माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी भाजलेलं तांदळाचं पीठ, cornflour यापैकी काहीही एक साखर व ओल खोबऱ्याच मिश्रण 70 - 80% घट्ट बनतं तेव्हा घालते, एक ते दोन tablespoon - त्याने व्यवस्थित होतात, पाणी दूध काहीही घालावे लागत नाही पण उपवासाला चालत नाहीत. दूध घातले की लवकर संपवाव्या लागतात , आई भाजलेलं बेसन देखील घालते, त्याही चांगला होतात.

काही लोकांची अगदी कमी तिखट-मीठ-मसाले घालून चविष्ट भाजी होती.
हातालाच चव‌ आहे म्हणतात तसं असेल‌ का?
माझं नाही तसं होत. . Sad
कमी तिखट-मीठ-मसाल्यांमधे एकदम सपक होते भाजी.
वेळ देऊन, मन लावून केलेला स्वयंपाक so-so होतो.
पण घाईघाईत केलेला, पाहुणे दत्त म्हणून दारातच ऊभे राहिलेत, आता पटकन काहीतरी करायचय असा स्वयंपाक मात्र माझा नेहमी भारी होतो.. असा बर्याच वेळेचा अनुभव आहे..
(पण म्हणून सारखे पाहुणे नकोयत मला).. Lol

हो होतं तसं Happy माझी बाई रागात फार चवदार भाजी करायची Wink

कुकींग स्लो गॅस वर, जिन्नस बारीक चिरून केला तर चव चांगली लागते असा माझा अनुभव आहे. मसाले जास्त घालण्या ऐवजी गावठी नुसत्या लसूणाचीच चव इतकी भारी असते की की नुसत्या लसूण मिरची वर पालेभाजी रुचकर लागते.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा