केक हा जवळजवळ सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा पदार्थ मायबोलीवर विविध केक्स, लोफ आणि मफिन्स इत्यादींच्या च्या वेगवेगळ्या तोंपासु पाककृती भरपुर आहेत.
परंतु बेसिक केक कसा करावा, ओव्हन टेम्परेचर काय असावे, सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे काय, भांडी कुठली वापरावीत, केक का फाटला/बसला, आयसिंग करताना कुठली साखर वापरावी, बटर वापरावे का क्रिम? असे अनेक प्रश्न, अनेक वेळेला विचारले जातात. युक्ती सुचवा बीबी वर किंवा त्या त्या पाकृ मधे काही उत्तरे ही मिळतात. पण जेव्हा केक करायचाय आणि असे बेसिक प्रश्न पडलेत तेव्हा शोधा शोधी करत बसण्यापेक्षा हा धागा उपयोगाचा ठरु शकेल.
इथे मी एक बेसिक बटर केक आणि बटर आयसिंग ची कृती दिली आहे. अजुन कुणाच्या काही खास आयडियाज्, टीप्स असतिल तर त्या या धाग्यावर लिहा.
बेकिंग मधे वापरले जाणारे काही खास शब्द जसे फोल्डींग, क्रिमिंग त्यांचे अर्थ आणि विश्लेषण इथे लिहा.
इथे तुमच्याकडे असलेली बेकिंग साठी लागणारी भांडी, उपकरणे यांचे फोटो पण टाका. एखादे खास उपकरण असेल तर त्याचा वापर कसा, कश्यासाठी करता ते ही लिहा
हॅप्पी बेकिंग
---------------------------------
बेकींग आणि केक साठी लागणारे साहित्य -
बर्याचदा बेकींगसाठी अथवा अभारतीय पदार्थ बनवतांना लागणारे साहित्य मुंबईत कुठे मिळेल याबद्दल चौकशी केली जाते. सीमाने दिलेल्या फुड ब्लॉगवर ही मुंबईतल्या ठिकाणांची आणि मिळणार्या वस्तूंची एकत्रित यादी मिळाली.
बेकींगसाठी मुंबईत सामान मिळण्याच्या ठिकाणांची यादी इथे मिळेल....
या मिहितीसाठी - धन्यवाद रूनी पॉटर
मस्तच केलंस हे काम.. माझ्या
मस्तच केलंस हे काम..
माझ्या लेकीला केक आवडतात, त्यामुळे मला ते करायला आवडतात. पण अजुन मास्टरी आली नाहीये.. आता इथले वाचुन प्रयत्न करेन...
तोपर्यंत मी केलेल्या चोकलेट लावा केकचा आनंद घ्या.. सुरवात गोड व्हायला पाहिजे ना...
साधना मस्त दिसतोय हा लावा
साधना मस्त दिसतोय हा लावा केक. रेसिपी योजाटा
ब-याच केकरेसिपीत अंडे हलके
ब-याच केकरेसिपीत अंडे हलके फेटून घ्या असे लिहिलेले असते. आता हे हलके म्हणजे कसे? थोडेसेच फेटायचे जेणेकरुन योक आणि पांढरे एकत्र होईल, पण मिश्रण पाणीदार राहिल (जसे अंडाभुर्जीसाठी असते) इतकेच फेटायचे की अगदी मिश्रण हवेशीर बुडबुडेदार होऊन स्वतः हलके होईल इतके??
हे मुद्दाम विचारतेय कारण अंडे जितके फेटाल तितका केक हलका होतो असे वाचलेय. या संदर्भात हलके फेटा म्हटले की कळत नाही...
अंडे अगदी हवेशीर बुडबुडेदार फेटायचे झाल्यास त्यात योक असेल तर असे फेटले जात नाही. मग केक करताना नेहमी योक वेगळा काढुन अंडी फेटुन मग सरतेशेवती योक टाकायचा का??
प्रश्न अगदीच बाळबोध आहेत पण मला ते नेहमी पडतात, काय करु????
अजुन काही प्रश्न ..... या
अजुन काही प्रश्न ..... या प्रश्नाचे उत्तरही तसे मिळालेय, पण अजुन माहिती मिळेल शिवाय इतरांना मदत होईल म्हणुन इथे परत टाकतेय...
मीही आयसिंगचा प्रयोग करुन पाहिला. मुंबईत क्रिमचे जास्त ऑप्शन्स मिळत नाहीत. अमुलचे क्रिम विकत आणले. आयसिंगसाठी फेटले तेव्हा डब्बा फ्रिजबाहेर काढुन अर्धा-पाऊण तास झाला होता. फेटताफेटता त्याचे लोणी कधी झाले कळलेच नाही
असे का झाले त्याचा नेटसर्च केल्यावर कळाले की फेटताना फ्रिजमधले काढलेले थंडगार लगेच फेटायचे आणि शिवाय डबल बॉयलरसारखे बर्फाच्या पाण्यात भांडे ठेऊन फेटले तर जास्त चांगले रिझल्टस मिळतात.
परत क्रिम आणुन कामाला लागले. यावेळी अर्धे यश मिळाले. क्रिम फेटल्यावर volume डबल झाला. पण घट्ट मात्र झाले नाही. (ऑफिसातल्या केकशॉपमध्ये क्रिम आयसिंग वापरताना पाहिलेले ते अगदी लोण्यासारखे घट्ट होते, अर्थात ते तसेच रेडिमेड मिळते म्हणुन त्या केकवाल्याने सांगितले). जास्त फेटायला पण भिती वाटत होती कारण की चोकलेट पावडर आणि साखर आधीच घातलेली. फेटताफेटता लोणी झाले तर चोकलेटी तुप कोण खाणार????
मी फ्रिजमध्ये न ठेवता ते तसेच केकला फासले आणि खाण्या-यांनी खाल्ले सुद्धा... (ते एक बरे आहे, माझ्या घरी पदार्थ फसला तरी तो खपतो )
तर मला प्लिज मदत करा. अमुल क्रिम वापरुन (यात वरायटी नाही, एकच प्रकार मिळतो तो घ्यायचा) आयसिंग कसे करायचे???????
संपादनप्रतिसादभान | 15 July, 2010 - 15:41
साधना,कदाचित क्रिममध्ये फॅटचे प्रमाण कमी असेल्.ईथे जर्मनीत ३०% फॅट असलेलं क्रीम मिळतं.ते खुप वेळ फेटलं तर लोण्यासारखं होतं आणि कमी फेटलं तर घट्ट होत नाहि.नंतर मी ३२% फॅट असलेलं क्रीम वापरलं तर मस्त घट्ट झालं.आता तर ईथे मला ३६% फॅट असलेलं क्रीम दिसलय
प्रतिसादरमा | 16 July, 2010 - 04:15
साधनाताई,
मला भारतात मिळणारे क्रीम कसे असते ह्याचि कल्पना नाहि पण थोडिफार मदत करु शकते. तुम्हि फेटलेल्या क्रीम चा व्हॉल्युम दुप्पट झाला म्हणजे ते व्यवस्थित फेटल्या गेले होते, त्याला पुर्विपेक्षा किंचित जास्त घट्ट्पणा पण आला असेल म्हणजे क्रीम जर एकदम प्रवाहि असेल तर हे फेटलेले क्रीम प्रवाहि नसणार त्यापेक्षा घट्ट असणार हे मिश्रण जर फ्रीझर मध्ये तीन चार तास ठेवल तर साधारण श्रीखंडासारखि कन्सिस्टन्सि येईल (स्वानुभव). ह्यापेक्षा जास्त काहि आपण घरघुति ब्लेंडर/व्हीपर वापरुन करु शकणार नाहि आता भान म्हणताहेत त्याप्रमाणे क्रीम चा स्निग्धांश (फॅट पर्सेंट) वाढवला तर फरक पडु शकेल.
पण केकवर आयसिंग म्हणुन लावायला वरिल मिश्रण फारस उपयोगि नाहि कारण परत उष्णतेने ते पातळ होणार. जनरलि हे मिश्रण केकवर आयसिंग म्हणुन वापरत नाहित, केक च्या दोन थरांमध्ये चव वाढवण्यासाठि वापरतात.
विकतच क्रीम आयसिंग (घट्ट) हे साधारण पणे क्रीमचीज वापरुन केलेल असत, म्हणजे क्रीम आणि क्रीमचीज समप्रमाणात घेउन त्यात दुपटिने साखर घालायचि (१:१:२) इसेंस नेहमिप्रमाणे. मिश्रण एकजीव करुन, पुरेस थंड करुन वापरायच. कदाचित अगदि थोड्या दुधाने/क्रीम ने पातळ केलेल किंवा नुसतच फेटुन घेतलेल मस्कारपोने चीझ पण चालु शकेल (संदर्भ : मेधाताईंनि गणेशोस्तवात लिहलेलि 'चीझ' लेखमालिका) पण मी अस करुन बघितल नाहिये.
पण आयसिंग करताना आयसिंग शुगर वापरावि, नाहितर पिठिसाखरेबरोबर कॉर्न स्टार्च वापरावा (आयसिंग शुगर मध्ये तो असतो) त्याच प्रमाण मला माहिति नाहि, प्रयोग करुन ठरवाव लागेल.
साधना, १. अंडे हलकेच फेटा
साधना,
१. अंडे हलकेच फेटा (बीट लाईटली) म्हणजे पांढरे आणि पिवळे योक एकत्र हिईल इतपत.
२. अंडे हलके होईपर्यंत फेटा (टिल यु गेट फर्म पिक्स) म्हणजे घट्ट क्रिम सारखे दिसेपर्यंत. हे केक्स साठी क्वचितच सांगतात.
३. काही केक्स साठी पांढरे आणि पिवळे बलक वेगवेगळे करुन घालायचे असतात अश्यावेळेस पांढरे वेगळे फेटुन (घट्ट फेसासारखे दिसेपर्यंत - सॉफ्ट पिक्स) घेतात. केकच्या बॅटर बरोबर पिवळे बलक फेटतात आणि शेवटी केक बॅटर मधे फेटलेले पांढरा फेस हलके हलके फोल्ड करतात.
४. काही केक्स मधे पिवळे बलक घालतच नाहीत. तर काहींमधे पांढरे.
अंडे जास्त फेटले म्हणजे केक हलका होतो हे कितपत सत्य आहे माहित नाही. कारण अंडे जास्त फेटले तर के बरेचदा वरतुन फाटतो किंवा इतका हलका होतो की कापतानाच तुकडे पडतात
परत क्रिम आणुन कामाला लागले.
परत क्रिम आणुन कामाला लागले. यावेळी अर्धे यश मिळाले. क्रिम फेटल्यावर volume डबल झाला. पण घट्ट मात्र झाले नाही. (ऑफिसातल्या केकशॉपमध्ये क्रिम आयसिंग वापरताना पाहिलेले ते अगदी लोण्यासारखे घट्ट होते, अर्थात ते तसेच रेडिमेड मिळते म्हणुन त्या केकवाल्याने सांगितले). जास्त फेटायला पण भिती वाटत होती कारण की चोकलेट पावडर आणि साखर आधीच घातलेली. फेटताफेटता लोणी झाले तर चोकलेटी तुप कोण खाणार???? >>>>>
साधना , क्रीम फेटताना क्रीम अतिशय थंड असावे लागते. इथे तर ज्या भांड्यात ते फेटणार आहात ते सुद्धा थंड करुन घ्या अस सांगतात. तसच जर चॉकोलेट क्रीम हवे असेल तर कोको पावडर घालुन कमीतकमी तासभर तरी ते मिश्रण फ्रीज मध्ये ठेवाव लागेल आणि मग ते बीट करुन घ्या.
क्रीम पुर्णपणे बीट झालय हे कळण्याची खुण म्हणजे क्रीम मधले जे पीक असतात ते छान उभे राहिले पाहिजेत. (मला नीट सांगता आलय कि नाही काय माहित.:अओ:)
साधना, साधे क्रिम जर आयसिंग
साधना,
साधे क्रिम जर आयसिंग म्हणुन वापरायचे असेल तर थंड क्रिम आधी फेटुन घ्यायचे मग हळु हळु आयसिंग शुगर + कोको घालुन हलक्या स्पीड वर फेटायचे. हे सर्व बर्फ ठेव्लेल्या भाड्यावर क्रिमचे भांडे ठेऊन करायचे. क्रिमचे सॉफ्ट पिक्स (म्हण्जे आपल्याकडे सॉफ्ट सर्व्ह आयस्क्रिम मिळते तसे दिसते) तयार झाल्यावर परत थोडावेळ फ्रिज मधे ठेवायचे.
हे क्रिम केकवर लावयच्या आधी केक पुर्ण थंड झालेला असला पाहिजे.
सीमा म्हणते त्याप्रमाणे, क्रिम चे आयसिंग हे युज्वली केकच्या दोन थरांमधे लावायला करतात. किंवा 'गातो' (पायनॅपल गातो), ब्लॅक फॉरेस्ट प्रकारचे केक्स असतात जे थंडच खायचे असतात त्यात वापरतात.
अंडे न खाणारे त्यात ताक
अंडे न खाणारे त्यात ताक सुद्धा घालू शकतात आणि किंचित विनेगर एस्सेन्चे ज्यांनी कॅकं आतिशय मऊ होतो न फुगतो सुद्धा.
त्याचप्रमाणे विनेगर ऐवजी केळं सुद्धा वापरता येत.
मिक्रोवेव नसेल ते असा केक तव्यावर वाळू टाकून त्यावर कॅकेचं भांड ठेऊन करू शकतात.
मी त्याची रेचीपे आणण्याचा लवकरच प्रयत्न करेन.
इचिंग साठी दिलेल्या टिप्स मास्त आहेत.धन्यवाद
धन्यवाद गं मुलींनो.. आता
धन्यवाद गं मुलींनो.. आता करुन पाहिन. केक करायची फर्माईश होतेय घरातुन, आयसिंगसकट करते आता...
मावशे मस्त धागा. वाचतेय.
मावशे मस्त धागा. वाचतेय. सध्या प्रश्नच बरेच आहेत
साधना वर फोटो टाकलायस तो केक
साधना वर फोटो टाकलायस तो केक तू मोठ्या मग मधे केक केलायस का? असेल तर मला नीट स्टेप बाय स्टेप रेसिपी सांग
सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे
सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे बेकिंग पावडर का ?
_/\_ वाचते आहे. धीर गोळा करते
_/\_ वाचते आहे. धीर गोळा करते आहे.
रैना धिर टाकला केक मध्ये की
रैना धिर टाकला केक मध्ये की केक अजुन स्पॉन्जी होतो.
जागू सेल्फ रेजिंग फ्लार
जागू सेल्फ रेजिंग फ्लार म्हणजे केकचा मैदा (हा वेगळा मिळतो त्यात म्हणे बेकिंक पावडर घालायची गरज नसते पण माझा प्रॅक्टिकल अनुभव हा की ह्यात सुद्धा बेपा घालावी लागते फक्त बर्याच देसी रेसिपीत जो सोडा बाय कार्ब घालायला सांगतात तो नाही घातला तरी चालतो सेल्फ रेजिंग फ्लार मधे)
इचिंग साठी दिलेल्या टिप्स
इचिंग साठी दिलेल्या टिप्स मास्त आहेत>>> किती वेळ समजेचना की हे काय आहे?
मृदुल, पोस्ट संपादित करणार का? दिवे घ्या.
सर्वच टिप्स छान आहेत. साधना, चॉकोलेट लावा केकची कृती योजाटा!!!
बेकिंग मधे वापरले जाणारे काही खास शब्द जसे फोल्डींग, क्रिमिंग त्यांचे अर्थ आणि विश्लेषण इथे लिहा>>> कुणीतरी जाणकाराने आधी हे सर्व व्यवस्थित एक्स्प्लेन करा. मुळात धडधाकट केक कसा बनवायचा ते नीट लिहा (आयसिंग वगैरे नंतर!! आधी बेसिकमधेच राडा आहे आमच्या)
कृपया, केक बनवण्यासाठी सर्वसाधारणपणे कोणती उप्करणे/ भांडी /पदार्थ लागतात (ती भारतात कुठे मिळतात तेपण लिहा)
हे सगळे केक्स वगैरे करताना
हे सगळे केक्स वगैरे करताना पहिला नियम पाळायचा तो म्हणजे मेझरिंग कप्स आणि मेझरिंग स्पून्स जे वेगळे मिळतात ते आणावेच लागतात. हा चमचा अगदी टेबलस्पून सारखाच आहे वगैरे भानगडी चालणे नस्से.
भारतातदेखील हे कप वगैरे आजकल मिळतात.
१ कप = २५४ मिली
१ टेबलस्पून = १५ मिली
१ टीस्पून = ५ मिली
१/४ कप = ४ टेबलस्पून
हे साधारण माप असते.
काही केक्स खुपच फर्गिव्हिंग असतात त्यामानाने काही काही अगदी जेवढ्यास तेवढे घटक पदार्थ टाकूनच करावे लागतात.
हे सगळे केक्स वगैरे करताना
हे सगळे केक्स वगैरे करताना पहिला नियम पाळायचा तो म्हणजे मेझरिंग कप्स आणि मेझरिंग स्पून्स जे वेगळे मिळतात ते आणावेच लागतात<<< १००% अनुमोदन मिनोती
ही माझ्याकडची मेजरिंगची साधने ...
मेजरिंग स्पुन्स,
मेजरिंग कप्स
लिक्विड मेजरिंग कप
टेबल टॉप वेइंग स्केल
मेझरिंग कप्स कोरड्या पदार्थांसाठी वेगळे आणि द्रव्य पदार्थांसाठी वेगवेगळे मिळतात. कारण दोन्हीच्या क्वांटीटीमधे फरक असतो. आपल्याकडे देशात एकाच कपावर दोन्ही मार्क केलेले मेजर्स ही मिळतात.
पण यात थोडाबहुत फरक पडु शकतो.
पदर्थ मेजर करताना, मेजरींग स्पुन्/कप कोरडा असणे ही जरुरीचे.
मिनोती अगदी अगदी. माझ्यासाठी
मिनोती अगदी अगदी.
माझ्यासाठी बेकींग हा सगळ्यात आवडता प्रकार आहे, एकदम सोपा आणि बिघडण्याची शक्यत कमी असलेला. मी अजून तरी elementary किंवा फार तर intermediate लेव्हल चे केक करते. त्याच्या पुढे अजून गेलेले नाहीये. केक न बिघडण्यासाठी काही नियम पाळावे लागतात, खास करून नवशिक्यांनी हे लक्षात ठेवावे.
जसे (मेजरींग कप/स्पून्स ने) मोजून मापुन सगळे घटक घेणे आवश्यक आहे,
पुस्तकात दिलेली पाककृती वाचून ती अगदी तशीच (कुठल्याही स्टेप्स न गाळता) स्टेप बाय स्टेप करणे,
तापमान सांगीतलेय तेच ठेवणे. थोडक्यात पीठ चाळून घ्यायला सांगीतले असेल तर तसे घेणे, ज्या क्रमाने पदार्थ मिसळायला सांगीतले आहेत त्या क्रमानेच ते मिसळणे, २०० डीग्री वर ४० मिनीट सांगीतले असेल तर घड्याळ लावून तेवढ्याच वेळ बेक करणे, त्या ऐवजी ४०० डीग्रीवर २० मिनीटे असे प्रकार करून नयेत.
माझ्यामते तुम्ही intermediate लेवलच्या थोडे पुढे गेलात की मग घटक replacements इ. चे प्रयोग सुरू करावेत, म्हणजे बटर ऐवजी अॅपलसॉस, किंवा साखरे ऐवजी अॅपलसॉस, मैद्या ऐवजी कणीक इ.इ.
मी मागच्या आठवड्यात
मी मागच्या आठवड्यात पिल्स्बरीचं केक मिक्स आणुन ४ मि. वाला केक केला आणि त्याला नंतर सोयाक्रीम (बहुतेक.. अता नाव आठवत नाहीये, एडीट करेन ही पोस्ट नंतर) बर्फात फेटुन त्यात स्ट्रॉबेरीक्रश घालुन, जॅम, शुगर सिरप लाउन पेस्ट्री केली होती... फारच सुंदर लागते ही.. माँजीनीस सारखी फोटो नाही काढले... या विकांताला पायनापल फ्ले. करणार आहे तेंव्हा काढेन नक्की
साधना, प्लीज लावा केक ची
साधना, प्लीज लावा केक ची रेसिपी द्या ना.
आज रात्री टाकते रेसिपी.. गेले
आज रात्री टाकते रेसिपी.. गेले तिनचार दिवस खुप बिजी होते....
चॉकलेट लाव्हा
चॉकलेट लाव्हा केक
http://www.maayboli.com/node/18088
केकमध्ये ब-याच वेळा अनसॉल्टेड
केकमध्ये ब-याच वेळा अनसॉल्टेड बटर किंवा तत्सम स्निग्ध पदार्थ घालायचे असतात. मला गार्गरिन किंवा डालडा वापरायला आवडत नाही. मग ऑप्शन उरतो लोण्याचा. भारतात विकतचे बटर म्हणजे अमुल/विजया/ब्रिटानिया बटर मिळते जे सॉल्टेड असते. डेअरीत दोन प्रकारचे लोणी मिळते, तुप काढण्यासाठीचे आणि टेबल बटर. हे टेबल बटर बहुतेक सॉल्टेड असते, मी कधी वापरले नाही त्यामुळे माहिती नाही. तुप काढण्यासाठी जे मिळते ते वापरले तर चालेल काय? किंवा बटरच्या जागी आपले घरचे किंवा अमुल तुप वापरले तर?????
गार्गरिन >> साधना याला
गार्गरिन >> साधना याला मार्जरीन म्हणतात ग
तुला घरचे लोणी वापरायला हरकत नाही पण त्यातला ताकाचा अंश पूर्ण निघालेला असावा. मी बरेचदा केक्स तेल घातलेले करते सफोला वगैरे वापरुन देखील ते छानच होतात.
अरे.. मला मार्गरिन म्हणायचे
अरे.. मला मार्गरिन म्हणायचे होते... टायपो.... पण त्याला मार्जरीन म्हणतात होय?? धन्स गं.
मी कुठेतरी वाचलेले की मार्जरीन म्हणजे प्लॅस्टिकपासुन फक्त एक स्टेप मागे. अजुन थोडे प्रोसेस केले की प्लॅस्टिक तयार होते. अर्थात हे खोटे असणार पण तरीही हे वापरायला जरा जड वाटते. केलेला पदार्थ आरोग्याच्या दृष्टीनेही बरा असायला पाहिजे असा माझा जरासा आग्रह असतो..
मी तेल बघते ट्राय करुन.
मिनोती ,साधना. मार्गारीन
मिनोती ,साधना. मार्गारीन
लोणी आणि मार्गारीन निम्मे निम्मे घ्या. बटर मुळ केक चवीला चांगला होतो. मार्गारीन मुळ हल्का आणि खुसखुशीत होतो.
मार्जरिनच इथे ऐका
मार्जरिनच इथे ऐका -
http://www.merriam-webster.com/dictionary/margarine
मी अनसॉल्टेड बटर ऐवजी घरात
मी अनसॉल्टेड बटर ऐवजी घरात केलेले लोणी वापरते. आतापर्यंत कधी गडबड झाली नाही.
नवीन बीटर घेतला आहे.तो वापरून
नवीन बीटर घेतला आहे.तो वापरून बघण्यासाठी एखादा चांगला केक सुचवा ना..लिंक दिली तरी चालेल.
इतके दिवस साध्या हँड बीटर वर काम करत होते. तेव्हा सारखे इलेक्ट्रीक बीटर घ्यावा असे वाटायचे आणि आत आणला आहे तर १ पण केक सुचेना
Pages