Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10
नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फणस झाडाच्या शंका निरसन
फणस झाडाच्या शंका निरसन केलेल्या सगळ्यांचे धन्यवाद !!
गंधकुटी, आंब्याच्या बुंध्याशी
गंधकुटी, आंब्याच्या बुंध्याशी मीरवेल किंवा मघई (किंवा दुसरी व्हरायटी) लावा. मस्त वाढेल.
सावलीत साधनाने सांगितलेली सगळी झाडे आणि मनीप्लँट, नेचा, सिंगोनिअम अशी पानांची झाडे चांगली येतील. फुलांमध्ये पीस लीली, फुशीआ अशी पण चालतील.
रिबन प्लांट पण सावलीत चालेल.
रिबन प्लांट पण सावलीत चालेल.
जामच्या फुलांवर आलेली मधमाशी
जामच्या फुलांवर आलेली मधमाशी

मिनी लोटस पहिलीच कळी

जागू, कमल कलिका मस्तच आहे.
जागू, कमल कलिका मस्तच आहे. फुलल्यावर पण फोटो टाक.
फुले येत नसलेला किंवा कमी
फुले येत नसलेला किंवा कमी येत असलेला मोगरा कपभर बियर (yes, no jokes) दिल्यास तरारून फुलतो. विश्वास नाही बसत? करून बघा. Thank me later.
(No subject)
For Flor de Papel lovers
# My Random Clicks
# Flor de Papel
# बोगनवेल
सुरेख सर्वच.
सुरेख सर्वच.
छान अंधारून आलंय इथे आणि वारा सुटलाय, नाहीतर कसलं गरम होत होतं. अर्थात पाऊस जर पडला तर नंतरही गरमी वाढेल.
मस्त गप्पा सुरू आहेत. आधना,
मस्त गप्पा सुरू आहेत. साधना, वाघाचा किस्सा भारीये.
परधार्जिणी झाडं, झोप्या फणस, जागूकडची सुंदर फुलं, अनिंद्य यांच्या रंगेबिरंगी बोगनवेली, रंगीत पक्षी.... जबरदस्त.
पोर्तुगीज चर्चबाहेर गुलबट बोगनवेल बहरलेय. थांबून फोटो काढायला हवा.
इतकुसा पाऊस पडला, जरा मोठी सर
इतकुसा पाऊस पडला, जरा मोठी सर तरी हवी होती. झाडांवरची धूळ जाऊन चकचकीत झाली असती पाने.
इतके दिवस बहरला पारिजात
इतके दिवस बहरला पारिजात
फुले का पडती शेजारी
ऐकले होते इथे मात्र अनंत, फणस पण हेच करतायेत
कलियुग
दुसरं काय?
(हसणारी बाहुली)
अनिंद्य बोगनवेलीचा रंग सुंदर
अनिंद्य बोगनवेलीचा रंग सुंदर आहे.
लाल कोरंटी
भरपूर उपाय सुचवले आहेत
भरपूर उपाय सुचवले आहेत सगळ्यांनी... थँक्यु... मायबोलीवर काय भारी लोकं आहेत. कधी काही विचारलं आणि मदत मिळाली नाही असं होतंच नाही. असो. करून बघते एकेक.
कुंडी लहान आहे, पानं खूप आहेत... आता उपाय केल्यावर तरी फुलायला पाहिजे.
अनंताचा पारिजात झाला हे भारी आहे.
गंधकुटी
गंधकुटी
Dianthus Ixora Pansy इतर अनेक फुलझाडे, शोभेची झाडे लाऊ शकता
कमळ कळी मस्त.
बोगनवेलीचा रंग बहारदार, तजेलदार आहे. मला आवडला.
एक फांदी द्या मला ह्याची.
जागुताई, लाल कोरंटी मला हवी. मस्त रंग...
धागा पळतोय
लाल कोरंटी मला हवी - मिळेल.
लाल कोरंटी मला हवी - मिळेल.
पीस लिली छान फुललेय

ए जागुतै, पीस लिली इतकी
ए जागुतै, पीस लिली इतकी फुलायला काय केलंस? माझी घरात आहे. डायरेक्ट ऊन नसलं तरी दिवसभर भरपूर उजेड येतो त्यावर. पण आणली तेव्हाची फुलं होती तेवढीच. नंतर आली नाही. माकाचु?
लाल कोरांटी सुंदर. तिथे असते तर मी पण पळवली असती.
मधमाशी एकदम डिटेलमधे
बोगनवेलीचा मस्त रंग.
rmd काही नाही ईतर
rmd काही नाही ईतर झाडांप्रमाणेच खत पाणी आणि जुनी पाने कट केली होती.
खत मी २ महिन्यांतून एकदा
खत मी २ महिन्यांतून एकदा घालते. पाणी आठवड्यातून एकदा.
तू डायरेक्ट उन्हात ठेवली आहेस का कुंडी? तसं असेल तर किती तास उन्हात राहतेय झाड?
rmd नाही सकाळी साधारण तीन तास
rmd नाही सकाळी साधारण तीन तास मिळत असेल उन. मी खत लाईट घालते पण दर आठवड्याला घालते. सगळ अलटून पालटून. त्यात लिंबू एन्झाईम, कांदा पाणी, गांडूळ/शेणखत, सीविड्स इत्यादी. दोन -तीन महिन्यातून एकदा npk, इप्सम साल्ट वगरे टाकते. पण तेही गांडूळ खतात मिसळून. पाच किलो गांडूळ खतात १ किलो npk
पीस लिली छान फुलली आहे.
पीस लिली छान फुलली आहे.
आमची लिली Believes in flowering family planning. एक या दो बस ! कधी तिसरे फूल देत नाहीच 😀
सुप्रभात निगकर
सुप्रभात निगकर
पीस लिली मस्त फुलली आहे.
पीस लिली मस्त फुलली आहे.
आमची लिली Believes in flowering family planning. एक या दो बस ! कधी तिसरे फूल देत नाहीच>>>>>
पोर्टूलाका/portulaca
पोर्टूलाका/portulaca

एक या दो बस >>>
एक या दो बस >>>
दर आठवड्याला खत घालून पाहते.
माझी पीस लिली घरात आहे. डायरेक्ट ऊन अजिबात मिळत नाही. कदाचित म्हणून येत नाहीत फुलं.
Portulaca सुंदर.
ऋतु, जास्वंद रंग सुंदर
Portulaca
Portulaca
+
जास्वंद
सुंदर रंगछटा
जागुताई झब्बू
जागुताई झब्बू
पोर्टूलाका मस्तच. याची
पोर्टूलाका मस्तच. याची वेरीगेटेड व्हरायटी पहिल्यांदाच पाहिली.
टेरेसवरचा मोगरा भरभरुन कळ्या
टेरेसवरचा मोगरा भरभरुन कळ्या आणि फुले लागली आहेत.
अहाहा !
अहाहा !
मोगरा, जाई, जुई, … ही सारी पांढरी सुगंधी फुले म्हणजे फुल्ल ट्रॉपिकल समर वाईब्ज ❤
रविवारचा सूर्य वर आला !
रविवारचा सूर्य वर आला !
जपाकुसुम संकाशं ….
# My Random Clicks
Pages