Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44
लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त पोस्ट पर्णिका!
मस्त पोस्ट पर्णिका!
असंच कळण करताना जरा आंबट ताक छान लागतं, त्यामुळे आजी ते कडधान्यांचं गरम असतानाच पाणी काढून त्यात आंबट्सर ताक एकत्र कालवून वरुन फोडणी देत असे. तूप जिर्याची फोडणी द्यायला लोखंडाची डाव होती ती चांगली तापलेली त्या कळणात चुर्र् आवाज करुन बुडवत असे. त्या पळीची आच इतकाच चटका. आणि मग ते तसंच लगेच पिऊन टाकायचं! यम्म!
अमित, मी आजच कळण केलं होतं.
अमित, मी आजच कळण केलं होतं. पाण्यात थोडं दही आणि ताक घालून चमचाभर डाळीचं पीठ घालून मी गरम करुन वरुन फोडणी देते. गरम प्यायला आवडतं म्हणून मग डाळी चं पीठ लावावं लागतंच.
मी पण युट्युब वर बघुन थोडं
मी पण युट्युब वर बघुन थोडं डाळीचं पीठ लावून गरम करतो. पण भारतात मला अस दाटसर प्यायलेलं आठवत नाही.
दाट नसतं. दही फुटू नये म्हणून
दाट नसतं. दही फुटू नये म्हणून अगदी चमचाभरच घालायचं.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
अमितव सॉलिड वर्णन केलंय
अमितव सॉलिड वर्णन केलंय तुम्ही, तिकडे सॅलेड इकडे कळण वाचूनच तोंडाला पाणी सुटतंय, दोन्ही करून पाहणार आहे.
कळण करताना डाळीचे पिठ नाही
कळण करताना डाळीचे पिठ नाही लावत. फक्त ताक घालून तूपाची फोडणी करायची, तेलाचीही करते क्वचित किंवा कधी कधी फोडणी करत नाही आणि मंद गॅस किंवा मावेत किंचित गरम करायचे, फुटत नाही. आलं लसूण मिरची ठेचा किंवा तुकडे घालते. मुळ कडधान्ये चव चांगली येते याने.
कढी करताना पिठ हाताने कालवते, ते अगदी थोडं घालते, डावाने गुठळ्या लवकर नाही मोडत. कढी नाही फुटत.
असं बेसन, ताक त्यावर फोडणी
असं बेसन, ताक त्यावर फोडणी आणि त्यात बारीक चिरलेला कांदा, असं करते आई. प्यायला नाही, तोंडी लावायला. त्याला डांगर म्हणतो आम्ही.
कळण मीही कडधान्य उकडलेल्या
कळण/कढण मीही कडधान्य उकडलेल्या पाण्याचं करते, मग शिवाय बेसन नाही घालावं लागत.
कुळथाचे कळण / कढण फार आवडते.
कुळथाचे कळण / कढण फार आवडते.
तूप जिरं (किंवा तेल मोहरी जिरं), मिरची, कढीलिंब ह्याची फोडणी करुन त्यावर कुळीथ शिजवलेलं पाणी ओतायचं. उकळी आली की त्यात किंचित साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. उकळी गेली की थोडे ताक घालून मीठ घालून ढवळायचे. वाटी वाटी भरून प्यायचे.
हो कळण्/कढण कडधान्याच्या
हो कळण्/कढण कडधान्याच्या उकडलेल्या पाण्याचंच करतात. जास्त करुन चवळीचं करतात. मला ते गरम करुन प्यायला आवडतं म्हणून मी बेसन घालते. बरीच लोकं शिजवलं रे शिजवलं की पाणी काढून तसंच पितात.
कुळथाच्या कळणाची कृती आवडली,
कुळथाच्या कळणाची कृती आवडली, करून पाहीन अश्विनी के
. धनिच्या कृतीने शेंगोळे करून थोडं पीठ उरलं होतं. दोन्ही कृती नवीन होत्या. कुळीथच नवा प्रकार आहे.
केकू, कढी केली का ?
हा केली ना. म्हटली तर फुटली
हा केली ना. म्हटली तर फुटली नाहीतर नाही फुटली. ह्याला आम्ही सुपरपोझिशन म्हणतो. पण चव छान होती.
दह्याला/ताकाला पीठ लावल की
दह्याला/ताकाला पीठ लावल की कढी फुटत नाही हे आई/आजी/साबा यांनी अगोदरपासून शिकवल होतं
, पण पर्णिका सविस्तर माहीतीसाठी धन्यवाद .
मला स्वयंपाक करायला फारसा आवडत नाही पण असं स्वयंपाकघरातलं विज्ञान वाचायला आवडतं आणि मग ते कधीतरी वापरायलाही आवडतं.
अरेरे, पुन्हा फुटली. चव छान
अरेरे, पुन्हा फुटली. चव छान होती ना मग जिंकलं.
एकाच वेळी फुटली आणि फुटली
एकाच वेळी फुटली आणि फुटली नाही.... केकू तुम्हा विज्ञानकथा लेखकांना हीच शिक्षा!
हवा असेल तर 
फुटीरतावाडी ताकाचा सविनय
फुटीरतावाडी ताकाचा सविनय कायदे भंग म्हणता येईल.
नशीब फुटकं असेल तर कढी फुटते असे पक्या म्हणाला. पुढच्या वेळी मुहूर्त बघून करेन.
(No subject)
>>> म्हटली तर फुटली नाहीतर
>>> म्हटली तर फुटली नाहीतर नाही फुटली
श्रोडिंजरची कढी.
धन्यवाद स्वस्ति.
धन्यवाद स्वस्ति.
केकु आता तुम्ही "श्रोडिंजरच्या काडीची" रेसिपी टाका इथे. एकाच वेळी फुटलेली आणि न फुटलेली कढी बनवणं हे काही येरागबाळ्याचे काम नोहे.
म्हणजे एकदम चोथापाणी झाली
म्हणजे एकदम चोथापाणी झाली नाही. पण कण कण दिसायला लागले होते, तिथेच थांबलो. आमच्या कडे कढीत ठेचलेले आले टाकतात आणि त्याची चब यावी म्हणून कढी खूप उकळतात. तितके उकळायचे धैर्य झाले नाही. रेसिपी नेहमीचीच अयशस्वी. ह्या वेळी मी बेसन आणि दही मिक्सर मध्ये एकत्र केले. नेहमी मी कढी उकळल्यावर थोडे बेसन लावतो . फोडणीत फक्त जिरे. आमच्याकडे कढीसाठी मोहरी वापरत नाहीत.
ते कण बेसनाचे होये का दह्याचे होते कल्पना नाही.
अमितव, स्वाती
अमितव, स्वाती
कडधान्य उकडलेलं पाणी + ताक + मीठ + जीरेपूड - ऑसम समर कूलर
कुळथाचं सर्वात चविष्ट लागतं. मग मटकी, पांढरी चवळी, मूग, आणि मग अन्य असा क्रम आहे.
मोहरीच्या फोडणीची कढी वेगळी
मोहरीच्या फोडणीची कढी वेगळी असते :
बेसिक ताकाची तयारी तीच. त्यात थोडं आलं किसून. मीठ-साखर.
याच्या फोडणीचा थाटमाट असतो - तेल (तूप नाही), मोहरी, लाल सुक्या मिरच्या, कसूरी मेथी, हिंग, काळे मिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र, कढीपत्ता, किसलेला लसूण
फार भारी लागते.
ही कढी जरा पातळ असलेली मला आवडते.
On second thought मला वाटते
On second thought मला वाटते की कढी पातळ झाली की फुटत असावी. मी जेव्हा ताक बाहेरून आणतो तेव्हा कढी हमखास फुटते असा अनुभव आहे. काल ही मी हळू हळू पाणी वाढवत गेलो आणि कढी फुटली. अस्मिताने आर्द्रता वगैरे काही म्हटले आहे ते हेच असावे.
काळण आवडतं पण मी करत नाही
काळण आवडतं पण मी करत नाही कारण पाणी काढलं की सत्व सगळं पाण्यात जातं आणि उसळ बेचव होते असं वाटत मला. पुरण करताना ही ह्याच कारणासाठी कट काढत नाही. कटाची आमटी करायची असेल तर वेगळी dal शिजवून घेते.
मला कढी खुप आवडते आणि ती
मला कढी खुप आवडते आणि ती फुटते. म्हणुन एकतर बेसन लाऊन करते नाहीतर आमचे मालवणी - खोबर्याचे वाटप लाऊन.
आईच्या मते कढीला उकळी आणायची नाही त्या आधी बंद करायचे. मी असे केले तरी नंतर फुटते.
माझ्या मते, बेसन किंवा खोबरे न लावताच ताक गरम करत ठेऊन वरुन फोडणी घातली तर फुटणार नाही. करुन बघायला हवे थोड्या ताकाचे.
खीर करताना शेवया गरम करुन वरुन दुध घातले तर माझे ते फाटते. इतरांचे फाटत नसावेही. मी दुध तापत ठेऊन त्यात शेवया घालते.
एकुणच दुधाच्या फॅमिलीत त्यांना दुसर्या पदार्थांमध्ये टाकले तर त्यांचे डोके फिरते हे माझे मत झालेले आहे. दुसर्या पदार्थाना यांच्यात टाकले तर महाराज शांत राहतात.
मापृ, आमच्या इथे डांगर असे
मापृ, आमच्या इथे डांगर असे लिहिलेली पुडी मिळते. तीत उडीदडडाळ पिठ , तिखट मिठ असते. मी ते दह्यात कालवले व कांदा घातला (त्यावर लिहिले होते). तोंडीलावण म्हणुन छान लागले.
खीर करताना शेवया गरम करुन
खीर करताना शेवया गरम करुन वरुन दुध घातले तर माझे ते फाटते. इतरांचे फाटत नसावेही.>>> तुपावर शेवया किंचित लालसर होईपर्यंत भाजून त्यात दूध (शक्यतो आधी तापवून ठेवलेले) घालायचे. ढवळत ढवळत शेवया दुधात शिजवायच्या. शेवया शिजून मोठ्या दिसू लागल्या की साखर, वेलची पूड, केशर वगैरे घालायचं. साखर घातल्यावर खीर जरा पातळ होते. ती मुळपदावर आली की गॅस बंद.
केशवकूल, रेडीमेड मस्ती दही
केशवकूल, रेडीमेड मस्ती दही मिळतं त्याची करुन पाहिली आहे का कढी?
मी ज्या पातेल्यात कढी करायची त्यात पहिल्यांदा मिरची, आलं, मीठ आणि कोथिंबीर असं ठेचून घेते आणि त्यात हवं तितकं दही घेऊन पाणी घालून फेटून घेते. ह्यातच हवं तितकं (गुजराती कढीला जास्त आणि मराठी पिवळ्या कढीला कमी) बेसन घेऊन गुठळ्या मोडून घेते. ह्यातच मीठ आणि साखर, मेथी दाणे घेऊन उकळायला ठेवते. मिडीयम गॅसवर मधे मधे ढवळत रहावं लागतं. मग तेल्/तूप फोडणी करुन त्यात जिरं, नावाला मोहरी, हिंग. मराठी कढी असेल तर हळद नाहीतर नाही.
मी चितळे दही वापरतो.
मी चितळे दही वापरतो.
कालची माझी कढी व्यवस्थित झाली होती पण हाव सुटली आणि मी पाणी वाढवत गेलो. आणि एका पॉइंटला कढी फुटल्यासारखी झाली. मला वाटते की पातळ पणाशी काही संबंध आहे.
Pages