
कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा
भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.
आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.
पन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.
देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.
तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.
भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !
चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …
Man, go, get a Mango !!
* * *
(वरील सर्व फोटो माझेच. मोबल्याचे. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)
मेथांबा = आम = लुंजी = लौंज;
मेथांबा = आम = लुंजी = लौंज; एकाच पदार्थाची नावें आहेत हे समजले.
वर प्रतिसादांमधे कोयाड, उकडांबा आणि सासव या कैरी-आंब्यापासूनच्या पदार्थांची नावें आली आहेत. ते काय असते कसे करतात यावर थोडा उजेड पाडा लोकहो. रेसिपी सांगितल्यास बेस्टच.
सासवhttps://www.maayboli.com
सासव
https://www.maayboli.com/node/66112
उकडांबा रेसिपी आईला विचारून
उकडांबा रेसिपी आईला विचारून लिहिते, पण फोटो नसेल कारण बरेच वर्षांत तिने केला नाहिये. सध्या मोतिबिंदूचं ऑपरेशन झालंय तिचं, जरा तिला बरं वाटलं की लिहिते नक्की. मलाही ती डॉक्यूमेंटेड व्हायला हवी आहेच उकडगर्यांसारखी.
उकडगर्यांसारखी. ?
उकडगर्यांसारखी. ?
आता हे काय ते ही सांगा
@ देवकी, थँक्यू ! फोटोही आहे तिथे, आयडिया आली जनरल सासव काय ते 👍
आता हे काय ते ही सांगा. >>>
आता हे काय ते ही सांगा. >>> जरा जून (गरे बनलेल्या) पण कच्च्या फणसाची भाजी.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/54103 >> हे घ्या उकडगरे.. आंबा आला की फणस हवाच यायला.
https://www.maayboli.com/node
अय्यो थँक्यू हेमाताई
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/aurangabad/keshar-mango-production-india-51-per...
बरोबर द.सा.
बरोबर द.सा.
केसर आंब्याची क्रेझ मी बडोद्याला असतांना बघितली आहे, same as Hapus frenzy in Maharashtra. स्वत:च्या बागेतला उत्तम केसर मित्रांना पाठविणे हे स्टेटस सिंबॉल आहे गुजरात भागात. मला फक्त रस आवडतो त्याचा, कापून खायला नाही आवडत केसर तेव्हढा.
.. आंबा आला की फणस हवाच यायला…
फणसाचा वास सहन होत नाहीं, म्हणून त्याचे सर्वच पदार्थ out of syllabus
अनिंद्य मी किसान कनेक्ट वरून
अनिंद्य मी किसान कनेक्ट वरून केसर आणि देवगड हापूस मागवले थोडे. दोन्ही चवीला खास नव्हते. मागच्या वर्षी हापूस छान मिळाला होता. पण यावर्षी सुरवातीला मागवले म्हणून असेल. आता रत्नागिरी हापूस मागवलाय.
लोकसत्तेच्या लेखात मेक्सिको,
लोकसत्तेच्या लेखात मेक्सिको, ब्राझील, थायलंडमधील आंब्याचा उल्लेख आला आहेच.
वर प्राजक्ता म्हणतात तसे कॅलिफोर्नियात मॅरेथॉन,अटाल्फो वाणाच्या सर्वसाधारण आंब्यांसोबतच उत्तर-दक्षिण अमेरिकाज़, Canada, UK सर्वत्र ऋतुनुसार मिळणारा “टॉमी एटकिन्स” आंबा म्हणजे “एका आंब्याचा जलप्रवास” असे नाट्य लिहिता येईल एवढे मटेरियल.
पहिल्या विश्वयुद्धापर्यंत मागे जातो टॉमीचा इतिहास. ब्रिटिशांनी अमेरिकेसकट निम्म्या जगावर राज्य केले ते तर सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या सैनिकांपैकी सर्वात डंबो, बोअर, साधारण आणि गुणहीन “ढ” वर्गाच्या सैनिकांना त्यांचे सैनिक दोस्त “टॉमी एटकिन्स” म्हणत. Kind of non-abusing funny banter word.
फ्लोरिडातल्या एका यथातथाच चवीचे पण भरघोस आंबे देणाऱ्या वाणाला त्यांनी हे नाव दिले. हा आंबा Shelf life जास्त असल्याने ब्रिटिश सैनिकांनी बोटीत भरभरून सर्वत्र नेला. खाऊन झाला की त्याच्या कोयी समुद्रात न टाकता मुक्कामाच्या बंदरानजिकच्या चर्चेस किंवा स्मशानात पुरण्याची त्यांची पद्धत. त्याचकारणे आज अमेरिकाज़, UK, Canada भागात हा आंबा मोठ्या प्रमाणात होतो, मिळतो. Boring, yet available when you want it = “टॉमी एटकिन्स”
>>>Boring, yet available when
>>>Boring, yet available when you want it = “टॉमी एटकिन्स”>>>>रोचक
आज उपवास म्हणून फराळाला काय
आज उपवास म्हणून फराळाला काय करावे हा विचार करत असतानाच फ्रीजमध्ये कैरी दिसली आणि या धाग्यावरील लौंजी/ लुंजीचे लाळगाळू फोटो आठवले. मग काय जिर्याच्या फोडणीत गुळ आणि मिरची पावडर घालून उपवासाची लौंजी/ लुंजी बनवली.

पुणे जिल्हा, पुरंदर तालुका
पुणे जिल्हा, पुरंदर तालुका बांधावर क्वचित एखादं आंब्याचं झाड. गावात अशी १०-१२ झाडं. मग प्रत्येकाला रायवळही दुरापास्त. मी लहान असताना नातेवाईक ज्यांच्याकडे आंबे येत, ते आवर्जून इतर नातेवाईकांना आमरस जेवायला बोलवायचे. चपाती,आमरस,शेवई असा साधा बेत असायचा.
चपाती,आमरस,शेवई असा साधा बेत
चपाती,आमरस,शेवई असा साधा बेत असायचा.>>> कुठल्याही आंब्याचा आमरस हा कायमच शाही असतो ❤
मस्त फोटो निल्सन.
मस्त फोटो निल्सन.
चपाती,आमरस,शेवई असा साधा बेत असायचा. >>> साधा नाही हो, राजेशाहीच बेत. आपल्याकडे आहे ते वाटून खायचं ही भावना आहे यात.
श्रीरामपुरला एका रस्त्यावर बांधावर लावलेली आंब्याची झाडं आहेत, आम्ही होतो तेव्हा आवर्जून मी त्या रस्त्यावरुन जायचे, छान वाटायचं.
तिथल्या लोकांना रत्नागिरी हापुस माहीती होता, देवगड हापुस नाही. मी द्यायचे आंबे, ते आवडायचे त्यांना. तेव्हा घरी काही बागा ठेवलेल्या, दोन पेट्या तरी यायच्या मग एक आम्हा तिघांना खूप व्हायची, एक वाटायचो आम्ही. मिस्टर बँकेत सर्वांना वाटायचे.
आमरस शेवयांचा बेत हे ऐकले आहे
टोमी अॅटकिन्स ची गोष्ट मस्त आहे
आमरस शेवयांचा बेत हे ऐकले आहे पण खाल्ले नाही कधी . शेवया म्हणजे खीर करतात की कसं करतात?
मैत्रेयी, नाही.
मैत्रेयी, नाही.
शेवया नुसत्या उकडून चाळणीवर निथळायच्या.
मग नूडल्स सारख्या त्या ताटलीत घेऊन त्यावर रस ओतून खायचे.
( कधीकधी, पाहुणे असताना रसाच्या जेवणात पोळ्या कमी पडल्या तर , पटकन काढू का थोड्या शेवयाच आता, पोळ्या करण्यापेक्षा..? असे विचारतात)
ओह्ह... हे म्हणजे स्पगेटीवर
ओह्ह... हे म्हणजे स्पगेटीवर मरिनारा ऐवजी आमरस!
ओह असं आहे होय. इन्टरेस्टिंग!
ओह असं आहे होय. इन्टरेस्टिंग! प्रयोग करून बघायला हरकत नाही.
रस शेवया सारख अजुन एक
रस शेवया सारख अजुन एक सरगुन्डे पण बघितल.. रस-सरगुन्डे विदर्भात खातात.. कुठेतरी फेसबुक पोस्ट मधे बघितल..नुडल सारखच दिसल पण फारस अपिलिन्ग वाटल नाही, अॅक्वायर टेस्ट मुळे त्या भागातल्या लोकाना आवडत असणार..
हे म्हणजे कोकणात शिरवळ्या
हे म्हणजे कोकणात शिरवळ्या करतात तसं वाटतंय. तांदुळाच्या ऐवजी गव्हाच्या शेवया आणि नारळाच्या गोड रसाऐवजी आंब्याचा रस..
आमरस आणि गवसण्याही पॉप्युलर
आमरस आणि गवसण्याही पॉप्युलर कॉम्बो आहे ना?
)
गवसणी म्हणजे तांदुळाच्या उकडीचं सारण असलेली कणकेची पोळी. (असं का ते मला विचारू नका, मला माहीत नाही.
भारी धागा ! काल पासून वाचतो
भारी धागा ! काल पासून वाचतो आहे.
मला आंब्याचा सर्वात आवडणारा प्रकार म्हणजे आमरस आणि पोळी / पुरी. हापूस आंब्याचा रस ओरपल्यावर जे समाधान मिळतं ते चिरून खाल्ल्यावर नाही मिळत.
तुम्ही कोणी पिठ पोळ्या करता का आमरसाबरोबर ? पुरणाऐवजी तांदुळाची उकड भरून केलेल्या पोळ्या. त्या इतक्या लुसलुशीत लागतात की बस! रसाबरोबर पिठपोळ्या खायच्या आणि मस्त कुलर/पंखा लाऊन तीन-चार तास ताणून द्यायची! हे झाल्याशिवाय उन्हाळा सार्थकी लागत नाही.
ही मागे लिहिलेली कैरी कांदा लोणच्याची रेसिपी : https://www.maayboli.com/node/6407
आंब्याचे सासव, कांदा कैरी
आंब्याचे सासव, कांदा कैरी दोन्ही आवडते. बाकी आंबा आवडतो पण ...... प्लीज मला मरु नका - आंब्यापेक्षा मला गपागप जाणारी केळीच जास्त आवडतात. हंबल व कम्फर्ट फुड

प्लीज मारु नका. आंबा तो आंबाच हे मी ही मान्य करते पण जस्ट माझा वैयक्तित पर्याय (चॉइस) सांगीतला.
--------------
आणि हो केळी वगैरे सर्वांपेक्षा कलिंगड जास्त आवडते. डॉक्टरांनी सांगीतले रोज एक फळ खा तर कलिंगड निवडावे
>>>>पुरणाऐवजी तांदुळाची उकड
>>>>पुरणाऐवजी तांदुळाची उकड भरून केलेल्या पोळ्या. त्या इतक्या लुसलुशीत लागतात की बस!
ओहो!! मस्त असणार.
>>> पुरणाऐवजी तांदुळाची उकड
>>> पुरणाऐवजी तांदुळाची उकड भरून केलेल्या पोळ्या.
अरे मी त्याबद्दलच लिहिलं - मी गवसणी नाव ऐकलं आहे. (खाल्लेली नाही कधी.)
हो, आत्ता पाहिलं. आपल्या
हो, आत्ता पाहिलं. आपल्या पोस्ट एकाच वेळेला आल्या.
मी गवसणी नाव नाही ऐकलेलं. पिठपोळ्या हा खानदेशी प्रकार म्हणून आमच्या घरी केला जातो.
स्पगेटीवर मरिनारा ऐवजी आमरस
स्पगेटीवर मरिनारा ऐवजी आमरस 😀
उपवासाची लुंजी - ग्रेट ट्विस्ट निल्सन 👍
आमरस शेवया, गवसणी, कैरी कांदा लोणचे, आमरस+ शिरवळ्या, रस-सरगुन्डे…. प्रदेश बदलतो पण कैरी-आंबा आपल्या रसनेवर राज्य करतो. So good to know the regional names and short recipes. ❤ थँक्यू.
विविध आंबा फळांचे, पाककृतींचे, कैरी आंब्याच्या खाद्यपदार्थांचे फोटोही येऊ द्या मंडळी
गवसणीची कृती मायबोलीवर होती.
गवसणीची कृती मायबोलीवर होती. इथे वाचूनच हा प्रकार कळला. करून पाहिलं होतं. पण जितका खटाटोप आहे, तितकी मजा खाताना आली नाही. आता मला जमल्या नाहीत (तेव्हा आई होती, त्यामुळे फायनल प्रॉडक्ट मध्ये फॉल्ट्स तरी नव्हते) की आयत्या मिळाल्या तरच छान लागतात ते सांगता येत नाही. शिवाय नोस्टाल्जियाचं आवरणही नाही . तिथेच पीठ पोळी हे नाव उकडीच्या पोळ्यांची कृतीही कळली.
Pages