केक हा जवळजवळ सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा पदार्थ मायबोलीवर विविध केक्स, लोफ आणि मफिन्स इत्यादींच्या च्या वेगवेगळ्या तोंपासु पाककृती भरपुर आहेत.
परंतु बेसिक केक कसा करावा, ओव्हन टेम्परेचर काय असावे, सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे काय, भांडी कुठली वापरावीत, केक का फाटला/बसला, आयसिंग करताना कुठली साखर वापरावी, बटर वापरावे का क्रिम? असे अनेक प्रश्न, अनेक वेळेला विचारले जातात. युक्ती सुचवा बीबी वर किंवा त्या त्या पाकृ मधे काही उत्तरे ही मिळतात. पण जेव्हा केक करायचाय आणि असे बेसिक प्रश्न पडलेत तेव्हा शोधा शोधी करत बसण्यापेक्षा हा धागा उपयोगाचा ठरु शकेल.
इथे मी एक बेसिक बटर केक आणि बटर आयसिंग ची कृती दिली आहे. अजुन कुणाच्या काही खास आयडियाज्, टीप्स असतिल तर त्या या धाग्यावर लिहा.
बेकिंग मधे वापरले जाणारे काही खास शब्द जसे फोल्डींग, क्रिमिंग त्यांचे अर्थ आणि विश्लेषण इथे लिहा.
इथे तुमच्याकडे असलेली बेकिंग साठी लागणारी भांडी, उपकरणे यांचे फोटो पण टाका. एखादे खास उपकरण असेल तर त्याचा वापर कसा, कश्यासाठी करता ते ही लिहा
हॅप्पी बेकिंग
---------------------------------
बेकींग आणि केक साठी लागणारे साहित्य -
बर्याचदा बेकींगसाठी अथवा अभारतीय पदार्थ बनवतांना लागणारे साहित्य मुंबईत कुठे मिळेल याबद्दल चौकशी केली जाते. सीमाने दिलेल्या फुड ब्लॉगवर ही मुंबईतल्या ठिकाणांची आणि मिळणार्या वस्तूंची एकत्रित यादी मिळाली.
बेकींगसाठी मुंबईत सामान मिळण्याच्या ठिकाणांची यादी इथे मिळेल....
या मिहितीसाठी - धन्यवाद रूनी पॉटर
मिनोती, लेमन केक सही झालाय.
मिनोती, लेमन केक सही झालाय. सगळ्या साहित्याचं प्रमाण एकदम योग्य आहे. जास्तिचं दूध वा पाणी अजिबात घालावं लागलं नाही. बेताचा गोड झालाय
मिनोती, कपकेक्स केले. मस्त
मिनोती, कपकेक्स केले. मस्त झालेत. TOP
परत एकदा प्रश्न.... १. ग्रीक
परत एकदा प्रश्न....
१. ग्रीक योगर्ट म्हणजे काय? - गुगलुन मिळालेले ज्ञान - गाईच्या दुधाचे दही झाले की त्याला पातळ कापडात घालुन पाणी काढायचे. म्हणजे आपला चक्का. तर पाकृत जिथे ग्रीक योगर्ट वापरा लिहिलेय तिथे गाईच्या दुधाचा चक्का वापरता येईल ना?
२. sour cream म्हणजे थोडेसे दही घालुन विरजलेली साय ना?
भारतात लेमन पिल, म्हणुन
भारतात लेमन पिल, म्हणुन पाकवलेली लिंबाची साल मिळते. ती बारीक चिरून वापरता येते. छान चव असते तिला. फक्त रेसिपीमधले साखरेचे प्रमाण थोडे कमी करावे लागते. (दादरला मिळते )
सार क्रीम साठी सायीत थोडे आंबट ताक मिसळून विरजण लावले तरी चालते.
एक कप सायीला (किंवा तयार क्रीमला ) ३ टेबलस्पून आंबट ताक लागेल.
ग्रीक योगर्ट म्हणजे चक्काच (पण बेसिकली दही म्हणजेच कर्ड आणि योगर्ट यात फरक आहे) तो गायीच्याच नाहि, तर इतर दूधांपासून पण बनवलेला असू शकतो.
इतर दूधांपासून पण बनवलेला असू
इतर दूधांपासून पण बनवलेला असू शकतो<< हो, मोस्टली शीप्स मिल्क (बकरीचे दुध) वापरतात ऑथेंटीक रेसिपी मधे. ग्रीक योगर्ट फारच क्रिमी आणि फुल्ल ऑफ फॅट असते. पण डेझर्ट्स वगैरे साठी मस्तच.
यावर नुसता मध आणि बादामाचे टोस्टेड काप किंवा पीच, आंबा, नेक्टरीन अश्या फळांच्या फोडी घालुन फ्रुट सॅलड देखिल छान लागते. यात संत्र्याचा रस आणि फोडी घालुन पण छान लागतं
ग्रीक योगर्ट, तातझिकी (काकडी चे डीप) साठी पण वापरतात.
धन्यवाद लाजो आणि दिनेश.
धन्यवाद लाजो आणि दिनेश. मुम्बईत घरच्याघरी चक्का करुन त्यालाच ग्रीक योगर्ट म्हणावे लागेल
'पदार्थ सजावट आणि मांडणी' या
'पदार्थ सजावट आणि मांडणी' या धाग्यावर झालेली चर्चा इथे पेस्टत आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
मंजूडी | 6 May, 2011 - 16:24
अरे सही आहेत कपकेक्स स्मित
कपकेकसाठी साचे असतात का? ते कागदाचे कप दुकानात काय नावाने मागायचे?
मी हा बावळट प्रश्न आधीही कुठेतरी विचारला होता, पण तो न सुटल्याने पुन्हा विचारते आहे. कृपया मदत करा.
सावली | 6 May, 2011 - 16:30
कसले क्युट कपकेक आहेत.!! ते मोठ्याने रडणार बाळही मस्त दिसतय.
मंजूडी मॉल मधे गेलीस तर केक साहित्याच्या भागात मिळतील कदाचित. यावेळी स्टार बझार मधे बघितल्यासारखे वाटताहेत. ते कागदाचेच साचे असतात त्यातच केक बनवावा लागतो. (मी स्वतः केला नाहीये पण कधी)
प्राची | 6 May, 2011 - 16:35
कपकेकसाठी साचे असतात का? ते कागदाचे कप दुकानात काय नावाने मागायचे? >>> मलाही हा प्रश्न पडला आहे.
मफिन मोल्डस् आणि हे कपकेक मोल्ड्स् वेगळे असतात का?
लाजो | 6 May, 2011 - 16:46
मफिन पेपर मोल्ड्स आणि कपकेक पेपर मोल्ड्स सारखेच पण मफिन मोल्ड्स आकाराने मोठे असतात आणि कधीकधी थोडे थिक असतात.
हे पेपर मोल्ड्स मफिन्/कपकेक पॅन मधे ठेऊन त्यात मफिनचे/केक चे बॅटर ओतायचं. हे मोल्ड्स ठेवल्यामुळे मफिन्/कपकेक्स पॅन ला ग्रीसींग/डस्टिंग कराव लागत नाही.
इथे भरपुए व्हरायटी मिळते या पेपर मोल्ड्स ची. माझ्याकडे सिलीकॉन चे मोल्ड्स पण आहेत. हे रीयुजेबल आहेत.
मी एक तासाभरात फोटो टाकते.
मंजूडी | 6 May, 2011 - 16:53
हां लाजो, तो सिलीकॉन मोल्ड मायक्रोवेवमधे वापरलेला चालतो का? (जाडजुड रबरासारखा फ्लेक्सिबल असतो तोच सिलिकॉन मोल्ड ना?)
अल्पना | 6 May, 2011 - 16:55
इथे मला कप केक आणि मफिन्स साठी एकाच प्रकारचा पॅन मिळाला. छोटे छोटे कप केक करुन झालेत त्यात. (मंजू तुझ्या रेसेपीने छोटे मावा कपकेक केले होते). पेपरमोल्ड्स कोणत्या दुकानात मिळतिल हे न कळाल्याने मी मोल्ड न वापरता त्या पॅनला आतून बटर लावून मैदा भुरभुरला होता.
लाजो | 6 May, 2011 - 16:57
पुण्यात भवानीपेठेत किंवा कँप मधे हे मोल्ड्स मिळतात. आपल्याकडे सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद ज्यात देतात तसेच हे असतात.
मंजूडी | 6 May, 2011 - 17:11
लाजो, माझ्याकडे हा एक मोल्ड आहे. त्यात केक केलेला चालतो का?
jelly mould.jpg
त्याचं मटेरीयल जाडजुड रबरासारखं आहे, फ्लेक्सिबल आहे. तो मावेत ठेवलेला चालतो का सांग. चालत असेल तर, समजा त्यात केकचं मिश्रण घालून छोटे केक केले तर ते अन्मोल्ड कसे करायचे तेही सांग.
प्राची | 6 May, 2011 - 17:21
माझ्याकडेही असाच मोल्ड आहे. नवर्याने तो आइसट्रे म्हणून आणला आहे. स्मित
मवा | 6 May, 2011 - 17:39
माझ्याकडे ३-४ प्रकारचे फुलांच्या, स्टार च्या, चौकोनी, नेहेमीचे गोल असे वेगवेगळ्या आकारात आहेत. त्याला ग्रीसींग लागत नाही. सिलिकॉन मटेरियल आहेत (तेच ते जाड रबर सारखे). मी तरी ते सोलल्यासारखे काढते, माझे सिंगल आहेत मात्र, असे ट्रे नाहीयेत. मावेत चालतात सिलिकॉन ट्रे मंजू.
लाजो | 6 May, 2011 - 17:41
हे मफिन्स आणि कपकेक्स चे माझ्याकडे असलेले पेपर आणि सिलिकॉन कप्स.
डावीकडचे गुलाबी आणि आकाशी आहेत ते सिलेकॉन चे आहेत.
मंजुडी, तुझ्याकडे असलेल्या मोल्ड्स वर हिट रेसिस्टंसी किती डिग्री पर्यंत आहे ते लिहीलय का?
सिलीकॉन मोल्ड्स हाय हिट ला तापत नाहीत म्हणुन ओव्हन्/मायक्रोवेव्ह मधे वापरता येतात. यात बॅटर डायरेक्टली ओतायचे. पण जस्ट प्रिकॉशन म्हनुन मी बटर चा हलका थर लावुन घेते.
आइस ट्रे म्हणुन आणले असतिल तर ते कदाचित केक साठी चालणार नाहित.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
बेसिक बटर केक केला होता तो
बेसिक बटर केक केला होता तो आतुन कच्चा राहिला...काय चुकल असेल?
रुपल, किती वेळ बेक केला
रुपल, किती वेळ बेक केला होता? साधारण दिड कपाचा केक केल्यास साधारण ४५ ते ५० मिनिटे लागतात बेक व्हायला, तापमान १८० डिग्रीवर ठेऊन. तुम्ही किती मापाचा, किती वेळ, किती तापमानावर ठेवला ते पाहा.
मी मागे खजुर लोफ केलेला तेव्हा पहिल्यांदा खुपच सुरेख झाला. दुस-यांदा केला तेव्हा खजुर चांगल्या प्रतीचे नव्हते. मी हातानेच तुकडे केले ते मोठेमोठे तसेच राहिले. मी खरेतर मिक्सरमधुन काढायला हवे होते पण लक्षात आले नाही. बेक करताना ते तुकडे लोफच्या तळाशी बसले आणि अर्थातच ते बेक झाले नाहीत. लोफ दोनतिनदा सळी घालुन चेक केला तेव्हा मिश्रण कच्चेच आहे असे वाटत राहिले. शेवटी कंटाळून अवन बंद केला. लोफ आतुन अगदी गिजगिजीत झाला होता, कच्चाच राहिला असे वाटत होते. बाकी चव वगैरे व्यवस्थित होते. मी बाईला सोबत घेऊन लोफ तसाच खाऊन टाकला पण काय चुकले ते लक्षात येईना. पुढच्या वेळेस परत तेच. म्हटले पहिल्या वेळेस नीट झाला आणि आता काय झाले???
काय झाले असावे याचा विचार करता करता अचानक लक्षात आले काय झालेले ते. खजुराचे मोठे तुकडे थोडेच बेक होणार? आणि दिड वाटी तुकडे लोफच्या तळाशी बसल्यावर तो कच्चाच वाटत राहणार. यावेळी अतिशय मस्त, मऊसुत खजुर मिळाला. हातानेच अगदी बारिक करता आला. एक उकळी घेऊन सिमर करताना ८०-८५ टक्के तुकडे विरघळतील याची काळजी घेऊनच लोफ केला. अगदी मस्त, मऊसुत, स्पॉंजी केक झाला. मैत्रिणींच्या समोर ठेवल्यावर ५ मिनिटात संपला हा रिपोर्टही मिळाला लेकीकडुन
माझ्यासारखे नवशिके इथे भरपुर असतील, चुक झाल्याचे कळते पण कशामुळे काय चुकले ते लक्षात येत नाही. मिश्रणात मोठे तुकडे असतील तर केक गिजगिजीत होऊ शकतो हे त्यांना कळण्यासाठी हा लेखनप्रपंच
रुपल किती वेळ बेक केला होता
रुपल
किती वेळ बेक केला होता केक, कृतीत सांगीतले तेवढा वेळ की काही फेरफार केले म्हणजे १८० सेल्सियसला ४० मिनीटे सांगितले असेल तर घड्याळ लावून तेवढाच वेळ की ३६० से. वर २० मिनीटे असा काही बदल केलात? सुई किंवा टुथपिक टोचून बघितली होती का केकच्या मध्यभागी, तेव्हा ओलसर पीठ लागले होते का? तसे झाले तर केक कच्चा रहातो. सुईला पीठ न लागता कोरडी बाहेर आली की केक झाला समजावे.
संपूर्ण खात्री असल्याशिवाय कृतीत/वेळेत/तापमानात शक्यतो बदल करू नयेत.
साधना, रुनी ३०/३२ मिनिट केला
साधना, रुनी
३०/३२ मिनिट केला कारण तो वरुन करपत होता बाकी प्रमाण सेमच होते. कट करुन microwave मधे शिजवला:)
रुपल, ओव्हनचे तापमान काय
रुपल, ओव्हनचे तापमान काय ठेवले होतेस?
तापमान जास्त असेल तर केक बाहेरुन होतो आणि आत कच्चा रहातो.
कारण तो वरुन करपत होता तुझा
कारण तो वरुन करपत होता
तुझा साधा, वर नी खाली कॉइल असलेला ओटिजी आहे काय? माझ्याकडे असला साधा ओटिजी आहे नी माझा केक आधी वरुन करपायचा कारण मी दोन्ही कॉइल्स सुरू ठेवायचे. आता मी केक ठेवायच्या आधी अवन गरम करताना दोन्ही कॉइल्स सुरू ठेवते पण केक आत ठेवला की फक्त बॉटम कॉइल ऑन ठेवते. टॉप कॉइल बंद करते. केक वरुन अजिबात करपत नाही आता.
मी परवा वर्षाला लिहिले होते
मी परवा वर्षाला लिहिले होते कि आयसिंग बद्दल सविस्तर लिहिन. तसे इथे लिहितोय, पण या पोस्टचे ऑडीट लाजोने करावे, अशी विनंतीही करतोय. कारण हे प्रकार करुन बरीच वर्षे झाली.
१) वॉटर आइसिंग
यासाठी दिड कप आइसिंग शुगर आणि दोन टेबलस्पून उकळते पाणी लागेल. आयसिंग शुगर हि पिठीसाखरेत स्टार्च मिसळून तयार करतात. स्टार्च मिसळल्याने त्यात गुठळ्या होत नाहीत. पण तरीही बाजारातून आणल्यावर यात काही खडे दिसतातच. तर हि साखर चाळून घेणे आवश्यक असते. अश्या चाळलेल्या साखरेत हळू हळू उकळते पाणी घालायचे. आणि भराभर ढवळायचे. ढवळण्यासाठी लाकडी चमचा वापरायचा. प्लॅस्टिकचा चमचा वापरला तरी चालेल. फेटलेल्या दह्यासारखी कंसिस्टन्सी येते याला. एका मोठ्या केकसाठी एवढे मिश्रण पुरेल. हे मिश्रण सूकल्यावर थोडे कडक होईल. त्यापुर्वीच ते केकवर पसरायचे. आणि वरचा भाग सपाट करुन घ्यायचा. लागणार नाही, पण लागलेच तर आणखी काही थेंब पाणी वापरायचे.
२) बटर आइसिंग
यासाठी दिड कप साखर, ७५ ग्रॅम साधे लोणी, पाच चमचा आवडीचा इसेन्स आणि २ टेबलस्पून उकळते पाणी लागेल. साखर चाळून त्यात इसेन्स व लोणी घालायचे. नीट मिसळून पाणी घालून घोटायचे. याला थोडी चमक येते आणि वरच्यापेक्षा हे थोडे स्मूथ असते. जास्त कडक होत नाही.
३) रॉयल आइसिंग
हे साधारण वेडींग केक आणि क्रिसमस केकसाठी वापरतात हेही सुकल्यावर कडक होते.
३ कप आयसिंग शुगर, २ मोठ्या अंड्यातले पांढरे, पाव चहाचा चमचा लिंबूरस आणि १ चहाचा चमचा ग्लिसरीन लागेल.
बोलमधे साखर चाळून घेउन त्यात अंड्यातले पांढरे, लिंबूरस आणि ग्लिसरिन टाकायचे. लाकडी चमच्याने नीट घोटून घ्यायचे. हे आयसिंग केकवर तसेच केकच्या कडांना पण लावता येते.
४) Ganache
हे चॉकलेट वापरुन केलेले आयसिंग असते. हे मिश्रण ट्रफल मधे भरण्यासाठी पण वापरता येते.
यासाठी अर्धा कप क्रिम, १ टेबलस्पून लोणी आणि १७५ ग्रॅम चॉकलेट लागेल. क्रिम आणि लोणी एकत्र करुन थोडे गरम करुन घ्यायचे. चॉकलेटचे तूकडे करुन एका बोलमधे घ्यायचे आणि त्यावर हे क्रीमचे मिश्रण ओतायचे. आणि घोटायचे. या उष्णतेने चॉकलेट वितळायला हवे. नाही वितळले तर मिश्रण परत गरम करावे लागेल. हे जसजसे थंड होईल तसे दाट होत जाईल.
५) प्लॅस्टीक आइसिंग
हे आइसिंग लाटून त्याचे आकार कापता येतात. याची फूले पण करत येतात. यासाठी तीन कप आइसिंग शुगर, एका अंड्यातले पांढरे, २ टेबलस्पून लिक्वीड ग्लूकोज आणि पाव चमचा इसेन्स लागेल.
साखर चाळून त्यात अंड्यातले पांढरे आणि लिक्वीड ग्लूकोज आणि इसेन्स घालून नीट मिसळून घ्यावे.
एकावेळी जितके वापरायचे असेल तितके बाजूला काढून, साखर पसरुन त्यावर ते मळुन घ्यावे, आणि मग लाटून हव्या त्या आकारात कापून घ्यायचे.
६) अमेरिकन फ्रॉस्टींग
यासाठी पाऊण कप साखर, एका अंड्यातले पांढरे. पाव चमचा क्रीम ऑफ टार्टर, दोन टेबलस्पून पाणी, आणि अर्धा चहाचा चमचा इसेन्स घ्यायचा. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवायचे. दुसर्या एका छोट्या भांड्यात बाकीचे घटक एकत्र करायचे. मग उकळत्या पाण्यात हे छोटे भांडे अधांतरी धरुन मिश्रण घोटायचे. याला सॉफ्ट पीक्स यायला लागली कि बाजूला करुन आणखी घोटायचे. स्टिफ पीक्स आले कि केकवर पसरायचे.
७) मार्झिपॅन
यासाठी दिड कप आइसिंग शुगर, २ कप बदाम किंवा काजूची पूड, ३ अंड्यातले पिवळे, २ टिस्पून लिंबूरस, पाव चमचा इसेन्स लागेल.
साखर आणि बदामाची वा काजूची पूड एकत्र करुन त्यात अंड्यातले पिवळे, लिंबूरस आणि इसेन्स घालून नीट ढवळून मळून घ्यायचे. हे सहज लाटता येते. हाताने वळून याचे आकारही करता येतात.
यासाठी लागणारी पुड मात्र मिक्सरवर करुन चालत नाही. या पूडी कोरड्या न होता तेलकट होतात.
८) बटरस्कॉच साठी लागणारे साखरेचे तूकडे, किंवा केकवरचे डेकोरेशन.
एक जाड स्टिलचे पॅन घ्या. तसेच एका ताटाला पाठीमागे तेलाचा हात पुसुन पालथे घाला. एका मोठ्या थाळ्यात थंड पाणी घालून तयार ठेवा.
साधारण अर्धा कप साधी साखर पॅनमधे पसरुन घ्य. मध्यम आचेवर पॅन ठेवा. साखर वितळायला लागली कि हलकेच पॅन गोल फिरवा. साखरेच्या पाकाला हलका सोनेरी रंग आला (साधारण बियरसारखा ) कि ते पॅन आचेवरुन उतरुन त्याचा तळ थंड पाण्यात बूडवा. पाणी उडून साखरेत जाणार नाही, याची काळजी घ्या. मग तो पाक तेल लावलेल्या ताटावर ओता. (बटरस्कॉच आइसक्रीमसाठी वापरायचे असेल तर या पाकात ओतण्यापुर्वी सुक्या मेव्याचे चण्याच्या डाळीएवढे केलेले तूकडे टाका व पॅन हलवा ) हा पाक थंड घाला कि काचेसारखा कडक होईल. याचे तूकडे केकवरच्या डेकोरेशनमधे वापरता येतील. आइसक्रिम साठी वापरायचे असेल, तर हे तूकडे जाड प्लॅस्टीकच्या पिशवीत घालून, लाटण्याने ठोका व तूकडे करा. त्यातली पुड बाजूला करा व मोठे तूकडे आइसक्रीम मधे वापरा.
दिनेशदा, छान रेसिपीज आयसिंग
दिनेशदा, छान रेसिपीज
वा वा.. मस्त डिटेलवार माहिती
वा वा.. मस्त डिटेलवार माहिती
दिनेशदा आणि जो धन्स
मस्त माहिती.
मस्त माहिती.
आज ब-याच दिवसांनी केक बनवायचा
आज ब-याच दिवसांनी केक बनवायचा मुड आला. दुपारी जेवताना मोबाईलवरुन नेटवर टिपी करताना http://londonfoodieny.com/2011/11/10/apple-coffee-crumb-cake/ ही रेसिपी सापडली. सोप्पी वाटली म्हणुन घरी आल्याबरोबर लगेच करायला घेतली. इथे वेगळा धागा काढुन लिहिली नाही कारण ही रेसिपी मी जशीच्या तशी वापरली, स्वतःचे वेगळे काहीच केले नाही. फक्त खालिल बदल केले.
१. क्रम्ब्ससाठीच्या प्रमाणाला ४ ने भागले. मुळ रेसिपीत क्रम्ब्स करा आणि त्यातले दोन कप वापरुन बाकीचे फ्रिजमध्ये ठेवा असे लिहिलेय. आता माझ्या फ्रिजमध्ये काही गेले की ते गेलेच. मग त्याला बाहेरची हवा कधी लागेल ते सांगता येणार नाही. म्हणुन ४ ने भागुन जेवढे काही क्रम्ब्स बनतील ते सगळेच्या सगळे वापरायचे ठरवले.
२. आईने 'उगीच जास्त करु नकोस. पदार्थ फसला तर सगळे जिन्नस वाया जातील' ही सुचना केली. तिचे ऐकुन केक रेसिपीला २ ने भागले.
३. सफरचंदाऐवजी संत्रे वापरले. एक संत्रे सोलुन त्याचा गर काढला आणि तो रेसिपीत वापरला. संत्रे अशा त-हेने वापरल्याने परत संत्र्याच्या सालीचा किस घातला नाही. संत्रे आंबट होते म्हणुन साखर थोडी वाढवली.
४. वरचे आयसिंग केले नाही. आधीच केकमध्ये बटर जास्त आणि वर साखरेचे आयसिंग केले तर मग मला केक काही खाता आला नसता
रेसिपीला २ ने भागल्यामुळे माझ्याकडच्या भांड्याच्या मानाने मिश्रण कमी पडले. तळाला अजुन थोडा जाड थर दिला तर संत्रे तळाला बसणार नाही. मध्यभागी येईल. तसेही माझे तळाला जाऊन चिकटले नाही पण थर पातळ झाला तर संत्रे खाली चिकटु शकते आणि केक काढताना तो तुटू शकतो. (माझे एका ठिकाणी चिकटले)
केक मस्त झाला. आंबटगोड अशी मस्त चव आली. टेक्श्चरही छान आले. केक आता खुप मऊ वाटतोय. उद्या थोडा कडक होईल.
काय चुकले?? - केक तयार झाला तरी रचे क्रम्ब्स डोळ्यांना जरासे कच्चट वाटत होते म्हणुन मी वरची कॉइल चालु केली आणि जस्ट दोन मिनिटे अवनसमोरुन दुर बाहेरच्या खोलीत गेले आणि तीच संधी साधुन केक वरुन थोडा जळाला. लगेच परतले म्हणुन नशीब, नाहीतर सगळी मेहनत फुकट गेली असती. खरेतर असे करायला नको होते कारण डोळ्यांना जरी कच्चट वाटले तरी बाहेर काढल्यावरही रंग बदलण्याची क्रिया चालुच होती. सोनेरी रंग आला असता.
हा फोटो. मोबाईलवरुन काढलाय शिवाय रात्रही आहे त्यामुळॅ क्लॅरीटी थोडी कमी आहे. पण केकच्या स्पाँजीनेसचा अंदाज येईल.
परत एकदा केक करणार नी भरपुर करणार हे नक्की.
माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे पण
माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे पण त्याला कन्फेक्शन मोड नाही. मागे एकदा मी मायबोलीवर बिनअंड्याच्या, मायक्रो मोड (हायवर ५ मि.) वर होणार्या केकची (त्याला माझ्यामते ब्राउनी म्हणतात )रेसिपी बघितली होती. त्या प्रमाणे केलाही होता. पण ती रेसिपी मला आता मिळत नाहीये. कोणी सांगू शकेल का?
साधना, मस्तच! तुझ्या
साधना, मस्तच!
तुझ्या वेरिएशन्स च्या प्रमाणे रेसिपी योजाटा प्लिज
बर्याचदा बेकींगसाठी अथवा
बर्याचदा बेकींगसाठी अथवा अभारतीय पदार्थ बनवतांना लागणारे साहित्य मुंबईत कुठे मिळेल याबद्दल चौकशी केली जाते. सीमाने दिलेल्या फुड ब्लॉगवर ही मुंबईतल्या ठिकाणांची आणि मिळणार्या वस्तूंची एकत्रित यादी मिळाली. http://purplefoodie.com/baking-in-bombay/
मला व्हीप क्रीम आईसिंगची
मला व्हीप क्रीम आईसिंगची रेसिपी हवी आहे इथे कोणी केले आहे का? मला कपकेकसाठी करायचे आहे.
पिहू, इथे
पिहू, इथे बघ...
http://answers.yahoo.com/question/index?qid=20090423071253AA4xOqG
http://www.cake-decorating-corner.com/whipped-cream.html
धन्यवाद लाजो !
धन्यवाद लाजो !
(No subject)
सिरॅमिक कप (जसे रेमकिन्स) आणि
सिरॅमिक कप (जसे रेमकिन्स) आणि आपले साधे चहाचे कप यात फरक आहे पण त्यामुळे बेकिंगवर कितपत परिणाम होतो?
मी ला-ओपालाच्या सिरॅमिक मध्ये कप केक बनवला तर तो फार झटपट होतो, रेसिपीत दिलेल्या वेळेत होतो, पण तेच साधे चहाचे कप वापरले तर खुप वेळ लागतो.
नव्या मुंबईच्या मार्केटमध्ये रेमकिन्स कुठे पाहिले नाहीत, त्याऐवजी एक्हिबिशनमध्ये जी सिरॅमिकची लहान भांडी मिळतात ती वापरली तरी चालेल असे वाटते, एक्स्पर्ट लोकांचे काय मत आहे?
सध्या लाजोताईच्या केक आणि
सध्या लाजोताईच्या केक आणि मफिन्स वगैरे पाकृ वाचून आणि फोटो बघून बेकींग ची जाम फुरफुरी आली आहे .
पण काही बाळ्बोध प्रश्न आहेत :
१. माझ्याकडे मावे आहे.त्यातील कन्वेक्शन मोड म्हनजे ओवन चे सेटिग का?
२.त्या मावेबरोबर २ मेटल रॅक्स आहेत . ते मी वापरते पण त्यात केक टीन वापरता येइल का?
३.बिस्किट्स , कूकीज वगैरे नुसत्या रॅक वर ठेउन बेक होतिल का?
४.बटर पेपर वापरता येइल का?
५.कपकेकसाठी पेपर कप वापरले तर जळणार तर नाही न?
१. माझ्याकडे मावे आहे.त्यातील
१. माझ्याकडे मावे आहे.त्यातील कन्वेक्शन मोड म्हनजे ओवन चे सेटिग का?>>> हो.
२.त्या मावेबरोबर २ मेटल रॅक्स आहेत . ते मी वापरते पण त्यात केक टीन वापरता येइल का?>> मेटल रॅक वापरू नका. मावेच्या फिरणार्या काचेच्या गोलावरच केक टीन ठेवून बेक करा.
३.बिस्किट्स , कूकीज वगैरे नुसत्या रॅक वर ठेउन बेक होतिल का?>> हो, पण कन्वेक्शन मोडमधे मेटल रॅक वापरू नका. मावेच्या फिरणार्या काचेच्या गोलावरच बिस्किट्स , कूकीज ठेवून बेक करा.
४.बटर पेपर वापरता येइल का? >>> हो.
५.कपकेकसाठी पेपर कप वापरले तर जळणार तर नाही न?>> नाही.
हॅप्पी बेकिंग!
हलो एक्सपर्टस्...मला
हलो एक्सपर्टस्...मला लेकीसाठी बाहुलीचा केक घरी बनवायचाय. यु-ट्युब वरुन धडे गिरवून आयसिंग बर्यापइकी जमलय. पण बेसिक केक काही केल्या होत नाहीय मी खास तो बाहुलीसाठीचा टिन मोल्ड पण आणलाय. पण त्यात खालच्या निमुळत्या बाजुचा भाग कच्चा रहात होता आणि तो शिजवता-शिजवता वरचा भाग कडक झाला. फक्त मधला भाग बरोबर झाला होता. कोणी मला मावे मधे हमखास न फसता होणार्या..स्पेशली त्या मोल्ड मधे होणार्या केकची रेसिपी देऊ शकेल काय? अजून आठवडा आहे त्यात प्रयोग करुन बघू शकेन.
धन्यवाद मंजुडी . नक्की
धन्यवाद मंजुडी . नक्की प्रयत्न करेन आणि काय काय ( आणि कसं कसं ) झालं ते आठवणीने कळवेन .
पण हा प्रश्न मला नेहमी पडतो : मावेत धातूची भांडी वापरू नये पण केक टीन चालतो ,असं का?
Pages