कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. मोबल्याचे. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा मस्त धागा….. सुंदर ओळख लिहिलीय.

इथे छान छान पाकृ वाचायला मिळतील.

सीमा यांची मँगो कलाकंद ही एक आवडती पाकृ आहे.

आहाहा कसले कातील फोटो आहेत.

आंब्याची डाळ (खरंतर कैरीची पण आम्ही आंब्याची म्हणतो) आणि पन्हं याशिवाय चैत्र महीना सुना सुना आहे. केलं नाहीये अजून.

मला कधीपासून हापूस आंबा पोखरुन त्यातला गर काढून तो दुधात मिक्स करुन कुल्फी करायची आणि मग ती पोखरलेल्या आंब्यात भरुन सेट करायची इच्छा आहे. पण इथे हापूस आंबे फार सहजासहजी मिळत नाही. मिळाले तरी त्यात खराब आंबे वाया जातात ह्या सगळ्यामुळे आंबे असे वापरायला नको होतं.

हापूस आंबा अत्यंत आवडीचा.. इकडे आंबे महाग असल्याने हवे तेवढे खाता येत नाहीत पण गावी गेल्यावर पोटभर आंबे, आंबापोळी, रायवळ आंबे अशी मजा असते..
IMG_20250410_175615.jpg
आंबापोळी
Screenshot_2025-04-10-17-55-40-14_965bbf4d18d205f782c6b8409c5773a4.jpg

jui.k

सचित्र प्रतिसादाची वाटच पहात होतो. ती बोहनी केली तुम्ही 😀

अरे वा ,आला धागा.
छान प्रस्तावना आणि अप्रतिम लाळगाळू फोटो Happy आताच निवडक मध्ये टाकतेय कारण यावर असंख्य तोंपासू फोटोज येणार आहेत याची खात्री आहे.

आहाहा! फोटो पाहून खपलो.
आम्हाला ना गाव ना शेती त्यामुळे जे काही पाहिजे ते विकत घ्या आणि खा. मग त्यात अस्सल हापूस कोणता आणि केमिकलने पिकवलेला कोणता हे न बघता आंब्यांवर ताव मारायचो. लग्नाआधी तर एकच पेटी आणत असू कारण हापूसचा न परवडणारा भाव. मग मी आंबे कापायला बसायचे आणि बाट्याला जास्त गर राहिल या हिशेबाने फोडी करत असे. सगळ्यांना फोडी आणि बाटा मला. आणि जर भावाने बाटा मागितला तर तेव्हा मात्र बाट्याचा पांढरा कडक भाग दिसेल इतपत गर निघेल अशा फोडी करायचे. भावाची आणि माझी चिक्कार भांडण होत असे Lol
काही वर्षांपासून मात्र नवर्याच्या एका मित्रामुळे जे देवगडला राहतात त्यांच्या वाडीतील अस्सल हापूस दरवर्षी न चुकता मनसोक्त खायला मिळतो. ते दोनते चार डझनच्या ४-५ पेटी तरी पाठवतात. यावर्षीची पहिली पेटी खाऊन झाली.
माझ्या ऑफिसला लागूनच २ आंब्यांची झाडे आहेत. एक छोटा चोखून खाऊ शकतो असा. त्याचे जवळजवळ ५०० आंबे काढले असतील यावेळेस. आमचे वर्कर रोज काढून मला आणून देतात. अतिशय गोड फळ आहे. आणि जो दुसरा आहे तो लोण्च्याचा आंबा असतो तसा आहे. एक फळ अर्धा किलोचे तरी असेल. ते बाजूच्या फॅक्टरीवाल्यांनी आधीच काढून घेतले. मला ३ कैरी मिळाल्या. एकाचे पन्हे केले. अर्धा तिखट मिठ लावून खाल्ला. अर्ध्याचा साखर, तिखट घालून फोडणीचा आंबा बनवला. एक आहे त्याचं काय करु विचार करतेय.

मस्त धागा.
हे आंबेपुराण आठवलं.

साहित्यातले उल्लेख हे आठवले:
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे, तो बालगुलाबहि आता रे, फुलबाग मला आज पारखा झाला... सागरा प्राण तळमळला (सावरकर)
दाट आमराईत विसावा वितरितसे सावली, मोट उपसते विशुद्ध जीवनगंगा विहिरीतली... अससि कुठे तू (कुसुमाग्रज)
जीएंची 'कैरी' कथा - आणि त्यावर निघालेली ही फिल्म
पाडाला पिकलाय आंबा
वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे.. माझिया प्रियेचे झोपडे (माडगूळकर)
पुलंच्या 'माझे खाद्यजीवन'मध्ये आंब्यांबद्दल चर्चा आहे. मी माणकुराद, इड्शाद वगैरे नावं त्यात प्रथम वाचली होती.

आणखी आठवेल तसं लिहीन. Happy

मस्त धागा आहे! हल्ली इकडे हापूस मिळायला लागलाय पण सहजा सहजी आणि खात्रीशीर नाहीच. तरी पण आंब्याच्या सीझन मधे आमरस पोळी, मँगो साल्सा, त्या आधी कैरीचा भात, मेथांबा हे तर हमखास होतंच. आता इथे वाचून अजून आणले जाणार!
स्वाती - हे एक नेहमीचे गाणे / बडबडगीत -
आंबा पिकतो, रस गळतो
कोकण चा राजा बाई झिम्मा खेळतो

मस्त धागा... माझ्या तर id मध्येच मोहोर आहे, आंब्याशी जन्मभराची नाळ जोडली गेली आहे. आंबा हे माझ्या साठी फक्त आवडत फळ नसून त्यापेक्षा आणखी खूप काही आहे.

जर भावाने बाटा मागितला तर तेव्हा मात्र बाट्याचा पांढरा कडक भाग दिसेल इतपत गर निघेल अशा फोडी करायचे. भावाची आणि माझी चिक्कार भांडण होत असे Lol >>>> Lol निल्सन सेम ,आंब्यावर भांडणं आमच्याकडे अजूनही होतात .कोय कोण खाणार यावर कापणारा जवळून की पातळ फोडी होणार हे ठरते ,मोस्टली मीच कापते (त्याला कापायचा कंटाळा)त्यामुळे मीच पार्षलिटी करते असं भावाचं मत, पण कापणाराला थोडं मेहनतीचं बेनिफिट मिळायलाच हवं ,असं वडील म्हणतात ,त्यावर परत भांडण, तुमी तिचीच बाजू घेता म्हणून . मी पार्षलिटी करत नाही खरच Wink Lol पण मी घरात समान वाटण्या करण्याला प्रसिद्ध आहे त्यामुळे अश्या गोड जबाबदाऱ्या माझ्यावरच सोपवल्या जातात. Happy

भावाची आणि माझी चिक्कार भांडण होत असे Lol>>>
निल्सन आमच्याकडे पण अशी भांडणं व्हायची आंबे आणि भाजलेल्या काजूंवरून..
गावी स्वतःची थोडी हापूस आंब्यांची झाडं आहेत त्यामुळे थोडेफार आंबे मिळतात खायला.. गेल्या एक दोन वर्षात मात्र हापूस चा मोहोर कमी झालाय कधीही येणाऱ्या पावसामुळे.. रायवळ आंबा मात्र खूप मिळतो.. कितीही खा कोणी काही विचारत नाही..

@ निल्सन, सिमरन, jui.k

.. जर भावाने बाटा मागितला तर तेव्हा पांढरा भाग दिसेल इतपत गर निघेल अशा फोडी करायचे….. वाटपावरून भांडण

हा हा. आंबाच नाही तर प्रत्येक गोष्ट अगदी मिलिमिटर/मिलिलिटर सुद्धा कमी-जास्त नको असा आम्हां भावंडांचा सतत भांडणाचा विषय आईनी नेहेमीकरता कसा सोडवला ते यावरून आठवले:

“One who makes the portions won’t get to choose first” !!! 😇

झाले, वाटपाचे भांडण नेहेमीकरता मिटले. Perfect solution and superb management of us aggressive unruly siblings.

@ भरत, हो प्रसिद्धच आहे ते गालिब वचन- गधा है इसीलिए आम नहीं खाता 😀

विस्मरणात गेला होता हा किस्सा.

@ मनीमोहोर,

प्रत्यक्ष आंबा बागाईतदाराकडून आंब्याचे पूर्ण life cycle समजून घेणे ही पर्वणीच. लेख छान तुमचा.

मलाही पिकलेल्या आंब्यापेक्षा फुलांचा-मोहराचा सुवास जास्त आवडतो. 😍

BTW, छोट्या बी न धरलेल्या (तोरं) अख्ख्या कैरीचे लोणचे तेलंगण-आंध्रात फारच फेमस आहे. आंबटचिंबट पसंत असलेल्या आमच्यासारख्यांचे सुखनिधान.

यावर्षीची पहिली पेटी खाऊन झाली.
>>>>>
जाळा निल्सन जाळा....

सध्या आमच्या घरी हाच विषय आहे की मुलांना गेले काही दिवस गर्मीचा खूप त्रास होत आहे तर आंबे आणायचे कधी आणि किती?
आंब्याने होणारी गर्मी कशी कंट्रोलमध्ये ठेवायची याचेही जाणकार सल्ले येऊ द्या धाग्यावर

बाई दवे, बाट्याला/कोईला आंबा कमी लागलेला असो किंवा जास्त... ती चुसून खायची मजा वेगळीच Happy

Pages