हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा.
धन्यवाद
अस्मिता.
त्यांनी वाद-चर्चांचं जे वर्णन
त्यांनी वाद-चर्चांचं जे वर्णन केलं आहे (दुसरी बाजू समजून घेणं, दुसऱ्या बाजूला तुच्छ न लेखणं) अशा प्रकारच्या संस्कारांची फार गरज आहे आपल्याला. >>> हो ते ही एक जाणवले. पूर्ण सहमत आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची पु.ल. देशपांडे यांनी घेतलेली अर्ध्या तासाची मुलाखत आहे. >>>>
अरे वा, ऐकली पाहिजे ही मुलाखत
की काही प्रोग्रॅमिंग भाषांमधे
की काही प्रोग्रॅमिंग भाषांमधे मधे एक डबल कोट प्रिन्ट करायचा असेल तर अलीकडे पलीकडे पन्नास एक एक्स्ट्रॉ डबल कोट्स टाकावे लागतात यश राज फिल्म्स मधल्या शावा शावा फॅमिली साँग मधे एक्स्ट्रॉज असतात तसे, तसे काहीतरी?
>>> एक नंबर उपमा! असा व्यासंग करायची माझी इच्छा आहे!
अरे वा, फार छान मुलाखत शेअर
अरे वा, फार छान मुलाखत शेअर केलीत वावे.
आवडलीच नव्हे तर धन्य वाटले ऐकुन खरंच.
आकाशवाणीच्या संग्रहातून-
आकाशवाणीच्या संग्रहातून- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची पु.ल. देशपांडे यांनी घेतलेली अर्ध्या तासाची मुलाखत>>>>> वावे, मी ही नुकतीच ही मुलाखत ऐकली. एकदम जबरदस्त. त्यात शेवटी त्यांनी ऋचा म्हटली आहे ती ऐकून तर आदर कैकपटीने दुणावला. या वयातील स्मरण शक्ती, उच्चार, विचार, विद्वत्ता सगळ्यांना दंडवत.
ही मुलाखत ऐकली होती मागे.
ही मुलाखत ऐकली होती मागे. फारच छान. गंमत म्हणजे वेद शास्त्रोत्तेजक सभेच्या (पुणे) सुरूवातीच्या परीक्षेला बराचसा अभ्यासक्रम असाच आहे, रघुवंश (काही सर्ग ), किरातार्जूनियं चे काही सर्ग, तर्कसंग्रह, पंचतंत्र आणि काही व्याकरण.
लोकहो, मराठी प्राध्यापिका यास्मिन शेख (ne जेरुशा रूबेन) ह्यांची अगदी वीस मिनिटांची मुलाखत आहे. त्यांनी नुकतेच १०० व्या वर्षात पदार्पण केले, सकाळ मध्ये मागच्या आठवड्यात बातमी होती. अगदी जरूर जरूर ऐका.
तर्कतीर्थांची मुलाखत ऐकली.
तर्कतीर्थांची मुलाखत ऐकली. फारच उच्च!
गेले काही दिवस यास्मिन शेख यांच्या वेगवेगळ्या मुलाखती ऐकतो आहे. फार आदर वाटतो त्यांच्याविषयी. शिवाय नव्वदी- शंभरीतही त्या काय सुंदर दिसतात! स्मरणशक्ती अजूनही तल्लख आहे. कमाल बाई!
https://youtu.be/EsSCTtjrcKc
https://youtu.be/EsSCTtjrcKc?feature=shared
AI संदर्भातली डॉ भूषण केळकर यांची ही मुलाखत नक्की बघा.
लोकहो, मराठी प्राध्यापिका
लोकहो, मराठी प्राध्यापिका यास्मिन शेख (ne जेरुशा रूबेन) ह्यांची अगदी वीस मिनिटांची मुलाखत आहे.>>>>>>लंपन, लिंक द्याल का?
ल-प्रि
ल-प्रि
वावे - पूर्ण ऐकली मुलाखत. काय रेंज आहे या माणसाची! आठव्या वर्षीपासून वेदपठण, चौदाव्या वर्षी विदर्भातून वाईला पुढे वेदशिक्षण. नंतर विनोबा भाव्यांकडून इंग्रजी शिकणे, मग गांधीजींशी इंटरअॅक्शन ( गांधीजींच्या मुलाचे आंतरजातीय लग्न शास्त्रसंमत आहे हे अभ्यास करून सांगितले, इतकेच नव्हे तर ते लग्नही लावले - ही माहिती विकीवरून). नंतर मानवेंद्रनाथ रॉय व कम्युनिजम्/मार्क्सवाद! तीन वेगळे विचार पूर्ण अभ्यासलेले, आणि तरीही इतके नम्र!
पुलंना त्यांच्याबद्दल बरीच माहिती आहे व त्यांच्याशी चांगली ओळखही आहे हे मुलाखतीतून स्पष्टपणे कळते.
यावरून आठवले - मी हे स्वतः ऐकले नाही पण वाचले आहे. नाशिकच्या एका सभेत एकाच व्यासपीठावर कुसुमाग्रज, तर्कतीर्थ व पुलं एकत्र होते. तेव्हा सुरूवातीला बोलणार्यांनी त्यांंची ओळख करून देताना "महाराष्ट्रातील काव्यशास्त्रविनोद इथे जमलेला आहे" असे म्हंटले होते.
नाशिकच्या एका सभेत एकाच
नाशिकच्या एका सभेत एकाच व्यासपीठावर कुसुमाग्रज, तर्कतीर्थ व पुलं एकत्र होते. तेव्हा सुरूवातीला बोलणार्यांनी त्यांंची ओळख करून देताना "महाराष्ट्रातील काव्यशास्त्रविनोद इथे जमलेला आहे" असे म्हंटले होते.>>>>>>भारीच माहिती फारएण्ड
नानाची लल्लन टॉपवरची मुलाखत
नानाची लल्लन टॉपवरची मुलाखत अर्धी एकली....(सुरवातिची ओळख करुन देताना गायलेली आरती पार् कर्पुर गौरमलाही थाबलेली नाही )..नाना फार अजब रसायन आहे...काही गोस्टि रिपिट आहेत म्हणजे त्याने या आधिही अनेक वेळा साग्नितल्यात पण ओघात येतच असाव ते...काही काही ठिकाणी थोड "अरे!आत्ता हे म्हणालास ना! असहि होत पण वो चलता है!! .
त्यातही राजदिप नेहमि प्रमाणे मखलाशी करायला गेला आणी नानाने नेहमिप्रमाणे त्याच्या पायाखालची सतरजी ओढली हा आहे...ती क्लिप फिरतिये..
कुसुमाग्रज, तर्कतीर्थ व पुलं
कुसुमाग्रज, तर्कतीर्थ व पुलं एकत्र होते. तेव्हा सुरूवातीला बोलणार्यांनी त्यांंची ओळख करून देताना "महाराष्ट्रातील काव्यशास्त्रविनोद इथे जमलेला आहे" >> एक नंबर! ही टिपिकल पुलंच्या स्टाईलमध्येच ओळख करून दिली त्यांनी.
कविता लिहीताना प्रामाणिकपणा
कविता लिहीताना प्रामाणिकपणा हा एक मुद्दा काही लोक खूपदा चघळतात. प्रामाणिकपणा म्हणजे तुमची जी अनुभूती आहे , तिला सोडून ज्या जाणिवा तुमच्याकडे नाही त्या आहेत असे समजून काल्पनिक लिहीणे. काहींचे म्हणणे असे आहे कि कविता म्हणजे तुमच्या अनुभूतीतून झालेले काव्यात्मक व्यक्तीकरण. कधी कधी हा विचार झपाटतो, पण कधी कधी अडचणीचा वाटतो.
ज्येष्ठ गीतकार जावेद यांच्या मुलाखतीतून एका नस्तिकाने एक अजरामर भजन कसे लिहीले याचा उलगडा होतो. अर्थात गीतकार आणि कवी मधे प्रोफेशनलिजमचा फरक आहेच. तरीही ही मुलाखत महत्वाची आहे. याशिवाय जावेद साहेबांचे चुरचुरीत संवाद फक्त नायकांच्या तोंडीच भारी वाटतात असं नाही, त्यांच्या स्वतःच्या तोंडून ऐकताना अजून भारी वाटतात. हजरजबाबीपणा हा जावेद यांचा एक उल्लेखनीय गुण अन्य मुलाखतीत दिसला आहे. आवडते व्यक्तीमत्व !
https://youtu.be/pxupeCsUp_8
तर्कतीर्थांची मुलाखत उत्तम
तर्कतीर्थांची मुलाखत उत्तम आहे. त्याकाळातले भारावलेले वातावरण, त्याचा देशातील लोकांवर पडलेला प्रभाव ह्याविषयी नेहमीच कुतुहल वाटतं. त्याविषयी ऐकायला मिळालं हे छान वाटलं.
वावे धन्यवाद
वावे धन्यवाद
पुलंना त्यांच्याबद्दल बरीच
पुलंना त्यांच्याबद्दल बरीच माहिती आहे व त्यांच्याशी चांगली ओळखही आहे हे मुलाखतीतून स्पष्टपणे कळते >> हो. मी पुढे जे लिहीत आहे ते मी नेमकं कुठे आणि कुणी लिहिलेलं वाचलंय ते अजिबात आठवत नाही, पण नक्कीच कुठल्या तरी प्रसिद्ध व्यक्तीने लिहिलं होतं. बालगंधर्व रंगमंदिर उभारण्यात पुलंचा पुढाकार होता. त्याचा उद्घाटन समारंभही संस्मरणीय झाला, त्याची संकल्पना पुलंची होती. स्वतः पुलंनी सूत्रसंचालन केलं होतं. तेव्हा सुरुवातीला पडदा वर गेला तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री मंचावर उभे होते आणि त्यांनी वेदमंत्रपठण केलं होतं. हे उपस्थित लोकांना एकदम अनपेक्षित होतं आणि सगळ्यांवर याचा खूप प्रभाव पडला होता. यात तपशिलाची थोडीफार चूक असू शकते कारण मुळात मी हे कुठे वाचलं ते प्रयत्न करूनही आठवत नाहीये. कदाचित मंगला गोडबोल्यांनी लिहिलेल्या पुलंच्या चरित्रात असेल. शोधून बघायला हवं.
महाराष्ट्रातील
महाराष्ट्रातील काव्यशास्त्रविनोद >>> भारी!
तर्कतीर्थ मुलाखत आवडली.
महाराष्ट्रातील
महाराष्ट्रातील काव्यशास्त्रविनोद>> वा!
वरचा प्रतिसाद लिहिताना माझी
वरचा प्रतिसाद लिहिताना माझी गफलत झाली, त्याबद्दल मी दिलगीर आहे.
'बालगंधर्व'च्या उद्घाटन समारंभाचं वर्णन मंगला गोडबोल्यांच्या पुस्तकात सापडलं. त्या वेळी सुरुवातीला संस्कृत मंगलाचरण म्हणणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नव्हते, तर महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार होते.
रेखा - बीबीसी -१९८६
रेखा - बीबीसी -१९८६
मला धड हिंदी येत नाही, उर्दू येत नाही. उमराव जानसाठी नॅशनल अवॉर्ड मिळावा असा काही तो अभिनय नाही.
मी यापेक्षा चांगलं गाऊ शकले असते.
आनंद माथुरने प्रेमात पडायला अगदी योग्य व्यक्ती निवडली.
आनंद माथुर???
आनंद माथुर???
आनंद माथुर हे हम पाँच मालिकेत
आनंद माथुर हे हम पाँच मालिकेत अशोक सराफचं नाव होतं ना?
फरीदा जलाल ने वैताग आणला आहे,
फरीदा जलाल ने वैताग आणला आहे, सगळीकडे तिचेच interview आलेत. चांगले काम करते, पण तेच तेच तेच तेच interview.. मम्मो मध्ये छान काम केलं आहे.
पण ह्यात काही नवीन नाही. एका
पण ह्यात काही नवीन नाही. एका कलाकाराचा एका चॅनलवर इन्टर्व्यु आला की इतर सगळ्या चॅनल्सवर चुरस लागते त्याला बोलवायची. त्या छाया कदमचं कान्सनंतर तेच झालं होतं.
भरत यांनी दिलेल्या रेखाच्या
भरत यांनी दिलेल्या रेखाच्या मुलाखतीत, रेखा किती सुंदर दिसते आहे! (पण भरत तुमचा मुद्दा नक्की कळला नाही).
मला ती व्यक्ती म्हणून जास्तच
मला ती व्यक्ती म्हणून जास्तच आवडली. नुकतीच अमेरिकेहून विमान प्रवास करून रात्री उशिरा लंडनला उतरली आहे. डोळ्यांवर झोप आहे.ही मुलाखत देते आहे. मुलाखतकार काही ठिकाणी उगाच स्वतःचे म्हणणे लावून धरत आहे. तरीही ती न चिडता व त्याचा अपमान न करता उत्तरे देते आहे.
ही मुलाखत पाहताना रेखाच्या प्रेमात पडायला झालं.
तिला तिच्या वकुबाच्या मानाने चांगल्या भूमिका कमी मिळाल्या.
तुलना केल्याशिवाय राहवत नाही. त्या काळात हेमा नंबर १ मानली जायची. तिचे चित्रपटाबाहेरचे हिंदीचे उच्चार अजूनही उपकार केल्यासारखे आहेत. रेखा १९८६ मध्ये इतकं छान हिंदी बोलत असूनही, मला हिंदी येत नाही म्हणते.
अच्छा, मला वाटलं तुम्ही
अच्छा, मला वाटलं तुम्ही उपरोधाने लिहिले होते. मस्तच हिंदी बोलली आहे ती मुलाखतीत.
पहिल्या पानावर.
पहिल्या पानावर.
" गगनभेदी" अनिल थत्ते यांची
" गगनभेदी" अनिल थत्ते यांची बेधडक आणि बिनधास्त मुलाखत पाहतो आहे. जरूर पहाच : https://www.youtube.com/watch?v=BaX60evWGww
उदाहरणादाखल : ते असे म्हणालेत,
"मी मराठीतील सर्वात श्रीमंत पत्रकार आहे"
" मी माझ्या कुठल्याही लेखनाला ठरवून सरकारी पुरस्कार मिळवू शकतो कारण ते लिहिण्याचा फॉर्मुला मला पाठ झालेला आहे !"
" पत्रकार होण्यापूर्वी थोडा काळ प्राध्यापक होतो ते फक्त चांगली बायको मिळावी म्हणून !!"
असे अनेक धमाल किस्से आहेत . . .
Pages