
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. मोबल्याचे. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
@ अन्जू,
@ अन्जू,
चैत्र असा सुना का जाऊ देताय? करा करा पन्हे आणि कैरीची डाळ आणि इथे फोटो डकवा. हवं तर आंब्याची डाळ म्हणा
अनायसे ऊन दणदणीत आहेच, गारेगार पन्हं will be a blessing.
हे आमचे पन्हे. With a small
👆 👆 👆
हे आमचे पन्हे. With a small twist - पाण्या ऐवजी सोडा टाकून. (माझ्या ग्लासमधे अगदी थोडेसेच चिली फ्लेक्स टाकले होते वरून)
गोड आंब्याला तडका देऊन केलेली
गोड आंब्याला तडका देऊन केलेली भाजी बायको आवडीने ओरपते मला आवडत नाही. या बाबत आमचं जुळत नाही. मी म्हणतो गोडाला गोड म्हणूनच खावं. तिखट खायचं तर मिरची खा. पण हे गोड तिखट म्हणजे काहीतरीच.
आता एक किस्सा
वंदना गुप्तेंना पाहायला गुप्ते कुटुंबीय गेले. माणिक वर्मांचे सगळे पंखे. वंदना माणिक वर्मांची मुलगी. ते तिला म्हणाले म्हण येखादं गाणं. त्यांना वाटलं गाईल एखादं सोज्वळ गीत आईनं गायलेलं.
वंदना "पाडाला पिकलाय आंबा" लावणी म्हणाली तिही त्यातली "अरे घे पाडाला पिकलाय आंबा ही ओळ होणा-या सास-यासमोर हात करत म्हणाली. म्हणे तेव्हापासून तिच्या नवरोबाने खाली घातलेली मान अद्याप वर केली नाही. आपल्या घरात काय येतंय हे ते समजून गेले.
हा किस्सा स्वतः वंदना गुप्तेंनी एका मुलाखतीत सांगितला.
मी जेव्हा पिकलेला आंबा पहातो तेव्हा मला हा किस्सा आठवतो.
द सा
द सा
.. पाडाला पिकलाय आंबा.. धमाल किस्सा
गोड आंब्याला तडका देऊन केलेली भाजी… याला काहितरी नाव आहे ना ? सासव ?
.. अंबुवा की डालीपे युगानुयुगं गाणारी कोयलिया…
हो हो. उभा विटेवरी सारखंच हे 😁
आयला, धागा आला पण... धन्यवाद
आयला, धागा आला पण... धन्यवाद अनिंद्य
जबरदस्त फोटो आणि माहिती.....
आकर्ण्याम्रस्तुतिं जलमभून्नारिकेलान्तरम्।
प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम्।
आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रताम्।
श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह।।
आंब्याची स्तुती ऐकून नारळाच्या काळजाचे पाणी पाणी झाले. फणसाच्या सर्वांगावर काटा आला. काकडी दुभंगली. केळ्याने मान खाली घातली. द्राक्षे शुष्क पडली. तर मत्सराने जांभळे काळी पडली.
हे भारी होते ऋतुराज
हे भारी होते ऋतुराज
श्यामत्वं बत जाम्बवं
श्यामत्वं बत जाम्बवं …
अरे काय ? नको असे म्हणूस कवीश्रेष्ठा ! सांगा त्याला तुम्ही ऋतुराज. 😀
आंबा आवडतोच पण जंबुफलही आवडतेच ना. भारतखंड जम्बुद्वीप आहे, आम्रद्वीप असे नामांतर करायचे आहे का मग यांना ?
स्वाती_आंबोळेंचे काव्य-साहित्याचे दाखले उच्च 👌
कामदेवाच्या पाच पुष्प
कामदेवाच्या पाच पुष्प बाणापैकी एक बाण आम्रमंजिरीचा.
आंब्याला संस्कृत साहित्यात दोहदवृक्ष मानले आहे त्यामुळे सुंदर स्त्रीच्या मुखातील सुगंधी वायूने आम्रवृक्ष बहरतो अशी कविकल्पना आहे.
आम्रकूट - अमरकंटक
आम्रनाथ - अंबरनाथ
संस्कृत मध्ये एक आम्रवनन्याय आहे ज्या वनात जात आंब्याची झाडे ती आमराई, तिथे बाकी वृक्ष असले तरी. जे जास्त त्याच नावाने ते ओळखले जाते.
आपला महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा.
१५ मार्चला कालनिर्णय मध्ये आम्रकुसुम प्राशन असे लिहिले आहे.
आमच्याकडे महाशिवरात्रीला आंब्याचा मोहोर शंकराला वाहतात.
आंबा हे प्रजोत्पादक प्रतिक मानले आहे. आंबा शिंपणे हा कुलाचार महाराष्ट्रात काही भागात लग्नात केला जातो.
वधूवर भिंतीवर काढलेल्या आंब्याच्या झाडाला विड्याच्या पानांनी कुंकवाच्या पाण्याने शिंपतात.
शिवाच्या पंचमहाभूत मंदिरांपैकी पृथ्वी तत्वाचे मंदिर असलेल्या एकांबरेश्वर मंदिरात एक खूप मोठा पुराण आम्रवृक्ष आहे त्याखाली बसून पार्वतीने शिवाची तप:चर्या केली होती अशी आख्यायिका आहे.
इथे भरपूर माहिती, रेसिपी
इथे भरपूर माहिती, रेसिपी असणारे निवडक दहात नोंदवला.
मला आंबा प्रचंड आवडतो. पण मी
मला आंबा प्रचंड आवडतो. पण मी रस नाही खात.
आंबा चोखून किंवा फोडी करून आणि कोय पांढरीशुभ्र करून खाण्यात मजा. रस काय प्यायचा ?
त्या आमरस करताना साली धुवून त्या पाण्याची कढी करतात. आमच्या लहानपणी बाजूच्या आजी करायच्या. फजेतो असे काहीतरी नाव. चविष्ट.
मस्त माहिती आणि श्लोक, ऋतुराज
मस्त माहिती आणि श्लोक, ऋतुराज.

ऋतुराजांना आंब्याचं महत्त्व माहीत नसणार तर कोणाला!
शुभप्रसंगी झेंडूच्या तोरणासह आंब्याचा टहाळाही लावण्याची पद्धत आहे दारावर.
उत्तम माहिती ऋतुराज.
उत्तम माहिती ऋतुराज.
…आम्रकुसुम प्राशन …
हे मी महाराष्ट्रात फारसे नाही बघितले पण दक्षिण भारतात चैत्र पाडव्याला आंब्याच्या मोहरापासून बनवलेले सरबत हमखास करतात हे प्रत्यक्ष बघितले आहे.
अर्थात चाखलेही आहे.
… आंबा हे प्रजोत्पादक प्रतिक
… आंबा हे प्रजोत्पादक प्रतिक मानले आहे…
नको ते आठवते बघा. ते मुलगा होण्याची खात्री देणारे आंब्याचे झाड होते एक गाजलेले. The notorious mango ! 🤣
.. तोरणासह आंब्याचा टहाळा..
+ १
मस्त चर्चा आणी फोटो
मस्त चर्चा आणी फोटो
हापुस आवडतो पण जो इथे भारतातुन येतो त्यातले किती चान्गले निघतात यावरच सगळ अवलबुन..बाकी इथे हिरवे आन्बे कधिही मिळतात..पन त्याला काही चव नसते फारशी.
खास सिझन मधे मॅरेथॉन,अटाल्फो वैगरे यायला लागले की भर्पुर आणतो..रस असेल तर पुर्या आणी कुरडई मस्ट
बाकी झटपट लोणच, मेथाबा,पन्ह वैगरे होतातच.
मस्तच गप्पा...
मस्तच गप्पा...
आमच्याकडे आंब्याच्या कोयी आणि साईडच्या फोडी ही खात नाही कोणी. मला मात्र लहानपणापासून खाल्लेले असल्याने कोयी चोखत चोखत खायला आवडत. जेवण झाली, सगळ्यांची निजानीज झाली की अख्खा आंबा घ्यायचा गॅलरीत बसायचं आणि चोखत चोखत खायचा. कोय अगदी पांढरीशुभ्र करायची. काय तंद्री लागते खाताना... दातात आंब्याच्या रेषा अडकल्या तरच होईल तो समाधीभंग...
आता मुलीची मुलं कोपरापर्यंत रस गळवत , तोंड माखवत बिट्टया चोखतात तेव्हा खूप छान वाटत. हापूसच्या बिटक्या ही आमची खासियत आहे त्या विकत नाही मिळत म्हणून आंबे एकवेळ नाही दिले तरी चालेल पण बिटक्या मुलीकडे देण्यासाठी आटापिटा चालतो माझा.
.. मॅरेथॉन,अटाल्फो ….
.. मॅरेथॉन,अटाल्फो ….
टॉमी एटकिन्स मिळत असावा ना तिकडे? त्याबद्दलचा एक रोचक किस्सा आहे, नंतर लिहितो.
चैत्र असा सुना का जाऊ देताय?
चैत्र असा सुना का जाऊ देताय? करा करा पन्हे आणि कैरीची डाळ आणि इथे फोटो डकवा. हवं तर आंब्याची डाळ म्हणा >>> हाहाहा. करणार आहे. फोटो काढेन असं नाही, तुम्हा सर्वांपुढे मी काढलेले फोटो फार गरीब बिचारे वाटतात मला. फोटो नीट काढता येत नाहीत.
इथले सर्वच फोटो अप्रतिम.
(No subject)
जुन जुलैकडे गावाहून आटीव रस आला की नवऱ्यासाठी थोड्या पोळ्या करते. आटीव रसात पेढे मिक्स करून वरचे सारण तयार करते मग ते भरुन पोळ्या करते, तुपावर भाजते. मला तो रस असाच खायला आवडतो, लेकराला दुधातून प्यायला आवडतो. त्या रसात खवा घालून मला आंब्याच्या वड्याही करता येतात पण क्वचित करते, कारण रस कमी असतो. तो आटवून घेणे हे मोठे दीर करतात, खूप वेळ लागतो, मेहनतीचे काम आहे. त्यात आमचं सासरचे कुटुंब मोठं त्यामुळे सर्वांना थोडा थोडा वाट्याला येतो, अजिबात कष्ट न करता आम्हाला मिळतो हे महत्वाचे. पुण्यातले नातेवाईक आणि आमचं डोंबिवलीकर कुटुंब (हे सर्व आम्ही आयतोबा) . मला नुसताच खायला आवडतो काहीही मिक्स न करता अगदी ओरिजनल.
ओह आंब्याच्या माव्याचं सारण
ओह आंब्याच्या माव्याचं सारण का? मस्त फोटो, अंजूताई! तोंपासु!
ममोंची रेसिपी होती का ती?
मी माझ्याच आम्रसांदणी विसरले!
मावा म्हणतात कोणी कोणी, आम्ही
थॅंक यु. एवढ्या सुरेख करता येत नाहीत मला पण चवीला आवडतात सर्वांना (नवरा भाऊ बहीण ) . मोठे दीर उत्तम कुक आहेत ते छान करतात.
मावा म्हणतात कोणी कोणी, आम्ही आटवलेला रस म्हणतो. ओरिजनल कलर फार सुरेख असतो, पेढे मिक्स केल्यावर सारण असं दिसतं.
आम्रचर्चा सुरेख रसाळ सुरू आहे.
मस्त धागा आणि फोटो! ऋतुराज -
मस्त धागा आणि फोटो! ऋतुराज - तो श्लोक्/सुभाषित भारी आहे
आंब्याचा रस, तूप आणि पोळ्या हा जगातील सर्वश्रेष्ठ गोड पदार्थ आहे
लहानपणी हापूस शक्यतो फोडी करून व रस पायरीचा केलेला आठवतो. नंतर हापूसचाही रस खाल्ला आहे पोळीशी. पण पायरीच्या रसाची चवही चांगली लक्षात आहे.
गावाहून हापूस बरोबर थोडे
गावाहून हापूस बरोबर थोडे पायरीही येतात. मला हापूस आंबाच जास्त आवडत असल्याने, रसही हापूसचाच आवडतो, नवऱ्याला पायरीचा आवडतो, पायरी रसाळ असतो जास्त हे खरं. नवरा हापूस मध्ये वाढलाय जास्त त्यामुळे त्याला पायरी, रायवळ आकर्षण जास्त. माहेरी हापूस नव्हताच, विविध रायवळ म्हणून मला हापूसचं आकर्षण. नंतर मी कॉलेजात असेन तेव्हा धाकट्या आतेने एक कलम लावलं आता ते छान बहरलंय, खूप मोठं झालंय. आता हापूस तिथेही येतो.
पायरी मलाही फार आवडतो.
पायरी मलाही फार आवडतो. पायरीचे जे फ्लेवर प्रोफाईल थोडा आंबट, थोडा गोड, थोडा रेषाळ, सालीशी जाडसर बाकी पाणीदार....त्यामुळे किती खाल्ला तरी तोचतोचपणा अजिबात येत नाही.
हापूस आवडतोच.
इथला कॉस्को मधला हिरव्या पाठीचा घरी आणून जरा पिकला की चौकोनी फोडी करून मस्त लागतो. केसर ही हमखास मिळतो.
अजून कोकणातील आंब्याचा सर्वात बेकार पदार्थ कसा कोणाला आठवला नाही!!! कोयडं!!!
हापूस आंबे मला आवडायचे म्हणून
हापूस आंबे मला आवडायचे म्हणून फार परिस्थिती नसताना, माझ्यासाठी पेटी विकत घेणारे माझे बाबा, माझं सासर देवगडजवळ आहे समजल्यावर, अंजुला घरचा हापूस आंबा मिळेल म्हणून खुश होणारे माझे बाबा, याच बाबांना नंतर काही वर्षे मी घरची आंब्याची पेटी देऊ शकले ही समाधानाची बाब आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. अगदी शेवटी जायच्या दोन दिवस आधी बाबा आंबा आंबा करत होते आणि जून महिना होता (सासरचे देवगडचे हापुस लवकर असतात, माहेरचे रत्नागिरी हापुस जरा उशिरा येतात) , माहेरून भाच्याने आणलेले हापूस आंबे थोडे भावाने मलाही दिले, भावाकडचे संपलेले पण माझ्याकडे एक का दोन होते, ते मी बाबांना देऊ शकले, त्यांच्या घरचा आंबा शेवटी खाऊन समाधानाने ते गेले. आंब्याची आठवण माझ्या बाबांसोबत सुरू होऊन तिथे संपते, खूप हृदयस्पर्शी आहे माझ्यासाठी. ऑफिसजवळच्या झाडाच्या खोबरी कैऱ्या ते आमच्यासाठी आणायचे.
अंजु खुप हृद्य लिहिलेस गं.,
अंजु खुप हृद्य लिहिलेस गं.,
अन्जु ताई ! किती हद्य आठवण
अन्जु ताई ! किती हद्य आठवण आहे ही...वरची आन्बाखवा पोळी किती मस्त दिसतेय.
ज्याच गाव कोकणात आणि घरचा हापुस खायला मिळतोय् ते खुप नशिबवान
आब्याचा मावा वैगरे एकुन आहे कधी खाल्ला नाही, भारत वारित कुठे मिळतोय का ते बघते..
@अन्जू हद्य आठवण.
@अन्जू हद्य आठवण.

वरची आन्बाखवा पोळी मस्त.कॅलरी बॉम्ब आहे हा पदार्थ पण या धाग्यावर कॅलरीज च नावही काढायचं नाही .
सर्वांपुढे मी काढलेले फोटो फार गरीब बिचारे वाटतात मला. फोटो नीट काढता येत नाहीत.>>> पन्ह्या कैरी डाळीचे चे फोटो काढा हो आणि टाका ,आम्ही गोड मानून घेऊ, नव्हे आंबट
मी पन्हे गुळाचे आणि हाताने गर
मी पन्हे गुळाचे आणि हाताने गर काढून करते, मिक्सरमध्ये केलेलं नाही आवडत कोणाला. थोडासा गर तोंडात यायला हवा त्यामुळे फोटो एवढा काही खास नसेल.
अंजू, किती हृदयस्पर्शी लिहिलं
अंजू, किती हृदयस्पर्शी लिहिलं आहेस बाबांबद्दल...
आंबा खवा पोळी ही छान दिसतेय खूप. मी पण करते आपण साधारण एकाच पट्ट्यातील आहोत म्हणून पण खवा कधी नाही घातलाय.
हेमाताई तुम्ही छान करत असाल,
हेमाताई तुम्ही छान करत असाल नक्कीच, तुम्ही इतर सर्व निगुतीने करता, छान वाटतं बघायला, ह्या पोळ्याही करत असणार नक्कीच सुरेख. फोटो रेसिपी शेअर करा जेव्हा जमेल तेव्हा.
एकदा आपलं फणसे नाडण gtg व्हायला हवं.
Pages