विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता सध्या त्यांच्या भाषणात जर का महाविकास आघाडी चे सरकार आले तर मला तुरुंगात टाकतील असी भिती मुख्यमंत्री साहेबांना का वाटत असेल असेच वाक्य देवेंद्र फडणवीस ह्यांनी पण बोलुन दाखवले आहे असे ह्या जोडी ने काय केले असेल त्यामुळे ह्यांना महाविकास आघाडी चे सरकार आले तर तुरुंगात टाकतील असे वाटत असेल ही नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग ह्या प्रोजेक्ट सुरवाती पासुन आता पर्यंत हिच जोडी संभाळत आहे त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहार ह्या मुळे ह्यांना तुरूंगात जाण्याची भिती तर वाटत नसेल ना तसेच देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांच्या मॅडम चे दाऊद चा हस्तकाची मुली बरोबर असलेली मैत्री त्यातुन झालेले व्यवहार त्यामुळे भिती तर वाटत नसेल ना तसेच मुंबई महानगर पालिकां चा हजारो करोंडाचा ठेवी चुकीच्या पद्धतीने आपल्या खासमखास ठेकेदारांना वळवण्यात आल्या आहेत पण त्या कामांचा टेंडर मध्ये गैरव्यवहार झाला आहे आणि स्वतः आदित्य ठाकरे साहेब ह्यांनी त्याचा पर्दाफाश केला आहे त्यामुळे तर भिती वाटत नसेल ना तसेच ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस ह्यांनी शिंदे साहेब ह्यांना हाताशी धरून मविआ चे सरकार पाडले ते सरकार पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसांन ची देवाणघेवाण झाली आहे असा आरोप आहे जर का महाविकास आघाडी चे सरकार आले तर त्याची उच्च स्तरीय चौकशी होणार त्यामुळे तर ह्यांना तुरूंगात जाण्याची भिती तर वाटत नसेल ना तसेच घाई घाईत लाडकी बहिण योजना राबविण्यात आली त्या मध्ये झालेला गैरव्यवहार तसेच सिडको घोटाळा असो किंवा गेल्या दोन वर्षांत महानगर पालिका अस्तित्वात नसताना महानगर पालिकां वरती प्रशासक असताना पण काही खासमखास लोकांना खुष करण्यासाठी करोडो रुपयांचे टेंडर कुठल्याही प्रकारची पारदर्शकता न ठेवता वाटण्यात आले त्याची संपूर्ण चौकशी होणार हे आदित्य ठाकरे साहेब ह्यांनी पहिलेच सांगितले आहे त्यामुळे तर तुरुंगात जाण्याची भिती तर वाटत नसेल ना अदानी अंबानी ह्यांना खुष करण्यासाठी करोडोंच्या जमिनी कवडीमोलाने मुंबई मध्ये देण्यात आल्या आहेत त्यामुळे तर. असो काही असो पण ह्या लोकांना आता पासुनच तुरुंगात जाण्याची भिती वाटत आहे हे महत्त्वाचे आहे

संतोष यादव

फेसबुकवरून साभार

महाराष्ट्रात येऊन
बटेगे तो कटेंगे
च्या घोषणा देणाऱ्या योगीच्या राज्यातील बातमी
झाशी मेडिकल कॉलेजच्या इन्फंट वॉर्डमध्ये लागलेल्या भीषण आगीत नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीतून निष्पाप मुलांना वाचवण्यासाठी अनेकांनी जीव धोक्यात घातला होता. हमीरपूरचा रहिवासी असलेला याकूब हा मात्र त्या दिवशी देवदून बनला होता. त्याने आगीचे लोट आणि धुरातून वॉर्डात घुसला आणि खिडकीतून एक एक करून अनेक नवजात बालकांना बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी ही बातमी पसरताच लोकांना याकुबचा अभिमान वाटू लागला, पण याकुबच्या जुळ्या मुलींना हा अभिमान कधीच जाणवू शकणार नाही, त्यांना त्यांच्या वडिलाच्या शौर्याची कहाणी ऐकायला मिळणार नाही. कारण, ज्या वेळी याकुब जळत्या वॉर्डच्या एका टोकातून मुलांना बाहेर काढत होता, त्याचवेळी दुसऱ्या टोकाला त्याच्या जुळ्या मुली आगीच्या भक्ष्यस्थानी होत्या.

हातगाडी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या हमीरपूरमधील सिकंदरपुरा परिसरातील याकूबची पत्नी नजमा हिने ९ नोव्हेंबर रोजी झाशी येथे जुळ्या मुलींना जन्म दिला. कुटुंबात आनंद शिगेला पोहोचला होता. मात्र अचानक मुलींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांनी त्यांना उपचारासाठी झाशी येथे आणले. गेल्या आठ दिवसांपासून मुलींना येथे दाखल करण्यात आले होते. याकुबने सांगितले की, शुक्रवारी रात्री तो वॉर्डाबाहेर झोपला होता. अचानक त्याला मोठ्याने किंचाळण्याचा आवाज आला आणि तो उठला. वॉर्डाच्या खिडकीतून लोक बाहेर येत असल्याचे पाहिले. आत आग आणि धुराचे लोट होते. याकुबने खिडकी तोडून वॉर्डामध्ये प्रवेश केला. त्याने आई बिल्किस आणि मेव्हणी राणू यांच्यासोबत एक एक करून अनेक मुलांना बाहेर काढले. मात्र त्याच्या स्वत:च्या दोन मुली मात्र त्यात नव्हत्या.

यानंतर याकुब आणि नजमा दिवसभर हॉस्पिटलमध्ये भटकत राहिले. त्यांनी मुलींचा प्रत्येक कोपऱ्यात शोध घेतला. दोघेही एकमेकांचे हात धरून अश्रू पुसत राहिले. दुसऱ्या दिवशी शनिवारी दोन्ही मुलींच्या मृतदेहाची ओळख पटल्यावर काळाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. ही बातमी कळताच नजमा बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हापासून तिची प्रकृती अस्वस्थ आहे. आठ दिवसात नजमाला आपल्या जुळ्या मुलींचे चेहरेही नीट पाहता आले नाहीत. असे म्हणत याकुब रडायला लागला. आपण अनेक मुलांचे प्राण वाचवले, पण आपल्या मुलींना वाचवू शकलो नाही. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने उपचार घेण्यासाठी मुलींना आणले होते, मात्र येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे तो रडत सांगत होता.
https://pudhari.news/national/twin-babies-die-in-fire-jhansi-medical-col...

असो. आम्हाला मात्र हिंदू -मुस्लिम करण्यातच धन्यता मानायची आहे

मुस्लिम समाज आता कितीही मोदींवर रागावला तरी त्यांची लोकसंख्या २० तारखेला दुप्पट होणार नाहीये. त्या मतपेटीने मोदीविरोधी सर्वाधीक पातळी गाठलेली आहे. त्यामुळेच भाजपा आक्रमक पातळीवर जाऊन प्रचार करत आहे. कारण मुस्लीम विरोधात जाण्याने भाजपाला आता काही फरकच पडणार नाहीये. मुस्लिमांच्या हे लक्षातच येत नाही आहे. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची तळी उचलायला पुरोगामी देश शिल्लक राहीलेले नाही आहेत. स्वकर्माने त्यांनीच युरोपमधे सहानुभूती गमावलेली आहे.

यामुळेच मध्ययुगीन कल्पनांमधे मुस्लीम समाजाला ठेऊन त्यांचा वापर करत राहण्याचा मुस्लीम नेत्यांचा प्रयत्नांना नेस्तनाबूत करण्याला हीच वेळ योग्य आहे हे भाजपाला कळून चुकले आहे. मुस्लीमांमधे आधुनिक शिक्षणाचा प्रसार, मुलींना प्रतिष्ठा, पोटगी व समान नागरी कायदा लागू करणे आणि वक्फ बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता यासाठी हीच वेळ योग्य आहे असे भाजपाला वाटायला लागले असल्यास नवल नाही.

लोकसभेच्या मतदानात मविआ आणि महायुती मधे फक्त ०.५५ टक्के एवढेच अंतर आहे. युतीला २-३ लाख मते जास्त मिळाली की बरोबरी होणारेय. युती मतदान वाढवायचे प्रयत्न करतीय व त्याला यश येताना दिसतंय. काश्मिर, हरियाना व आता झारखंड फेज १ मधे हे घडताना दिसतंय. तसं झालं तर महाराष्ट्रात आरामात युती सत्तेत येऊ शकेल.

मुस्लीम लोक धर्माच्या आधारावर एकत्रीत येऊन राजकारण करत असतील, मतदान करत असतील तर हिंदूंनाही हिंदूत्वाच्या आधारावर राजकारण व मतदान करायला लागेल.

मुस्लीम लोक धर्माच्या आधारावर एकत्रीत येऊन राजकारण करत असतील, मतदान करत असतील तर हिंदूंनाही हिंदूत्वाच्या आधारावर राजकारण व मतदान करायला लागेल. उद्या म्हणाल, ते वाटीभर शेण खाताहेत,हिंदूनी पातेलेभर शेण खावे. Happy

फडणवीसांनी आपण मामुपदाच्या शर्यतीत नाही असे जाहीर केलेय. आता कोथरुडकरानी कोल्हापुरतून आलेल्या कोथरुडाशी काहीही संबंध नसलेल्या भाजपच्या उमेदवाराला मत का द्यावे? कोथरूडकराना मोटीवेशन काय?

<< घटना बदलाचा नेरेटीव मतदानाच्या पुष्कळ आधी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी लोकांपुढे ठेवला होता. >>

------ नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा - बहुमत मिळाल्यावर काय करणार आहोत याची एक झलकच सांगून गेला.
संविधान, घटना, सामान्य भारतीय हे केंद्रस्थानी असते तर संगोल, पूजा विधी आणि धर्मसंसदेचे स्वरुप बघायला मिळाले नसते.
Trial_8June2024_BB.jpg

संसदेत, लोकसभा अध्यक्ष हेच सर्वोच्च स्थानी पद आहे. त्यांना वंदन करणे समजतो पण हे कोण आहेत? देशाच्या जडणघडणीत यांचे काय योगदान आहे जेणेकरुन अगदी खास विमानाने यांना दिल्लीला आणले गेले ?

पुलवामा घटनेच्या वेळी शेकडो जवानांना ने-आण करण्यासाठी केवळ चार विमानांची मागणी होती. विमानांची मागणी फेटाळली गेली आणि स्फोटामधे ४० जवाननांची नाहक हत्या झाली.

मुस्लिनांनी चांगल्या वस्तीत येऊन रहावे म्हणुन त्यांच्या दाटीवाटीतल्या राहत्या घरावर बुलडोझर्स चालवले तर ते सुद्धा काही नतद्रष्ट लोकांना बघवत नाही.

<< फडणवीसांनी आपण मामुपदाच्या शर्यतीत नाही असे जाहीर केलेय. >>

------- अनेक तोंडांनी बोलण्याची परंपरा आहे. जे बोलतील अगदी तसेच वागतील असेही नाही.

७०००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍याला चक्की पिसायला पाठविणार होते. काय झाले? अगदी भल्या पहाटे शपथविधी साठी नेले होते. आता तर शेजारीच बसविले आहे. भ्रष्टाचाराचा केलेला आरोप खोटा होता किंवा भ्रष्टाचारा विरुद्ध लढण्यात त्यांना काहीच स्वारस्य नाही. दोन्ही निष्कर्ष वाईट.

अबा
आम्ही कोथरूडकर असे आहोत कि भाजपाने पेकाटात लाथ मारली तरी चम्पालाच मत देऊ,

मी परवा कसब्यात गेलो होतो आणि अहो आश्चर्य जगातील कुठल्या तरी अतिप्रगत जागेवर आल्याचा अनुभव आला. प्रशस्त रस्ते, वाहनांना पार्किंग साठी मोकळ्या जागा, स्वच्छ सुंदर परिसर, सगळीकडे झाडी, रस्त्यावर एकही फेरीवाला नाही, फुटपाथ वर चालायला जागा, आवश्यक तिथे स्कायवॉल्क, जागोजागी इ रिक्षा/इ सायकल आणि हा सगळा बदल म्हणे गेल्या काही महिन्यात झालाय, जशी कोणी जादूची काडी फिरवली.

येतांना कोथरूड मार्गे आलो, तिथेही तीच परिस्थिती. २०४७ चे स्वप्न आताच पूर्ण झाले असे वाटले.

https://youtu.be/raFp3-Cu39A
या व्हिडीओमधे खालील गोष्टी मिळतील.
00:00 Intro
02:01 २०३५ सालचा महाराष्ट्र कसा असेल?
08:02 वाढवण बंदर महत्त्वाचे का आहे?
12:22 महाराष्ट्राची ओळख काय असावी, असं वाटतं?
15:57 विकासाचं मार्केटिंग करायला कमी पडलात का?
20:07 राज्यासमोरील रोजगार, जाती-धर्माच्या समस्या कशा सुटतील?
23:04 विविध योजनांतून थेट बँक खात्यात पैसे देणं म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे?
23:52 थेट बँक खात्यात पैसे देणाऱ्या योजनांवर मध्यमवर्ग नाराज आहे?
25:13 विकासाच्या मुद्द्यावरून निवडणुक जिंकता येते?
28:18 १९९० ते २०२४ या काळांत महाराष्ट्रात काय बदललं?
30:30 शहरी आणि ग्रामीण भागांतील विकासाबद्दल तुमची दृष्टी काय?
37:44 महाराष्ट्राचं राजकारण संक्रमणाच्या टप्प्यात आहे?
38:49 भाजप पुन्हा सत्तेत येईल का? सत्तेत आल्यावरचा ड्रीम प्रोजेक्ट कोणता असेल?

या व्हिडीओमधे खालील गोष्टी मिळतील. >>>>> त्यामुळे लोकांनी आता राजकारण्यांकडे जास्त आशेने पाहू नये, विडिओ मधून घरबसल्या गोष्टी घ्याव्यात आणि उगी बसावे. आणखी गोष्टी हव्या असतील तर आणखी व्हिडीओज प्रसारित करण्यात येतील....व्हिडिओ ऑन डिमांड Rofl

मुस्लिम समाज आता कितीही मोदींवर रागावला तरी त्यांची लोकसंख्या २० तारखेला दुप्पट होणार नाहीये. त्या मतपेटीने मोदीविरोधी सर्वाधीक पातळी गाठलेली आहे. त्यामुळेच भाजपा आक्रमक पातळीवर जाऊन प्रचार करत आहे. कारण मुस्लीम विरोधात जाण्याने भाजपाला आता काही फरकच पडणार नाहीये. मुस्लिमांच्या हे लक्षातच येत नाही आहे. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची तळी उचलायला पुरोगामी देश शिल्लक राहीलेले नाही आहेत. स्वकर्माने त्यांनीच युरोपमधे सहानुभूती गमावलेली आहे.>>>
आधीच भाजप चा निट प्रचार करायचा की राव. उगाच शेअर बाजाराच्या gotya खेळत बसलात Happy

आधीच भाजप चा निट प्रचार करायचा की राव. उगाच शेअर बाजाराच्या gotya खेळत बसलात खिक्क. Wink

भाजपशी त्यांना काहीही सोयरसुतक नाही. एकदा फक्त फडणवीसला घरी बसवुद्या. त्या दिवसापासून ते भाजपला शिव्या देणे सुरू करतील.

मला राजकारणातील जास्त कळत नाही पण वेगळाच undercurrent जाणवतोय लोकांशी बोलताना ज्याचा तोटा महायुतीला होईल असा अंदाज आहे

महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांचा तोटा होणार नाही, तोटा महाराष्ट्राच्या जनतेचा होणार आहे. आयुष्यात कधी थिल्लर विचाराच्या शिवसेनेला मत देईल असे वाटले नव्हते. महाविकास आघाडीमुळे नाईलाजाने ह्यावेळेस द्यावे लागणार.

महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांचा तोटा होणार नाही, तोटा महाराष्ट्राच्या जनतेचा होणार आहे.>>> +१००

महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांचा तोटा होणार नाही, तोटा महाराष्ट्राच्या जनतेचा होणार आहे.>>> +१००

महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांचा तोटा होणार नाही, तोटा महाराष्ट्राच्या जनतेचा होणार आहे.>>>अगदी अगदी . तीळ तीळ तुटतो महाराष्ट्राची झालेली अवस्था पाहून . एकेकाळचे सुसंस्कृत, पुरोगामी आणि विकासशील राज्य ! आज काय अवस्था आहे .

या वेळी राज्यात कुठलीच लाट नाही. उबाठांबद्दल असलेली सहानुभूतीची लाट सुद्धा विरली आहे.
एकनाथ शिंदे त्यांची खलनायक ही प्रतिमा पुसट करण्यात यशस्वी झाले आहेत. तरी पण लाडकी बहीण योजनेचा म्हणावा तसा फायदा होणार नाही.

अजितदादा पवार आणि शरद पवार हे दोघे मिळून (मविआच्या भाषेत गेम खेळतात तर महायुतीच्या भाषेत चुना लावताहेत) १०० च्या वर जागा लढत आहेत. ही माझी एकट्याचीच शंका नाही हे आता समजले. आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उघड बोलत आहेत कि काकांना ५० च्या घरात जागा आणि अजितदादाच्या २८ जागा. ८० च्या घरात काका पुतण्याच्या जागा आल्या तर मुख्यमंत्री आमचाच.

ज्या अर्थी सामान्य मतदाराला ही गोष्ट कळते त्या अर्थी मविआ आणि महायुतीच्या नेत्यांना हे कळत नसेल हे शक्यच नाही.
शरद पवार आणि माझे वडील एकाच कॉलेजला शिकले. पवार साहेब बीएमसीसी ला तर माझे वडील फर्गसनला. त्या वेळीही त्यांनी फर्गसनला शाळेतली मुलं शोधून काढली होती. ते सीनीयर होते. वडलांना त्यांचे राजकारण माहिती होते. तसेच आजोळीही चांगलेच माहिती आहे.

एका सभेला मी सहज गेलो होतो. त्यांच्या एका चेल्याने बंडखोरी केली होती. कृषी उत्पन्न बाजार समिती, आमदारकी सगळं मिळूनही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध अपक्ष होते. बंडखोराचे चिन्ह विमान होते. पवार साहेब भाषणात म्हणाले कि एकट्यानेच किती खायचं ? भाकरी फिरली पाहीजे. काही काही विमानं खूप उडतात पण त्याच्यावर नियंत्रण नसलं कि अपघात होतो.

या भाषणानंतर उमेदवार खूष झाला.
पण दुसर्‍या दिवशी दूध आणायला गेलो तेव्हां दूधवाल्याने सांगितलं. विमान चालवायचा मेसेज आलाय. आमचा बूथ होता तो बघणारे कार्यकर्ते पण मेसेज देऊन गेले. त्यामुळं दिलीप वळसे पाटील यांना पाडा म्हटले तरी आज आणि उद्या घरोघरी भलताच मेसेज जाईल याबाबत खात्री आहे. त्यांचं राजकारण हे पहिल्यापासून असंच राहिलेलं आहे. तेच अजितदादा पुढे चालवतात.

जो बोलता हूं वो नही करता, जो नही बोलता वो डेफिनेटली करता हूं,
हा रावडी राठोडचा डायलॉग त्यांच्याकडे पाहूनच लिहीला असावा.

राष्ट्रवादीच्या या खेळीला लगाम त्यांचेच सहकारी पक्ष घालू शकतात. तेच महायुतीत घडतंय.
यांची अंतर्गत पाडापाडी किती डॅमे ज करणार यावर निकाल लागतील.

Pages