विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इतका फरक?? काहीतरी गडबड आहे नक्की. असा कुठला घटक होता फरक पडायला?? रिसल्ट स्वीकारण्यायोग्य नाही.

ह्यावरून बिहार मध्ये राज्यात पहिल्या आलेल्या रुबी रॉय ह्या मुलीचा किस्सा आठवला. तिने तिच्या काकाना सेटिंग लावून फक्त पास करा असे सांगितले होते. पण तिच्या काकानी तिला राज्यात टॉपर केले. Happy

शरद पवारांनी काल १५७ जागा येतील असा अंदाज सांगितला होता.
पण शतं स्थानचा आमदार फितूर झाला.

वा वा! महायुतीचा लँडस्लाइड विजय.
आता फडणवीसांनी रात्री वेशांतर करून लपत छपत कोणाला भेटायला जावं लागणार नाही.
या विजयाचं बक्षीस म्हणून मोशांनी त्यांना केंद्रात अर्थमंत्री करावं.

माहीममध्ये अमित राज ठाकरे तिसर्‍या क्रमांकावर हे धक्कादायक आहे. अर्थात अजून १८ पैकी ४ च फेर्‍या झाल्यात.

वरळीत आदित्य ठाकरे किंचित पुढे आहेत. इथे अजूनही घराणेशाहीचा पराभव होऊन राज्यसभा खासदार मिलिंद देवरा निवडून येऊ शकतील.

ह्यावरून बिहार मध्ये राज्यात पहिल्या आलेल्या रुबी रॉय ह्या मुलीचा किस्सा आठवला. तिने तिच्या काकाना सेटिंग लावून फक्त पास करा असे सांगितले होते. पण तिच्या काकानी तिला राज्यात टॉपर केले. Happy

नवीन Submitted by अमरेंद्र बाहुबली on 23 November, 2024 - 10:47
>>>>>>>>>>
३५ लाख का तो हमारा investment है.... तो ३६ लाख का घाटा कैसे हो गया......

 वा! महायुतीचा लँडस्लाइड विजय.
आता फडणवीसांनी रात्री वेशांतर करून लपत छपत कोणाला भेटायला जावं लागणार नाही.
या विजयाचं बक्षीस म्हणून मोशांनी त्यांना केंद्रात अर्थमंत्री करावं.>>>>>किती जळफळाट.. कधी कधी वाटत तुम्ही संजय राऊतांचा माबो वरचा डु आयडी आहात

२५ फेर्या बाकी आहेत. पण सुरूवातीच्या फेर्यात जो कल दिसतोय त्यावरून मविआने धडा घेतला पाहिजे. ज्या घटकांनी लोकसभेला ३१ जागा दिल्या, त्यातल्या मुस्लीम समाजाला फार काळ गृहीत धरू नये. लोकसभेला शून्य ठिकाणी उमेदवारी दिली तरी मुस्लिमांनी १२% मतं पारड्यात टाकली. दलितांनी १२% मतं पारड्यात टाकली. २८८ जागांवर अगदीच नगण्य उमेदवारी देऊन मूठभर घराण्यातल्या सर्व नातेवाईकांना ज्या उमेदवार्या दिल्या आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी इथून पुढे या नातेवाईकांचेच मतदान घ्यावे. इतरांनी फुकट यांच्यासाठी राबणे सातत्याने शक्य नाही.

अर्थात नातेवाईक इकडून विजयी झाले नाहीत तरी महायुतीतून पुन्हा तेच आहेत. त्यामुळे परिणाम तोच.
विचारधारा म्हणजे मतदारांना गाढव बनवणे आहे. अजून किती काळ मतदार गाढव बनतात त्यावर यांचे दुकान चालत राहील.

मी सकाळपासून इंडिया पाकिस्तान मॅच पाहायला मिळणार म्हणून खुश होतो पण ही तर इंडिया झिंबांब्वे निघाली. आता एव्हढे पॉपकॉर्न आणि कोक काय करायचे? आता अधूनमधून राऊत आणि उबाठा टिविवर येऊन मनोरंजन करतील तेच काय. फुकट गेला शनिवार.

वा वा ! महाराष्ट्र विधानसभेत आता विरोधी पक्षनेता असणार नाही. महाविकास आघाडीत कोणालाही २९ जागा मिळत नाहीत. काँग्रेसची ही आतापर्यंतची सगळ्यात वाईट कामगिरी असावी.

भाजपचं एकहाती बहुमत थोडक्यात हुकतंय. Sad

रिसल्ट स्वीकारण्यायोग्य नाही
राऊत हेच बोलले थोडा वेळ आधी

आता फडणवीसांनी रात्री वेशांतर करून लपत छपत कोणाला भेटायला जावं लागणार नाही
किती ती जळजळ. किती तो वैयक्तिक राग

रिसल्ट स्वीकारण्यायोग्य नाही
राऊत हेच बोलले थोडा वेळ आधी

आता फडणवीसांनी रात्री वेशांतर करून लपत छपत कोणाला भेटायला जावं लागणार नाही
किती ती जळजळ. किती तो वैयक्तिक राग

राग कसला? फडणवीसांसारख्या अभ्यासू नेत्याला अशी कामं करावी लागत याचं मला खूप वाईट वाटत होतं. २०१४ साली त्यांचा चेहरा कसा होता आणि आता कसा आहे बघा. मला त्यांच्यासाठी फार वाईट वाटतं.

मला तुमच्या बद्दल वाईट वाटतंय, तुमची जळजळ होतेय, चिडचिड होतेय ते दिसतय. थोडे दिवस सोमी पासून ब्रेक घ्या. डेटॉक्स व्हा.

मी सकाळपासून इंडिया पाकिस्तान मॅच पाहायला मिळणार म्हणून खुश होतो पण ही तर इंडिया झिंबांब्वे निघाली. आता एव्हढे पॉपकॉर्न आणि कोक काय करायचे? आता अधूनमधून राऊत आणि उबाठा टिविवर येऊन मनोरंजन करतील तेच काय. फुकट गेला शनिवार.

नवीन Submitted by बोकलत on 23 November, 2024 - 11:13
>>>>>>>>>>>>
उद्या आयपीएल ऑक्शन आहे.

फडणवीसांना केंद्रात अर्थमंत्री केलं पाहिजे यात राग कसा? भाजप समर्थक सुद्धा निर्मला सीतारामन यांच्यावर नाराज आहेत. त्या पदासाठी भाजपकडे फडणवीसांसारखा दुसरा नेता नाही. पीयुष गोयल यांना ट्राय केलं होतं. पण मोदींना आवडले नसावेत.

आता अर्थमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली की पुढे पंतप्रधानपदही हक्काने मिळेल. भारताला मराठी पंतप्रधान मिळेल. Happy

भाजप समर्थक नेहमीप्रमाणे विजयसुद्धा ग्रेसफुली घेऊ शकत नाहीत असं दिसतंय. त्यांची अपेक्षा होती मी रडारड करेन. अपेक्षाभंग झाल्यामुळे चिडलेत.
मस्त पेढे आणा. शिकरण आणि वाटाण्याची उसळ खा. आणि ताणून द्या.
माझे प्रतिसाद वाचून त्रास कशाला करून घेता?

महायुतीचं अभिनंदन. भाजप स्वतःचाच रेकॉर्ड तोडताना दिसतोय. चांगलं यश मिळालं. ह्यावेळी भाजपला यश मिळेल असं मनातून वाटत होतं पण तरीही राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही असंही वाटलं.

भाजपचं विशेष अभिनंदन.

Pages