केक हा जवळजवळ सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा पदार्थ मायबोलीवर विविध केक्स, लोफ आणि मफिन्स इत्यादींच्या च्या वेगवेगळ्या तोंपासु पाककृती भरपुर आहेत.
परंतु बेसिक केक कसा करावा, ओव्हन टेम्परेचर काय असावे, सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे काय, भांडी कुठली वापरावीत, केक का फाटला/बसला, आयसिंग करताना कुठली साखर वापरावी, बटर वापरावे का क्रिम? असे अनेक प्रश्न, अनेक वेळेला विचारले जातात. युक्ती सुचवा बीबी वर किंवा त्या त्या पाकृ मधे काही उत्तरे ही मिळतात. पण जेव्हा केक करायचाय आणि असे बेसिक प्रश्न पडलेत तेव्हा शोधा शोधी करत बसण्यापेक्षा हा धागा उपयोगाचा ठरु शकेल.
इथे मी एक बेसिक बटर केक आणि बटर आयसिंग ची कृती दिली आहे. अजुन कुणाच्या काही खास आयडियाज्, टीप्स असतिल तर त्या या धाग्यावर लिहा.
बेकिंग मधे वापरले जाणारे काही खास शब्द जसे फोल्डींग, क्रिमिंग त्यांचे अर्थ आणि विश्लेषण इथे लिहा.
इथे तुमच्याकडे असलेली बेकिंग साठी लागणारी भांडी, उपकरणे यांचे फोटो पण टाका. एखादे खास उपकरण असेल तर त्याचा वापर कसा, कश्यासाठी करता ते ही लिहा
हॅप्पी बेकिंग
---------------------------------
बेकींग आणि केक साठी लागणारे साहित्य -
बर्याचदा बेकींगसाठी अथवा अभारतीय पदार्थ बनवतांना लागणारे साहित्य मुंबईत कुठे मिळेल याबद्दल चौकशी केली जाते. सीमाने दिलेल्या फुड ब्लॉगवर ही मुंबईतल्या ठिकाणांची आणि मिळणार्या वस्तूंची एकत्रित यादी मिळाली.
बेकींगसाठी मुंबईत सामान मिळण्याच्या ठिकाणांची यादी इथे मिळेल....
या मिहितीसाठी - धन्यवाद रूनी पॉटर
हा प्रश्न श्रद्धाच्या बाफ
हा प्रश्न श्रद्धाच्या बाफ मध्ये कोणीतरी विचारला होता ,
मला पण हवयं "Fondant" कुठे मिळेल ?
आणि त्याच वापरायचं प्रमाण काय असत ?
Fondant : आपण अमेरिकेत असाल
Fondant :
आपण अमेरिकेत असाल तर, Hobby Lobby or michaels
या दुकानात मिळते. बहुतेक Duff Goldman चे मिळते.
वापरायचं प्रमाण त्या वर लिहलेले असते.
डबलक्रीम म्हणजे काय? बँगलोर
डबलक्रीम म्हणजे काय? बँगलोर मध्ये सुपर्मर्केट्स मध्ये सहज मिळते का? न मिळाल्यास, दुसरे काय वापरता येइल?
रेसिपी मध्ये पुढीलप्रमाणे वापर दिला आहे:
for filling (beween the two layers of cake): place double cream (300ml) in pan and bring it to boil, stirring. add plain chocolate (150gms) and stir till it melts. remove from heat, tranfer to bowl and let it cool. beat with wooden spoon till it thickens.
अमुलचं फ्रेशक्रीम वापरता येइल का? मुळात फ्रेश क्रीम आणि डबल्क्रीम यात काय फरक असतो.
उद्या केक करायचा आहे आणि सामान आजच आणावं लागेल, तेव्हा प्लीज मला सांगा.
प्लीज माझ्या प्रश्नाचं उतर
प्लीज माझ्या प्रश्नाचं उतर द्या. दोन लयेर्स च्य मध्ये फिलिंग घालाय्चय त्यामुळे ते पातळ होउन चालणार नाहिये. म्हणून फ्रेश क्रीम चालेल का असं वाटतय. नसल्यास पर्यायी काय वापरता येइल??
मला बाहुलीचा केक बनवायचा आहे.
मला बाहुलीचा केक बनवायचा आहे. मला स्वतःला व्हिप क्रीम अवद्ते. एकदा छोट्या केक ला ट्राय केला. पण डीसाईन करताना हाताच्या उष्णतेने क्रीम विताळणे , सारखे फ्रीज ला ठेऊन परत सुरु करणे असा प्रकार झाला . बटर क्रीम सोपे जाईल का? बाहुली केक ला किती क्रीम लागेल? सोपी रेसिपी सांगता का बटर क्रीम ची .
@ - आनन्दि माझ्याकडे पण ओवन
@ - आनन्दि
माझ्याकडे पण ओवन नाहिये. मी कुकर मध्ये केक करते. चान्गला होतो.
Pages