केक मेकिंग, बेकिंग आणि डेकोरेटिंग टिप्स आणि प्रश्नोत्तरे

Submitted by लाजो on 19 July, 2010 - 21:44

केक हा जवळजवळ सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा पदार्थ Happy मायबोलीवर विविध केक्स, लोफ आणि मफिन्स इत्यादींच्या च्या वेगवेगळ्या तोंपासु पाककृती भरपुर आहेत.

परंतु बेसिक केक कसा करावा, ओव्हन टेम्परेचर काय असावे, सेल्फ रेसिंग फ्लार म्हणजे काय, भांडी कुठली वापरावीत, केक का फाटला/बसला, आयसिंग करताना कुठली साखर वापरावी, बटर वापरावे का क्रिम? असे अनेक प्रश्न, अनेक वेळेला विचारले जातात. युक्ती सुचवा बीबी वर किंवा त्या त्या पाकृ मधे काही उत्तरे ही मिळतात. पण जेव्हा केक करायचाय आणि असे बेसिक प्रश्न पडलेत तेव्हा शोधा शोधी करत बसण्यापेक्षा हा धागा उपयोगाचा ठरु शकेल.

इथे मी एक बेसिक बटर केक आणि बटर आयसिंग ची कृती दिली आहे. अजुन कुणाच्या काही खास आयडियाज्, टीप्स असतिल तर त्या या धाग्यावर लिहा.

बेकिंग मधे वापरले जाणारे काही खास शब्द जसे फोल्डींग, क्रिमिंग त्यांचे अर्थ आणि विश्लेषण इथे लिहा.

इथे तुमच्याकडे असलेली बेकिंग साठी लागणारी भांडी, उपकरणे यांचे फोटो पण टाका. एखादे खास उपकरण असेल तर त्याचा वापर कसा, कश्यासाठी करता ते ही लिहा Happy

हॅप्पी बेकिंग Happy

---------------------------------
बेकींग आणि केक साठी लागणारे साहित्य -

बर्‍याचदा बेकींगसाठी अथवा अभारतीय पदार्थ बनवतांना लागणारे साहित्य मुंबईत कुठे मिळेल याबद्दल चौकशी केली जाते. सीमाने दिलेल्या फुड ब्लॉगवर ही मुंबईतल्या ठिकाणांची आणि मिळणार्‍या वस्तूंची एकत्रित यादी मिळाली.

बेकींगसाठी मुंबईत सामान मिळण्याच्या ठिकाणांची यादी इथे मिळेल....

"बेकींग-इन-बॉम्बे"

या मिहितीसाठी - धन्यवाद रूनी पॉटर Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला साखरेच्या जागी मध किंवा खजुर हा पर्याय वापरुन केक्स करायचेत. १ वाटी साखर असे पाकृत दिले असेल तर त्या जागी मध्/खजुर किती वापरावा? खजुर मिक्सरनधुन काढावा का??

साधना, खजुरआणि थोड दुध मिक्सर मधे वाटुन वापरता येइल, पण तु कुठला केक करणार आहेस त्यावर साखरेवजी खजुर चालेल का हे बघाय्ला लागेल. कारण खजुराचा एक वेगळा स्वाद येइल केकला.

मधाचे प्र्माण मला वाटत तुला केक कितपत गोड हवाय आनि मध कितपत गोड आहे त्यावर ठरवाव लागेल.

बाकी कुणी असे ऑल्टरनेटीव्हज वापरले असतिल तर गाईड करतिलच Happy

काल मी संजीव कपूरच्या पाकृप्रमाणे एगलेस मावा केक केलाय. फार सुंदर आणि चविष्ट झालाय.

मूळ पाकृमध्ये 2 टिस्पून कॉर्नफ्लार किंवा कॉर्नस्टार्च सांगितलाय... मी घरी घेऊन जायला विसरले आणि अर्थातच केकमध्ये घातलं नाही. Happy तर त्या कॉर्नफ्लारचं कार्य नक्की काय असतं?
तसंच त्याने पाव कप ताक आणि कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करण्यासाठी लागेल तेवढं दूध असं सांगितलंय. ताक घालण्याचा उद्देश काय?

एम्बी पावलोवा नावाचा सर्च मार. आमच्या घरी आई तेच करून दाखव नावाचा धोशा लागला आहे. ते हिने पाहिले मास्टरशेफ वर अन मला कस्ले येतेय. पण नाही आता रविवारी पावलोवाच. खूप बीटिन्ग करावे लागते. एग्स मग क्रीम वर टॉपिन्ग साठी. डॉन त्रिविक्रम रेसीपी टाकायला सांग डॉनराणीला.

मंजू, बिनाअंड्याच्या बहुतांशी केक्स मध्ये दही /ताक वापरायला सांगतात. तसंच बर्‍याचदा केकमध्ये अंडं असेल तरी जर मैद्याऐवजी गव्हाचे किंवा दुसरे कुठले पीठ वापरले असेल तरी दही असतं रेसेपीमध्ये. बहुतेक केक हलका होण्याचा आणि याचा काही संबंध असेल. (अर्थात हा आपला माझा एक अंदाज. :))

होय होय, आंबट अंशामुळे केक फुगायला आणि जाळीदार व्हायला मदत होते- सोडा बायकार्ब/ दही/ ताक- त्यासाठीच असतं कृतीत.

कॉर्नस्टार्च दाटसरपणासाठी, मिळून येण्यासाठी वापरतात. मावा म्हणजे खवा, तो तसा मोकळा असतो ना, तो मिळून येण्यासाठी कॉर्नफ्लार/ स्टार्च. मन्जे कृती टाक प्लीज, नायतर मेल तरी कर Happy

विक्रम तुमच्या ह्यांनाही कृती टाकायला सांगा की. पिझ्झासारखं दिसतंय, मस्त टेम्प्टींग आहे. ब्राझिलची म्हणजे एकदम ऑथेंटिक कृती असणार.

साधना, शक्यतो केकमधे मध वापरू नको. आयुर्वेदाप्रमाणे मध तापवायचा नसतो त्याचे गुणधर्म बिघडतात. पाश्चात्य जनता कितीही काहीही करत असेल तरी आपल्याला कारणे माहिती असल्याने शक्यतो तसे करु नये.

मंजु,

केक हलका होण्यासाठि मैद्यामध्ये कार्बन डाय ऑक्साइड चे बुडबुडे तयार होण आवश्यक असत, म्हणुन बेकिंग पावडर वापरतात. बेकिंग पावडर म्हणजे अ‍ॅसिड (टारटरिक अ‍ॅसिड मोस्टलि), अल्कलि (सोडिअम बायकार्बोनेट ज्याला आपण बेकिंग सोडा म्हणतो) आणि इनर्ट पदार्थ (जसे कॉर्न किंवा पोटॅटो स्टार्च) ह्याच मिश्रण असत. स्टार्च फिलर म्हणुन (व्हॉल्युम वाढवायला ज्याने आपण घरगुति चमचा किंवा टेबलस्पुन ने बेकिंग पावडर मोजु शकु) आणि हाय्ग्रोस्कोपिक (पाणि शोषुन घेणारा पदार्थ ज्यामुळे अ‍ॅसिड+अल्कलि रिअ‍ॅक्शन आधिच म्हणजे डब्यातच सुरु होत नाहि वातावरणातल्या वाफेने) म्हणुन वापरतात.

संजीव कपुर ने बहुदा केक रेसिपि मध्ये बेकिंग पावडर ऐवजी बेकिंग सोडा वापरला असावा किंवा मग दोन्हि थोड थोड वापरल असाव अश्या रेसिपिज मध्ये इथे क्रीम ऑफ टारटर वापरायला सांगतात (पोटॅशिअम सॉल्ट ऑफ टारटरिक अ‍ॅसिड) वापरायला सांगतात ते पाण्याच्या सम्पर्कात आल्यावर मिश्रणात टारटरिक अ‍ॅसिड रिलिज करते. हे भारतात सहज रित्या उपलब्ध नाहि बहुदा म्हणुन त्याने डायरेक्ट टारटरिक अ‍ॅसिड म्हण़़जे ताक वापरले.

रमा Happy
मग एरवी केक करताना द्रवपदार्थ कमी पडल्यास दुधाऐवजी ताक वापरणं योग्य का?

संजीव कपूरने दीड कप मैद्यासाठी प्रत्येकी एक टीस्पून बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सांगितलाय, दोन टेबलस्पून कॉर्न स्टार्च आणि शिवाय पाव कप ताकही सांगितलंय.

विक्रम क्लास च दिसतोय तो पदार्थ.
मला पण व्हेज फ्रिटाटाच वाटतोय तो. मी जो व्हेज केक पाहिलाय त्यात व्हेजीज अशा वर दिसत नाहीत.

<<<<एरवी केक करताना द्रवपदार्थ कमी पडल्यास दुधाऐवजी ताक वापरणं योग्य का?>>>

नाहि ग प्रत्येक केक मध्ये नाहि चालणार कारण अ‍ॅसिड अल्कलि रेशो बिघडेल ना. पण क्रीम ऑफ टारटर ला पर्याय म्हणुन चालु शकेल.

अहो तायांनो टाकतो रेसिपी रविवारी, मॅडमनी केला तर परत फोटोही. व्हेज फ्रिटाटा म्हणजे मला माहित नाही. पण वरचा पिझा अ‍ॅपिअरन्स सोडल्यास केक नेहमीच्या केक सारखाच असतो.

मिनोती, धन्स गं.. मीही मधाबद्दल वाचलंय, त्यामुळे जरा शंका होतीच मनात.

मला वाटते, ड्राय्फ्रुट केक किंवा प्लम केकमध्ये खजुर चालु शकेल. जिथे एक वाटी साखर आहे तिथे अर्धा किंवा पाऊण वाटी खजुर घेतल्यास गोडाचे प्रमाण बरोबर मॅनेज होईल असे वाटते. मला नेहमी साखरेपेक्षा खजुर जास्त गोड वाटतो.

एक अर्जंट प्रश्न.

आत्ता केक करतेय. एक केक बेक करायला ठेवला अन दुसर्‍याचे मिश्रण भांड्यात काढताना, चुकुन फक्त बटर लावलेल्या भांड्यात काढले. बटरच्या वर नेहेमीप्रमाणे मैदा भुरभुरायला विसरले. तसाच बेक करायला ठेवला तर केक सुटून येईल का?
का ते सगळे मिश्रण परत दुसर्‍या भांड्यात काढू ? अजून १५-२० मिनिटं आहेत माझ्या हातात.

अल्पना नो प्रॉब्लेम. काळजी करू नकोस. काढतांना थोडा काळजीपूर्वक काढावा लागेल पण केक सुटून येइल .

अल्पना, काढताना केक गरम असताना साईडने सुरी फिरवुन ठेव आनि केक काढायच्या आधी भांड्याचा तळ थोडा गॅस वर गरम करुन घे ज्यामुळे बटर मेल्ट होईल आणि केक सुटेल Happy

मी इथे क्रिम आयसिंगबद्दल विचारलेले... मी अमुल क्रिम आणुन आयसिंग केले ते जमले नाही नीट. तेव्हा सल्ला मिळाला की हेवी फॅट असलेले क्रिम वापरावे लागेल तरच घट्ट आयसिंग जमेल. ३०% पेक्षा जास्त फॅट कंटेंट असायला हवा. मी अमुलचा डब्बा चेक केला नव्हता त्यामुळे फॅट कंटेंट माहित नव्हता.

मी काल परत अमुल क्रिम आणले. त्यावर लो फॅट क्रिम छापलेय. २५% फॅट. म्हणजे क्रिम आयसिंग चे स्वप्न कायमचे मोडले Sad मी तरी आयसिंग शुगर वगैरे वापरुन प्रयत्न केला पण आयसिंग अजिबात घट्ट व्हायचे नाव घेत नाहीये. जाउदे. पुढच्या वेळेपासुन बटर किंवा अंडे वापरेन.

साधना, साधाराण २० एक वर्षापूर्वी मी भारतात आयसिंगचा प्रयोग केला होता तो मस्त झालेला.

१/२ वाटी घरचे लोणी अगदी स्वच्छ धूवुन सगळे पाणी स्वच्छ निघेल इतपत धुवायचे. लागेल तसे फ्रीजचे पाणी घ्यायचे म्हणजे लोणी खुप पातळ होत नाही.
आता एका पसरट बाऊलमधे ते लोणी नीट फेटायचे. त्यावेळी तरी हातानेच केले होते ते सगळे. लोणी पातळ होतेय असे वाटायला लागले तेव्हा मोठ्या तसराळ्यात निम्मे पाणी निम्मा बर्फ असे घेउन त्यात हे लोण्याचे बाऊल ठेवुन मग फेटले (साधारण १५-२० मिनीटे).
आता त्यात बसेल इतकी आयसिंग शुगर घालत गेले. हलक्या हाताने फेटत गेले. या आयसिंगची कन्सिस्टंसी साधारण मेहेंदीहुन थोडी घट्ट व्हावी इतपत साखर घातली. मग त्यात पायनॅपल इसेन्स घातला. पिवळ्या रंगाचे २ कण घातले अगदी नकळत पिवळा रंग आला होता.
ते आयसिंग केकवर उलथण्याने लावले होते.
साधारण ३-४ चमचे आयसिंग ठेवले शिल्लक तर त्यातल्या निम्म्यात हिरवा आणि निम्म्यात लाल रंग घातला (अगदी किंचित). ते मिश्रण मेंदीच्या कोनात भरून छोटी गुलाबाची फुले (आळी टाक्याची गुलावाची फुले कशी असतात तशीच) आणि हिरव्याने त्याला देठ आणि पाने असे केले होते.

हा प्रयोग करुन बघू शकतेस तुला इच्छा असेल तर.

मिनोती थँक्स गं.. तु सुचवलेला प्रयोग करुन पाहते.

तसेही मी अगदी बाजारातल्यासारखे आयसिंग जमेपर्यंत स्वस्थ बसणार नाहीच आहे.. Happy

मी केक करते तेव्हा तो कधीकधीवरुन जरा करपतो. याचे कारण बहुतेक माझा अवन छोटा आहे हे असावे.

तो असा करपु नये म्हणुन भांड्याला वरुन अ‍ॅलुमिनियम फॉइल लावावी काय? फॉईल लावल्यास केक नीट फुगेल काय?

दुसरा उपाय म्हणजे अवन आधी जास्त तापमानावर ठेऊन सणसणीत तापवुन घ्यायचा आणि मग केक आत ठेवताना फक्त बॉटम कॉइल चालु ठेवावी. वरची बंद ठेवावी. पण असे केल्यास केक नीट बेक होईल काय ??

Pages