निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

स्निग्धा, किती सुंदर फोटो आहेत सगळे.

त्या पांढर्‍या फुलांच्या लडी आणि अस्सल गुलाबी गुलाब - लाजवाब!

फुजीचं असं निरभ्र दर्शन म्हणजे फुजी प्रसन्न आहे तुमच्यावर.

स्निग्धा,सुंदर फोटोज सगळेच, मागच्या पानावरचा साकुरा तर अप्रतिम .काढलाय ही एकदम कॅन्डीड.
फुला पेक्षा जांभळी पानं लक्ष वेधून घेतात +1

सुप्रभात,
सगळे फोटो प्रचंड सुंदर आहेत.

धन्यवाद . अजून खूप फोटो दाखवायचे आहेत. पण ते सारखे resize करण्यात वेळ जातो आणि कंटाळा येतो

मी पहिल्यांदाच आली आहे या धाग्यावर.. इतकी सुंदर फुलं फुलली आहेत इथे!!!
ऋतुराज तुमची बोगनवेल खूप मस्त आहे.. मला खूप आवडतात ती फुलं... फांदी मिळेल का त्याची??
फांदी लावली कुंडीत तर जगते का??

जयुचा झब्बू मस्त! Happy

काय ही गुंतागुंत >>> हो ना! Lol पिचकारी उर्फ आकाश शेवग्याच्या झाडाचा आधार घेऊन वाढलेली ही कुठलीशी वेल आहे. वर्षानुवर्षं खपून त्या वेलीने स्वतःचं साम्राज्य उभं केलंय हे.

सुप्रभात
भूईचाफ्याला फुलायची इतकी घाई झालेली की पानेही वाळू दिली नाहीत. त्याआधीच फुलला. त्यालाही कळल असेल निसर्गाचा धागा पुन्हा धावू लागला म्हणुन.

Screenshot_20250416_064838_Photos~2.jpg

सुप्रभात नि ग कर
कॅमेलिया फोटो जबरदस्त आहे.
शिपाई बुलबुल भारीच. फुजी सान मस्तच.
शेंदरीची तिन्ही रूपे एक फोटोत...
भुई चाफा पण मस्त फुलला आहे.
त्यालाही कळल असेल निसर्गाचा धागा पुन्हा धावू लागला म्हणुन.>>>> अगदी अगदी

Pages