निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

स्निग्धा तुमच्या कॅमेलिया ला झब्बू >> सुंदर
हे झाड तुमच्याकडे आहे का? असेल तर मला फांदी द्याल का? त्या आधी फांदी लागेल का?

आहा! काय प्रसन्न वाटलं इथे येऊन. सुंदर फोटो सगळ्यांचे.

@ जागू ,
थँक्यू यार!
पीस लिलीला गेल्या आठवड्यात फ्लॉवरिंग खत घालून पाहिलं. एक कळी दिसते आहे आता. म्हणजे हाच प्रॉब्लेम असावा. मी कुठेतरी वाचलं होतं की पीस लिलीला वरचेवर पाणी घातलं आणि खत घातलं तर नुसतीच मुळं स्ट्रॉन्ग होतात आणि फुलं येत नाहीत. हे चुकीचं असावं म्हणजे.

मस्तच फोटो स्निग्धा
हे झाड तुमच्याकडे आहे का? असेल तर मला फांदी द्याल का? त्या आधी फांदी लागेल का?>>>>> नाही तो नेपाळमध्ये काढलेला फोटो आहे.
ते झाड थंड हवेच्या प्रदेशात येते.

वा! वा! बहावा!

मस्त फोटोज् सगळे नविन.
स्निग्धा, lupins कुठे फुललेत आत्ता? मे-जून च्या सुमारास फुलतात ना हे?

स्निग्धा, lupins कुठे फुललेत आत्ता? मे-जून च्या सुमारास फुलतात ना हे? >> सगळे जपान मधे काढलेले फोटो आहेत

तामण अतिशय आवडता!
बहावा सुंदरच.

मनिम्याऊची हिरवी सकाळ Happy

स्निग्धा, कसलं झाड आहे ते? कसला भन्नाट गुच्छ आहे फुलांचा!

स्निग्धा, कसलं झाड आहे ते? कसला भन्नाट गुच्छ आहे फुलांचा! > नाही बा माहीत. जाणकारांनी प्रकाश टाकावा

जपानमध्ये एवढी फुले कुठे कुठे बघितली त्यावर एक लेख लिहा(च) > बापरे लेख लिहिणं मेरे बस की बात नही. पण फुलं Tokyo, Kyeto, Osaka, Gotemba, Hakone, Hiroshima इ. ठिकाणी बघितली

IMG-20250419-WA0012.jpg
साधना ताई हे ते फुलं ज्याच्याबद्दल मी आधी सांगितलं होतं. जरा शिळं झालं आहे खरं पण आज सापडल.

Pages