केक हा जवळजवळ सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा पदार्थ मायबोलीवर विविध केक्स, लोफ आणि मफिन्स इत्यादींच्या च्या वेगवेगळ्या तोंपासु पाककृती भरपुर आहेत.
परंतु बेसिक केक कसा करावा, ओव्हन टेम्परेचर काय असावे, सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे काय, भांडी कुठली वापरावीत, केक का फाटला/बसला, आयसिंग करताना कुठली साखर वापरावी, बटर वापरावे का क्रिम? असे अनेक प्रश्न, अनेक वेळेला विचारले जातात. युक्ती सुचवा बीबी वर किंवा त्या त्या पाकृ मधे काही उत्तरे ही मिळतात. पण जेव्हा केक करायचाय आणि असे बेसिक प्रश्न पडलेत तेव्हा शोधा शोधी करत बसण्यापेक्षा हा धागा उपयोगाचा ठरु शकेल.
इथे मी एक बेसिक बटर केक आणि बटर आयसिंग ची कृती दिली आहे. अजुन कुणाच्या काही खास आयडियाज्, टीप्स असतिल तर त्या या धाग्यावर लिहा.
बेकिंग मधे वापरले जाणारे काही खास शब्द जसे फोल्डींग, क्रिमिंग त्यांचे अर्थ आणि विश्लेषण इथे लिहा.
इथे तुमच्याकडे असलेली बेकिंग साठी लागणारी भांडी, उपकरणे यांचे फोटो पण टाका. एखादे खास उपकरण असेल तर त्याचा वापर कसा, कश्यासाठी करता ते ही लिहा
हॅप्पी बेकिंग
---------------------------------
बेकींग आणि केक साठी लागणारे साहित्य -
बर्याचदा बेकींगसाठी अथवा अभारतीय पदार्थ बनवतांना लागणारे साहित्य मुंबईत कुठे मिळेल याबद्दल चौकशी केली जाते. सीमाने दिलेल्या फुड ब्लॉगवर ही मुंबईतल्या ठिकाणांची आणि मिळणार्या वस्तूंची एकत्रित यादी मिळाली.
बेकींगसाठी मुंबईत सामान मिळण्याच्या ठिकाणांची यादी इथे मिळेल....
या मिहितीसाठी - धन्यवाद रूनी पॉटर
साधना तू वरची कॉइल चालू
साधना तू वरची कॉइल चालू ठेवतेस म्हणजे केक broil सेटींग वर करतेस का? इथे अव्हनमध्ये बेक साठी असलेल्या सेटींग मध्ये दोन्ही पैकी एकच कॉइल चालू असते, शक्यतो खालची. तू फक्त खालची एकच कॉइल वापरून करुन बघीतलास का केक? नसेल तर एकदा करून बघ. जर वरची आणि खालची दोन्ही कॉइल्स वापरायच्या असतील तर शेवटची १०-१२ मिनीटे भांड्याला अॅल्युमिनीयम फॉइल लावून ठेवू शकतेस.
फाँडट जर विल्टन च तयार वापरल
फाँडट जर विल्टन च तयार वापरल तर रमा म्हणते तसा वास येतो. घरी बनवलेल्या फाँडटला वास येत नाही. मार्शमेलोज पासून बनतात. चव विल्टन पेक्षा बरी असते. (पण आयसिंगची चव बहुतांश लोकाना जास्त आवडते फाँडट पेक्षा).
सीमा फॉन्डन्ट मार्शमेलोपासून
सीमा फॉन्डन्ट मार्शमेलोपासून घरी बनवतांना त्यात अॅनिमल फॅट सारखे काहीतरी वापरावे लागते ना सगळे एकत्र मिसळून येण्यासाठी, मी मागे कृती वाचली होती त्यात होते असे लिहीलेले, की तू बटर वापरून केले होतेस?
अगं माझा बाबा आदमच्या
अगं माझा बाबा आदमच्या जमान्यातला ओटिजी आहे... त्यात फक्त खालिल सोयी आहेत.
१. तापमान सेट करता येते.
२. आत वर खाली दोन कॉइल्स आहेत त्या दोनपैकी, दोन्ही एकदम, फक्त वरची आणि फक्त खालची सुरू ठेवता येते.
आधुनिक ओटिजीमध्ये बेक सेटिंगसाठी फक्त खालची कॉइल चालु होत असेल तर मी ह्यातही तसे करुन पाहते. मला वाटले तसे केले तर केक वरुन नीट भाजला जाणार नाही आणि सुरवातीलाच फॉइल लावुन भाजला तर नीट फुगणार नाही. आता दोन्ही पद्धतीने एकेकदा करुन पाहते म्हणजे कशामुळे काय होते ते कळेल. रिझल्ट अर्थातच इथे पोस्टते
रुनी, खाली दिलेल्या दुव्यावर
रुनी,
खाली दिलेल्या दुव्यावर फॉन्डंट ची छान रेसिपी आहे.
http://allrecipes.com//Recipe/rolled-buttercream-fondant/Detail.aspx
junya maaybolivar Leenas ni
junya maaybolivar Leenas ni egless cake chi recipe dileli aahe , tya pramane mi baryach varshanpurvee cake karun pahila hota pan aatta nakki kay kele hote te athavat nahiye, mhanje mi jara confused aahe , tyat step 4 pramane maidache mixture anni areated soda aaltun paaltun ghalne ase lihile aahe mhanje nakki kaay karayache. pls mala koni tari sanga. ani tya cake sathi icing pan suchva .
धन्यवाद स्वाती.
धन्यवाद स्वाती.
ही साधनाची "आज काय बनवु" वरची
ही साधनाची "आज काय बनवु" वरची पोस्ट. इथे ही माहिती उपयोगी वाटत्येय म्हणुन कॉपी-पेस्ट केलिये
--------------------------------------------------------
साधना | 5 March, 2011 - 18:53
अगं त्या बाटलीवर लिहिलेले असेल.. दिड वर्षे पडुन आहे म्हणजे माझी मैत्रिण शोभतेस अगदी स्मित
ती जुनी बनानाकेकची रेसिपी माझ्याकडे नाही आता. आणि ती वापरुन केलेला लोफ मला नीटसा जमला नव्हता. अर्थात मी खाल्लेला. पण ह्या केकइतका सुंदर झाला नव्हता, मी सकाळी केला तो इथुन घेतला - http://londonfoodieny.com/2009/03/22/a-recipe-banana-loaf-cake/
अतिशय सुंदर होतो. आता थंड झाल्यावरही त्याचा नरमपणा आहे तसाच आहे. अमुल बटर वापरले. माझ्याकडे ताक नव्हते. रेसिपीत अंडी २ आहेत, पण रेसिपीत लिहिलेला पातळ पदार्थ माझ्याकडे नव्हता म्हणुन अजुन एक अंडे घेतले. कणिक वापरली. बेसो आणि बेपा रेसिपीप्रमाणेच घेतले. रेसिपीत ३०० ग्र/३ केळी लिहिलीत. माझ्याकडे तिन केळी होती पण त्यांचे वजन २०० ग्र भरले. केळी बाहेरुन काळीकुट्ट झाली होती. ती सोलली, बारीक चिरली आणि भरत्याच्या वांग्यासारखी सुरीने अजुन बारिक केली. मिक्सरमधुन काढली नाही. गरज वाटली नाही.
पिठ तिन हप्त्यात टाकायचे होते. दुसरा हप्ता टाकल्यावर मिश्रण जरा घट्ट होतेय असे वाटल्यावर जरा जरा पाणी घालत कंसिस्टन्सी अॅडजस्ट करत गेले. अर्धा कप पाणी पडले असावे बहुतेक. फक्त पाणी मोजुन घेतले नाही. बाकी सगळे जसे रेसिपीत आहे तसेच मोजुन घेतले. केकला सगळे प्रमाण अगदी बरोब्बर मोजुन लागते नाहीतर सगळे प्रयत्न पाण्यात हा पुर्वानुभव स्मित मेझरिंग स्पुन, मेझरिंग कप आणि २ किलोपर्यंत वजनाचा काटा हे सगळे आणुन ठेवलेय. केक जमायलाच हवा यासाठी कंबर कसलीय ना मी आता. स्मित
मिश्रण जर जास्त घट्ट बांधले गेले तर केक दगडासारखा होतो हा पुर्वानुभव असल्याने पाणी टाकुन नेहमीचे केक मिश्रण जितके प्रवाही असते तितके केले... स्मित आता उद्या कर आणि कळव. केक करणे म्हणजे खुप वेळखाऊ काम आहे असे मला आधी वाटायचे. पण आता तसे वाटत नाही. उलट अगदी सोप्पे आहे असे वाटते. आता पुढची स्टेप आयसिंगची. त्यासाठी पुढचा आठवडा.
---------------------------------------------------------------------------
एक प्रश्न. केकमध्ये बटरचे
एक प्रश्न.
केकमध्ये बटरचे काम नक्की काय असते? केक हलका होतो त्यात बटरचा हात कितपत असतो?
बटरपेक्षा तेल वापरले तर काय फरक पडेल?
अर्थात हे सगळे स्वतः करुनही ठरवता येईल. मी खजुर लोफ ऑलिव ऑइल वापरुन केलेला तो चांगला झाला होता. पण तो लोफ होता केक लोफपेक्षा जास्त नरम असावा अशी अपेक्षा असते ना....
केक करताना बटरला आरोग्यदायक असा पर्याय आहे का? मी संत्रा केक केला होता त्यात अमुल बटर न वापरता डेअरीतुन तुपासाठी म्हणुन विकतात ते लोणी वापरले. चवीत फारसा फरक पडला नाही. पण थोडा लोणकट वास येत होता. लोणी आणल्यावर एक-दोन दिवस फ्रिजमध्ये पडुन राहिले म्हणुन तसा वास आला असावा. ताजे लोणी वापरले तर कदाचित वास येणार नाही. पण हा बटरला पर्याय नाही. अमुल बटरच्या ऐवजी साधे लोणी वापरुन पाहायचे होते म्हणुन असे केले.
पण बटरला पर्याय मात्र सुचवा. मैद्याजागी मी कणिक वापरते आणि त्यामुळे रंग सोडता इतर काही फरक पडत नाही (बेसो आणि बेपा योग्य प्रमाणात वापरले तर). बटरसाठीही पर्याय मिळाला तर केक मोकळ्या मनाने खाता येईल. (तसाही मी खातेच. असले पदार्थ खाताना डायट खुंटीवर )
गुगलुन पाहिले पण तिथे लोकांना तेलाच्या जागी बटर वापरल्यास चालेल काय असा प्रश्न पडलाय..
साधना, मी सविस्तर मग लिहिन.
साधना, मी सविस्तर मग लिहिन. पण केक करताना बटरला पर्याय नाही. काहीतरी फॅट वापरावी लागतेच. मार्गरीन/ लार्ड पण वापरतात. पण त्यापेक्षा बटर बरे.
आपल्या पद्धतीच्या रवा केक मधे तूप वापरतात. लोणी किंवा बटर हे फ्रिजमधल्या बाकिच्या पदार्थांचे वास शोषून घेतात. म्हणून तसा वास येतो.
बटरच्या जागी काही वेळा ऑलिव्ह ऑईल वापरता येते. काही वेळा वास नसलेले रिफाइंड तेल वापरले तरी चालते.
मुंबईत किंवा इतरत्रही जी खारी मिळते, त्यासाठी अॅनिमल फॅट वापरतात असा संशय एका लेखात व्यक्त केल्याचे वाचले होते. खारीचे पदर वेगळे होण्यासाठी, खूप मोठ्या प्रमाणात फॅट वापरावी लागते. त्या प्रमाणात ते बटर वापरतील हे अशक्य आहे. माझ्या आजोळी बेकरी आहे, तिथे वनस्पति तूप वापरतात.
लाजो.. आता पुढच्या
लाजो.. आता पुढच्या भारत्भेटीत.. केक्स चा बेत पक्का..
इथे मायबोलीवर मी वाचलेले की
इथे मायबोलीवर मी वाचलेले की कनोला तेल किंवा अन्य काही वनस्पतीजन्य तेल वापरले तरी चालते. वास येतोय असे वाटले तर इसेन्स वापरुन तो लपवता येईल पण केकची प्रत कमी नको व्हायला.
बटरबद्दल गुगलुन बघत असताना बटर मी समजते तेवढे काही वाईट नाहीय असे लक्षात आले बटरबद्दल सगळ्यात मोठा आक्षेप 'त्याच्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते' हा आहे. जर आपले कॉलेस्टेरॉल मुळातच ठिक असेल तर मग बटरला एवढे घाबरायचे कारण नाही
Butter नको असेल तर cream
Butter नको असेल तर cream वापरता येते. saur cream पण वापरता येते. त्याने केकचे texure थोडेसे बदलते. बटर केक पेक्षा. It is more softer.चव पण मस्तच येते.
पण इथे मिळणार नाही ना सावर
पण इथे मिळणार नाही ना सावर क्रिम. मुळात हे काय असते ते कोणी मला सांगेल काय? सावर क्रिम म्हणजे विरजत घातलेली साय काय???
बरेचसे केक्स तेल वापौन करता
बरेचसे केक्स तेल वापौन करता येतात. थोडे ऑप्शन्स कमी झाले तरी अगदीच होत नाही असे नाही. मी कधीही बटर वापरून केक्स केलेले नाहीत आजवर नेहेमी तेलाचेच करते. पण कनोला-सफोला सारखे विनाफ्लेवरचे तेल वापरणे आवश्यक आहे.
मी केलेले मित्र-मैत्रिणींमधे हिट असलेले केक्स हे -
लेमन आलमंड केक
चॉकलेट मिनी कपकेक्स
बनाना केक आणि ब्रेड
कॅरट केक
ऑरेंज केक - पायनापल ज्युस+थोडा पल्प टाकून याचा पायनापल केकही अप्रतीम होतो.
चॉकलेट केक - यात कॉफीऐवजी ऑरेंज ज्युस घालूनही मस्त ऑरेंज-चॉकलेट केक होतो.
अजुन एक ऑरेंज केक
लेमन लोफ
मँगो केक
आणि मी कधीही मैदा वापरत नाही. नेहेमी चपातीचे पीठच वापरते. काही रेसिपीज दूध असते ते पण काहिवेळा नेहेमीचे दूध तर काहीवेळा सोयामिल्क असे दोन्ही वापरून मी केक्स केलेले आहेत.
अजुनही काही लिंक्स आहेत त्या नंतर देईन.
बटर किंवा बाकिच्या फॅट्स चा
बटर किंवा बाकिच्या फॅट्स चा केकमधला महत्वाचा रोल म्हणजे शॉर्टनिंगचा. पिठातील कणांना त्याचे आवरण चढते आणि ते कण एकमेकांपासून वेगळे राहतात. बटरच्या स्वादाची सवय झाली आहे म्हणून तेच वापरले जाते. पण वर लिहिल्याप्रमाणे कनोला तेल चालते. आपल्याकडे मिळत असेल तर ग्रेपसीड ऑईल पण चालेल. (द्राक्षांच्या बियांचे तेल) राईस ब्रान ऑईल पण चालते, पण याला जरा उग्र वास येतो. हे तेल सामान्य तपमानालाच घट्ट असते. डालडा सदृष्य वनस्पति मधे ते वापरतात. पावलोवा, स्पाँज सारख्या केक्स मधे बटर वापरायचे नसते.
मिनोती धन्यवाद. मीही हे केक
मिनोती धन्यवाद. मीही हे केक करुन पाहिन. वेगवेगळ्या पद्धती वापरुन केले तरच लक्षात येईन ना कशामुळे काय फरक पडतो ते...
सध्या माझ्याकडे केळी आहेत भरपुर. उद्या बटरऐवजी तेल वापरुन बनाना केक करते तुझ्या रेसिपीने.
मिनोती,तुझ्या रेसिपीने आज मी
मिनोती,तुझ्या रेसिपीने आज मी चॉकलेट कपकेक्स केले.एकदम भारी झाले आहेत.मी सुद्धा मैदा न वापरता नेहमीची कणिक वापरली.कोको पावडर ऐवजी घरातले नेसले नेसविक चॉकलेट पावडर वापरली.त्यात थोडी साखर असते म्हणून १/२ कप ऐवजी १/४ कप साखर वापरली.पाण्याऐवजी होल मिल्क वापरले.
अंडं आणि मैद्याशिवाय इतका छान केक होऊ शकतो असे मला कधी वाटलेच नाही.रेसिपीसाठी धन्यवाद
रच्याकने कोणाला माँजिनिजच्या मँगो स्लाईस केकची रेसिपी माहित आहे का?
धन्यवाद सर्वांना. मिनोती,
धन्यवाद सर्वांना.
मिनोती, मँगो केक फार आवडला.
मला एगलेस मार्झीपॅनची रेसीपी पाहीजे आहे. मी परवा एक प्रयत्न केला पण यशस्वी नाहे झाला:-(
मँगो चीजकेक करायचा आहे पण
मँगो चीजकेक करायचा आहे पण त्यात जिलेटीन/ चायना ग्रास घालणे कंपलसरी असते का? तो स्मूथ लुक नक्की कशामुळे येतो?
साधना, कसा झाला केक? पूर्वा,
साधना, कसा झाला केक?
पूर्वा, जाह्नवी - धन्यवाद.
हा व्हिगन मँगोचिजकेक अप्रतीम होतो कुणाला ट्राय करायचा असेल तर.
मिनोती, मी वर लिहिले होते की
मिनोती, मी वर लिहिले होते की उद्या करेन म्हणुन पण तो उद्या शेवटी आज उजाडला...
आज सकाळी गिन्नीचे शेंगदाणा तेल वापरुन बनाना केक केला. (जे घरी होते तेच वापरले) मूळ कृतीत १२५ ग्र. बटर होते. मी १२५ ग्र. तेल घेतले. त्यात उगीचच अर्धा मिनिट बीटर फिरवला, मग साखर घातली, फेटले आणि शेवटी अंडी घालुन भरपुर फेटले आणि मग नेहमीचेच.....
केक अगदी परवा बनलेला तसाच बनला होता. तसाच नरम, हलका आणि चवदार, तेवढाच मॉइस्ट. अजिबात ड्राय वाटला नाही. पण खाताना तेलाचा वास येत होता आणि जराशी तेलाची कच्चट चव लागत होती. माझी वॅनिला इसेन्सची बाटली संपत आली होती त्यात फक्त अर्धा चमचा इसेन्स शिल्लक होता. कदाचित मूळ पाकृमध्ये लिहिल्याप्रमाणे दिड चमचा इसेन्स घातला तर हा वास लपेल.
आता नेहमीप्रमाणे प्रश्न
१. बटरच्या जागी तेल वापरायचे झाल्यास प्रमाण तेच ठेवावे की कमी करावे? मी हल्लीच कुठेतरी थोडे कमी करावे असे वाचलेले आठवतेय.
माझ्याकडे अजुन भरपुर केळी आहेत (दुकानात उरलेली ) आज संध्याकाळी/उद्या सकाळी परत करेन केक त्यात दिड चमचा इसेन्स टाकुन पाहते तेलाची चव लपते का ते.
वरचा मँगोचिजकेक दिसायला तर एकदम भारी दिसतोय, लगेच उचलुन खावासा.. नक्कीच करुन बघेन. परवाच डिमार्टमध्ये ब्रिटानियाचे क्रिमचिज दिसले होते. इथे असल्या गोष्टी चटकन मिळत नाहीत त्यामुळे जरा प्रोब्लेम होतो. अर्थ बॅलन्सच्या जागी बटर वापरावे लागेल. इथे तेही मिळत नाही. पण केक एवढा जब-या दिसतोय की जरी तस्साच जमला नाही तरी प्रयत्न करुन चवीचा अंदाज घ्याय्ची इच्छा होतेय
आज सकाळी गिन्नीचे शेंगदाणा
आज सकाळी गिन्नीचे शेंगदाणा तेल वापरुन बनाना केक केला. >>>
तेलाचा वास भयानक बेकार येतो साधना... मी तेच गिनीचं तेल वापरून कॉफी केक केला होता. एकदम हॉरीबल वास
मिनोती, तू केकच्या दिलेल्या लिंका लई भारी आहेत, त्यातला 'लो फॅट लेमन केक' करून पाहणार आहे, तुला सांगेनच कसा झाला ते
फक्त मला एक सांग, त्यात मला पीठाच्या प्रमाणात साखर खूप कमी वाटतेय, (म्हणजे पावणेदोन कप पीठाला अर्धा कप साखर) तर तेवढी बरोबर होते का?
गिनीचं तेल >> म्हणजे काय ग
गिनीचं तेल >> म्हणजे काय ग ?? शेंगदाना तेल की अजुन कुठले दुसरे
साधना, शक्य असेल तर शेंगदाणा
साधना, शक्य असेल तर शेंगदाणा तेल न वापरता सफोला वगैरे बिनावासाचे (फ्लेवरचे) तेल वापरून पहा. वास अज्जीबात येणार नाही. इथे देखील ऑलिव्ह ऑइल वापरून कोणी केक करत नाहीत शक्यतो सफोला, कनोला, व्हेजीटेबल ऑइल असेच वापरून केक बनवला जातो. त्यामुळे शक्यतो तसे करुन पहा.
समजा बटर १/२ कप असेल तर तेल साधारण १-१.५ टेबलस्पून कमी घातले तरी हरकत नसते. त्याहुन कमी पहिल्याच प्रयत्नात घालू नये कारण केक नक्की कसा होणार आहे याची आपल्याला काहीच कल्पना नसते.
हो मंजू मला तरी ती पुरेशी वाटली कारण तो केक नाही ब्रेड आहे. तुला हवी तर २ टेबलस्पून वगैरे जास्ती घातलीस तरी हरकत नाही. आणि तो बर्यापैकी लाईट होतो/असतो.
लेमन झेस्ट म्हणजे काय?
लेमन झेस्ट म्हणजे काय?
लिंबाची साल /सालीचा किस
लिंबाची साल /सालीचा किस
लेमन झेस्टवरुन आठवले. अख्खे
लेमन झेस्टवरुन आठवले. अख्खे लिंबू आपल्या चिज किसायच्या लहान किसणीवर फक्त सालीएवढंच किसुन घ्यायचे हे फोटोत पाहिलेय. पण इथे लेमन तिरामिसुच्या चर्चेत साल किसण्यासाठी मोठे लिंबु घ्या, लहान लिंबु घेऊ नका असे सुचवलेय. तिथे टाकलेले गलगल मी उदयपुरला पाहिलेले एकाच्या शेतात पण तसली लिंबे इथे मिळत नाहीत. इथे मुंबईत अगदी लहान लिंबे मिळतात. मग केक करताना झेस्टसाठी इथली लिंबे चालतील का?
मिनोती, तेल बदलुन पाहते. शेंगदाणा तेलाचा वास अगदीच हॉरिबल नव्हता पण चव व वास तेल ओळखण्याइतपत होता. आज केक केलेला तो बाईसाठी केलेला, म्हणुन सगळा तिला दिला. पण घरच्या चिकित्सक मंडळींनी नक्कीच नाके मुरडली असती.
मंजु, मी मिपावरच्या रेसिपीने कॉफिकेक केला होता. मी बटर वापरुन केलेला. रेसिपीत आरारुटही वापरलेय. माझा केक खुप ड्राय झाला होता. आणि साखर तिथल्या प्रमाणाने वापरली तरीही केक जरा गोडीला कमी होता. घरच्यांनी खाल्ला पण नाके मुरडत. ड्राय का झाला कळले नाही मला. कदाचित आरारुटमुळेही असु शकेल. तेव्हापेक्षा आता ज्ञानाची पातळी जराशी उंचावलीय, म्हणुन परत एकदा करुन पाहिन. यावेळेस चांगला होईल अशी आशा ठेवते.
वर्षा गिनी हा शेंगदाणा तेलाचा ब्रँड आहे गं धारासारखा.
साधना पुढच्यावेळी रीफाइन्ड
साधना
पुढच्यावेळी रीफाइन्ड सूर्यफुल तेल वापरुन बघ केक करतांना शेंगदाणा तेल नको.
आपल्याकडच्या छोट्या लिंबाची (lime) साल कडवट आणि पातळ असते ती फारशी किसली जाणार नाही. गलगल/Lemon ची साल संत्र्याच्यासालीइतकी जाड असते आणि ती किसणीवर किसली जाते. माझा सल्ला केक बेक करण्यासाठी लेमन झेस्ट हवी साठी असेल तर तिथे तू ऑरेंज झेस्ट वापर पण लेमन तिरामिसुसाठी असेल अर ऑरेंज झेस्ट + लिंबाचा रस वापर. लिंबाचा रस आवश्यक आहे.
केक करताना शेंगदाणा तेल न
केक करताना शेंगदाणा तेल न वापरता व्हेजीटेबल तेल वापरायला हव. खुप वास येतो नाहीतर.
जर तेल वापरायचे नसेल आणि पुर्ण बटर वापरायचे नसेल तर १/२ बटर+१/२ Margarine घेतल तर केक अतिशय हलका आणि चविला मस्त होतो एकदम. पण Margarine प्रत्येकाला चालेलच अस नाही.
मी आज पायनॅपल अपसाईड डाउन केक केली कि रेसीपी टाकिन.
Pages