बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा ने सुचवल्याप्रमाणे पातळसर पळीवाढं पिठलं व त्यात कसुरी मेथी, वरती लसणाची खमंग फोडणी मस्त लागते. >> अर्थात पिठलं भाकरी कॉम्बो हिट च असतो परंतू संध्याकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत जेवणं चालतात त्यामुळे स्वयंपाक सारखा थंड होतो . त्यात पिठलं लगेचच दाट होतं. त्यामुळे पिठलं ऑप्शनल टाकलंय मी.

पनीर भाकरी मलाही झेपत नाही. पनीर सोबत रोटी किंवा चपातीच.

येस..भाकरी सोबत झुणका, कढी गोळे, गोळ्यांची आमटी, डाळ कांदा, ...असेच चांगले लागते.
पण भाकरीच का करायच्या आहेत? पोळ्यां सोबत अधिक बेटर ऑप्शन मिळतील ...

नमस्कार मायबोलीकरहो,
पुढच्या आठवड्यात ३ जवळची लोकं जेवायला आहेत.
बाईट साईज चीज कॉर्न पॅकेट (जागू रेसिपी) प्रत्येकी ३ स्टार्टर म्हणून,
पराठा, शाम सवेरा भाजी (म्हाळसाच्या रेसिपीने), फ्रुट रायता, बिर्याणी (किंचित स्पायसी) असा बेत विचार करत्येय.

गोड काय करु? घरीच करायचे आहे.

मागच्यावेळी गुजा व बीटरुट नारळ वडी हे करुन झालेय.
कृपया मदत करा.

Apple Atta हलवा. काही दिवसांपूर्वी बहिणीने केला होता, मस्त झाला होता एकदम.

अच्छा. चांगले आॉप्शन्स. धन्यवाद.
मेन्यू कसा वाटतोय? काही पातळ पदार्थ ठेवू का? जेवायला संध्याकाळी येणार आहेत.

वेळ असेल तर रसमलाई करा. नेटवर खूप रेसिपीज आहेत. मी रक्षाबंधन साठी केली होती. सोपी पण वेळखाऊ आहे. आणि खूप छान होते, एकदम विकतच्यासारखी. पाहुणे एकदम भारावून जातात. Happy
माझी एक टीप- दुधात MTR ची बदाम मिल्क पावडर घालून खूप छान आणि लवकर दूध तयार होते.

3 लोकांसाठी तुमचा मेनू खूप वेळ घेणारा वाटतोय. मी पराठा, दही बुंदी रायते, बिर्याणी आणि रसमलाई केली असती. स्टार्टर नसते केले कारण त्यातच पोट भरून जाते आणि आपल्या बाकी मेहनतीला कोणी न्याय देत नाहीत.

स्टार्टर नसते केले कारण त्यातच पोट भरून जाते आणि आपल्या बाकी मेहनतीला कोणी न्याय देत नाहीत. >> + ११११. हेवी स्टार्टर असतील तर पोट भरून जाते. अगदीच ठेवायचे असेल तर एखादा ढोकळा पीस किंवा केक स्लाइस सारखे एकदम लाइट असेल तरच पुढच्या जेवणाला न्याय मिळेल.

स्टार्टर नसते केले कारण त्यातच पोट भरून जाते आणि आपल्या बाकी मेहनतीला कोणी न्याय देत नाहीत.>> मानण्यावर आहे ते. स्टार्टर शिवाय मजा नाही असे मला वाटते. जर का ३ तास + असतील तर स्टार्टर जरूर ठेवा. पराठा भाजी, बिर्याणी हेवी मेनू आहे पातळ मधे सूप्/दाल फ्राय मॅच नाही होत. रायता पुरेसा आहे.
मींट लिंबू सरबत ठेवता येईल स्टार्टर सोबत.

दिवाळी साठी १०/११ जणी येणार आहेत. मेनू कसा वाटतोय?
दाबेली, चटणी (बटाटा बटाटा होईल का जास्त?)
दम आलू ग्रेव्ही वाले
भरली/लसूणी ड्राय भेंडी
अजवाईन पराठा
जिरा राईस
दाल तडका
बुंदी रायता
गोडात शेवया खीर किंवा सोपं काय ठेउ? शिरा नकोय.

आशू, मेनू मस्त आहे.‌फक्त दाबेलीच्या ऐवजी काही तरी वेगळं करता येईल का?
बटाटा जास्त होईल. किंवा मग दम आलू ऐवजी पनीरमाखनी वगैरे करता येईल का?
गोडात फिरनी करता येईल.

कोथिंबीर वडी, मटकी उसळ टोमॅटो सार, मसाले भात. मठ्ठा व जिलेबी( ही बाहेरून आणता येइल.) पापड कुरड्या व खोबर्‍याची चटणी. अजू न भाजी हवी असल्यास फ्लावर बटाटा मटार सुकी भाजी. सोबत पुरी.

ह्यातील भाज्या उसळ सार चटणी आदल्या दिवशी करता येइल. कोथिंबीर वडी उकडून ठेवता येइल आयत्या वेळी पुर्‍या व व्ड्या तळायच्या.

धन्यवाद सगळ्यांचे. मी असा बेत केलेला -
बाईट साईज चीज कॉर्न पॅकेट (जागू रेसिपी) स्टार्टर
पालक पराठा
नारळाची चटणी
व्हेज बिर्याणी
बुंदी रायता
दुधी हलवा
आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने मसाला दुध कोजागिरी असल्याने.

सगळ्यांना आवडलं. स्टार्टर असून हेवी झाले नाही.

धन्यवाद प्राची, मेधावी.
दाबेली ऐवजी कचोरी (विकताची) ठेवणार आहे.
अश्विनीमावशी तुम्ही मला सजेस्ट केलाय का अनामिका ला? सगळा मेन्यु च बदललात Happy

आशु मेन्यु मस्तंंय. गोडात खीर शेवया / दुधीची / गुलाबजाम / फ्रुट सॅलड (फळं + दुध) चालत असल्यास ह्यातलं काहीही चालेल असं वाटतं.

१५ तारखे ला मुला ला पहायला मुली कडची लोक येणार आहे। साधारण ८ लोक होतिल।पोट भरी च काम करता येइल।मी एकटी आहे कराया।गोड अंजीर हलवा आहे।

इडली सांबार किंवा
पाव भाजी किंवा मिसळ पाव
किंवा पुलाव आणि टोमॅटो सार किंवा
पनीर बिर्याणी आणि रायता

नाहीतर बाहेरून ऑर्डर करा. हे सर्वात सोपं...

१५ तारखे ला मुला ला पहायला मुली कडची लोक येणार आहे। साधारण ८ लोक होतिल पोट भरी च काम करता येइल>>
कांदा-बटाटा पोहे + तर्रीवाली मटकी उसळ + शेव+बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो -कोथिंबीर+ लिंबु ई ई
सर्व पदार्थ आधी करुन ठेवता येतील. वाढायला पण सोपे.
आणी दाखवण्याच्या कार्यक्रमाला महत्वाचे Wink

चहा, पोहे, एक बाकरवडी, एक आंबा बर्फी. कापलेली फळे कलिंगड किंवा अ‍ॅपल्स. तर्री/ सार हे व असे लिक्विड पदार्थ शक्यतो ठेवू नका. लोक भारी कपडे घालुन येतात. व बावरलेले असतात सांडले तर कपड्यांवर तेलाचे डाग पडतील. अर्थात असे झाले तर साफ कराय च्या निमित्ताने मुलगा मुलगी बोलु शकतील.

दुसरा पर्यायः दहिवडा बोल मध्ये. गरम उपमा वरुन ओले खोबरे व कोथिंबीर, उपमा इज व्हेरी नॉन थ्रेटनिन्ग. मावेत गरम केलेली डॉलर जिलेबी.

सून कशी आहे सांगा हं वृत्तांत हवा.

असा प्रमाणेच दहीवडे सुचवीन. .. भरून ठेवता येतील. .. बोलायला वेळ मिळेल. चिरोटे लाडू, गुजा गोड ठेवणार असाल तर चहा/कॉफी खारी गोड बिस्किटे

पोहे
समोसा / ब्रेड पकोडा
हिरवी चटणी / चिंचेची चटणी
मिनी डोसा खाकरा
काजुकतली / काजुरोल / बीट नारळ वडी
अॅपल / पेअर
चहा / काॅफी
मिनी खारी / जिरा बिस्कीट

Pages