विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पवार साहेब बीएमसीसी ला तर माझे वडील फर्गसनला >> ?? >> ही दोन्ही कॉलेजेस एकाच संस्थेची आहेत. नेस वाडिया आणि नौरोसजी वाडिया प्रमाणेच आर्ट्स सायन्सचे एक आणि कॉमर्सचे एक.

अमरेंद्र बाहुबली >> इतक्या दिवसात तुम्ही हैद्राबादचे आहात एव्हढीच तुमची माहिती आहे. वडील हयात नाहीत त्यामुळे त्या काळी आजच्या वाडियाप्रमाणेच एका कँपसमधल्या एका संस्थेच्या दोन कॉलेजेसना एकच कॉलेज म्हणण्याची पद्धत असेल असे म्हणायचे होते पण वडलांच्या निधनावरून ( या वर्षीच गेले ते) सुद्धा तुम्हाला विनोद सुचण्याची शक्यता आहे. कारण माझ्या या पोस्ट्च्या आधीच्या पोस्स्ट्स. अर्थात या एका उल्लेखामुळे बाकीची पोस्ट चुकीची ठरत असेल तर तुम्ही ते करू शकता. तुमचे रेकॉर्ड पाहता ते अशक्य नाही.

प्रमोद महाजन यांनी शरद पवारांच्या एकसष्टीनिमित्त सकाळ मधे लिहीलेल्या लेखात सुद्धा फर्गसन, बीएमसीसी या कॉलेजेस मधून पवारांनी बारामतीच्या विद्यार्थ्यांना एकत्र केल्याचा उल्लेख आहे. त्या काळी बहुधा पवारांची आणि प्रमोद महाजनांची युती असेल असा ज्योक मारू शकता.

शरद पवार बीएमसीसीलाच शिकले.
कॉलेजच्या निवडणुकीत ढोल ताशे आणून प्रचार करण्याच्या पध्दतीचा श्रीगणेशा त्यांनीच केला. कॉलेजच्या निवडणूका नेहमी तेच जिंकायचे हे वेगळे सांगायलाच नको. तेंव्हांपासून त्यांचे निवडणुकांत नवनवीन कल्पना आणून त्या जिंकायचे कसब दिसून यायला लागले होते. इव्हेंट मॅनेजमेंट ही त्यांच्यात तेंव्हांपासून आहे.

शरद पवार म्हणजे एकदम जबरदस्त माणूस.
_/\_

भाजपशी त्यांना काहीही सोयरसुतक नाही. एकदा फक्त फडणवीसला घरी बसवुद्या. त्या दिवसापासून ते भाजपला शिव्या देणे सुरू करतील. >>
Happy Happy Happy

आधीच भाजप चा निट प्रचार करायचा की राव. उगाच शेअर बाजाराच्या gotya खेळत बसलात खिक्क. >>
मी तरी खालच्या भावात खरेदी करत राहिलो आहे. २० तारखेला मतदानाचे प्रमाण वाढत चालले असल्याचे लक्षात आल्याबरोबर शेअर बाजार वरती यायला लागेल असं गृहित धरलेलं आहे.
Happy

गेल्या २.५ वर्षात फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी काय चांगली कामे केली किंवा मोदींनी दहा वर्षांत काय केले हे वाचायला आवडेल पण कल्पनेवर आधारलेल्या कथांचा , खोट्याचा आधार घ्यावा लागावा एव्हढी पण परिस्थिती वाईट नसावी.

या आधी पण कपोलकल्पित कथा वाचलेल्या आहेत. कथेमधे भ्रष्ट आमदार हा कायम काँग्रेसचाच किंवा नंतर सेनेचा असायचा. मोडस ऑपरेंडी आहे.

रघू आचार्य विनोद तुमच्या लिखाणावर होता नाकी तुमच्या वडिलांवर. तरीपण माफी मागतो.

भाजप समर्थक ट्विटर हँडल मि. शर्माने म्हटलंय - प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिराच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. आता हे व्हायरल केलं जाईल / केलं गेलं असेल.
माझ्या चुलत काकांनी गझवा ए हिंद असे शब्द असलेला मेसेज मला फॉर्वर्ड केला. त्याआधी हिंदू म्हणवून घेणार्‍यांना नमस्कार अशी सुरुवात असलेल्या भाषणाची क्लिप पाठवली. त्यांना , मी तुम्हांला मतदान होईपर्यंत ब्लॉक करतोय असं सांगून ब्लॉक केलं.

आमच्या सोसायटीतला भाजप कार्यकर्ता भाजपने छापलेल्या व्होटर स्लिप्स वाटताना म्हणाला - मोदी जी को लाना है.

मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले बघायला नक्की आवडेल.

मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले बघायला नक्की आवडेल. >>
तो लागलीच दारूबंदी करेल.
चालणारेय का?
Wink

अमरेंद्र बाहुबली धन्यवाद.
त्यात विनोदी काहीही नाही. पूर्वी आर्ट्स आणि सायन्स चे कॉलेज असायचे. बहुतेक सुरूवातीला सर्व शाखांना बीए हीच डिग्री असायची. त्यानंतर सायन्सची डिग्री मिळू लागली. इंजिनियर ला बीएससी मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशी डिग्री असायची.

कॉमर्स सुरू झाल्यानंतर कदाचित वेगळे कॉलेज काढायला लागले असेल.

आता क्रॉस चेक केलं.
बीएमसीसी कॉलेज हे फर्ग्युसनच्या सध्याच्या amphitheater मधेच सुरू झाले होते. बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडीकेट ने 2 लाख रूपयांची मदत केल्याने संस्थेच्या नावावरून नाव ठेवावे लागले.

कॉमर्स कॉलेज साठी विद्यापीठाच्या नियमांमुळे वेगळे कॉलेज करावे लागले का? बघावे लागेल. नौरोसजी वाडिया आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स या नावाने रजिस्ट्रेशन असल्याने कदाचित कॉमर्स साठी वेगळे कॉलेज काढायला लागले असेल.
आर्ट्स सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स अशी कॉलेजेस पाहण्यात आहेत.

नौरोसजी वाडिया आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स या नावाने रजिस्ट्रेशन असल्याने कदाचित कॉमर्स साठी वेगळे कॉलेज काढायला लागले असेल. >>> मुंबईतील या प्रकारचे एक उदाहरण माझ्या पहण्यात आहे - के जे सोमैय्या आणि एस के सोमैय्या कॉलेजेस - मुंबई विद्याविहार इथे आहेत, सुरवातीला फक्त के जे सोमैय्या होते ज्यामध्ये सायन्स विभाग नव्हता, जेंव्हा एस के काढले तेंव्हा त्यामध्ये आर्टस्, कॉमर्स आणि सायन्सही सुरु केले University Grants Commission (UGC) च्या अप्रूव्हल्स साठी असं काही तरी करतात हे ऐकलेलं.

शाम भागवत, तुम्ही किती गोष्टी गृहीत धरता? >>
Happy
आज तरी २ टक्के फायद्यात आलोय.
उद्या आणखी फायद्यात येईन असं आत्ता तरी वाटतंय.

गृहितक नुकसानीत येईल असं वाटलं तर सोडून द्यायचं.
हाकानाका.

एस के काढले तेंव्हा त्यामध्ये आर्टस्, कॉमर्स आणि सायन्सही सुरु केले University Grants Commission (UGC) च्या अप्रूव्हल्स साठी असं काही तरी करतात हे ऐकलेलं. >> सेम हिअर.

बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडीकेट ने 2 लाख रूपयांची मदत केल्याने संस्थेच्या नावावरून नाव ठेवावे लागले. >>
बरोबर.
बांधकाम, आतील सर्व लाइट, फॅन वगैरे सगळंच सगळं करून द्यायचं मान्य केल्यावरच नाव दिलं.

या उलट गरवारे कॉमर्स कॉलेजचं झालं.
५ लाखाचे शेअर्सच्या बदल्यात नाव बदलली. नंतर त्या शेअर्सचे फक्त कागद झाले. थोडी फार रोख रक्कम मिळाली. पण ५ लाखाच्या मानाने ती फारच किरकोळ होती.

फर्ग्युसन ला शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि अन्य काही लोकांनी मदत केली होती. शाहू महाराज डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे तहहयात अध्यक्ष होते.
नाना पेठ कि गुरुवार पेठ इथे सुरूवातीला पाच सहा वर्षे एका वाड्यात कॉलेज भरत असे. शाहू महाराजांच्या सांगण्यावरून नानासाहेब शिरोळे पाटील यांनी त्यांची 35 एकर जागा 99 वर्षाच्या लीज ने दिली होती.

आले आले शेअर मार्किट एक्स्पर्ट भागवतजी आले ज्यांना पाहताच बैलं मुसंडी मारतात आणि अस्वलं गुहेत जाऊन लपतात ते शेअर मार्केटमधले शेर आले.

हो भरत, आता लंच टेबल वर हेच बघत होतो आम्ही. काय निर्ढावलेले आहेत आणि ह्या विनोद तावडे ला का हे करावेसे वाटले? निवडणूक हरणार असे दिसताच शहा ने सांगितल्या प्रमाणे वागत आहेत, साम दाम दंड भेद काहीही करा पण सत्ता आणा. भाजपा कुठून कुठे पार रसातळाला गेलाय. हा तावडे यंदा मुम पदाचा दावेदार होता म्हणे ह्यांचा. नंबर आला तर ह्याला बनवतीलच , एकेक निकष पूर्ण करत आहे.
आजच बातमी आहे सकाळला की ऑपरेशन लोटस फार नेटाने चालू आहे कर्नाटकात. अवघड आहे.

अनिल देशमुख यांच्यावर फार वाईट प्रकारे हल्ला झाला. फार लागलं त्यांना, निषेध.

विनोद तावडेना मुख्यमंत्री व्हायचं नाहीये की काय, असे काय उद्योग करतात. असा पैसेवाटप डायरेक्ट मोठ्या पदावरची माणसे स्वत: करत नाहीत खरंतर, पडद्यामागून असतात मोठी लोकं असं आत्तापर्यंत ऐकून होते. मग आता मुख्यमंत्री ते होत नाहीत.

फडणवीस यांनी केलं असेल तर त्यांनाच ते पद हवं आहे, नाही नाही म्हणता मुख्यमंत्री त्यांनाच व्हायचं आहे, तेच होतील.

आले आले शेअर मार्किट एक्स्पर्ट भागवतजी आले ज्यांना पाहताच बैलं मुसंडी मारतात आणि अस्वलं गुहेत जाऊन लपतात ते शेअर मार्केटमधले शेर आले.. >>

बाकीच्यांचे माहीत नाही. माझी खरेदी आज २ टक्के फायद्यात आलीय. उद्या मतदान वाढतंय असं वाटलं तर होल्ड करणार. नाहीतर जेवढा फायदा मिळतोय तेवढा वसूल करायचा.
Happy
यात गृहितकं फार. Wink

अगदी ३ दिवसांपूर्वी म्हणजे १५ तारखेला फडणवीसांकडून 'तावडे हे राष्ट्रीय नेते, मी छोटा नेता' असे वक्तव्य आलेले, तेंव्हाच मी समजून गेलेलो तावडेची रिटर्न जर्नी चालू झालीये....माणूस महाभयंकर कपटी बाबा, 'भगवान ऐसा दोस्त किसी दुश्मन को भी ना दे' हे देवा भौ वरूनच आलाय बहुतेक... Rofl

https://www.instagram.com/abpmajhatv/reel/DCYo2posepk/

उद्या मतदान वाढतंय असं वाटलं तर होल्ड करणार

7 दिवसाच्या पडझडी नंतर आज मार्केट वर आलंय. माविआसाठी शुभ संकेत म्हणायचा का की पुरोगामी साहेबांच्या भिजण्याचा "शकुन" कामी आला.

शाम भागवत, तुम्ही किती गोष्टी गृहीत धरता? >>

जरा धाग्याच्या उद्देशातून उत्तर देतो. नाहीतर बोकलत सर रागावतील. Happy माझे सगळ्यांत मोठे गृहितक हे मतदान वाढेल हे आहे.

मतदान टक्केवारी वाढण्याची कारणे खालील असावीत असे वाटते आहे.
१. मोदी शहा आपल्याला गृहीत धरायला लागले आहेत अशी समजून भाजपाला मत देणाऱ्यांची व्हायला लागली होती. त्यांसाठी एक हलकासा धक्का मोदी शहांना बसावा अशी एक सुप्त इच्छा जाणवत होती. पण मोदींचे बहुमत जावं एवढा काही राग नव्हता. त्यामुळे भाजपा २४० पर्यंत आल्यावर त्या लोकांच्या लक्षात आलं की जरा जास्तच जोरात धक्का मोदी शहांना मारलाय. ती लोकं परत येतील.

२. ४००+ पर्यंत आरामात आपण जातोय या नादात काही लोकं फिरकलीच नाहीत. ४००+ नाऱ्यामुळे गाफीलपणा वाढला. पूर्वी शिवाजी महाराज शत्रूगोटात गाफीलपणा यावा यासाठी शरणागतीची हूल उठवत असत. इथे तर आपलीच लोकं गाफील राहण्यासाठी प्रयत्न केला गेलाय. ती चूक दुरूस्त होताना दिसते आहे.

३. यावेळेस आरएसएस सक्रीय झालीय असे वाटतंय. लोकसभेत जरा थंडपणा जाणवला होता. नेहमीची उत्साही मंडळी गायब झाल्याचे लक्षात आले होते. ती परत दिसायला लागली आहेत.

४. बांगला देश फॅक्टर खूप प्रभावी ठरेल असे वाटतंय. सैन्य व रेल्वेच्या खालोखाल वक्फ बोर्डाकडे जमीन आहे हे बऱ्याच जणांना प्रथमच कळतंय असं वाटतंय. वक्फ बोर्डावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही याउलट हिंदूंच्या मंदिरांवर सरकारचे संपूर्ण नियंत्रण हा आपपर भाव प्रथमच हिंदू धार्मिक लोकांच्या लक्षात येतोय. त्यामुळे किर्तनकार, प्रवचनकार, वारकरी आपआपसात काही बोलत असतील तर तो अंडर करंट खूप मोठा असू शकतो.

५. नेमानी सारख्या लोकांनी आपल्या मागण्या ऊघडरित्या मांडायला सुरवात केल्याने मविआची पंचाईत होतीय तर लोकांमधे धृविकरण होतंय. बंद दाराआड करायच्या गोष्टी हा माणूस सर्व दारं खिडक्या सताड उघडून का करतोय हे उबाठामधल्या कित्येकांना कळेनासं झालं असेल. Wink

६. भाजपाच्या धोरणांना आंतरराष्ट्रीय परिस्थिती खूप अनुकूल आहे. आहेरे वर्गातले, सुशिक्षीत, परदेशात राहणारे असे बरेच हिंदू आहेत की ते भाजपाच्या मुस्लीम धोरणांबाबत संपूर्णपणे तटस्थ आहेत. मुस्लीमांनी देवळे फोडली. लोकं मारली हे त्यांना माहीत आहे. पण त्याचे त्यांना सोयरसुतक फारसे नाही. तो इतिहास झाला. तो आता उगाळून आता काय फायदा हा त्यामागे व्यवहार्य विचार असतो. पण मुस्लीम राष्ट्रांत मंदिरे उभारायला मुस्लीमच मदत करताहेत हे पाहिल्यावर तेही प्रथमच विचार करायला लागले आहेत. स्पेन, इंग्लंड, जर्मनी मधे मुस्लीमांचे अतिरेकी वागणे व त्यावर त्या देशांनी केलेली कार्यवाही यामुळे यालोकांना प्रथमच असे वाटायला लागले आहे की भाजपा जे काही मुद्दे मांडतो आहे त्यात काहीतरी तथ्य असावे. बांगलादेशातील घटनांमुळे या सगळ्यावर फोकस पडून जणूकाही त्याकडे बहिर्गोल भिंगातून तपासणी सुरू झाली आहे.

७. कॅनडा प्रकरणातूनही भारताचे हित व अहीत या मुद्यांतून परकीय भारतीय विचार करायला लागले की काय असे वाटायला लागले आहे.

७. यातूनच ट्रंप हा भारताचा मित्र व ओबामा वगैरे भारताचे हितशत्रू असा काहीसा प्रकार अमेरिकेत प्रथमच होऊन डेमोक्रोटीक पक्षाकडील हिंदू मते रिपब्लिकनांकडे वळली असावीत असा संशय यायला लागला आहे. ट्रंप यांचा विजय ऐतिहासीकच मानावा लागेल. दोन्ही सभागृहे व इलोक्टरल मतांनामधील त्यांचा विजय हा काही निसटता विजय म्हणता येत नाहीये . त्याला निर्विवाद विजयच म्हणायला लागेल. या सर्व घडामोडींचे पडसाद त्यांच्या भारतातील नातेवाईक व परिचीतांमधे उमटणे साहजिक आहे. त्यामुळे परदेशीय भारतीयांचे भारतातील नातेवाईक व तत्सम श्रेणीतील आहेरे वर्गातली लोकं प्रथमच भाजपाचा मुस्लीम विरोधाकडे डोळसपणे पहावयास सुरवात करायला लागले असावेत असं वाटू लागलं आहे. याबाबत नारायण मूर्तींचे उदाहरण दिलेले आहेच.

या सगळ्यामुळे हिंदूंचे मतदान वाढेल अशी मी समजूत करून घेतलेली आहे Happy

त्याच बरोबर यातूनच मी काश्मिर व हरियाना निवडणूकांकडे पाहातो आहे. मला असे वाटते आहे की,
१. हिंदूं हितैषी मतदान वाढण्याचा गेल्या ४० वर्षांचा कल चालूच राहीलेला असून, प्रथमच हिंदूबहुल जम्मूमधून कॉंग्रेस संपूर्णपणे उखडली गेली आहे. पंडितांच्या पलायनाच्यावेळी व त्यानंतरही कॉंग्रेस १०-११ आमदार निवडून आणू शकत असे.

२. हुरियत कॉन्फरन्स किंवा तत्सम उमेदवार खूप मोठ्या प्रमाणावर उभे राहूनही त्यांना काश्मिर खोऱ्याने नाकारलेले आहे. यांच्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच राष्ट्रीय आहे असे माझे मत आहे. त्यांनी नक्कीच काश्मिरसाठी जास्त तुरूंगवास भोगला आहे. हाल सहन केले आहेत. स्वतंत्र उमेदवार जेवढे पाकिस्तान धार्जिणे असतील त्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच कमी पाकिस्तान धार्जिणी असेल. ही गोष्टही भाजपाच्या धोरणाला अनुकूल आहे असे मला वाटते. कारण मुल्ला मौलवी धार्जिण्या मुस्लिमांकडून राष्ट्रीय मुसलमांनाकडे मतदान जाणे ही भारताच्या दृष्टीने खूपच भाग्याची गोष्ट मी समजतो.

३. हरियानामधे कॉंग्रेसची मते २७% वरून ३९% पर्यंत गेली तर भाजपाची ३६% वरून ३९% पर्यंत गेली. धृविकरण झाले लोकसभेचे तंतोतंत प्रतिबिंब विधानसभेत पडले यात वादच नाही. पण वाढलेले मतदान हे सर्वस्वी भाजपाकडेच गेले हे त्यातूनच लक्षात आले. त्यामुळेही माझ्या पहिल्या भागाला पुष्टी मिळाली असेच वाटले.

४. झारखंडातही पहिल्या फेरीचा तोच मतदान वाढीचा कल दिसून येतो आहे.

हे सगळे मिसळपाव.कॉम वर लिहले आहे. तरीही मायबोलीवर लिहिण्याचा खूप फायदा होतो असे वाटायला लागले आहे. त्यामागचे गृहितक Wink
मोदींच्या बाबतीत काहीही लिहीले की, इथे जबरदस्त विरोध होतो. त्यामुळे वाचकवर्गातील मोदीविरोधकांना यांत काहीच तथ्य नाही असे वाटते. त्यातून काहीही ते शिकणे शक्यच नसते. त्यामुळे ते आहेत तिथेच राहतात. बऱ्याच जणांची वागणूक शेखर गुप्तांसारखी असते. त्यांना दिसत असूनही पहावयाचे नसते. ते तर मी मांडलेले मुद्दे फारच हिरीरीने खोडून काढतात. माझ्या पोस्टमुळे मोदी विरोधकांचा यत्किंचीतही फायदा होऊ नये याची अत्युच्च दर्जाची काळजी त्यांच्यामुळे घेतली जाते.

याउलट मोदी आवडणारे सगळं वाचतात. त्यांचे मोदीप्रेम वाढते. कुंपणावर बसलेला मोदींकडे सरकायची शक्यता वाढीस लागते. मुख्य म्हणजे ही लोकं माझ्या पोस्टला कधीही अनुमोदन देत नाहीत. कारण तसे केले आपल्यावरही ट्रोलींग होईल अशी त्यांना भिती वाटते . यामुळे होत काय की, माझ्या पोस्टचा फायदा युतीला किती झाला हे कधीच कळत नाही. त्यामुळे मोदी विरोधक कायमच निकाल येईपर्यंत जिंकलेल्या अवस्थेत राहतात.
तर सांगायचा मुद्दा लिहावयाचा राहूनच गेला.
या पोस्टला मोठ्या प्रमाणावर विरोध करा. Wink
बोकलत सर आता बास म्हणा हो. टंकून हात दुखायला लागले.:)

Pages