Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
"कुंभकर्ण रोबोटिक्स" कंपनी
"कुंभकर्ण रोबोटिक्स" कंपनी काढा.
चांगल्या ऑर्डर्स मिळतील.>>> मी विचारलेल्या प्रश्नात पुढील ५ वर्षे तरी एक खुप मोठी आर्थिक संधी दडलेली आहे असं हलक्यात घेऊ नका. I'm serious.
मविआ मध्ये सध्या तरी सगळ्यात
मविआ मध्ये सध्या तरी सगळ्यात जास्त जागा शिवसेनेच्या आल्यात. ही सबसे कमजोर कडी असं बोललं जात होतं. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात पडले. नाना पटोलेंचं काही खरं नाही. देशमुख बंधू झोपाळ्यावर बसलेत. महाराष्ट्र काँग्रेस मध्य प्रदेश काँग्रेसच्या वाटेने जाईल असं दिसतंय.
एकच वाटते, प्रत्येक निवडणूक
एकच वाटते, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. त्यामुळे चर्चा, प्रतीचर्चा, विश्लेषण यांना फार काही किंमत ठरत नाही. शेवटी लोक जे ठरवतात ते होते
लोकशाहीचा नेहमीच विजय होतो (बाकी narrative सेट करणारे यावर आक्षेप घेतीलच)
ह्या निवडणुकीत पैसा आणि
ह्या निवडणुकीत पैसा आणि निवडणूक आयोगाने जे ठरवले तेच झाले.
अरेच्चा महायुती म्हणजे भाजप
अरेच्चा महायुती म्हणजे भाजप शिंदे पवार आणि आघाडी म्हणजे शप उबाठा मी सकाळपासून उलट समजत होतो. कमालच झाली म्हणायची एवढ्या फरकाने कसे जिंकले?
अगदीच अनाकलनीय निकाल आहे.
अगदीच अनाकलनीय निकाल आहे. युती येईल असे वाटत होते पण एवढे यश समजण्या पलीकडे आहे. १४९ पैकी १३७ म्हणजे गुजरात पेक्षा जास्त यश भाजपला इथे. काका पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतात आणि पुतण्या ला ५८ पैकी ४१ जागा. सगळ्याच का नाही दिल्या युतीला, चालले असते की.
झारखंड मध्ये आम्ही हरलोय,
झारखंड मध्ये आम्ही हरलोय, म्हणजे आम्ही महाराष्ट्रात काहीही गडबड केलेली नाही असे वाटून घ्यावे. कळावे.
सगळ्याच का नाही दिल्या युतीला
सगळ्याच का नाही दिल्या युतीला, चालले असते की. मनाचा चांगुलपणा दुसरं काय?
मी मोदींचे भाषण एकले नाही.
मी मोदींचे भाषण एकले नाही. वक्फ बोर्ड रद्द करण्याची कुठली तारीख सांगितली मोदीनी? कळेल का?
महत्वाच्या परिक्षेचा पेपर
महत्वाच्या परिक्षेचा पेपर आधीच फुटला होता, पर्यवेक्षक व्यक्ती परिवारातलीच होती त्यामुळे परिक्षेत कॉपी करण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले, तपासणारे पुन्हा परिवारांतलेच... जेमतेम काठावर पास होण्याची शाश्वती नसलेला बाळ्या आज राज्यांत पहिला आला.
राज्यपाल कोश्यारींची हुशारी , फोडा फोडी, निवडणूक आयोगा कडून कायम झुकते, ED-CBI कडून एक एक करत विरोधाची आणि विरोधकांची धार बोथट करणे, महत्वाच्या खटल्यांमधे सर्वोच्च न्यायालयाकडून दिरंगाई, भरभक्कम रोकड पैसा सढळ हाताने वापरण्याची खास परवानगी, हे सर्व कमी म्हणून EVM - कारणांची लांब मोठी यादी करता येईल पण त्याला काहीच अर्थ नाही. निखळ नसले तरी यश आहे हे मान्य.
देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे या यशाबद्दल अभिनंदन. હવે તેઓ બધા મહારાષ્ટ્ર માટે કામ કરશે.
फडणवीसांना रात्री बेरात्री
फडणवीसांना रात्री बेरात्री फिरस्तीवर जावे लागणार नाही हा वर आलेला मुद्दा महत्वाचा आहे. पोटेन्शीयल नेता आहे फरफट का करायची ?
ED/ CBI यांना पण आता विरोधकांच्या मागे २४-७ धावावे लागणार नाही. तेव्हढाच त्यांचाही वेळ ज्या कामाचा ते पगार घेत आहे त्या कामासाठीच सत्कारणी लागेल ( अशी अपेक्षा). जे काही चार- दोन विरोधी आमदार EVM ने निवडले असतील त्यांना मागचा इतिहास माहितच आहे. पुढच्याच ढेच मागचा शहाणा.
सर्वोच्च न्यायालयांला अपात्र आमदार सारख्या निरर्थक खटल्यांवर निकाल देण्याची वेळ येणार नाही. सुंठीवाचून खोकला गेला.
शरद पवारांनी आता सुखाने निवृत्त व्हायला हरकत नाही.
कुठले शेअर घ्यायचे?
उदय सर तुम्ही एव्हडे उशिराने
उदय सर तुम्ही एव्हडे उशिराने का आलात. तिकडे रात्र होती काय?
उदय सर, भरत सर जरा आठवडाभर
उदय सर, भरत सर जरा आठवडाभर तरी आराम करा. महायुतीचे एव्हढे आमदार येण्यासारखं त्यांचं काम नव्हत. निवडणुकीपूर्वी फुकट पैसे वाटले त्याचा त्यांना फायदा झाला. लोकसत्तेत लिहिलय राहुल गांधींनी फ्कत चारच सभा महाराष्ट्रात घेतल्या. जरा तरी कष्ट घ्यायला नको का?
महत्वाच्या परिक्षेचा पेपर
महत्वाच्या परिक्षेचा पेपर आधीच फुटला होता, पर्यवेक्षक व्यक्ती परिवारातलीच होती त्यामुळे परिक्षेत कॉपी करण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले, तपासणारे पुन्हा परिवारांतलेच... जेमतेम काठावर पास होण्याची शाश्वती नसलेला बाळ्या आज राज्यांत पहिला आला
झाला दिवस, पुढे चला, रडणे बंद करा.
स्वतःची रेष मोठी करा
रात्रीचे चांदणे सर , माझ्या
रात्रीचे चांदणे सर , माझ्या आरामाची काळजी केल्याबद्दल धन्यवाद. मी अगदी मजेत आहे. त्यामुळे तुमची निराशा झाली असेल तर त्याबद्दल दिलगीर आहे.
फडणवीसांविरुद्ध महाराष्ट्रात
फडणवीसांविरुद्ध महाराष्ट्रात मराठा समाजात प्रचंड नाराजी होती, दलित मतदारही भाजपवर लोकसभेपासून नाराज होता, मुस्लिम समाजही भाजपच्या फूट पाडणाऱ्या प्रचारावर नाराज होता तसेच ठाण्याबाहेर आजीबात प्रभाव नसलेले एकनाथ शिंदे, त्या शिवसेना फोडल्या बद्दल प्रचंड नाराजी तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार ह्यांच्याबरोबर प्रचंड सहानुभूती असताना भाजप एकहाती १४९ पैकी १३२ जागा, शिंदे ५७ जागा आणी मविआ फक्त ५० जागा जिंकणं शक्य आहे का? हे निकाल जनतेने लावलेत की यंत्रणेने? की निवडणूक घेण्याचे फक्त नाटक करण्यात आले?
ऑपरेशन लोटस म्हणजे आपली रेष
ऑपरेशन लोटस म्हणजे आपली रेष लहान असली तर दुसर्याच्या मोठ्या रेषेचे तुकडे पाडून ते आपल्या रेषेला जोडायचे. हाकानाका.
बाहुबली,
बाहुबली,
मटा, पुणे आवृत्ती, रविवार 24 नोव्हेंबर अंक, पान 15 वाचा. सुंदर लेख आहेत.
बाहुबली,
बाहुबली,
मटा, पुणे आवृत्ती, रविवार 24 नोव्हेंबर अंक, पान 15 वाचा. सुंदर लेख आहेत.
काका, आज सकाळी सकाळीच
काका, आज सकाळी सकाळीच
मटा, पुणे आवृत्ती, रविवार 24
मटा, पुणे आवृत्ती, रविवार 24 नोव्हेंबर अंक, पान 15 वाचा. सुंदर लेख आहेत. वाचले. जर निवडणूक फेक नसती नी गडबड करुन जिंकले नसते. तर भाजप नी फुटीर पक्षांना जास्तीत जास्त १५० जागा मिळाल्या असत्या. मला ह्या पानावरील काँग्रेस बद्दलचा लेख पटला. निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढायला हव्या होत्या तसेच मोदीना थेट अंगावर घ्यायला हवे होते. पण ह्या निवडणुका मला वयक्तिक संशयास्पद वाटताहेत. अगदी जिंकलेले उमेदवार, मतांमधील फरकही संश्यासापद आहे.
काँग्रेस समर्थक कालपासून जे
काँग्रेस समर्थक कालपासून जे काय पिसाळलेत की ज्याचे नाव ते. सोशल मीडियावर नुसता शिव्या शापांचा पाऊस सुरू आहे आणि सोबत रडारड. सकाळी सकाळी दीडशेच्या आसपास सीट होत्या तेव्हा लय खुश होते पण नंतरच्या तासाभरात जे काय पोकळ बांबूचे फटके पडायला लागले विचारू नका. कुठं लपू आणि काय झाकू अशी अवस्था झाली. मजा आली. रागा मागे बोलले होते ‘ये मजा मै सबको देना चाहता हू’ ती हीच मजा असावी
2024-25 च्या शैक्षणिक धोरणा
2024-25 च्या शैक्षणिक धोरणा नुसार लोकशाही चा धडा नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून वगळून इतिहासाच्या पुस्तकात घालण्यात येणार आहे.
इतिहासजमा झालेली लोकशाही...
जर निवडणूक फेक नसती नी गडबड
जर निवडणूक फेक नसती नी गडबड करुन जिंकले नसते.
जाऊद्या आता, रडीचा डाव किती वेळ आणि किती दिवस आणि किती वर्ष खेळणार. केंद्रात मोदी, अमेरिकेत ट्रंप आणि राज्यात युती परत आली. 2029 पर्यंत यात काही बदल होणार नाही. उगाच का रक्त जाळता. त्या पेक्षा घाम गाळा, काम करा आणि 2029 ला बदल घडवून आणा.
इथे आणि इतर कुठेही चर्चा/प्रती चर्चा करून, धागे काढून, त्यावर कॉमेंट लिहून यात काहीच बदल होणार नाही. कुठे चुकले आणि नेहमी कुठे चुकतंय याचे रेट्रोस्पेक्टिवे गरजेचे आहे. त्यात वेळ सत्कारणी लावा. तुमच्या आवडत्या पक्षातील कार्यकर्ते, श्रेष्ठी यांच्याशी संपर्क असेल तर सकारात्मक चर्चा करा. पुढील रणनीती आखा. अजून जोमाने काम करा.
धुळे शहर मतदार संघात मुस्लिम
धुळे शहर मतदार संघात मुस्लिम मते आहेत ६७००० आणी mim च्या उमेदवाराला पडलेत ७० हजार मते. म्हणजे मुस्लिम १०० टक्के मतदान अधिक ३ हजार मते बोनस. दलित मत म्हणावे तर वंचीत ला ५ हजार मते पडलीत. समजावादी पार्टीचा अत्यंत तगडा मुस्लिम उमेदवार ज्याला १५ ते २० हजार मते सहज पडतील त्याला १७०० मते पडलीत. आणी धुळ्याचे ३ टर्म आमदार त्यातल्या दोन टर्म अपक्ष , स्वतःचा ४०-५० हजाराचा वोट बेस असलेले अनिल गोटे शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहूनही फक्त २४००० मते मिळवत आहेत. शिवसेनेचे स्वतःचे २० ते ३० हजार मते धुळ्यात आहेत. मागच्या निवडणुकीत अवघ्या ४ हजार मतानी त्यांचा पराभव झाला होता . आणी भाजप उमेदवाराला किती मते मिळावेत तर १ लाख १६ हजार?? आणी तेही अत्यंत नवख्या उमेदवाराला. वरकडी म्हणजे धुळ्यातील काही १०० टक्के मुस्लिमबहुल भागातूनही भाजपच्याच उमेदवाराला लीड मिळालाय. असाच चमत्कार धुळे ग्रामीण मध्ये झालाय. अत्यंत स्ट्राँग नेटवर्क असलेल्या काँग्रेसच्या कुणाल पाटील ह्यांचा अर्ध्या तालुक्याला माहित नसलेला तिशीतील उमेदवार पराभव करतो तेही ६६००० मतानी? चमत्कारच. धुळे जिल्ह्यात शिंदेसेना औषधालाही नाही. आणी साक्री ह्या मतदारसंघात शिंदेसेनेचा उमेदवार जिंकतोय.
असे चमत्कार महाराष्ट्रात सगळीकडे घडल्याचे कळतेय.
जाऊद्या आता, रडीचा डाव किती
जाऊद्या आता, रडीचा डाव किती वेळ आणि किती दिवस आणि किती वर्ष खेळणार. म्हणजे तुम्हाला मान्यआहे की गडबड झालीय. पण भाजप आहे म्हणून पवित्र मानून घ्या असेच ना?
ते evm बद्दल रडायला काल
ते evm बद्दल रडायला काल दुपारी 2 नंतर सुरुवात करायची होती... तुम्हाला एक दिवस उशीर झालेला दिसतोय (हा हा हा)
केंद्रात मोदी, अमेरिकेत ट्रंप
केंद्रात मोदी, अमेरिकेत ट्रंप आणि राज्यात युती परत आली. 2029 पर्यंत यात काही बदल होणार नाही. उगाच का रक्त जाळता. त्या पेक्षा घाम गाळा, काम करा आणि 2029 ला बदल घडवून आणा.
मी ज्या मतदारसंघात राहतो तिथे
मी ज्या मतदारसंघात राहतो तिथे तुतरीची हवा होती आणि निवडून आलीही. मग निवडणुकीमध्ये काहीतरी घोळ झाला होता अस समजायचं का? पैसे तिघांनीही भरपूर वाटले पण जास्त घड्याळ वाल्याने जास्त वाटले. घड्याळ वाले काल पासून रडत आहेत, विकास करूनही लोकांनी मत दिली नाहीत म्हणून.
तात्पर्य: कार्यकर्त्यांना काहीही फरक पडत नाही, आपला उमेदवार जिंकला तरच योग्य नाही तर रडत बसणे.
लोकसभेला ३१ जागा आल्यावर
लोकसभेला ३१ जागा आल्यावर मविआच्या डोक्यात यश गेले.
या वेळी जागावाटपाच्या बोलणीतून राजू शेट्टी, डावे, आडम मास्तर, बहुजन विकास आघाडी असे अनेक छोटे पक्ष बाहेर पडले. प्रत्येक वेळी यांचा शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपाचा घोळ चालू राहतो आणि अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना हे जागा सोडलेली नाही किंवा अडचणीची जागा सोडलीय असे सांगतात. तिथून पुढे प्रचाराला वेळ मिळत नाही. राजू शेट्टी यांच्याप्रमाणेच डाव्यांनीही या वेळी स्पष्ट शब्दात सांगितले.
संविधान खतरे मे मुळे ज्यांनी ज्यांनी मतं दिली त्यांना गृहीत धरणे, एकजातीय नातेवाईकशाही चालवणे, ओबीसींना घाबरवून सोडणे या मुळे ओबिसी कसे एकवटले हे आताच लक्ष्मण हाकेंच्या मुलाखतीत ऐकले. जरांगेंना ऐन वेळी माघार घ्यायला लावल्याने मराठा मतदार गोंधळात पडला. अशा अनेक गोष्टींमुळे पराभव झाला.
छोट्या पक्षांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा देऊन आणि निवडून आणून भाजपने देशाच्या इतर भागात जी कामगिरी केली तशी २०१४ आणि २०१९ ला केली होती. मात्र भाजप सुद्धा महाराष्ट्रात काँग्रेसच्या मार्गावर आहे. महादेव जानकरांचा पक्ष संपवायचा प्रयत्न केला. शेतकरी संघटना संपवायचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपची अवस्था सुद्धा मविआ प्रमाणे होईल.
१३३ हा आकडा त्यांचे एव्हरेस्ट शिखर असेल. कोर्टात ओबीसी आरक्षण स्थगित आहे. ते उठवले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधे ओबीसी भाजपचा सुपडा साफ करतील. या वेळी मविआसोबत असणारा मायक्रो ओबीसी महायुतीकडे वळला.
लोकसभेला संविधान बदलण्याची भीती आणि या वेळी ओबीसी आरक्षणाची भीती या भयाच्या सावटाखाली मतदान झाले.
दोन्हीकडचेही कधीच वास्तव मांडत नाहीत, मांडणारही नाहीत.
Pages