माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईची ट्रीक सांगते, ओले खोबरे वाटून टाका. .... .. ओले खोबरे वाटणात वाटून पीठ आंबवायला ठेवते डोशांचा टेक्सचर आणि चव फार छान लागते.थोडेसे जाड पण सॉफ्ट होतात.

चितळेंचे ढोकळामिक्स एकदम छान आहे.एकदा 400 गरम चे पाकीट एकदम वापरले होते.त्यामुळे कुकरमध्ये 1,कढईत पाणी ठेऊन त्यात दुसरे भांडे ठेवून आणि उरलेले मावेत असा प्रचंड प्रमाणात(माझ्या दृष्टीने) ढोकळा केला होता.
सूचनांचे तंतोतंत पालन केले होते साखर सोडून.वरून साखरेचे पाणी घालतो त्यात सांगितल्यापेक्षा कामी साखर घातली होती.
शेजार पाजारना देऊन(खरतरत्यासाठीच जास्त केला होता),मदतनीस, केअरटेकरna दिला.

ताक घालायची गरज नाही...आंबवलेजे पीठ असेल तर जाळीदार उत्तम dosa होतो..

चितळे ढोकळा जिंदाबाद..आज पर्यंत एकदाही बिघडलेला नाही...त्याबद्दल चितळ्यांची आजन्म ऋणी आहे..

मी पूर्वी अनेकदा ढोकळा करायची, आठवड्यातून एकदा कारण लेकराला आवडायचा, हल्ली तो खात नाही म्हणून फार होत नाही. बाहेरच्या इतकी जाळी पडायची नाही पण चांगली पडायची आणि मी चार पाच तास तरी पिठ भिजवायचे. मी बेसन त्यात थोडा रवा घालून आंबट ताक आणि पाणी गरम करून त्यात भिजवायचे सर्व. आलं लसूण मिरची पेस्ट मस्ट आहे माझ्यासाठी, बाहेरचे चितळे किंवा इतर आणलं तरी मी घालणारच, साखर मी अजिबात घालत नाही, बाहेरच्या ढोकळ्यात साखर असते म्हणून मी फार खात नाही. करताना आधी पातेल्यात गरम पाणी करत ठेऊन ज्या डब्यात करायचं आहे तो थोडावेळ ठेवायचा, एकीकडे मीठ, ठेचा घालून बॅटर एका बाजूने ढवळत राहायचं, त्यानंतर इनो घालून परत तसंच करायचं मग गरम झालेल्या डब्यात ओतून वर झाकण आणि जड वस्तू ठेऊन, पंधरा मिनिटांनी उघडून बघते. झालेला असतो ढोकळा. नंतर वरुन फोडणी, फोडणीत तीळ असतील तर तेही घालते.

मागच्या पानावर मी आंबोळीच्या पीठाबद्दल लिहिलं होतं.
त्यावर आलेले सगळे सजेशन्स करून झाले.
मूळ प्रॉब्लेम पीठ जास्त जाडसर दळून आणले हा आहे. त्यामुळे पिठाला बाइंडिग नाही असे वाटते.
श्रवू यांनी सांगीतल्या प्रमाणे पीठ घट्ट काळवुन जाड आंबोळ्या केल्यातर कमी चिकतात.

बाईंडिंग एजंट म्हणुन सहा आंबोळ्या एवढ्या पीठात एक अंड घातलं तरी अजिबात चिकटत नाहीत.

याला पर्याय म्हणुन
१) दीड चमचा चीया सिड्स अर्धा कप पाण्यात १० मिनिट भिजवून त्याची जेली होते. ती वेळेवर पीठात घालुन नीट कालवून मग आंबोळ्या केल्या तर चिकटल्या नाहीत. अगदीच अलगद सुटल्या नाहीत, पण उलथणं कुठूनही घातलं आणि जरा सावकाश उचलली अथवा उलथणं सगळी कडे फिरवून उचलली की झालं.

२) चार आंबोळ्या एवढ्या पिठालत चिमूटभर गवार गम वेळेवर पीठात घालून कालवले तरीही वरील प्रमाणे रिझल्ट मिळाला. पण गवार गम फारच जपून घालावी लागते. पहिल्यांदा मी एक आंबोळी होईल एवढं पीठ वेगळं काढुन त्यात मसाल्याचा छोटा चमचा असतो त्याच्या अर्धा गवार गम घालती ते एवढं चिकट झालं की टाकून द्यावं लागलं.
अगदीच चिमूटभर घालुन ढवळून बघायचं मग अजून एक चिमूट असं करून अंदाज आला.

आता हे पीठ असे संपवता येईल.
पुढचे बरोबर दळून आणेन. खरंतर गिरणीवाला मी दाखवलेल्या विकतच्या पिठाच्या सॅम्पल बरोबर दळत होता, मला थोडं पीठ दाखवून म्हणाला बघा बरोबर येत आहे. पण मला वाटलं ते बारीक आहे, अजून जाड असं दोनदा त्याला सांगुन मी नको तो आगाउपणा केला होता.

मानव जास्त सांगत नाही पण काही ही करून एवढा झोल होतोय तर मला वाटतंय की तुमचे तांदूळ चिकट जातीचे आहेत का ते चेक करा, इंद्रायणी वगैरे नका वापरू आंबोळी साठी.

ममो नोटेड. पण इकडे पटनी, इंद्रायणी वगैरे मिळत नाहीत.
सोना मसुरी, HMT, कोलम पोनी, जयश्रीराम, Rmr
अशी नावे असतात. त्यात डोसा राईस, इडली राईस असे वेगवेगळे मिळतात. डोसा राईस जुना आणि लांब दाण्यांचा असतो तो मी वापरला. त्यात नक्की कोणता तांदुळ असतो माहीत नाही.

मानव,
तुम्ही अंडं, चीया सीड्स, गवार गम असे किती वेगवेगळे प्रयोग करुन बघितलेत! मला यातले काहीच सुचले नसते.

बेकिंगमध्ये अंड्याला शाकाहारी पर्याय म्हणून अळशी (फ्लॅक्स सीड्स) वापरतात असं वाचण्यात आलं होतं - चिया सीड्सची आयडियाही भारी आहे.
इथे एक रेस्टॉरन्टवाले काका डोसा सुटत नसेल तर आम्ही बॅटरमध्ये मैदा घालतो असं म्हणाले होते - त्यापेक्षा हा हेल्दी ऑप्शन आहे.

अवांतर : इथे मिळणारं ज्वारीचं पीठ असं भरभरीत असतं. मी त्यात चमचाभर कणीक मिसळून घेते भाकरी करताना. पण एकदा ग्वार गम वापरून पाहायचा ठरवला होता (क्रिश अशोकचं पुस्तक वाचल्यावर) हे विसरून गेले होते. तुमची पोस्ट पाहून आठवलं. आणेन आता. Happy

मानव पीठ अन् इव्हन असणे ही समस्या वाटतेय मला. पीठ २/३ तास भिजवून मग व्यवस्थित भिजलेले पीठ मिक्सर मध्ये काढुन एकदा आंबोळ्या घालण्याचा प्रयोग करून बघा (इतर काही बाईंडिंग घटक न घालवता). मला वाटतेय जमुन जाईल एवढ्याने.

>>बेकिंगमध्ये अंड्याला शाकाहारी पर्याय म्हणून अळशी (फ्लॅक्स सीड्स) वापरतात असं वाचण्यात आलं होतं>> मी वापरते क्वीक ब्रेड्स, कॉर्न ब्रेड्स, आणि मफिन्ससाठी.

अमितव, एग व्हाइटला चिया सिड्स रिपप्लेसमेंट बाईंडिंग साठी हे आधीच माहीत होतं. गवार गम सुद्धा. पण वापरले नव्हते कधी.
हे डोश्यापीठात वापरून पाहिलं एवढंच.

पर्णीका, ते करून बघितलं तर व्यवस्थित होतीलच असं वाटतंय. तसं शेवटी करायचं ठरवलं होतं. ते टाळून काय करता येईल ते केलं. (आंबोळी पीठ दळून आणण्याचा मुख्य उद्देश हाच मिक्सीतून ग्रांईड करणे टाळणे.) तरी सुद्धा एकदा पीठ जास्त जाडसर असल्यामुळे हे होतंय हे कन्फर्म करायला ते करून बघतोच.

ज्वारी पीठात गवार गम प्रयोग (उकड न काढता लाटुन करण्यास) मी पण या विकांताला करणार आहे Happy
चार दिवसांपूर्वीच याची दुसरीकडे चर्चा झाली होती.

रोजच्या भाजीत रोजरोज कांदा टोमॅटो वापरायचा कंटाळा येतो पण थोडी ग्रेवी तर हवी असते. मग करायचे काय? म्हणुन शेण्गदाणे, तिळ व नावाला सु खो भाजुन पुड करुन ठेवली. सो मि वर ज्ञानप्राप्ती होतच असते. त्यात कुठेतरी ज्ञान मिळाले होते की जवस पण ह्या पुडीत घालायचे म्हणजे रोज पोटात जातील. स्त्री आरोग्याला चांगले व व व व नेव्हर एंडिंग ज्ञानवाटप. (जवस म्हणजे तीच ती आळशी वगैरे)

तर येड्यासारखे जवसही घातले. हे मिश्रण वापरुन वांगी केली. चव चांगली लागली, ग्रेवीही भरपुर झाली पण जवसाचा प्रचंड वास व चव पदार्थाला चिकटले. जवसाने बाकीचे वास मारले. आणि बोनस म्हणुन एक बुळबुळीतपणा पदार्थाला बहाल केला. चांगल्या भाजीचा सत्यानाश Happy मी खाल्ली तरीही पण मजा गेली ती गेलीच.

तर मंडळी अशा पुडी वगैरे करुन ठेवाव्याश्या वाटल्या तर कृपया त्यात जवस वापरु नका. आता मी त्या मिश्रणात तिखट मिठ लसुण घालुन चटणी करेन व संपवेन.

एका मैकडे जवसाची चटणी दह्यात कालवून केली होती. तो. बुळबुळीतपणा आठवून कसंतरीच झाले. एकदा थोडीशीच जवसाची पूड गुळ पापडीत घातली होती तरी त्यात उग्गपणा जाणवत होता.

जवसाची कोरडी चटणीच छान होते, तेही जवस नीट खणखणीत भाजले गेले असतील तरच. नाहीतर सत्यानाश. मी माझ्या हाताने डबाभर चटणी फेकून दिली आहे. जवस तडतडले तरी मंद आंचेवर भाजत रहायचे. कव्हर निघून आतलं पांढरं दिसेल अशी त्याच्या लाह्या फुटतील असे झाले तर ते 'झाले' मानायचं, नाहीतर भाजत रहायचं. मी कमी भाजले, आणि ४ दिवसांनी भयानक वास यायला लागला. एक प्रयत्न म्हणून साबांनी ते प्रकरण कढईत ओतून पुन्हा भाजायला घेतलं खरं, पण घरभर चक्क मासळीसारखा वास सुटला नि तो जाता जाईन! :कपाळालाहात: त्यानंतर मी चटणी केली नाही. Proud

आमच्या इथे एका दुकानात छान भाजलेले जवस मिळतात. ते आणून आवडी प्रमाणे जिरं , लसूण, लाल तिखट , मीठ वगैरे घालून मिक्सर मध्ये फिरवले की दोन मिनटात चटणी तयार. मला खूप म्हणजे खूपच आवडते. कधी भाजीत वगैरे घटले नाहीयेत.

वेगळे तांदूळ भिजवून वाटोक्न बघा होतायेत का आंबो ळ्य. @ >> मानव<<
तवा बीडाचा असेल तर तापल हवा.

गॉव गम हा आणखी चिकटपणस आणेल. त्याचा इथे काही फायदा नाही.
सरळ इतर डाळी भिजवून अडाई नाहितर अप्पे करा दर आठवड्याला कधी गोड, तर खारा ..

मला तर भाजलेले जवस नुसतेच खायला आवडतात मुखशुद्धी म्हणून. असले तर त्यात तीळही टाकते.>>> खरं तर मला चटणी आवडत नाही. म्हणून मग साबा जेव्हा चटणीसाठी सगळं भाजतात तेव्हा नुसते भाजके जवस, तीळ वेगळे काढतात माझ्यासाठी. मग सैंधव घालून मीपण नुसतेच चिमटीभर खाते जेवल्यावर.

भाजलेले जवस मी ग्रनोला वगैरेत वापरते. मुखशुद्धीत पण टाकते कधीकधी. ते जोवर पाणी पाहात नाहीत तोवरच… पाणी लागले की सत्यानाश.

आळशी = जवस , माझ्या माहितीनुसार.... >> हो मलाही तेच वाटतयं. ममो, चॉकलेटी अळशी आणि जे काळे म्हणताय ते खुरसणी/कारळं, त्याची चटणी छान लागते. गवार, घेवडा असल्या भाज्या त्याचा कुट घालून मस्त लागतात.

Lol
सिद्धार्थ माबोवर असता तर 'जीवनातील दु:खाचं कारण काय' असा प्रश्न न पडता जवस आणि अळशी एक का? असा मूलभूत सवाल त्या बोधिसत्त्वासमोर खडा राहता!

Pages