Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10
नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://youtu.be/hjZ7I0b5wZI
https://youtu.be/hjZ7I0b5wZI?si=C4JFFve-73Wssgh1
नि ग साठी अतिशय चपखल व्हिडीओ.
सुप्रभात ओळखा पाहू?
सुप्रभात

ओळखा पाहू?
ऋतुराज कोको किंवा काॅफी मला
ऋतुराज कोको किंवा काॅफी मला कन्फ्युजन आहे.
टेरेसवर फुललेली colorada वाॅटर लिली

ऋतुराज - नाही ओळखले, सांगा
ऋतुराज - नाही ओळखले, सांगा तुम्हीच.
जागू वॉटर लिली छान टपोरी.
जागू वॉटर लिली छान टपोरी.
For the lovers of Flor de
For the lovers of Flor de Papel
गुलदस्ता
# My Terrace
# My Random Clicks
# Flor de Papel
सर्च केला तर कोको असावं
सर्च केला तर कोको असावं दिसतंय.
ज्यांनी ओळखलं त्यांनी बरोबर
ज्यांनी ओळखलं त्यांनी बरोबर ओळखलं.

कोकोची फुले आहेत.
कोकोला खोडावर फुले येतात. ही पहा फुले आणि फळे
colorada वाॅटर लिली मस्त रंग
colorada वाॅटर लिली मस्त रंग आहे.
अनिंद्य, नक्की किती बोगन वेली आहेत तुमच्याकडे?
सुंदर रंग.
बोगनवेली आणि चाफा फार पसंत
कोको फुले आणि फळे 👌
बोगनवेली आणि चाफा फार पसंत आहेत. दोन्ही भरपूर आहेत.
कण्हेर
कण्हेर

आहाहा आहाहा.
आहाहा आहाहा.
खूप वर्षांपूर्वी भावाने माहेरच्या गावाहून जास्वंद आणली. माझ्याकडे त्यानेच लाऊन दिलीय. त्यांच्याकडे येतात फुलं. माझ्याकडे कळी येते आणि आता दोन दिवसात फुल होणार इथपर्यंत सर्व नीट असतं मग मात्र देठ पिवळा पडून गळून पडते ती कळी.
हो, जास्वंदाला कीड खूप लागते.
हो, जास्वंदाला कीड खूप लागते. पुन्हापुन्हा. भरपूर उपाय केले तरी दोनदा माझी पूर्ण बाग नष्ट झाली. मग जास्वंदाचा नाद सोडला. थोडी बरी झाडं वाटून टाकलीत. ती झाडं आता सोसायटीच्या उद्यानात / बाकी ज्यांना दिलीत त्यांच्याकडे भरपूर फुलत आहेत- विनातक्रार. May be माझेच ग्रह नव्हते जुळत 😀
कण्हेर
कण्हेर 👌
झीरो डिमांड प्लांट.
कीड लागलेली दिसत नाहीये
कीड लागलेली दिसत नाहीये अनिंद्य. मी ही खाली जास्वंद लावलेली पण खाली माझी रोपे आजूबाजूला व्यवस्थित दगड विटा लाऊनही का कोणाला दिसत नाहीत, तण काढायला सोसायटीतर्फे येतात तेव्हा का उपटली जातात, मला समजत नाही, एकदा एका कामगाराने आंब्याचे रोप उपटल्यावर थोड्या वेळाने मी बघितलं आणि त्याला परत लावायला सांगितलं पण नाही जगले. खाली लावलेलयापैकी एक आंबा तो जरा लांब आहे आमच्या घरातून दिसत नाही आणि एक जांब एवढेच वाचून मोठं झालंय. आता एक कोंब फुटलेला नारळही लावलाय पण तो ही लांब. बघूया येतो का.
अन्जू केळीची साले पूर त्या
अन्जू केळीची साले पूर त्या जास्वंदीत आणि कांद्याचीही सुकी साले.
माझ्याकडे आज फुललेली हळदी कुंकू
कण्हेर मस्तच
कण्हेर मस्तच
खरच झीरो डिमांड प्लांट.
हळदी कुंकू रंग अगदी ठसठशीत आहेत.
आज बनवलेला हा व्हिडिओ कदाचित
आज बनवलेला हा व्हिडिओ कदाचित आवडेल तुम्हाला म्हणुन देतेय ईथे लिंक
https://youtube.com/shorts/ezfM9RsmbAw?si=z4qCISKHhUE5YwiF
आहाहा कसल्या सुरेख दोन्ही
आहाहा कसल्या सुरेख दोन्ही जास्वंदी.
केळीची, कांद्याची दोन्ही सालं उपाय करून बघेन, थँक्स जागू.
व्हिडिओत दिसणारा मोगरा
व्हिडिओत दिसणारा मोगरा = 👌
सुंदर फोटो आहेत सर्व. एकदम
जागु मोगरा व इतर फुले मस्तच्
जागु मोगरा व इतर फुले मस्तच्..
डोळे काय खेळ करतात… ऋतुराजचा
डोळे काय खेळ करतात… ऋतुराजचा फोटो मला जमिनीवर आलेली फुले वाटला. बाहेर डोकावत असलेले पुंकेसर बघुन क्लेरोडेन्ड्रोन जातीतले असावे असेही वाटले.
मग कॉफी कोको वाचल्यावर मागचा बुंधा दिसला
कॉफीची फुले म्हणजे फांदीवर पसरुन्ठेवलेला सायलीचा गजरा हे लक्षात ठेवायचे म्हणजे कॉफी की कोको हा गोंधळ होत नाह्रे
सुप्रभात...
सुप्रभात...

कॉफीची फुले म्हणजे फांदीवर पसरुन्ठेवलेला सायलीचा गजरा हे लक्षात ठेवायचे>>>>>>> अगदी चपखल वर्णन साधनाताई.
असच एक फोटो आहे माझ्याकडे पण आता सापडेना.
तोवर हे ओळखा..
ब्राऊनिया
ब्राऊनिया
बरोबर...
बरोबर...
रिलयन्स कॉर्प पार्कात खुप
रिलयन्स कॉर्प पार्कात खुप कलमे लावलीत. अगदी
पाच फुटी झाडाला ढीगांनी झुंबरे लटकलेली असतात.
अनिंद्य कागदी फुले मस्तच…
अनिंद्य कागदी फुले मस्तच…
मला हा व्यासंग करायचा आहे. सध्या एकच बोगन्वेल आहे. ती ऊम्च वाढते आणि पावसाळ्यात पुर्ण मरते. परत मुळातुन अंकुर फुटतो आणि परत आकाशाला भिडायचे वेध तिला लागतात.
साधना, थँक्यू.
साधना, थँक्यू.
कमीत कमी देखभाल करावी लागणारीच झाडे ठेऊन उरलेली कमी केली आहेत.
बोगनवेल आणि चाफा no / low maitenance याच कारणाने टिकून आहेत माझ्याकडे.
…. परत आकाशाला भिडायचे वेध तिला लागतात.… ❤
# Nature’s Chandelier
एका farmhouse च्या बागेत एकटाच फुललेला जास्वंद.
# Nature’s Chandelier
# जपाकुसुम
# जास्वंद
Pages