Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
*मोदीजींचे महाराष्ट्र
*मोदीजींचे महाराष्ट्र विधानसभा 2024 चे शिलेदार..*
*हिंदुराष्ट्र निर्माण करण्याकरीता*
1) सना नवाब मलिक
2) झिशान बाबा सिद्दिकी
3)नजीब मुल्ला
4)हसन मुश्रीफ
*भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याकरीता*
1)अजित दादा पवार
2)छगन भुजबळ
3)हसन मुश्रीफ
*सुशिक्षित,सुसंस्कृत पिढी निर्माण करणेकरीता*
1)निलेश नारायण राणे
2)नितेश नारायण राणे
3)संतोष बांगर
*लाडकी बहिण सुरक्षित बहिण करीता*
1)संजय राठोड.....
2)धनंजय मुंढे........
*देशप्रेमी असाल तर हा संदेश पुढे 10 जनांपर्यंत पोहचवा..*
टरबूज्याला उत्तर देताना
टरबूज्याला उत्तर देताना भाजपचे नेते कोमट पाणी किंवा कोमटराव असा उल्लेख करतात. पण त्यात ती तीक्ष्ण धार नाही.>>> बरोबर, आदित्यला दिलेलं बेबी पेंग्विन हे नाव त्याच्या आवाजामुळे चपखल बसल्यासारखं वाटतं.
असेही यातले कुणीच जनतेचे प्रश्न सोडवण्यात गंभीर नसल्याने किमान निवडणुकीच्या काळात पिचलेल्या जीवांचे मनोरंजन केले तर त्या निकषावर मत देता येईल.>>> या निकषावर राज ठाकरेंना, 'फक्त एकदा माझ्या हाती सत्ता द्या' बोलायची गरज भासणार नाही.
*देशप्रेमी असाल तर हा संदेश
*देशप्रेमी असाल तर हा संदेश पुढे 10 जनांपर्यंत पोहचवा..*
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 17 November, 2024 - 12:04>>>> आजून खूप पट्टीचे, होतकरू आणि हौशे-गौशै-नौशै उमेदवार आहेत हो.... लिस्ट मधल्यांची काय लॉटरीत नावं निघाली काय??
जो जास्त मनोरंजन करेल त्याला
जो जास्त मनोरंजन करेल त्याला मतदान. >>
असं असेल तर अमोल मिटकरी सर्वप्रथम आठवायला पाहिजे होते. काय लोकं हसत होते.
उजबेकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांचे काम उत्तमरित्या पुढे नेत होते.
असं असेल तर अमोल मिटकरी
असं असेल तर अमोल मिटकरी सर्वप्रथम आठवायला पाहिजे होते. काय लोकं हसत होते.>>> हसत तर लोक पाशा पटेलांच्या भाषणाला देखील होते.
(No subject)
जरांगे पाटलांनी नैसर्गिक
जरांगे पाटलांनी नैसर्गिक भाषेला इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, प्रिंट माध्यमात प्रतिष्ठा मिळवून दिली. या आधी ती खुष्कीच्या मार्गाने ठाकरी भाषा नावाने चंचूप्रवेश करती झाली होती. मात्र आता ती सहजच विहरू लागल्याने मोदीजींनी सुद्धा हीच योग्य वेळ आहे असा विचार करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.आहे.
यापूर्वी ग्रामीण भागातून आलेल्या नेत्यांची सदाशिव पेठी भाषेच्या नियम व अटी सांभाळताना तारांबळ व्हायची. पण तरीही जीभ कधी कधी सरळ व्हायची. (घसरली हा वाकप्रचार चुकीचा आहे. कारण जिभेला जे वळण असते ते सरळ असते आणि तारेवरची कसरत करताना ते कधी वाकडे किंवा घसलेले असू शकते). मग अशा नेत्यांना मनात नसतानाही लाजेकाजेस्तव शाब्दीक कसरत सांभाळण्याचे उत्तम उदाहरण असलेल्या नेत्याच्या समाधीशी जाऊन प्रायश्चित्त घ्यावे लागे. इथून पुढे जीभेवर नैसर्गिक लहेजा येणार नाही अशी शपथ घ्यावी लागे.
आता मात्र अभिजात भाषेच्या दर्जेमुळे आता नैसर्गिक भाषेचा वावर सहज , सुलभ आणि सन्मानाने, छाती पुढे करून , ताठ मानेने करता येणार आहे हे एकदाचे जर भाजपेयींनी जनतेला पटवून दिले तर ग्रामीण भागात भाजपच्या विजयी रथाला लगाम घालणे अवघड होणार आहे
मी सहज असा विचार करत होतो की
मी सहज असा विचार करत होतो की हे राजकारणी लोक इतके धुर्त असतात तर अशी स्टेटमेंट्स कशी काय बरे करतात, जी त्यांनाच घाताक ठरु शकतील....तेव्हा अशी एक शक्यता वाटली की हे लोक भाषण करताना बहुतेकदा फक्त समोरील गर्दी कोणत्या वर्गातील-स्तरातील आहे हे पाहून भाषण ठोकतात...पण त्याचे मिडीयामुळे होणाऱ्या व्यापक प्रसारावर त्यांचे काही क्षणांपुरते का होईना दुर्लक्ष होते, आणि सर्व घात होउन बसतो.
मविआ चा जाहीरनामा आल्या नंतर
मविआ चा जाहीरनामा आल्या नंतर भाजपाने त्यांचा जाहीरनाम्यात बदल करुन अधिकच्या योजना जाहीर करुन जाहीरनामा रि-कॅलिबरेट केला की काय?? नविन ॲड्स पाहिल्यावर तसं जाणवते आहे.
या निकषावर राज ठाकरेंना,
या निकषावर राज ठाकरेंना, 'फक्त एकदा माझ्या हाती सत्ता द्या' बोलायची गरज भासणार नाही. >>
एकदा राजसाहेब काय म्हणतात ते ऐका. त्यावर विचार करा.
https://www.youtube.com/watch?v=JzXhhZjO2TE
मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा
मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्याच वेळी एक देश एक भाषा या अजून अधिकृत उद्घोषणा न झालेल्या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातले उमेदवार घोषित करताना इथल्या गावांच्या नावांचं हिंदीकरण केलं.
धुले , भुसावल, जलगाव, चालीसगाव, देवली, हिंगना, वानी, यवतमाल, मुरबाद, मलाड, वडाला, उरान , पार्वती, कंकावली (राण्यांचं गाव हो) , श्रीगोंडा, मालबार हिल
https://x.com/BJP4Maharashtra/status/1847962055246270718/photo/1
अमित शहांच्या विदर्भातील
अमित शहांच्या विदर्भातील आजच्या नियोजित ४ सभा आणि एक रॅली रद्द करुन दिल्लीला रवाना. काय चाललंय काय?? उत्तरेतली लोकं महाराष्ट्रात प्रचाराला चालत नाहीत याचा साक्षात्कार झाला की काय??
एकदा राजसाहेब काय म्हणतात ते
एकदा राजसाहेब काय म्हणतात ते ऐका. त्यावर विचार करा.
https://www.youtube.com/watch?v=JzXhhZjO2TE >>>
आता सरडे पण लाजून लाल लाल
आता सरडे पण लाजून लाल लाल झाले आहेत.
Though there was no official
Though there was no official word on the reason behind the cancellation of the minister's rallies, the sources indicated that it could be due to the volatile situation in Manipur.
रावेर मधील कॉंग्रेसच्या
रावेर मधील कॉंग्रेसच्या प्रचारसभेत वक्त्या महिलेने वंंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील यांच्या केलेल्या हीन उल्लेखाबद्दल निषेध. पक्ष पातळीवर करवाई व्हायला हवी.
"शालेय सहलीसाठी खास सूट!
मत तर द्यायचेच, न्याय पण द्यायचा आहे!
(आजच्या देशोन्नती दैनिकात सुधाकर जाधव ह्यांचा प्रकाशित लेख)
------------------------------------------------------
महाराष्ट्राच्या राजकारणाचे गटार बनविणाऱ्यांना पराभूत करा!
--------------------------------------------------------
विधानसभा निवडणुकीत एवढ्या आघाड्या , एवढे उमेदवार आहेत की त्यातून एक पक्ष, एक आघाडी किंवा एक उमेदवार निवडणे ही मतदारांसाठी कसोटीच आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून समजून उमजून निर्धाराने मतदान करून देशाच्या राजकारणाला नावे वळण नवी दिशा देण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. तोच धागा पकडून विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा विचार केला तर अवघड वाटणारी उमेदवार किंवा पक्ष किंवा पक्षांच्या आघाडीची निवड करणे सोपे जाईल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील मतदारांनी मत देतांना जसा देशातील परिस्थितीचा विचार केला होता तसाच महाराष्ट्रातील परिस्थितीचा देखील विचार केला होता. आपण लोकसभा निवडणुकीत ज्या उद्देश्याने मतदान केले तो कितपत पूर्ण झाला याचा सारासार विचार केला की या विधानसभा निवडणुकीत काय करायचे याचा अंदाज येईल. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष पाशवी बहुमत मिळवून देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना बदलवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराशी मिळतीजुळती नवी राज्यघटना देण्याचा विचार करतोय अशी साधार भीती मतदारांच्या डोळ्यासमोर होती. ही भीती निर्माण होण्याचे कारण भारतीय जनता पक्षाच्या एका पेक्षा अधिक नेत्यांनी केलेली वक्तव्य होती. त्यांनीच ४०० पार चा आणि घटना बदलाचा संबंध जाहीरपणे बोलून दाखविला होता.
लोकसभा निवडणुकीचा सत्ताधारी पक्षाला धक्का देणारा निकाल लागल्या नंतर केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घटना बदलाचे फेक नेरेटीव तयार करून विरोधकांनी जनतेची दिशाभूल केल्याने असे निकाल आल्याचे म्हंटले होते. घटना बदलाचा नेरेटीव मतदानाच्या पुष्कळ आधी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी लोकांपुढे ठेवला होता. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने घटना बदला बाबत जी वक्तव्ये दिली जात आहेत त्याच्याशी पक्षाचा आणि सरकारचा काहीही संबंध नाही, पक्षाचा किंवा सरकारचा असा कोणताही विचार नाही असा खुलासा केला नाही की असे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलला नाही किंवा स्पष्टीकरणही मागितले नाही. आपल्या राज्यघटने बद्दलचे विपरीत मत संघाने वेळोवेळी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी नेत्यांची अशी वक्तव्ये गंभीरपणे घेण्याचा सुजाणपणा मतदारांनी दाखविल्यामुळे तूर्त राज्यघटनेवरचे संकट तळले आहे. लोकसभा निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा होता यात वादच नाही पण तितकाच महत्वाचा मुद्दा राजकारणाची झालेली अधोगती हा ही होता. आणि महाराष्ट्रात तर हा मुद्दा घटना बदला इतकाच मतदाराच्या मनावर स्वार होता. महाराष्ट्रातील मतदारांनी जी उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून मतदान केले त्यातील फक्त एकच उद्दिष्ट पूर्ण झाले. घटना बदल करण्याच्या स्थितीत सत्ताधारी भाजप राहिला नाही. मात्र घटनेचा , घटनात्मक संस्थांचा दुरुपयोग करून, सम दामदंड भेद वापरून देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा जो चिखल केला गेला तो लोकसभा निवडणूक निकालानंतरही साफ झालेला नाही. ते अर्धवट राहिलेले कार्य विधानसभा निवडणुकीत मतदारांना पार पाडायचे आहे.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला गुजरात व मध्यप्रदेश वगळता देशातील सर्वच राज्यात फटका बसला पण मोठा फटका उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बसला. या दोन्ही राज्यात भाजपची दाणादाण उडण्याचे कारण सत्तेचा करण्यात आलेला दुरुपयोग होता. महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोगाने केवळ राजकारणच नसले नाही तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती विद्रूप केली. असे करण्यात सगळ्यात मोठा वाटा केंद्रातील आणि महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वाचा आहे. नियम ,कायदे ,घटना आणि नितीमत्ता याची वाट लावून सत्तेचा खेळ नाही तर खेळखंडोबा केला. अत्यंत बेदरकारपणे घटनात्मक संस्थांचे पावित्र्य व निष्पक्षता नष्ट करून आपल्या दावणीला बांधले आणि त्यांच्या मदतीने विरोध व विरोधी पक्ष संपविण्याचे अघोरी कृत्य पार पाडले. सर्वोच्च न्यायालयासारख्या सर्वोच्च घटनात्मक व पवित्र संस्थेला देखील त्यांनी सोडले नाही हे न्यायालयात अपात्रता प्रकरणात जे काही घडले त्यावरून स्पष्ट होते. बेकायदेशीर व अनैतिक मार्गाने स्थापन झालेले सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या संरक्षणात पूर्ण मुदत संपे पर्यंत चालले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ज्या कोलांटउड्या मारल्या त्या आश्चर्यात आणि बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत. एक महिन्यात जे प्रकरण निकाली निघायला हवे होते ते विधानसभेचा कार्यकाल संपल्यावरही निकाली निघाले नाही. त्यामुळे ज्यांनी चुकीच्या मार्गाने सत्ता उलथवली व सत्ता मिळविली ते कायदेशीर शिक्षेतून सहीसलामत सुटले आहेत. पण आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्याही वरच्या जनतेच्या न्यायालयात आले आहे. या प्रकरणाचा विचार करून निर्णय द्यायला सर्वोच्च न्यायालयाकडे २ वर्षाचा कालावधी होता. तो सर्वोच्च न्यायालयाने अक्षरशः वाया घालविला. जनतेच्या न्यायालयात निकालाची तारीख ठरलेली आहे. काय द्यायचा तो निकाल द्या पण त्या तारखेलाच तुम्हाला निकाल द्यावा लागणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान करायला जाल तेव्हा तुम्ही फक्त मत देणार नाही आहात . सर्वोच्च न्यायालयाला न्याय देता आला नाही तो न्याय देण्याची जबाबदारी मतदारांवर येवून पडली आहे. तुमचे मत हे तुम्ही काय निकाल देता यावरची स्वाक्षरी असणार आहे .
महाराष्ट्राचे राजकारण आणि राजकारणी यांना चुकीच्या मार्गाने नेण्यास कारणीभूत सूत्रधारांचे काय करायचे याचा विचार केला नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना शिक्षा देवून उपयोग होणार नाही. यातील सूत्रधाराने तर आपल्या सहभागाची स्वत:च कबुली दिली आहे. मी नुसताच परत आलो नाही तर दोन दोन पक्ष फोडून परत आलोय याची कबुली कोणी दिली हे सर्वांनाच माहित आहे. हे पक्ष कसे फोडलेत याच साद्यंत वर्णन राजदीप सरदेसाई लिखित पुस्तकात छगन भुजबळ यांचा हवाला देवून करण्यात आले आहे. अमित शाह यांच्या मदतीने आणि आशीर्वादाने ई डी आणि इतर सरकारी यंत्रणाचा गैरवापर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी करून पक्ष फोडलेत आणि ते फोडल्याची कबुलीही दिली. देवेंद्र फडणवीस यांचा एवढाच अपराध नाही. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना विशेषत: पोलीस अधिकाऱ्यांना अपराध करायला भाग पाडले आणि अशा अपराधी अधिकाऱ्यांना संरक्षण व बढतीही दिली हे रश्मी शुक्ला प्रकरणातून स्पष्ट झाले. हे काही एकमेव प्रकरण नाही. या शिवाय बोलण्या वागण्यात कुठलाही धरबंद नसलेल्या कार्यकर्त्यांना नेते बनविण्याचे पातक फडणवीस यांनी केले आहे. या लोकांनी राजकारणाचे गटार बनविले आहे. फडणवीस यांच्या आश्रित नेत्यांपैकी सदा खोत याने काय गुण उधळले हे नुकतेच सर्वांसमोर आले आहे.असे डजनावारी कथित नेते त्यांनी पोसले आहेत. फडणवीस यांनी आपल्याला उद्धव ठाकरे विरोधात आरोप करायला भाग पाडल्याची कबुली किरीट सोमय्याने दिलीच आहे. आरोपाची राळ उडवून द्यायची, त्या आधारे सरकारी यंत्रणेचा ससेमिरा मागे लावायचा, अटकेची टांगती तलवार केवळ त्या नेत्यावर नाही तर त्याच्या घरच्या सदस्यांवर ठेवायची आणि आपण म्हणू तसे करायला भाग पाडायची फडणवीस यांची कार्यपद्धती आहे. या कार्यपद्धतीने महाराष्ट्राचे राजकारण नासले आहे. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचे राजकारण नासवले त्या सर्वाना घरी बसविल्याशिवाय महाराष्ट्राचा गौरव व पूर्वीची ओळख परत मिळविता येणार नाही. खरे तर देवेंद्र फडणवीस हे नव्या पिढीतील आश्वासक राजकारणी वाटत होते. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी फार चांगली कामगिरी केली. पण गडकरीच्या विरोधात केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि फडणविसांच्या डोक्यात सत्ता गेली. त्यांच्या डोक्यातील सत्ता उतरविण्याची ताकद फक्त मतदारातच आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची साफसफाई मतदारांनी या निवडणुकीत केली नाही तर देशातील सर्वोत्तम गणल्या गेलेल्या राज्याला सर्वात वाईट राज्य अशी ओळख आजचे राजकारणी देतील.
https://www.facebook.com/share/p/15JvDapmUN/
**
महाराष्ट्र शेणपट्टा बनवायचे
महाराष्ट्र शेणपट्टा बनवायचे भाजपचे प्रयत्न वाखाणन्याजोगे आहेत.>>> काहीही असो या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा 'बटेंगे तो कटेंगे' पासुन भाजपाला ज्याप्रकारे डायवर्जन ( जरी यु-टर्न नसेल ) घ्यावं लागला, आणि आता त्या वाक्याचा चुकिचा अर्थ लावला गेला हे पटवून देण्याचा जो अटोकाट प्रयत्न भाजपा कडून होतो आहे त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राचे वेगळेपण पोहचले गेले हे नक्की....कदाचित त्यामुळे मोदी-शाह-योगी यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेऊन स्वतःच्या मानसिक असुरक्षिततेला मलमपट्टी करण्याच्या नादात नवहिंदूत्वाचा परवाना घेतेल्या त्यांच्या नवहिंदू समर्थकांच्या भविष्यातील आशा-अपेक्षांचाही निदान काही काळापुरता आणि काही प्रमाणात हिरमोड झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
महाविकास आघाडी आणि महायुती
महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही चा मसावी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे.
दोन्ही चा मसावी >>
दोन्ही चा मसावी >>
येणार कोण?
येणार कोण?
प्रियांकाने नागपूर आरएसएस
प्रियांकाने नागपूर आरएसएस मुख्यालयात जान आणली. मोगांबो खुश हुआ!
उ प्र च्या मुख्यमंत्री अजय
उ प्र च्या मुख्यमंत्री अजय भिस्त याने स्वत: च्या राज्याची वाट लावली आहे. आता महाराष्ट्रात या स्टार प्रचारकाला आमंत्रण देणारे राज्याचे सुमार बुद्धीचे , गुजरात धार्जिणे नेते. राज्याच्या वाटेला आलेले प्रोजेक्ट/ नोकर्या गुजरातला पाठवायच्या, आणि वर बेरोजगार युवकांना धार्मिक द्वेषाच्या नशेमधे ढकलण्यासाठी अजय भिस्त.
https://timesofindia.indiatimes.com/india/batenge-to-katenge-has-yogi-ad...
विकासाचे आश्वासन ते बटेंगे,
विकासाचे आश्वासन ते बटेंगे, भाजपची साधार भीती दर्शवतो की काय?
कायदा आणि सुव्यवस्था सांभाळता
कायदा आणि सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. लोकांनी स्वतःचा बचाव कसा करायचा हे सरकारने सांगू नये.
आजच्या पेपरांत पहिलं पान
आजच्या पेपरांत पहिलं पान भरून भाजपची जाहिरात आहे. - म्हणूनच काँग्रेस नको. त्या आधी MVA .
बातम्यांचं कोलाज. २००८ ते २०१३ या काळातले दहशतवादी हल्ले. २००९ मध्ये तरीही काँग्रेसचं च सरकार आलं. २०१४ चं सरकार विकास आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बदललं, मोदींच्या अखत्यारीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना हे लोक दह शतवादी हल्ला मानत नाहीत, याचं कारण काय असावं?
बृहन्मुंबई महानगर पालिकेतले घोटाळे - काँग्रेस मुंबई मनपामध्ये कधी सत्तेत होती?
कोविड स्पाइक दर म्यान मुंबईने मोठ्या धार्मिक सणांवर निर्बंध लादले आहेत. These people are insane and they assume their followers to be equally insane and so they are.
१०० करोड की वसूली. - या बद्दल अनेकदा लिहिलंय. सचिन वाझेच्या तोंडच्या शब्दांशिवाय दुसरा काही पुरावा नाही. हा यांचा आता लाडका झाला. अँटिलिया स्फोटके प्रकरणात फडणवीसांची विधानस भेतील भाषणे ते हे सगळे प्रकार घडत असताना प्रत्यक्ष हजर असल्यासारखी होती. का?
रेमडेसिवीरचा काळाबाजार - काँग्रेस पदाधिकार्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. - अशाच कोणालातरी वाचवायला अभ्यासू फडणवीस भर रात्री पोलिस स्टेशनला गेले होते ना?
राहुल गांधींच्या आदेशावरून उद्धव ठाकरेंनी पालघर मॉब लिंचिंगचा सीबीआय तपास थांबवला. - पालघर पोलिसांनी केलेल्या तपासात यांना हवं तसं काही मिळालं नाही, किंवा नको ते मिळालं म्हणून सीबीआय हवं? आणि राहुल गांधींचा काय संबंध? त्या साधूंच्या आणि सुशांतसिंग राजपूतच्या मृतदेहाचे लचके हे लोक अजून तोडताहेत. रोज जेवताना तोंडी लावण्यासारखे.
बाजार मस्त घसरलाय. आज तरी
बाजार मस्त घसरलाय. आज तरी मविआ जिंकतीय.
मिसळपाव.कॉम वर धमाल चाललीय.
मिसळपाव.कॉम वर धमाल चाललीय. काही लोकांचं म्हणणं आहे की,
जरांगे फॅक्टर व्यवस्थित चालला तर मविआ २१० ला गवसणी घालू शकते. महायुती ७० ही क्रॉस करणार नाही नी मविआ २१०-२० ला धडकून राक्षसी बहुमत मिळवेल. काही झाले तरी भाजपची ही शेवटची सत्ता असेल अजून पुढे २० वर्षातरी भाजपला सत्ता मिळणार नाही. चुकीच्या नेतृत्वामुळे मागच्या ४ पिढ्यांची मेहनत वाया जाऊन वगैरे वगैरे
बाजार घसरण्याचं हेच कारण असावं.
एका गाजलेल्या मराठी नाटकातलं
एका गाजलेल्या मराठी नाटकातलं एका भ्रमिष्ट वृद्ध स्त्रीचं पात्र थोड्या थोड्या वेळाने - व्यंकटेशा, किती रे वाजलेत ? असं ओरडत असे. कोणतं नाटक , कोणाला काही आठवतंय का?
नाटक आठवायची गरज नाहीये, भरत.
नाटक आठवायची गरज नाहीये, भरत..
प्रयोग अखंड चालू आहे..
Pages