Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाफाळते पोहे/उपमा, मिरगुंडं,
वाफाळते पोहे/उपमा, मिरगुंडं, आंबा/नारळ बर्फी.
वरून खोबरं कोथिंबीर लिंबू. (शेव नको. )
अमांची स्पेशल टिप्पणी नक्की च
अमांची स्पेशल टिप्पणी नक्की च लक्षात ठेवा... त्यांचे कमेंट्स वाचताना नेहमी चेहऱ्यावर स्माईल येतेच.....
ह्यावरून आठवल, जवळपास
ह्यावरून आठवल, जवळपास वर्षभरापूर्वी (किंवा त्याआधीही असेल) कुणीतरी विवाह इच्छुक मायबोलीकर आयडीने (बहुधा ज्यांचे लग्न जमले होते) एक धागा उघडला होता. कित्येक मायबोलकरांनी जणु अगदी घरचेच कार्य असावे ह्या उत्साहाने बस्ता व दागिने खरेदी, मेन्यू, व आयोजनाबद्दल भरभरून उत्तम प्रतिसाद, सल्ले, व सुचना दिल्या होत्या. सुरूवातीला धागाकर्ताही तेवढ्याच उत्साहात वृत्तांत देत असे पण पुढे त्या धाग्याचे काय झाले समजलचं नाही. कुणाला तो धागा आठवतो का?
राहुल
राहुल
मी सकाळी हाच विचार करत होते
त्या आयडी चं सर्व व्यवस्थित झालं असावं अशी सदिच्छा
मला तोच धागा आठवत होता.
राहूल, हो हो अगदी! नागपूरचीच
राहूल, हो हो अगदी! नागपूरचीच होती.
हा तो धागा.
हा तो धागा.
चहा, पोहे, एक बाकरवडी, एक
चहा, पोहे, एक बाकरवडी, एक आंबा बर्फी. कापलेली फळे कलिंगड किंवा अॅपल्स. तर्री/ सार हे व असे लिक्विड पदार्थ शक्यतो ठेवू नका. लोक भारी कपडे घालुन येतात. व बावरलेले असतात सांडले तर कपड्यांवर तेलाचे डाग पडतील. >>
मग तर नक्कीच ठेवले पाहिजेत पातळ पदार्थ. नवरा किंवा होणारी सासु कितपत धांदरट आहे हे समजेल या निमित्ताने. हा हा हा.
आणि देताना मुलीने सांडलवंड केली तर होणारी सून किती धांदरट आहे ते सासुला पण समजेल ना .. दोन्हींचा फायदा. ( दिवे घ्या हो )
स्मित श्रीपाद,
स्मित श्रीपाद,
{१५ तारखे ला मुला ला पहायला मुली कडची लोक येणार आहे।}
अर्थात तरीही तुम्ही म्हणता ते थोडंफार होऊ शकेल.
हा तो धागा >>> थँक यू,
हा तो धागा >>> थँक यू, मानवदादा! तोच तो.
mi_anu >>> होय, मलाही अमांची कोटी वाचूनच त्या धाग्याची आठवण आली होती, जो शोधूनही सापडला नाही. मात्र तो मानवदादांना लगेच भेटला. सगळें सुरळीत पार पडले असावे ही माझ्याकडूनही सदीच्छा.
मंजूताई >>> धागाकर्ती नागपूरची आहे माहित नव्हते.
विवाह इच्छुक मायबोलीकर आयडीने
विवाह इच्छुक मायबोलीकर आयडीने >>ती अमृताक्षर. किती गोड मुलगी. तरुणी सदस्य होतात. अगदी साध्या साध्या शंका असतात. मग लग्ने होतात पहिल्या बाळापरेन्त पोस्टी येतात. मग युवती बिझी होउन जातात. की थोडा ब्रेक. मग एकदम बालसंगोपनातील शंका. घर कसे लावायचे त्या शंका. माबो लाइफ सायकल
फार पदार्थ करू नका - चहा/कॉफी
फार पदार्थ करू नका - चहा/कॉफी, सोबत बिस्कीटस्, जिंजर कूकीज, एक पोटभरीचा खारा पदार्थ पोहे/उपमा/इडली सांबार, एक गोड पदार्थ - गुलाब जाम, बंगाली मिठाई, काजू कतली इ., फिंगर फूडसारखे खाता येईल अशी फळं कलिंगड/पपई कापून टूथपिक लावून ठेवा. एवढे बास होईल.
उपवासाच्या दिवस असेल तर साबुदाणा खिचडी/कचोरी वगैरेचा एक्स्ट्रा इंतजाम करा. खूप ऊन असेल तर कोकम/लिंबू सरबत/ पन्हे करण्याचे सामान असू दे. सोबत बच्चा पार्टी असेल तर छोटेसे बोर्नविटा वगैरेचा सॅशे असू दे घरात.
पॉटलक साठी साऊथ इंडियन लोकाना
पॉटलक साठी साऊथ इंडियन लोकाना आवडेल अशी ड्राय भाजी कोणती करावी? १५-२० लोकांसाठी, सोपी, पटकन होणारी अशी . पनीर छोले नकोयत. Help please.
काजू तोंडली आवडेल त्याना.
काजू तोंडली आवडेल त्याना.
ममो+१.
ममो+१.
दुसरा ऑप्शन
ओले खोबरे असेल तर थेंगइ पोरियाल
भेंडी . शेंगदाणे , कडिपत्ता
भेंडी . शेंगदाणे , कडिपत्ता घालुन परतलेली. सुंदर होते.
कुर्मा आवडतो. ( पण ड्राय नको आहे हे आत्ता पाहिले)
दुधी डाळ घालुन. कडिपत्ता भरपुल घाला. लाल मिरची ओले़ खोबरे घाला.
काळा मसाला घालु नका़ कुठेच.
छान आहेत ऑप्शन. पण भाताबरोबर
छान आहेत ऑप्शन. पण भाताबरोबर खूपच कोरडे वाटतील का?चपाती फुलके नाहियेत म्हणे.( सांबार असेलच )
दुधी डाळ घालुन. कडिपत्ता
दुधी डाळ घालुन. कडिपत्ता भरपुल घाला. लाल मिरची ओले़ खोबरे घाला. >> ही भाजी किंवा याच पद्धतीने पत्ता कोबी, बीट रूट आणि कच्ची पपई छान लागते. हवे तर यात थोडा सांबार मसाला पण घालता येतो. बाकी कसल्याच मसाल्याची गरज नाही.
भेंडी . शेंगदाणे , कडिपत्ता
भेंडी . शेंगदाणे , कडिपत्ता घालुन परतलेली. सुंदर होते.>>> हा च सांगणार होते..जरा क्रिस्पी बनवली कि छान लागते
झटपट होणार्या २
झटपट होणार्या २
दुधी किंवा तोंडली. बारीक चिरलेली. ओला नारळ, सांबार मसाला, भरपूर कढीपत्ता किंवा त्याची पावडर, तिखट, चिंच कोळ, दाण्याचा कुट आवडत असेल तर. थोडं तेल जास्त घातलं तर भाताबरोबर पण चांगल्या लागतील.
अवांतरः साऊथ इंडियन लोकांना आवडतील अशाच का पण? न्या की आपली मराठी ऊसळ, बटाटा रस्सा भाजी.
आपली कांद्याची पिठ पेरून भिजी
आपली कांद्याची पिठ पेरून भिजी न्या. हिट्ट असते ती.
सेल्स फंडा.
सेल्स फंडा.
आधी त्यांना आवडेल तसे करा, मने जिंका.
मग आपल्याला आवडेल ते त्यांच्या कडुन करून घ्या.
भरली वांगी, मटकी / मिश्र
भरली वांगी, मटकी / मिश्र कडधान्याची उसळ, फ्लावर बटाटा वाटाणा रस्सा भाजी
रिक्षा : https://www.maayboli.com/node/24325
https://www.maayboli.com/node/10781
https://www.maayboli.com/node/20392
https://www.maayboli.com/node/4126
मिरची का सालन न्या. बेस्ट
मिरची का सालन न्या. बेस्ट लागतं.
थँक्यू ऑल. पॉटलक साठी वरच्या
थँक्यू ऑल. पॉटलक साठी वरच्या सजेसना घरच्या मेंबरांनी च विरोध केला. पार्टीसाठी फॅन्सी भाजी पाहिर्जे म्हणून मश्रूमची भाजी केली . कापाकापी मेंबरांनाच करायला सांगितली. आवडली सगळ्यांना.
चांदण्यातल्या डोहाळेजेवणासाठी
चांदण्यातल्या डोहाळेजेवणासाठी सर्व पांढरे पदार्थ करायचे आहेत.तर मेनु सुचवा.१५-१६ लोक आहेत.
खालचा मेनु आधीच ठरवला आहे पण मला अजुन थोडी व्हरायटी हवी आहे.
इडली ( चटणी, सांबार )
खवा पोळी
पुलाव, काकडी कोशिंबीर
धन्यवाद
वॉव! किती हौशी आहेत सर्वजण!
वॉव! किती हौशी आहेत सर्वजण!
करंज्या ( चंद्रकोरी चा आकार म्हणून)
पांढरा ढोकळा, हळद न घालता दडपे पोहे, स्वीट कॉर्न सूप (गरम काहीतरी पाहिजे म्हणून), साबुदाण्याच्या पापड्या तळून
@स्मिता श्रीपाद : पांढरा
@स्मिता श्रीपाद : पांढरा ढोकळा, उकडीचे मोदक/रसमलाई/रसगुल्ला/खीर/फिरनी, मेथी मलई मटर, मलई कोफ्ता करी ,पनीर काली मिर्च/पनीर चमन, आलू जीरा/उपवासाची बटाट्याची भाजी, रुमाली रोटी, बुंदी रायता, काबुली चण्याचे सुंदल, मश्रुम सूप, तांदळाचे पापड किंवा कुरडया
कश्मिरी दम आलू व्हाइट
कश्मिरी दम आलू व्हाइट ग्रेव्ही मधले. जीरा राइस किंवा नवरत्न पुलाव. व्हाइट ढोकळा. कढी किंवा नारळाच्या दुधातील व्हेज स्ट्यु.
कौतुकाचे म्हणून गुलकंद आइसक्रीम नक्की करा. व्हॅनिला आइसक्रीम मध्ये गुलकंद घालुन परत फ्रीज करा. / नॅचरल्स चे टेंड र कोकोनट आइसक्रीम.
ओल्या नारळाच्या वड्या.
गोडात-काजूकतली, रवा नारळ लाडू
गोडात-काजूकतली, रवा नारळ लाडू,
सँडविच, दहिवडा, निर डोसा, साबुदाणा खी,दहीबुत्ती
काय भारी यादी तयार होतेय..
काय भारी यादी तयार होतेय..
@स्मिता श्रीपाद, मला निमंत्रण नक्की पाठवा..
Pages