Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44
लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चैत्रगंधा, साय फ्रिज बाहेर
चैत्रगंधा, साय फ्रिज बाहेर होती का? मी साय फ्रिझ मध्ये ठेवते मग भांडे भरत आले की त्यात विरजण लावुन ते ढवळुन बाहेर ओट्यावर रात्रभर किंवा दिवसभर ठेवते. ताक वा लोणी किंवा तुप कडु होत नाही. आणी भांड्यात सायीत आधी जरी विरजण घातले ( ताक किंवा दही ) तरी चमच्याने ते खालपर्यंत फिरवुन घ्यावे. म्हणजे विरजण नीट लागुन दही वा साय कडु रहात नाही.
रश्मी , साय फ्रिजमध्येच होती.
रश्मी , साय फ्रिजमध्येच होती. भांडे भरले की आदल्या दिवशी सकाळी बाहेर ठेवून दुसर्या दिवशी दुपारी केले होते लोणी. मी मिक्सरमध्ये करते.
भांड्यात सायीत आधी जरी विरजण घातले ( ताक किंवा दही ) तरी चमच्याने ते खालपर्यंत फिरवुन घ्यावे. >> हे पण केले होते.
मग दूधाचा प्रॉब्लेम असु शकतो.
मग दूधाचा प्रॉब्लेम असु शकतो. रतिबाच्या दूधात पण तसे असु शकते. कारण बर्याच वेळा डेअरी मध्ये ३-४ ठिकाण चे दुध एकत्र केले जाते. माझ्या माहेरी असे झाले आहे.
आईला तूपाचा वासही सहन होत
आईला तूपाचा वासही सहन होत नसल्याने आम्ही सदैव विकतचेच तूप आणत असू. पण मागच्या जूनपासून साय जमा करून घरीच तूप करायला लागलो. पहील्यांदाच साय जमा होऊन पंधराहून अधिक दिवस झाले होते म्हणून जरा साशंक मनाने साईला फ्रिजबाहेर काढून सामान्य तापमान होईस्तोवर ठेवले. नंतर विरजण लावून 24 तासानी तूप करायला घेतले तरीही अजिबात कडवटपणा आला नव्हता. त्यामूळे आता निदान 20 दिवसांची साय जमा करून तूप कढवतो. आमचेही रतीबाचेच दूध आहे. मात्र लोणी कढवतांना अजिबात वास येत नाही.
परत असं झालं तर (किंवा आधीच)
परत असं झालं तर (किंवा आधीच) विरजण बदलून बघा.
परत असं झालं तर (किंवा आधीच)
परत असं झालं तर (किंवा आधीच) विरजण बदलून बघा.>>>>>> एकदम बरोबर. कदाचीत आधीच्या कडवट विरजणामुळे चूकुन असे झाले असेल.
मी गेल्या रविवारी अशक्य
मी गेल्या रविवारी अशक्य माकाचू केले.
देविका यांची रेसिपी वाचून बेक्ड बाकरवडी बनवायचा प्रयत्न केला. त्यांनी २३० फॅ. ला दोन तास ओवन मधे ठेवायला सांगितले होते. मी ओवनचे सेटींग करून आरामात आंघोळीला गेलो. तज्ञ लोकांना सांगितले होते दोन तास लागतील म्हणून. मधून मधून पलटावे लागेल वगैरे.
त्यांनी मधेच २० -२५ मिनिटात मला हाक मारून सांगितले ते आता काढायला पाहिजे जळल्याचा वास येतोय. आणि मला न विचारता काढले पण ओवन मधून. खरेच काही ठिकाणी काळे झाले होते. एकदम टणक झाल्या होत्या बाकरवड्या. पण चावता येत होत्या. करपल्या नाहीत पण चव बंडल झाली होती.
आता माकाचू.
चव बंडल होण्याचे कारण : माझ प्रमाण काहितरी गंडल होत. धन्याची चव जास्त प्रॉमिनंट होती.
टणक आणि लवकर होण्याचे कारण : मी २३० सें ला सेटींग केले होते.
माझे घरी लावलेले दही चवी ला
माझे घरी लावलेले दही चवी ला उत्तम होते पण सैल होते कायम.
ईथे दह्याचा धागा आहे माहीत आहे पण इतके वाचायचा पेशन्स नाही, एखादी बेस्ट दही लावणे युट्युब लिन्क आहे का?
मधूरा रेसिपी वाली मिल्क पावडर घालायला सान्गते मला नेहमी साठी घालयची नाही मि.पा. दह्यात.
विरजण कोमट दुधात घालून
विरजण कोमट दुधात घालून चमच्याने 40 ते 50 वेळ ढवळत राहायचे.
किंवा विरजण दुधात घालून एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात,जरा वर धरून ओतायचे.असे 4-५ वेळा करायचे.माझा नवरा हे करतो.मला ते भांडे खराब होते ते पाहवत नसल्याने मी बाहेर जाते.पण दूध गाईचे असूनही दही चांगले लागते.
किचन ते हाॅल/बेडरुम असं धावत
किचन ते हाॅल/बेडरुम असं धावत रहायचं का?
धावत नाही ग ढवळत रहायचे.ऑटो
धावत नाही ग ढवळत रहायचे.ऑटो करेक्ट्ची कमाल!
40 ते 50 वेळा ढवळायचे???
40 ते 50 वेळा ढवळायचे???
मी विरजण कोमट दुधात घालून एकदाच ढवळते आणि हॉट बॉक्समध्ये डबा ठेवते.वर्षभर दही लावते.घट्ट, चवीला पण छान बनते.इकडे गाईचेच दुध मिळते.
मी ही तो उपद्व्याप करत नाही
मी ही तो उपद्व्याप करत नाही.मी दही लावायचे त्यावेळी 1-२ वेळा चमचा फिरवायचे.मला जरा गोडसर दही आवडते तर नवऱ्याला आंबट दही आवडते.मग त्याने सूत्रे आपल्या ताब्यात घेतली.
रश्मी , साय फ्रिजमध्येच होती.
रश्मी , साय फ्रिजमध्येच होती. भांडे भरले की आदल्या दिवशी सकाळी बाहेर ठेवून दुसर्या दिवशी दुपारी केले होते लोणी.
<<
विरजण बदलण्याचा सल्ल आहे तो योग्य आहे. डेअरीतून (साध्या गल्लीतल्या कोपर्यावरच्या डेरीतून. चितळे फितळे नाही. ते पाश्चराईज्ड दही असते.) दही आणा, किंवा चांगल्या शेजार्या कडून.
दुसरे, 'सायिचे दही' हे दही करायचे असते. फ्रीजमधे त्याचे 'दही' होत नाही.
बायोकेमिस्ट्री: दुधाचे दही होताना, लॅक्टोबॅसिलस नावाचे गुड बॅक्टॅरिया दुधातील प्रत्येक फॅट थेंबा भोवतीचे केसीन नामक प्रोटीनचे आवरण तोडून आतील फॅट उर्फ लोणी वेगळे करीत असतात, तसेच इमल्शन मोडून काढत असतात. हे जर नीट झाले नाही, तर दही, अन पर्यायाने लोणी, अन म्हणून तूप कडू लागेल.
अर्थात, दही लागेपर्यंत सायीचे भांडे रोज बाहेर ठेवणे हा एक इलाज आहे. कारण बॅक्टेरिया च्या वाढीसाठी शरीराच्या नॉर्मल टेम्परेचर इतकी उष्णता गरजेची आहे. फ्रीजात अती थंड होते.
रोजची साय विरजण न लावता
रोजची साय विरजण न लावता साठवून फ्रीजमध्ये ठेवली आणि ताक करायच्या आदल्या दिवशी बाहेर काढून, रूम टेंपरेचरला आणून रात्री विरजण लावलं तरी चालतं. एकूण एकच.
वर राहुल बावणकुळे यांनी तेच लिहिलंय. आत्ता बघितलं.
थॅन्क्स देवकी.
थॅन्क्स देवकी.
मृणाली, मी पण तसेच करते फक्त हॉट बॉक्स ऐवजी ओव्हन मधे ठेउन देते. पण घट्ट नाही होत.
काल मलई कोफ्ते करायला घेतले
काल मलई कोफ्ते करायला घेतले कुणाल कपूरची रेसिपी बघून. ग्रेव्ही छान झाली. पण कोफ्ते पार फसले. तेलात सोडल्यावर पूर्णपणे पसरले. एकही कोफ्ता नीट निघाला नाही . बटाटा उकडून किसून घेतला म्हणून झालं असेल का? मॅश करून घ्यायला हवा होता का?
बहुतेक नवीन बटाटे असले की हा
बहुतेक नवीन बटाटे असले की हा घोळ होतो.एकदा माझेही मटार्/वाटाणा पॅटीस अशा बटाट्यांमुळे फसले होते.तेलात बटाट्याची पारी विरघळायची.मग ब्रेड स्लाईस मिसळल्या.
काही फिलर होते का? म्हणजे
काही फिलर होते का? म्हणजे एखादे पीठ वगैरे?
)
आणि तेल नीट तापले होते का?
थोडा पाणी कंटेंट जास्त असेल बटाट्यात,उएकदम मऊ उकडले जाऊन किसले असतील तर
(माझे भूतकाळातले अनेक हसलेले कोफ्ते, पॅटिस आठवून एकदम भावनिक झाले
कॉर्नफ्लॉअर टाकले होते. पण
कॉर्नफ्लॉअर टाकले होते. पण फार काही फरक पडला नाही.
तेलात टाकल्यावर एका बाजूने छान गोल व्हायचे, पलटले की लगेच पसारा. शेवटी पनीरचे तुकडे ग्रेव्हीत टाकून खाल्लं.
अजून उरले असतील तर मैदा पाणी
अजून उरले असतील तर मैदा पाणी मीठ यांचे पातळ सोल्युशन करुन यात बुडवून आणि रव्यात घोळवून चप्पट पॅटिस तव्यावर तेलात खमंग परतून खाता येतील.
)
किंवा पराठे थालीपीठ पण छान होतील कणिक घालून.
(व्हेन लाईफ गिव्हज यु हसणारे कोफ्ते, टेक देअर स्विमिंग स्पेस अवे फ्रॉम देम
तेच केलं. मक्याचे दाणे भरडून
बटाटे उकडून लगेच गरम असता
बटाटे उकडून लगेच गरम असता किसायचे नाही. किसण्याआधी 2तास उकडून ठेवायचे आणि गार होऊ द्यायचा.
कुकरमध्ये उकडणार असेल तर तळाशी पाणी ओतावे पण बटाट्याच्या भांड्यात पाणी टाकू नये. फक्त वाफेवर शिजले पहिजेत. (यूट्यूब रेसिपी साभार)
माझं पिठलं नेहमी खूप घट्ट
माझं पिठलं नेहमी खूप घट्ट होते , काय बरे चुकत असेल . काल तर पाणी खूप घेतला होतं नि थोडंसं पीठ , तरी पण खूप घट्ट झाला सगळे व्हेरिएशन प्रमाण , पाणी करून झाले, टेस्ट चांगली होते पण घट्ट च काय करू ?>
पाण्यात पीठ कालवून ते मिक्स फोडणीत घालता का ?
उत्तर हो असेल तर फोडणीत पाणी घालून त्या पाण्याला उकळी आली कि त्यात पीठ पेरून करून बघा .
बटाटे उकडून लगेच गरम असता
बटाटे उकडून लगेच गरम असता किसायचे नाही. किसण्याआधी 2तास उकडून ठेवायचे आणि गार होऊ द्यायचा >>
हे कसं व्हायचं? आमचं रेसिपीत उकडलेले बटाटे टाका वाचलं की अरे बटाटे उकडायचे राहिलेच की!. काही हरकत नाही लाव मावेत अशी तऱ्हा असते.
अमितव जोक आवडला. उकडलेले
अमितव जोक आवडला. उकडलेले बटाटे रेसिपी करताना पुर्ण थंड असावेत त्यामूळे मिश्रण पातळ होत नाही.
बटाटे उकडून लगेच गरम असता
बटाटे उकडून लगेच गरम असता किसायचे नाही.>>> आमच्याकडे अगदी हेच चुकलं. अतिऊत्साही मंडळींनी वाफाळणारे बटाटे किसले, आम्ही किती भारी काम करतोय या अविर्भावात. पूर्ण मिश्रण चिकट पातळ झालं आणि कोफ्ते खिदळले तेलात जाऊन.
>>उत्तर हो असेल तर फोडणीत
>>उत्तर हो असेल तर फोडणीत पाणी घालून त्या पाण्याला उकळी आली कि त्यात पीठ पेरून करून बघा . .....
पाण्यात पीठ मिक्स करून घेते मग फोडणी करून मग फोडणीत टाकते ,, नेहमीच घट्ट होत पिठले ... आता अस करून bhagatey मग
अमितव, उकडून झाले की लगेच थंड
अमितव, उकडून झाले की लगेच थंड पाण्यात टाकायचे तरीही गरम वाटत असले तर दोन मिनिटं फ्रिजर मध्ये ठेवायचे.
स्वयंपाक करतच असतो आपण त्यामुळे फ्रिजर मध्येच विसरून जात नाही आपण.
रात्री दही लावताना माझं असं होतं: फ्रीज मधनं दूध काढून गॅस वर कोमट करायला ठेवायचं.
मग विसरल्या मुळे ते उकळायला लागतं. मग फ्रिजर मध्ये कोमट होई पर्यंत गार व्हायला ठेवायचं. ते एक दोन वेळा मध्ये चेक होतं, तेव्हा ते अजून चांगलंच गरम असतं. तिसऱ्यांदा आठवण येते तेव्हा धावत जाऊन बघायचं तर ते थंडगार झालं असतं.
मग परत सायकल रिपीट होऊ नये म्हणुन, कोमट होई पर्यन्त गॅस समोरच उभं राहायचं आणि दही लावायचं.
मानव, तुमचं आयुष्य किती
Pages