कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. मोबल्याचे. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनया,

रस गाळून घ्यायला, गुठळ्या काढायला. शिवाय ते कापड ओलं करून त्यात आंबे बांधले जात.

चिनूक्स, सुंदर पोस्ट.

मला तर आम्रपंक्तिभोजनासाठी आणायच्या आंब्यांचं प्रमाण फार आवडलं - एकशे पंधरा पानांस पांच मण तीस शेर आंबे !!! खा तुडुंब. माणसी दोन शेर आंबे. ग़ज़ब. 🙂

बडोदेकरांचे आणि एकूणच गुजरात राज्याचे खरे प्रेम केसर आंब्यावर. तसे वनराज, तोतापुरी, राजापुरी सुद्धा असतात पण केसर-गीरकेसर हे जास्त लोकप्रिय. बऱ्यापैकी fibrous texture. म्हणून गायकवाडांच्या महालात रस करण्यासाठी - रस गाळून घेण्यासाठी खादीच्या रुमाल पट्ट्यांचा वापर is explaining itself so well. ❤

आम्रपंक्तिभोजनाच्या मेन्यूत व्हेज अगदी साधा तर सामिष मात्र राजेशाही आहे. व्हेज खाणारेही खूप कमी आहेत.

लखनवी जर्दा / शेवयाचा जर्दा गोड़ असतो असे माहित होते; इथे कोंबडी / चिकन घातलेला दिसतोय. some interesting twist.

आमरस + शेवया हे कॉंबो खाणारे इथेही आहेत.

अंजू,1 लहान कैरी,1/२ कांदा, गूळ ,तिखट आणि मीठ एकत्र वाटले.जरा जाडसर हवे.(माझा झाला नाही) वरुन हिंगमोहोरीची फोडणी दिली.

खरंतर गुठळ्या असलेला रस जास्त छान लागतो. .....+१.

देवकी,

आमच्याकडे “तक्कू” म्हणतात. कैरी जाडसर किसून करतात. फोडणी ऑप्शनल. बाsssssरिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मस्ट, झेपतील तेव्हढ्या.

प्रज्ञा९,

.. मला दुष्ट ठरवण्यात आलेलं आहे… can understand !
😀

दसा,

छान माहिती. आंब्याच्या एकाच झाडावर ३०० जातींचे ग्राफ्ट म्हणजे विश्वविक्रमच असावा. तसेही मलीहाबाद प्रसिद्धच आहे तिथल्या आंब्यांसाठी, थोडे उशिरा येतात तिथले आंबे, मे-जून.

Season’s Delight वन्स मोअर - कैरीयुक्त सुकी भेळ

9236df8c-2c25-41dd-99e3-ce721ae4670e.jpeg

@ स्वाती_आंबोळे , चांगली कोथिंबीर सध्या short supply आहे, तरी यावेळी थोडी अधिक वापरणेत आली आहे याची नोंद घ्यावी. 😀

तसेच खुद्द कैरी उपलब्ध असतांना भेळेत टोमेटो टाकण्याची जुर्रत केल्याबद्दल संबंधितांची योग्य ती कानउघाडणी करून त्यांना समज देण्यात आली असे. कळावे यास्तव विद्यापना.

मॅंगो विथ स्टीम्ड राईस पफ्फ. Proud कृपया ह्याला इडली म्हणू नये. ह्याला सान्ना(कोकणी उच्चार) म्हणतात.

हा सकाळचा नाश्ता. घरचे आंबे आणि घरची सान्ना. कोकणातला पारंपारीक प्रकार..
आमच्याकडे झाडपिक्या आंबा कोचुन घावणे किंवा आंबोळीबरोबर पण खातात. अगदीच मूड, हौस आणि वेळ असेल तर शिरवळ्या-रस असतो.
IMG_2601 (2).jpg

ह्याला सान्ना(कोकणी उच्चार) म्हणतात........ हा उच्चार वाचून गार वाटलं.तसेच शिरवाळ्या (शिरवाळ्यो).
सान्ना आणि रस(नारळाचे गूळ घातलेले दूध)हे कॉम्बो पण छान लागते.

इथे कोणीतरी टाकली होती रेसीपी. शोधायला लागेल. शोधते व देते लिंक.
पण फरक हा आहे की, वरच्या साध्या सान्ना मध्ये सूर घालतात. फणसाच्या सान्ना मध्ये नाही.

माझी सासु आमपापड, टॉमेटो खजूरची मस्त चटणी बनवायची. खिचुरि बरोबर मस्त लागते. मग मी मेथांबा बनवला की, ते नाक मुरडत खायची. Proud
अनिंद्य, तुम्हाला माहिती असेल हि बेंगाली चटणी.

आंबा + सान्ना नवीन आहे माझ्यासाठी.

BTW, “हा” सान्ना की “ही” सान्ना की “हे” सान्ना ? भरड वाटलेल्या तांदळाच्या इडलीसारखे टेक्शर दिसतेय. हे गोड पदार्थांसोबतच खातात का ?

…. साध्या सान्ना मध्ये सूर घालतात…..

सूर ? फारच रसिक बॉ तुम्ही 😀

मनिम्याऊ कसली तयारी ?

कैरी छोटी आणि करकरीत दिसते आहे, बाजूला हिरव्या मिरच्या बघता यांचे काहीतरी चटपटीत घडणार !

हि सान्नां असा उच्चार आहे. गोडच पदार्थबरोबरच खातात असं नाही. कोंबडी रस्सा, वेज कुर्मा आम्ही खातो सगळ्याबरोबर.
क्रिस्श्चन लोकं तर पिग करी, चिकन कुर्मा बरोबर सुद्धा खातात.
माझं कूकिंग नॉलेज इतकच. Happy

.. गोडच पदार्थबरोबरच खातात असं नाही…

मग बेस्ट 👍

झंपी तुम्ही इथे लिहिले आणि मला “कैरीपापड”करण्या-खाण्याच्या डझनावारी रील्स फीडमधे दिसू लागल्या which is so good !! अगदी flavour brust प्रकार. रेसिपी द्या नाहीतर आमंत्रण द्या, your choice. 😀

.. टॉमेटो खजूर बंगाली स्टाइल चटणी…

हो परिचित प्रकार. मला फारशी नाही आवडत ती चटणी. माझ्यामते खजूर + चिंच deep natural love आणि टोमेटो आणि खजूर हे marriage of convenience आहे 😀

मला वाटतं सांदणचा कोकणीतला उच्चार आहे तो. >>> हो बहुतेक, जवळ जाणारा वाटतोय शब्द, पण हे प्लेन आहे. सांदण करताना त्यात आंबा किंवा फणसाचा गर घालतात.

या वर्षीचा आंबा. माझ्या वडिलांच्या शेतातला. संपूर्ण सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेला आहे. हा केसर आहे. या प्रमाणेच हापूस आणि बाकी प्रकारपण आहेत. वडिलांनी वयाच्या ७५ वर्षी शेती करायला सुरूवात केली.

IMG-20250419-WA0004.jpgIMG-20250419-WA0007.jpgIMG-20250419-WA0005.jpgIMG-20250419-WA0003.jpg

आंबे एकदम भारीच!
वडिलांनी वयाच्या ७५ वर्षी शेती करायला सुरूवात केली. >> __/\__

Pages