केक हा जवळजवळ सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा पदार्थ मायबोलीवर विविध केक्स, लोफ आणि मफिन्स इत्यादींच्या च्या वेगवेगळ्या तोंपासु पाककृती भरपुर आहेत.
परंतु बेसिक केक कसा करावा, ओव्हन टेम्परेचर काय असावे, सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे काय, भांडी कुठली वापरावीत, केक का फाटला/बसला, आयसिंग करताना कुठली साखर वापरावी, बटर वापरावे का क्रिम? असे अनेक प्रश्न, अनेक वेळेला विचारले जातात. युक्ती सुचवा बीबी वर किंवा त्या त्या पाकृ मधे काही उत्तरे ही मिळतात. पण जेव्हा केक करायचाय आणि असे बेसिक प्रश्न पडलेत तेव्हा शोधा शोधी करत बसण्यापेक्षा हा धागा उपयोगाचा ठरु शकेल.
इथे मी एक बेसिक बटर केक आणि बटर आयसिंग ची कृती दिली आहे. अजुन कुणाच्या काही खास आयडियाज्, टीप्स असतिल तर त्या या धाग्यावर लिहा.
बेकिंग मधे वापरले जाणारे काही खास शब्द जसे फोल्डींग, क्रिमिंग त्यांचे अर्थ आणि विश्लेषण इथे लिहा.
इथे तुमच्याकडे असलेली बेकिंग साठी लागणारी भांडी, उपकरणे यांचे फोटो पण टाका. एखादे खास उपकरण असेल तर त्याचा वापर कसा, कश्यासाठी करता ते ही लिहा
हॅप्पी बेकिंग
---------------------------------
बेकींग आणि केक साठी लागणारे साहित्य -
बर्याचदा बेकींगसाठी अथवा अभारतीय पदार्थ बनवतांना लागणारे साहित्य मुंबईत कुठे मिळेल याबद्दल चौकशी केली जाते. सीमाने दिलेल्या फुड ब्लॉगवर ही मुंबईतल्या ठिकाणांची आणि मिळणार्या वस्तूंची एकत्रित यादी मिळाली.
बेकींगसाठी मुंबईत सामान मिळण्याच्या ठिकाणांची यादी इथे मिळेल....
या मिहितीसाठी - धन्यवाद रूनी पॉटर
त्या मावेबरोबर २ मेटल रॅक्स
त्या मावेबरोबर २ मेटल रॅक्स आहेत . ते मी वापरते पण त्यात केक टीन वापरता येइल का?>> यासाठी तुमच्या मावेसोबत आलेल्या पुस्तकामधे माहिती दिली असेल ती वाचा. केक टीन या रॅकवर ठेवून मग बेकिंग करायचे. माझ्या मावेमधे कन्वेक्शनमोडला कमी उंचीचा रॅक वापरायला सांगितला आहे. ग्रिलमोडसाठी जास्त उंचीचा रॅक वापरायला सांगितला आहे. यामुळे पदार्थाला योग्य ती उष्णता मिळू शकते. अर्थात हे प्रत्येक मावेच्या मॉडेलवर अवलंबून असेल.
बिस्किट्स , कूकीज वगैरे नुसत्या रॅक वर ठेउन बेक होतिल का?>> नाही, नुसत्या रॅकवर ठेवल्यास ओघळून खाली पडतात. त्याऐवजी ट्रे वापरा.
पण कन्वेक्शन मोडमधे मेटल रॅक वापरू नका. >>> आं??? माझ्या माहितीप्रमाणे आणि जवळ असलेल्या तीन चार पुस्तकामधे हे मेटल रॅक कन्व्हेक्शन अथवा ग्रिलमोडमधेच वापरायचे आहेत. आणि हे मेटल रॅक "मायक्रोवेव्ह मोडमधे" अजिबात वापरायचे नाहीत.
स्वस्ति, इकडे वाचा, कदाचित
स्वस्ति, इकडे वाचा, कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
आणि हे मेटल रॅक "मायक्रोवेव्ह मोडमधे" अजिबात वापरायचे नाहीत.>> नंदिनी, त्या वाक्याच्या मागचा प्रश्न आणि पुढचं वाक्य त्या वाक्याबरोबर वाच
मंजूडी, नाही समजलं. मेटल
मंजूडी, नाही समजलं.
मेटल रॅक कुठे वापरणे अपेक्षित आहे ते सांगशील का प्लीज? माझ्या मावेच्या मॉडेलसाठी, बेकिंगसाठी "कमी उंचीचा मेटल रॅक वापरा" असे रेकमेंड केलेले आहे. कारण रॅक वापरल्याने बेक करायचा पदार्थ ओव्हनच्या भट्टीजवळ जातो आणि त्याला योग्य ती उष्णता मिळते. अर्थात मी वर लिहिल्याप्रमाणे हे मावेच्या मॉडेलनुसार बदलू शकते.
३.बिस्किट्स , कूकीज वगैरे
३.बिस्किट्स , कूकीज वगैरे नुसत्या रॅक वर ठेउन बेक होतिल का?>> हो, पण कन्वेक्शन मोडमधे मेटल रॅक वापरू नका. मावेच्या फिरणार्या काचेच्या गोलावरच बिस्किट्स , कूकीज ठेवून बेक करा.>>>
अगं नंदिनी, तिने बिस्किटं, कूकींसाठी रॅक वापरू का विचारलं होतं, ती रॅकवर ठेऊन बेक केली तर लिहिल्याप्रमाणेच ओघळून खाली पडतील म्हणून मी कन्वेक्शन मोडमधे मेटल रॅक वापरू नका असे लिहिले
आहे. आणि मेटल रॅक फक्त आणि फक्त ग्रिल मोडमधेच वापरा असे माझ्याकडच्या पुस्तकात लिहिले आहे. पण मी नानकटाई त्यावरच करते. मी मायक्रोवेव मोडाबद्दल काहीही लिहिलेले नाहीये.
मंजू, तुझ्याकडे कोणता मावे
मंजू, तुझ्याकडे कोणता मावे आहे?
हमरे पास सॅमसंगवा हय प्राची.
हमरे पास सॅमसंगवा हय प्राची.
सॅमसंगमध्ये अवन रॉडस्
सॅमसंगमध्ये अवन रॉडस् अॅडजस्ट करता येतात ना वर खाली? (एका मैत्रिणीकडे आहे सॅमसंग, तिनेच ही माहिती दिली होती. तिच्याकडील मॉडेल वेगळे असेल तर माहिती नाही. )
एल्जीमध्ये अशी सोय नसल्याने त्यांनी रॅक्स दिले आहेत. उंच रॅक ग्रिल मोडमध्ये आणि कमी उंचीचा रॅक कन्व्हेक्शन मोडमध्ये वापरता येतो.
हे वाचल्यावर माझी 'एगलेस चॉकलेट केक' मध्ये होत असणारी चूक लक्षात आली आहे. तेव्हा लवकरच परत प्रयोग केला जाईल.,
रॉड??? कुठे आहेत रॉड?? रॉड
रॉड??? कुठे आहेत रॉड??
रॉड न मिळाल्याने फारच ऑड वाटू लागलंय बै मला.. द्वाड आहेत विजय सेल्सवाले!
सॅमसंगमध्ये अवन रॉडस्
सॅमसंगमध्ये अवन रॉडस् अॅडजस्ट करता येतात ना वर खाली>>> सगळ्या मॉडेलमधे करता येत नाहीत. माझ्या सॅमसंगच्या मॉडेलमधे नाही करता येत. म्हणून तर रॅक वापरावे लागतात. अॅडज्स्टेबल रॉडपेक्षा हे बरे पडते. आपल्या मायक्रोवेव्हमधे ओव्हनची भट्टी, ग्रिलिंग आणि मायक्रोवेव्ह कुठे आहेत हे सोबत आलेल्या पुस्तकामधे लिहिलेले असते. त्यानुसार बेकिंग केल्यास केक जास्त चांगला होऊ शकतो.
२.त्या मावेबरोबर २ मेटल रॅक्स आहेत . ते मी वापरते पण त्यात केक टीन वापरता येइल का?>> मेटल रॅक वापरू नका. मावेच्या फिरणार्या काचेच्या गोलावरच केक टीन ठेवून बेक करा
३.बिस्किट्स , कूकीज वगैरे नुसत्या रॅक वर ठेउन बेक होतिल का?>> हो, पण कन्वेक्शन मोडमधे मेटल रॅक वापरू नका. मावेच्या फिरणार्या काचेच्या गोलावरच बिस्किट्स , कूकीज ठेवून बेक करा.
मंजूडी, मी तुझ्या या वरील दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांच्या अनुषंगाने लिहिले होते. तू दोन्ही ठिकाणी मेटल रॅक वापरू नका असेच लिहिले आहेस. मेटल रॅकवर ट्रे ठेवून त्यामधे बिस्कीटे अथवा कूकीज इत्यादि करणे अपेक्षित असते. काचेच्या टर्न टेबलवर आवश्यक तितकी हीट मिळत नाही त्यामुळे बिस्कीटे खालून खमंग भाजली जात नाहीत असा माझा स्वानुभव. स्वस्तिच्या मावेच्या मॉडेलप्रमाणे हे बदलू शकते एवढेच मला म्हणायचे होते. दोन मेटल रॅक असल्याने बेकिंग्साठी एक वापरणे रेकमेंड केलेले असेलच. असो. माझ्यातर्फे पूर्णविराम.
रॉड न मिळाल्याने फारच ऑड वाटू
रॉड न मिळाल्याने फारच ऑड वाटू लागलंय बै मला.. द्वाड आहेत विजय सेल्सवाले!>>>> नाही गं. तुझा तसा नवा आहे ना मावे? मैत्रिणीचा फारच जुना आहे. त्यामुळे, बहुदा आधीच्या मॉडेल्समध्ये तशी सोय असेल, नव्यांमध्ये नसेल सोय. कारण, एकदोनदा काही रेसिपी सांगताना तिने हा उल्लेख केला होता.
तू नको काळजी करूस.
अगं प्राची, ते रॉड मिळाले
अगं प्राची, ते रॉड मिळाले असते तर मस्त तंदूर पदार्थ करता आले असते या स्वप्नरंजनात मी दंगून गेल्याने मला जरा जास्तच वैट वाटले
धन्यवाद मंजुडी , नंदीनी
धन्यवाद मंजुडी , नंदीनी .
प्राची माझ्याकडेही एलजी मावे आहे. मी या अगोदर २ वेळा साधा केक करून बघितलेला काचेच्या भांड्यात .uneven शिजलेला आणी करपला ही.आता परत try करून बघते.
एक प्रश्न - माझ्याकडे ब्राउनी
एक प्रश्न -
माझ्याकडे ब्राउनी मिक्सचं पाकिट आहे. त्यावर ८ इंच व्यासाच्या गोल भांड्यात ब्राउनी बेक करायला सांगितलिये. माझ्याकडे तसं भांडं नाहीये. सध्या घरात एक ओव्हल शेपचं केकचं भांडं, एक ब्रेडसाठीचं लांब आयताकृती भांडं, एक खोलगट गोल भांड (बाहुलीच्या फ्रॉकच्या घेराच्या आकाराचं), एक कपकेक /मफिन्सचा साचा अशी चार मेटलची भांडी आहेत आणि एक काचेचा आयताकृती ट्रे आहे.
बहूतांशी वेळा केक ओव्हल शेपच्या भांड्यामध्ये किंवा कपकेकच्या साच्यामध्ये केले जातात. तर ब्राउनी या ओव्हल शेपच्या भांड्यात केली तर चालेल ना?
दुसरा प्रश्न - मी जितक्यांदा खोलगट मेटलच्या भांड्यामध्ये केक बेक केला आहे तितक्यांदा तो बिघडला आहे. (आतमध्ये थोडा कच्चा रहातो,). हे भांड्यामूळे होत असेल का? (मारे मोठ्या हौसेने वेगळ्या आकाराचं म्हणून ते भांडं घेवून आलेय)
कव्हेक्शन मोड असेल तर
कव्हेक्शन मोड असेल तर मेटलच्या भांड्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ नये अल्पना. हे भांडं जास्त काळ करम रहातं, त्यामुळे उलट केक जास्त खरपूस होतो. थोडा वेळ अजून ठेवून बघ केक.
पुढच्या वेळी तसं करून
पुढच्या वेळी तसं करून बघते.
जनरली केकसाठी वापरली जाणारी भांडी उथळ असतात ना, म्हणून मला वाटलं की हे भांडं खोलगट असल्याने मध्ये केक कच्चा रहातोय की काय.
मुम्बईत छोट्या आकाराचा वजनाचा
मुम्बईत छोट्या आकाराचा वजनाचा काटा कुठे मिळेल? केकचे साहीत्य अचुक मोजण्यासाठी.. आरीफकडे नाहिये आणी वर दिलेल्या ब्लॉगमध्येही उल्लेख नाहीये {की मलाच दिसत नहिये} प्लीज जाणकारानी मार्गदर्शन करावे.
झुमरु, मला तानिता चा वजनाचा
झुमरु,
मला तानिता चा वजनाचा काटा हायपरसिटीत मिळाला होता. तिथे मिळ्तो का पहा.
मुंबईत क्रॉफर्ड मार्केटाच्या
मुंबईत क्रॉफर्ड मार्केटाच्या आसपासच्या भागात मिळू शकतो वजनकाटा. मी तिथुन १० वर्षांपुर्वी आणलेला. अजुनही अग्दी बरोब्बर मोजतो सगळे. २ किलो कॅपॅसिटी आहे. माझ्या वहिनीने तिथुन ३ किलोवाला आणलेला.
मी १२ मफिन्स चा ट्रे घेतला
मी १२ मफिन्स चा ट्रे घेतला आहे. केक करताना जसा मावे मधली डीश फिरते तशी मफिन्स करताना पण फिरणार का? जर फिरणार असेल तर माझा ट्रे फिरनारच नाही. कारण तो खूप मोठा आहे.
का मफिन्स साठी काही वेगळी पद्धत असते ?
साधा केक नेहमी करते पण मफिन्स पहिल्यांदाच करणार आहे.
मदतीची अपेक्षा
मृणाल१, मफ़िन्स कशात करणार
मृणाल१, मफ़िन्स कशात करणार आहात? मावेमध्ये की साध्या ओव्हनमध्ये? तुमचा मफिन ट्रे का बरं फिरणार नाही म्हणता?
मृणाल१, मफ़िन्स कशात करणार
मृणाल१, मफ़िन्स कशात करणार आहात? मावेमध्ये की साध्या ओव्हनमध्ये? तुमचा मफिन ट्रे का बरं फिरणार नाही म्हणता?
मावे मध्ये
convection मोड ला मधली डिस्क फिरते ना.
माझा मफिन ट्रे आयताकृती आहे
convection मोड ला मधली डिस्क
convection मोड ला मधली डिस्क फिरते ना.
माझा मफिन ट्रे आयताकृती आहे>> त्याने नाही पडणार फरक माझ्या मते. मावे मोडमध्ये आपण आयत काचेचे भांडे नाही का वापरत? तसेच हे.
रच्याकने, केलेत का तुम्ही मफिन्स?
रच्याकने, केलेत का तुम्ही
रच्याकने, केलेत का तुम्ही मफिन्स?
अजून तरी नाही केलेत . मोठ्या उत्साहाने मोठा ट्रे आणला . आणल्या वर हा प्रोब्लेम लक्षात आला !!!!
घेताना अजिबातच लक्षात आले नाही. ( घाई आणि वेंधळेपणा)
मावे मोडमध्ये आपण आयत काचेचे भांडे नाही का वापरत? तसेच हे.>>>>>
नाही ग, चांगला १५ मफिनचा अल्डो चा ट्रे आहे. नाही फिरणार तो. मावे च्या गोल डीश पेक्षा बराच मोठा आहे.
काचेची आयताकृती भांडी गोल डीश पेक्षा लहान किंवा थोडीशीच मोठी असतात. काय करू ??
नाही तर पैसे वाया
(कापून २ ट्रे करावेत का झाडाची रोपे तयार करता येतील त्याच्यात )
मावे च्या गोल डीश पेक्षा बराच
मावे च्या गोल डीश पेक्षा बराच मोठा आहे.<<< मग तो नीट फिरणार नाही. शिवाय ओव्हनच्या आतल्या बाजूला घासू पण शकेल. शक्य अस्ले तर दुकानामधे नेऊन एक्स्चेंज करून छोट्या साईझचा ट्रे घेऊन या.
मावे च्या गोल डीश पेक्षा बराच
मावे च्या गोल डीश पेक्षा बराच मोठा आहे.>> अच्छा! असं झालं होय. मग बरोबर आहे, नाही फिरणार.
नंदिनी +१. अजून वापरला नाहीयेस ना? मग बदलून आणू शकतेस.
गितान्जली, साधना
गितान्जली, साधना धन्यवाद,
वजनकाटा मिळाला, आरीफ मधल्या चाचानेच मागवून दिला.
मझा बेसिक एगलेस बटर केक मधे
मझा बेसिक एगलेस बटर केक मधे बसलाय.
काय चुकले असेल?
आज अर्ध्या प्रमाणात केलाय. १ वाटी मेदा, अर्ध्या वाटी बटर,दुध्,पाउण वाटी साखर.
उद्या परत करणार आहे. प्लिज मदत करा.
जयु, तुझा केक करुन झाला असेल
जयु, तुझा केक करुन झाला असेल अत्तापर्यंत पण मी अत्ता पोस्ट बघितली म्हणून केक बसण्याच्या काहि शक्यता सांगते.
बेपा घातली होतिस का? किती?
ओव्हन टेंपरेचर बरोबर होते ना? फार कामी किंवा जास्त नव्हते ना?
केक बेक करायला घेतेलेले भांडे आणि केक बॅटर चे प्रमाण - भांड लाहान / मोठे - बॅटर कमी / जास्त??
खरतर केक करताना जे प्रमाण दिले असेल त्या प्रमाणेच करावे.. कधी कधी अर्धे प्रमाण घेऊन केक बरोबर होइल याची खात्री नसते.
उशिरा उत्तर दिल्याबद्दल क्षमस्व.
लाजो मि पण काल पौर्णिमाच्या
लाजो मि पण काल पौर्णिमाच्या रेसिपीप्रमाणे केक केला पण तो अगोदर चांगला फुगला आणि मग पुर्ण्पणे खालि बसला.अगदि मऊ रव्यासारखा झाला काय चुकले असेल?
लाजो उत्तराबद्द्ल धन्यवाद
लाजो उत्तराबद्द्ल धन्यवाद .
परत केक केला नाहि अजुन.
बेपा १ चहाचा चमचा ,चिमुट्भर सोडाहि घातला होता. मि कुकरम्ध्ये करते केक. मिडिअम हिट्वर,२० मिनीटे लागली.
केक बसु नये म्हणून काहि टिप्स द्या ना.जमल्यास बेसिक केकसाठी(w/wo egg) वाटिचे प्रमाणहि.
Pages