
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. मोबल्याचे. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
आंबट रसाचे आंबे पाठवावेत का ?
.
आंबट रसाचे आंबे पाठवावेत का ?
आंबट रसाचे आंबे पाठवावेत का ? ....त्या आंब्याचे सासव करतील की.
सासव करतील ? मग नको.
सासव करतील ? मग नको. 🙂
इंग्रजीतला Mango 'मँगो'
इंग्रजीतला Mango 'मँगो' शब्दाचा आणि तामिळ भाषेचा काही संबंध असेल असे कधी वाटले होते का ?
पण संबंध आहे !
तामिळ भाषेत 'मंगा' म्हणजे आंबा. दुसरे नाव 'मानकाई'. दोन्ही शब्दांचा उच्चार 'मँगो' ला जवळचा वाटतोय ?
वर्ष १४९० मध्ये पोर्तुगीझ व्यापाऱ्यांनी केरळच्या मसाल्यांसोबत स्थानिक आंबेही त्यांच्या देशात नेले असल्याचे संदर्भ आहेत. ते त्यांच्या भाषेत आंब्याला काय म्हणत हे मात्र सुस्पष्ट नाही. त्यासाठी वर्ष १५१० उजाडावे लागले. एका पोर्तुगीझ दर्यावर्दीनी तमिळ प्रदेशातला आंबा खाऊन, त्याचे नाव उसने घेतले 'मंगा' आणि पुढे त्याच्या पोर्तुगीझ भाषेत मँगो/ मंगा स्थिरावून इंग्रजांनी ते इंग्रजीत तसेच उचलले.
मंगा = मानकाई = मँगो !!!
हापूस आणि अल्फांसोवर पुन्हा कधीतरी.
ग्राफिक धमक्या आवडल्या
ग्राफिक धमक्या आवडल्या
और आने दो
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.

युवी तुम्ही बरोबर ओळखलेत, मराठवाडा.
अनिंद्य, तुम्ही पण 'लोणचं टेस्टर' !! आता आपण लोणचं गेट टुगेदर करून भेटायलाच हवे.
ग्राफिक धमक्या!
ग्राफिक धमक्या!
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/69518
आंबट रसाचे आंबे पाठवावेत का ?
अस्मिता मस्त आठवणी.
ग्राफिक धमक्या
आंबट रसाचे आंबे पाठवावेत का ? >>>>
पाठवा !पाठवा !काहीतरी पाठवा!... अनिंद्य,आमच्याकडे अजून कैरी महोत्सवच चालू आहे ,पिकलेले आंबे अजून यायचेत . तुमच्याकडे लवकर सुरू झाला आंबा महोत्सव.खरंतर आंबे आल्याशिवाय धाग्यावर यायचं नाही ठरवलं होतं . 
एक दोन दिवसात येतील हापूस . आईस्कीम ,मिल्कशेक, शिरा वगैरे मनसोक्त आंबे खाऊन झाल्यावर करायचे उद्योग आहेत . त्यामुळे फोटो नंतर.
आमच्याकडे "पाडव्याला पाड आखीतीला ग्वाड" अशी परंपरा आहे. हल्ली एव्हडी पाळत नाहीत त्यामुळे त्या आधीही देवाला दाखवून खाल्ले जातात .पण पहिला आमरस मात्र अक्षय तृतीयेलाच केला जातो . पितरांना नैवेद्य दाखवायला.उगाच आमरस न दिल्याने पितरं अजून नाराज व्ह्यायला नकोत .
मनसोक्त आंबे खाऊन झाल्यावर
मनसोक्त आंबे खाऊन झाल्यावर करायचे उद्योग आहेत.....+१.
पण आमच्याकडे आंबे अशासाठी उरतच नाहीत. बाट्याचा रस काढून फ्रिजरमध्ये साठवला जातो आणि मग मात्र दीपांजलीच्या कृतीने शिरा केला जातो.आंब्याचे आइस्क्रीम , मिल्कशेक आणि श्रीखंड हे 3 पदार्थ मला आवडत नसल्याने बनवत नाही.
आंब्याच्या रसाचा गोळा जो
आंब्याच्या रसाचा गोळा जो फ्रिझ करता येतो त्याचं काय काय करता येईल? माझ्याकडे भारतातून आला आहे.
आम्रखंड, खीर , शिरा,
आम्रखंड, खीर , शिरा, नारळाच्या वड्या, आंबा आइस्क्रीम ह्यात दुधात नीट मिक्स करून घालता येतो. गुठळ्या राहता कामा नयेत. नुसता ही छान लागतो.
जास्त उत्साह असेल तर रसाच्या पोळ्या करता येतील.
ओके. थॅन्क्स ममो. काय करायचं
ओके. थॅन्क्स ममो. काय करायचं ते बघते. एकावेळी संपणार नाहीच.
अग वर्ष दोन वर्ष फ्रीज मध्ये
अग वर्ष दोन वर्ष फ्रीज मध्ये आरामात टिकतो. संपवण्याची घाई नको करू. वापरायच्या आधी फ्रीजमधून थोडा वेळ आधी बाहेर काढून ठेव म्हणजे गुळासारखा मऊ होतो आणि वापरणं सोपं होतं.
दुधात घालण्या ऐवजी हवा असेल तेवढा रस आणि साखर मिक्सर मधून फिरवायची म्हणजे अगदी एकसंध होतो.
शाळा सुरू होईपर्यंत सगळ्यांची
शाळा सुरू होईपर्यंत सगळ्यांची वजनं वाढायची, सगळे पिवळसर दिसायला लागायचे >>>
आख्खी पोस्ट धमाल आहे
ग्राफिक धमक्या वाचून टोटल फुटलो.
आमच्या घरी- नात्यात भयंकर ग्राफिक बोलायचे >>>>
अनिंद्य - मोस्टली ममोंनीच दिलेली माहिती आहे. मी एक दोन वेळा रत्नागिरीत ऐकलेल्या गोष्टी इथे टाकल्या इतकेच
उन्हाळ्यात केलेले नवीन लोणचे फार मस्त लागते.
… लोणचं गेट टुगेदर…. ऐतिहासिक
… लोणचं गेट टुगेदर….
👏
ऐतिहासिक कल्पना आहे ही !!! Never heard before Paradigm Shifting Idea !!!
पार्टी, पॉटलक, वनभोजन जगाला माहिताय मात्र “लोणचं गेट टुगेदर” कुणीच केल्याचे ऐकले नाही.
याचे पेटेंट घ्याच अस्मिता.
… अजून कैरी महोत्सवच चालू आहे
… अजून कैरी महोत्सवच चालू आहे ,पिकलेले आंबे अजून यायचेत….
@ सिमरन,
अरे आपण कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी नाव दिले ना धाग्याला? "पाडव्याला पाड आखीतीला ग्वाड" चालतयं की. बिन्दास कैरीच्या रेसिपी, फोटो येऊ द्या बिगीनं. सध्या कैरी भरपूर आणि आता आंबेही सुरु झालेत. Best of both worlds ! मौजां ही मौजां. 🙂
@ तनमयी, तुम्हीं खऱ्या कैरी भक्त. बेस्ट. जमल्यास काही फोटोही येऊ द्या तुमच्या कैरीकृतींचे इथे.
@ सायो, मँगो क़ुल्फ़ी करा ! सौ दुखों की एक दवा. 👍
आम्रचर्चा सिरीज मधली नवीन
आम्रचर्चा सिरीज मधली नवीन रेसिपी.... सिर्फ फोटो ही काफी है

सायो तो आटवलेल्या आंब्याचा रस
सायो तो आटवलेल्या आंब्याचा रस असाच येता जाताही खाते मी. बाकी हेमाताईंनी लिहिलंच आहे.
अश्विनी कसला सुरेख फोटो, कातिल कलर.
आज मी ही स्वामी पुण्यतिथी म्हणून चितळे आंबावडी (बर्फी) घालून प्रसादाचा शिरा केलेला आणि नैवेद्य दाखवलेला.
ममो, अनिंद्य- हो नक्की. आंबा
ममो, अनिंद्य- हो नक्की. आंबा कुल्फीचं आलं माझ्या डोक्यातही.
क्राइम मास्टर गोगा सारख " हात
क्राइम मास्टर गोगा सारख " हात को आया मुह न लगा" अस झालय या धाग्यावर...फोटोतुन प्लेटा पळवायची सोय हवी होती.
सिर्फ फोटो ही काफी है+100000
सिर्फ फोटो ही काफी है+100000 वा ! कसला तोपासू फोटो आहे .अप्रतिम दिसतोय आंब्याचा शिरा .
, अप्रतिम दिसतोय आंब्याचा
, अप्रतिम दिसतोय आंब्याचा शिरा.
हे घरी केलेलं आम्रखंड ... प्रत्येक वेळी घरी करणं शक्य नसतं सोय म्हणून रेडीमेड आणलं जातच पण विकतच आणि घरच चवीत खूप फरक पडतो.
छान दिसतंय.
छान दिसतंय.
आंब्याचा शिरा, आम्रखंड दोन्ही
आंब्याचा शिरा, आम्रखंड दोन्ही फारसे आवडत नाहीत. फोटो मात्र सुंदर आले आहेत. रंग = 😍
होम मेड आम्रखंडात चारोळ्या आहेत का ? आता चारोळ्या short poems ना म्हणतात आणि खाण्याच्या चारोळ्या दिसायला दुर्मीळ झाल्यात. त्या नुसत्याच खायला आवडतात. किंवा भाजून.
धन्यवाद अंजू, अनिंद्य ..
धन्यवाद अंजू, अनिंद्य ..
हल्ली चारोळ्या कोणी फार वापरत नाही बदाम आणि पिस्ते जास्त वापरले जातात. पण घरी केलेल्या श्रीखंड बासुंदी मध्ये चारोळ्या मस्ट आहेत आमच्याकडे . जरा पोळपाटावर खरंगटून घातल्या की छान दिसतात.
इथे अवांतर आहे पण तरी विषय निघालाय म्हणून लिहून ठेवते, कोकणात चारोळ्याना चारणं किंवा चाऱ्या म्हणतात आणि तो एक रानमेवा आहे. सड्यावर बांधाकडेला मध्यम उंचीची ही झाडं असतात, मार्च महिन्यात ह्यांना बोरासारखी पण त्याहून आकाराने जरा लहान अशी फळं लागतात. पिकलेली फळं रंगाने काळी असली चवीला गोड लागतात. फळातील बी मध्ये जो गर असतो तीच चारोळी. हातोड्याने फोडून त्या छोट्याशा बी मधील चारोळी अखंड मिळवणे खूप वेळ मोडणारं आहे , चारोळ्या मग म्हणून ही असतील मार्केट मध्ये कदाचित..
तो आंब्याचा शिरा ❣️
तो आंब्याचा शिरा ❣️
आम्रखंड ❣️
Pages