विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आपल्याला आवडणारं उत्तर शोधायला लोकं कितीही लांब जायला तयार असतात. कष्टांची अजिबात तमा बाळगत नाहीत.
ह्याला म्हणतात कनव्हिक्शन. Wink
लगे रहो.
Happy

एकनाथ शिंदेंनी रुबिका लियाकतला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की उद्धव ठाकरेंनीच २०१९ मध्ये जनमताशी गद्दारी केली. पण हे तुम्हांला कळून त्यावर कृती करायला २०२२ साल का उजाडावं लागलं? २०१९ मध्येच नाही म्हणून सांगायचं. हाच का तुमचा जलद कारभार?

2019 मधे अदानी कडे तेवढे खोके नसतील १०००० कोटीचा प्रकल्प होता असे कळते. ५००० कोटी आमदारांवर खर्च झाले. ५० खोकेचे आरोप लागले पण प्रत्यक्षात १०० खोक्याच्या वर दाबलेत.

माझ्या ओळखीतला एक माणूस आहे त्याला झटपट श्रीमंत व्हायचं होतं. त्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली. अल्पावधीतच देव त्याला प्रसन्न झाला. देवाकडे त्याने वर मागितला की ईथून पुढे जो कोणी भारताचा पंतप्रधान बनेल तो त्याला वैयक्तीकरित्या ओळखेल आणि त्याला काय पाहिजे नको ते बघेल. देव तथास्तु बोलून गायब झाला. मग काय त्याच दिवशी याला हार्ट अटॅक आला आणि दुसऱ्या क्षणाला मोदींच्या निवासस्थानी एका मोरच्या पिल्लाने जन्म घेतला. आता तो पिल्लू मोरांच्या भाषेत मला इथून बाहेर काढा माझ्याकडून मोठी चूक झाली म्हणून रडत असतो पण आता भरपूर उशीर झालाय.

इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती गुरुवारी (14 नोव्हेंबर, 2024) रोजी असे म्हणाले की,
"इतिहास असे सांगतो की वैदिक काळापासून अनेक आक्रमणे होईपर्यंत गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया यातील नवनवीन कल्पनां मांडणारे भारत एक आघाडीचे राष्ट्र होते. या सगळ्यात अध्ययन, अध्यापन व संशोधन यात भारत अग्रेसर होता. "

"पण 700 AD ते 1520 AD याकाळात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधील नेते आणि त्यानंतर ब्रिटिश वसाहतींमुळे भारतीय तरुणांना त्यांच्या विज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी यासह इतर गोष्टींमधे अजिबात प्रगती करता आली नाही. सुमारे 1,000 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना बळजबरीने रोखून धरलेले होते. प्रगतीच्या वाटा रोखून धरलेल्या होत्या."

"इतिहास हे देखील सांगतो की अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राज्यकर्त्यांना विज्ञान, वैद्यक आणि गणिताची फारशी कदर नव्हती. ब्रिटिश विजेत्यांनी गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया या विषयांत महत्त्वाकांक्षी आणि काल्पनिक कार्य करण्याच्या आमच्या इच्छेला तुरळकपणे प्रोत्साहन दिले, परंतु आमची प्रगती मंदावलेलीच राहीली."

"ते पुढे म्हणाले की, भारतीय तरुणांना विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र, निसर्गाचे निरीक्षण करण्याची शक्ती, कुतूहल, अनुमान काढणे, गंभीर आणि विश्लेषणात्मक विचार, शोध आणि नवकल्पना, आणि समस्या व्याख्या आणि समस्या सोडवणे या सर्व गोष्टींपासून १००० वर्षे लांब ठेवण्यामुळे, भारतीय तरूणांचे अतोनात नुकसान झालेले आहे."

श्री. नारायण मूर्ती हे समाजवादी विचारसरणीचे असल्याचे मानले जाते. पण लवकरच त्यांना मोदीभक्तांमधे सामील केले जाईल असे वाटायला लागले आहे. Wink

मला तर आता भिती वाटायला लागली आहे की, असाच एखादा जेएनयुमधील कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस असेही म्हणेल की, भारतात नवविचार मांडणे, संशोधन करणे याची खूप मोठी परंपरा आहे. जर भारतावर आक्रमणे झाली नसती. इथली ज्ञानसंपदा नष्ट झाली नसती. इथल्या अभ्यासकांना कवट्यांचे मिनार बनून आपले जीव गमवायची पाळी आली नसती तर कदाचित औद्योगिक क्रांती युरोपमधे न होता ती भारतातच झाली असती व ती सुध्दा ६००-७०० वर्षे अगोदरच झाली असती.

मला तर असेही वाटायला लागले आहे की, मोदींचे अंधभक्त आता वाढायला लागले आहेत. नारायण मूर्तींसारखी जीवनांत यशस्वी झालेली माणसे,आपली बुध्दी मोदींच्या चरणी गहाण टाकायला लागली आहेत हे पाहून त्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटायला लागली आहे. राममंदीर तोडून बाबरी मशिद बांधणाऱ्या बाबराचा उदोउदो करायचे सोडून त्या बाबरालाच दोषी समजायला लागली आहेत. बुरसटलेले विचार पसरवणारी नालंदा, तक्षशीला येथील भव्य ग्रंथालये जाळून नष्ट करणाऱ्या लोकांना नतद्रष्ट म्हणायला लागली आहेत. मोठमोठे ग्रंथ तोंडपाठ असणारे माणसे म्हणजे तर चालती फिरती ग्रंथालये. त्यांची मुंडकी उडवण्याचे व त्या मुंडक्यांचे मनोरे रचण्याचे महान कार्य करणाऱ्या सर्व आक्रमकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे दु:साहस जर नारायण मूर्तींसारखे विद्वान करायला लागले तर भारताची किती वाट लागेल याची कल्पनाच करवत नाही. हिंदूंची मोठमोठी मंदीरे ही तर एकप्रकारची बुरसटलेली विचार मांडणारी छोटीछोटी ग्रंथालयेच होती. त्यातही चालती बोलती फिरती ग्रंथालये असायची. भारतवर्षाला या सगळ्यांतून मुक्ती मिळवून देण्याचे महान कार्याला आज कमी लेखले जायला लागले आहे.:;)

तरीपण बाबर, औरंगजेब असे थेट उल्लेख न करता "उझबेकिस्तानमधील राज्यकर्ते" असे शब्द वापरून नारायण मूर्ती साहेबांनी अजून तरी १०० टक्के मोदीभक्त न झाल्याचे दाखवून दिले आहे. तरीपण योगी आदित्यनाथ यांना मदत होईल अशी व्यक्तव्ये ऐकली की मनाला खूप व्यथा झाल्याशिवाय राहात नाही..
Happy

अफगाण आणि उझ्बेक आक्रमकांमुळे भारताची प्रगती खुंटली म्हणून महायुतीला मत द्या, असं म्हणताहेत का नारायण मूर्ती?

हे आक्रमक आले तेव्हा भारतात राज्यव्यवस्था , राज्यकर्ते, सैन्य असले काही प्रकार नव्हते . कारण सगळे लोक वैज्ञानिक संशोधन करत होते , सुंदर भव्य दिव्य वास्तू उभारत होते. असंही म्हणताहेत का ते?

आदित्यनाथ यांच्या वक्तव्यांबद्दल नितीन गडकरी, अजित पवार, इतकंच काय तर उत्तर प्रदेशातले त्यांचेच मंत्री केशव प्रसाद मौर्य जे म्हणाले ते ऐकून यांचेही पूर्वज अफगाण आणि उझबेक असतील असे वाटू लागले आहे.

शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकींत मशीद आणि दर्ग्यापुढे मुजरा करणे, या वास्तूंवर रॉकेट सोडणे, प्रक्षोभक घोषणा आणि गाणी, मग दगडफेकीचे निमित्त साधून बुलडोझर, ट्रेनमध्ये वृद्ध व्यक्तीला बीफवरूनमारहाण,, हे प्रकार सुरू झालेत. ही घाण महाराष्ट्रात नको यासाठी मी मत देणार आहे.
भाजपचा - फडणवीसांचा तथाकथित जलद भव्य दिव्य चकचकीत विकास नाही झाला तरी चालेल. काँग्रेसचा संथ , साधा विकास चालतो मला.

आयुष्य मंत्रालयाने Ayurvedic DM Oncology, hepatology, psychiatry अशा सुपर स्पेशालिटीज आयुर्वेदात सरळ जाहीर करून टाकल्या. त्यावर काही अफगाण, उझबेक मूळ असलेले आयुर्वेदाचार्य बघा काय म्हणताहेत.

आपण संस्कृती वगैरे जपणारे राज्य असल्याने फ२० ना टरबुज्या, शिंदेना मिंधे म्हटलेलं, नऊच्या भोंग्याने केलेली अनर्गल वक्तव्ये, खुद्द पवारांनी मर्यादा सोडून केलेले हातवारे चालतात. पण मविआच्या लोकांना काही बोलल्यास मारहाण व जेलची हवा खावी लागते. मर्यादा फक्त भाजप व मित्रपक्षांनी जपायच्या, बाकीच्यांना मोकाट वागायची मुभा आहे.

मला वाटतं मी सुरुवातीच्याच प्रतिसादांत वरुण सरदेसाईंबद्दल बोलताना या अशा भाषेबद्दलही लिहिलं आहे. ठाकरे सिनियर अशीच भाषा बोलायचे. भाजपला कमळाबाई म्हणायचे. त्याबद्दल तेव्हा भाजप वा समर्थकांनी कधी आक्षेप घेतला होता का?

मविआने मारहाण केली किंवा जेलमध्ये टाकलं तेव्हा मी त्या त्या वेळी निषेध केला आहे.

नितीन गडकरी , पंकजा मुंडे यांना एक है तो सेफ है मान्य नाही का? की त्यांनी इथे एक या शब्दाचा वेगळाच अर्थ लावलाय? आणि त्याच्यापासून आपण सेफ नाही, असं सुचवताहेत?

फडणवीसांनी आपण मामू बनणार नाहीये असे संगीतले त्यामुळे भाजपला मत देऊ नये असे मला वाटते.

उबाठा पुढे बोलले की ‘टरबूज कधी धर्मयुद्ध करू शकतं का हो? आपण कधी बघितलंय का की काय टरबूज लढतंय माझ्यासाठी.’

टरबूज्या म्हणण्याला अनुमोदन.
प्रचारसभांमधे असं मनोरंजन असायलाच पाहिजे. तरच आम्ही मत देऊ. जो जास्त मनोरंजन करेल त्याला मतदान.

पूर्वी बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. व्यंगचित्रकाराला चित्र काढताना जे जाणवतं ते बाळासाहेब अचूक मांडायचे. त्याचबरोबर स्वतःचा उल्लेख हाडांचा सापळा असा करून समोरच्याला काही कामच ठेवत नसत. त्यामुळं बाळासाहेबांच्या सभा म्हणजे मनोरंजनाची फुल्ल ग्यारण्टी असायची. आता ती गादी राज ठाकरे चालवतात. जयंत पाटलांची नक्कल करून चकित चंदू असा उल्लेख केला तेव्हां मजा आणली होती.

टरबूज्याला उत्तर देताना भाजपचे नेते कोमट पाणी किंवा कोमटराव असा उल्लेख करतात. पण त्यात ती तीक्ष्ण धार नाही. उसाचं चिपाड वगैरे उल्लेख केले तर धमाल येईल. मग त्याला प्रत्त्युत्तर.

असेही यातले कुणीच जनतेचे प्रश्न सोडवण्यात गंभीर नसल्याने किमान निवडणुकीच्या काळात पिचलेल्या जीवांचे मनोरंजन केले तर त्या निकषावर मत देता येईल.

Pages