
पालकची डाळ घालून भाजी.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
फक्त एवढ्या लोकांसाठी मटार सोलायची एक पार्टी ठेवावी लागेल एक-दोन दिवस आधी>> हे तर आमच्याकडे दरवर्षी असते. ४-५ किलो मटार निवडणे, फ्लॉवर, गाजर, फरसबी कापून ठेवणे, गुलाबजाम बनवणे, कांदा खोबऱ्याचे वाटण, मोदकाची चव हे सगळं आदल्या दिवशी आई, आत्या, दोन वहिनी, मामा, नवरा, साबा, साबू आणि मी मिळून करतो.
चपात्या, भाकरी बाहेरून ऑर्डर करतो, भाज्या, वरण भात मामा आणि मी घरी बनवतो.
कडधान्य उसळ पर्याय बरा वाटतो. पटकन होईल आणि कापाकापी कमी असेल.
शेंगदाणा मिरची ठेचा २-३ दिवस आधी करून ठेवता आला तर बघते. आवडेल सगळ्यांना असे वाटते.
भाकरी बरोबर उसळ चांगली लागेल
भाकरी बरोबर उसळ चांगली लागेल का? >>> आमच्याकडे आवडते. मुगाची उसळ छान शिजते, मिळून येते . पावट्याची उसळ पण छान लागते.
वांग्याच्या भाजी सोबत जोडीला
वांग्याच्या भाजी सोबत जोडीला शेवभाजी किंवा पाटवडी रस्सा.. किंवा साधी मटार बटाटा टोमॅटो रस्सा भाजी.
वांगी वातूळ आहेत ऑलरेडी, मग
वांगी वातूळ आहेत ऑलरेडी, मग आणखी उसळही नको असं वाटतं मला. वर भोपळ्याची बाकरभाजी सुचवली आहेच शोनूने.
अळूवड्या करणं / आणणं शक्य असेल तर एक डाव्या बाजूला भाजीचा प्रकार होऊ शकेल. किंवा गाजराची कोशिंबीर (गाजराचा कीस फोडणीवर वाफवून त्यात हिरवी मिरची+मीठ+साखर+लिंबू) चालेल.
वांगी वातूळ आहेत ऑलरेडी, मग
वांगी वातूळ आहेत ऑलरेडी, मग आणखी उसळही नको असं वाटतं मला. >>> मुद्दा बरोबर. काही कडधान्ये पचायला हलकी असतात पण बरीच कडधान्ये जड.
उसळ ऑप्शन करणार असाल तर मुगाची पचायला हलकी. मटकी पण जड नसावी बहुतेक.
ताकातली पालक/डाळ पालक छान
ताकातली पालक/डाळ पालक छान लागेल भाकरी सोबत.. जर उसळ नाही ठरली तर.
पनीर ग्रेव्हीवाले सुद्धा चांगले लागते भाकरी बरोबर>>>> नाहि हो बहुतेकांना नाही आवडणार हे काँबो.
वरदा ने सुचवल्याप्रमाणे
वरदा ने सुचवल्याप्रमाणे पातळसर पळीवाढं पिठलं व त्यात कसुरी मेथी, वरती लसणाची खमंग फोडणी मस्त लागते.
नुकतेच प्रयोग म्हणून केले होते. पिठल्यापेक्षा चविष्ट लागते. बाजरीची भाकरी होती त्याबरोबर.
भाकरी बरोबर पनीर बिग नो पनीर
भाकरी बरोबर पनीर बिग नो पनीर बरोबर तंदूरी रोटी, पराठा किंवा लच्छा पराठेच. पण आसाममध्ये असताना पनीर बरोबर साधा पांढरा भात खाल्लाय.
पिठल्यात व्हेरिएशन करता येतील
पिठल्यात व्हेरिएशन करता येतील, शेवग्याच्या शेंगा / किंवा ताजी मेथी घालुन, पाटोड्यांचा रस्सा किंवा शेव भाजी - ग्रेवीचा मसाला (कांदा खोबरं) आधी भाजुन वाटुन ठेवता येईल.
नुसती पालेभाजी नको असेल तर सरसो का साग करता येईल.
कढी पकोडे / गोळ्याची आमटी / सांडग्याची भाजी / बिरड्या मिळाल्या तर बिरड्याची उसळ किंवा वालाच्या डाळीची आमटी इत्यादी
सुरणाची / दोडक्याची भाजी / दुध्याची लाल तिखट घालून केलेली जराशी चमचमीत भाजी पण चालू शकेल का?
बरोबर ठेचा आणि ताक
पालक / मेथी ची मुददा भाजी
पालक / मेथी ची मुददा भाजी मराठवाडा पदधतीची ,
भरली वांगी ऐवजी खारे वांगे
Pages