विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काल काही चानेल बघत होतो. धमाल. आणि निवडणूक झाल्यावर ही कोमेडी सर्कस बंद होणार आहे ह्याचे खूप वाईट वाटते.
चर्चेवरच्या काही गोष्टी.
चार M
मटण = ४५००० किलो मटण वाटले. मटण कुणाचेही खा पण बटण स्वाभिमानाचे दाबा.
मनी = एका मताची बोली १०,०००/ पाच मतदाराच्या कुटुंबाला ५०,०००. पैसे कंटेनर मधून येत आहेत.
मविआ= EC ने हरियाणा सारखा झोल नाही केला तर मविआ २१० टच करेल.
मशीन= जुना खेळ पुढे सुरु.
माफिया ???
मत विकणे हा गुन्हा आहे का?
लोक पोटची मुल विकतात मग साधे मत का विकू नये?

सापडला पैसा हाटलीत,
लोकशाही चढली सरणावर,
झाला विनोद मोठा इथे,
राष्ट्रहित करण्यावर.

तत्त्वे, विचार, सत्य हरवले,
सत्ता झाली स्वार्थाची गुलाम,
नेते करतात सौदे वायफळ,
जनतेचं दु:ख नको त्यांना नाम.

घड्याळाच्या काट्यावर वाटाघाटी,
पदं ठरतात नोटांच्या बाजारात,
हक्क आणि अधिकारांचे स्मारक,
झाले सत्ताधारी लोभाच्या वार्‍यात.

पण उठू दे आता जनतेचा आवाज,
ही साखळी तोडायची वेळ आलीय,
लोकशाहीला पुन्हा जीवन देण्यासाठी,
तत्त्वांनी पेटायची वेळ आलीय.

आजची तावडेंची न्युज पाहता, फडणवीसांनी मोदी-शाह यांच्यासमोरच्या महाराष्ट्र भाजप नेतृत्वासाठी इतर सर्व उपलब्ध असलेल्या पर्यायांवर फुली मारून टाकली आहे असे सध्या तरी दिसतंय. माझ्या मते मोदी या बाबतीतल्या दूरदृष्टीत कच्चे आहेत, कदाचित शाह ला फडणवीसांमधल्या या महत्वाकांक्षेचा आणि पाताळयंत्रीपणाचा कुठेतरी नमुना दिसला असणार. 

मणिपूर जळतय तरी मोदी शहा बिरेन सिंहला पदावरून काढत नाहीत. मग हे नोटा वाटल्यामुळे थोडीच फुली मारणार आहेत.

राजकारण चांगलंच फिरलंय. खर्गेंनी जाहीर केलं की बीजेपी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साप आहे आणि त्यांना मारून टाकलं पाहिजे.

त्यामुळे भाजपची लोकं व संघाची लोकं घाबरून लपून बसली आहेत. ती निवडणूक संपेपर्यंत बाहेर येण्याची शक्यता वाटत नाहीये. त्याचा मतदानावर प्रचंड परिणाम होणार आहे. त्यामुळे मतदान मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता वाटायला लागली आहे. काश्मीरचे कमी मतदानाचे विक्रम मोडले जाऊ नयेत यासाठी त्यांनी देव पाण्यात घातले आहेत.

शेवटी मतदान कमी होण्यासंदर्भात एक तरी मुद्दा मिळाला. Happy
असो.

ही माझी शेवटची पोस्ट.

माझे तर्क चुकले तर ते सांगायला नक्की येईन.
पण जर माझे तर्क बरोबर आले तर एकदम पुढच्या निवडणुकांत भेटू.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
_/\_

पण जर माझे तर्क बरोबर आले तर एकदम पुढच्या निवडणुकांत भेटू,>>>>>>>>> कमीतकमी यासाठी तरी आपले तर्क बरोबर यायले हवेत

जर माझे तर्क बरोबर आले तर एकदम पुढच्या निवडणुकांत भेटू.

असे करू नका, इथे अधून मधून येत जा. थोडा तुम्हाला थोडा आम्हाला फायदा होईल.

GcvOUIPXIAE9Bmw.jpg

घरकाम करणारया स्त्रिया काय म्हणत आहेत. आमच्या कामवल्या मावशी बोलल्या, त्या तिकडच्याना मिळाले, आम्हाला दिले नाहीत. मी मतदानाला जाणार नाही. Happy

आजची तावडेंची न्युज पाहता, फडणवीसांनी मोदी-शाह यांच्यासमोरच्या महाराष्ट्र भाजप नेतृत्वासाठी इतर सर्व उपलब्ध असलेल्या पर्यायांवर फुली मारून टाकली आहे असे सध्या तरी दिसतंय यातून तावडे बाहेर पडले तर मोठा प्रतिडाव खेळतील.

५ दिवसापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे टिव्ही मुलाखती दरम्यान म्हणाले होते, 'भाजपमध्ये ज्या गोष्टीची चर्चा असते ते शंभर टक्के होतेच असे नाही. राजस्थानमध्ये पाहा, भजनलाल मुख्यमंत्री झाले. मध्य प्रदेशात मोहन यादव मुख्यमंत्री झाले. चर्चा होते ते मुख्यमंत्री होतातच असं नाही.'

आज विनोद तावडे नालासोपाऱ्याच्या विवांता हाॅटेल मध्ये होते. बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर, मुलगा क्षितिज ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह विनोद तावडेंना घेरले. त्यांच्या बॅगेतील पैसे, पैसे वाटपाच्या नोंदी असलेली डायरी व इतर साहित्याचे व्हिडिओ माध्यमांनी प्रसिध्द केलेत.

आमदार ठाकूर म्हणालेत, 'भाजपा मधीलच हितचिंतकांनी विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याची माहिती त्यांना दिली. हा प्रकार जागेवर मिटविण्यासाठी तावडेंनी हितेंद्र ठाकूर यांना २५ फोन केले.' तावडेंना सुमारे २ तास विवांता हाॅटेल मधून बाहेर पडता आले नाही. हा सगळा तमाशा गोदी मेडीयाचे चॅनेल चर्वितचर्वण करुन दाखवत आहेत.

दुसरीकडे डहाणू विधानसभा मतदारसंघातील बविआचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी उद्या मतदान असताना आजच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्थ स्पष्ट आहे, निवडणूकीच्या आधीच घोडेबाजार झाला आहे. तावडे त्याच कामगिरीवर होते. पण भाजपमधील तावडेंच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिक्रियेमुळे तावडेंचा करेक्ट कार्यक्रम झाला.

राष्ट्रीय सरचिटणीस यांचा दौरा लीक करत, मुद्देमालासह पकडून देण्यासाठीच्या प्रकारामागे कोण आहे? हे एव्हाना उभ्या महाराष्ट्राला समजलेले आहे. महाविकास आघाडीला घवघवीत जागा मिळण्यासाठी आजचा प्रकार हा मैलाचा दगड ठरलेला आहे.

- तुषार गायकवाड

#नोंद #महाराष्ट्रविधानसभा२०२४

मला आश्चर्य वाटतं, तावडे राजकारणात एवढे अनुभव घेऊनही कच्चे कसे राहिले, पार दिल्लीत होते ना, असा कसा स्वतःचा गेम होऊ दिला.

मला आश्चर्य वाटतं, तावडे राजकारणात एवढे अनुभव घेऊनही कच्चे कसे राहिले, पार दिल्लीत होते ना, असा कसा स्वतःचा गेम होऊ दिला.>>> महाराष्ट्र प्रदेश भाजपा हा पुर्णपणे फडणवीसांच्या कह्यात आहे, गेल्या १५-२० वर्षांच्या फडणविसांच्या महाराष्ट्रातील/भाजपातील एकखांबी राजकारणाचा हा परिपाक आहे. गडकरी राज्यात न येण्याचं हे ही एक मुख्य कारण सांगितले जाते. जर तुची टीमच तुमच्या मागे तुमचा गेम करायला टपली असेल तर तुम्ही शिर्षस्थानी राहूनही कुठे कुठे आणि कशा कशाला म्हणून पुर्ण पडणार?

त्यांनी पैसे वाटले असतील तर फडणवीसांना टार्गेट करून काय उपयोग? पैसे न वाटता अडकवले असेल तर गोष्ट वेगळी.

त्यांनी पैसे वाटले असतील तर फडणवीसांना टार्गेट करून काय उपयोग? पैसे न वाटता अडकवले असेल तर गोष्ट वेगळी.>>> तो जो जुन्या हिंदी चित्रपटांमधला डायलॉग होता ना 'मेरे इजाजत के बगैर यहां परिंदा भी पर नही मार सकता', हे फडणविसांचं सध्याच्या घडीला महाराष्ट्र प्रदेश भाजपामधे प्रस्थ आहे....फडणवीस टार्गेट तर बनणारच!!

https://www.loksatta.com/nagpur/police-raided-ashwin-shendes-farm-in-shi...
आर्वीलगत शिरपूर खडकी येथील अश्विन शेंडे यांच्या शेतात हा साठा दिसून आला. पोलिसांनी पहाटे दोन वाजता धाड टाकून हा साठा जप्त केला. या कारवाईवेळी खासदार अमर काळे पण उपस्थित झाले. त्यांनी आरोप केला की हा साठा आम्हीच पकडून दिला असून तो भाजपने मतदारांना प्रभावित करण्यासाठी आणला. शेतमालक हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर दारू सोबतच पैसाही दिसून आला असता. पण पोलिसांनी वेळेवर कारवाई केली नाही असा आमचा आरोप आहे.

इथे फडणविसांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे भाजपचे उमेदवार आहेत.

कदाचित दुसऱ्या पक्षानेही केला असेल गेम विरारच्या बाबत, त्यांचा उमेदवार ढापल्याने, अनेक शक्यतापैकी एक ही असू शकेल, उगाच ढापले त्याला.

मला आश्चर्य वाटतं, तावडे राजकारणात एवढे अनुभव घेऊनही कच्चे कसे राहिले, पार दिल्लीत होते ना, असा कसा स्वतःचा गेम होऊ दिला. ह्याबाबत सहमत, २०१९ सालीच तिकीट कापून एवढा मोठा गेम झालेला असताना, कोण कुठे केव्हा घात करेल ह्याचा अंदाज त्यांना यायला हवा होता. तरीही हे प्रकरण सावरले गेल्या सारखे वाटतेय. विरोधी पक्षानेही जास्त लावून धरले नाहीये. तावडे ह्यातून तावून सुलाखून निघतील.

Do you know?:

Leading hollywood actors are closely watching Maharashtra election campaigns in order to prepare for their roles in upcoming psychothrillers and comedies?

<< अगदी ३ दिवसांपूर्वी म्हणजे १५ तारखेला फडणवीसांकडून 'तावडे हे राष्ट्रीय नेते, मी छोटा नेता' असे वक्तव्य आलेले, तेंव्हाच मी समजून गेलेलो तावडेची रिटर्न जर्नी चालू झालीये....माणूस महाभयंकर कपटी बाबा, 'भगवान ऐसा दोस्त किसी दुश्मन को भी ना दे' हे देवा भौ वरूनच आलाय बहुतेक... Rofl >>

----- एकेकाळी, एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदासाठीचे मोठे दावेदार होते, पण शेवटच्या क्षणी माशी शिंकली सुमार नेतृत्व लादले गेले.
पुढे खडसे यांना कसल्याशा भ्रष्टाचार प्रकरणांत छान गोवले, अगदी खड्यासारखे बाजूला केले.... मुख्यमंत्री पदाचा एक दावेदार कमी झाला. आता तावडे...

<< तरीही हे प्रकरण सावरले गेल्या सारखे वाटतेय. विरोधी पक्षानेही जास्त लावून धरले नाहीये. तावडे ह्यातून तावून सुलाखून निघतील. >>

------ जेव्हढे साधायचे होते ते झाल्यावर सावरणे असते. आपलाच माणूस आहे.
कुठलेही प्रकरण कायमचे सावरलेले नसते. व्यावस्थित डॉक्युमेंटेशन झाले आहे. वेळ पडल्यास फाईल केव्हाही उघडता येते. Happy

कुठलेही प्रकरण कायमचे सावरलेले नसते. व्यावस्थित डॉक्युमेंटेशन झाले आहे. वेळ पडल्यास फाईल केव्हाही उघडता येते. >>> राजकारण म्हणजे खूप भांडी एकाच वेळी चुलाणावर ठेऊन आग कमी जास्त करायची, पण कुठलेही आधण उतू जाऊ द्यायचे नाही. हे खरे कौशल्य.
त्या हॉटेलात काही स्त्रिया पण होत्या असे म्हणतात म्हणे. त्या पळून गेल्या.

पैसे वाटपाची काम मोठ्या पदावरील लोक स्वत कधी करत नाहीत. त्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ते, संस्थेतील कामगार असतात. तावडे स्वतः वाटत असतील तर त्यांना जाण कमीच आहे म्हणावी लागेल. एव्हढी वर्ष राजकारणात असूनही त्यांना स्वतःचा मतदारसंघ ही नाही.

Pages