Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
च्यायला
च्यायला
कुठल्या ओटीटी वर आहे हा ??
अब तो देखणाईच पडेंगा
रमड _/\_ फारच भारी चाललाय
रमड _/\_ फारच भारी चाललाय रिव्ह्यु, आता यारा दिलदारा पाहावाच लागणार.
सगळी पोस्टच भारी आहे पण हा रेफरन्स बर्याच दिवसांनी पाहिला >> (याचं नाव रामय्या. घराला आणि गोठ्याला पत्रे लावायचं सोडून हे काय करतोय हा?)
इच्छुकांसाठी टीप : रायव्हल गँग मधे अमिता नांगिया आहे. >> आणि हा खास दर्दी संदर्भ
मुळात सोनु वालियाच गरीब … त्यात ही म्हणजे गरीब स्क्वेअर. >> MazeMan
रोहिणी हट्टंगडी "अपने हाथ धो ले" म्हणायला लागली >> फा
रच्याकने, आसिफ शेखची या सिनेमाविषयक टिप्पणी ( ) >> https://youtu.be/FuJ0N1BOQbY
ओह, आणि रँडम सीन बघताना जाणवलेले >> ९०च्या चित्रपटांचे व्यवच्छेदक लक्षण, आऊट ऑफ नोव्हेअर इंडियन इकॉनॉमीवर कमेंट्स, या चित्रपटातही आहे. जसे गुप्तच्या ओपनिंग सीनमध्ये मनमोहन सिंगांच्या आर्थिक धोरणावर सखोल चर्चा आहे तसे इथे रोहिणी हट्टंगडीच्या एंट्री सीनमध्ये मिडलईस्ट क्रायसिसचा (१९९०-९१ चे गल्फ वॉर) भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल यावर चर्वण आहे.
इकडे राजेश फावड्याने गवताचे
@रमड >>> खतरनाक रिव्ह्यू… आने दो.
याचं नाव रामय्या. घराला आणि गोठ्याला पत्रे लावायचं सोडून हे काय करतोय हा >>>
रायव्हल गँग मधे अमिता नांगिया आहे.
इकडे राजेश फावड्याने गवताचे भारे तिच्या अंगावर टाकतो. हिरवीण आहे का घोडी>>>
दिग्दर्शकाला एकंदरीतच हे कन्फ्युजन पिक्चरभर असावं. कारण बिन तेरे सनममध्ये पण गवताचा भारा उडवणे आहेच. किंवा मग आरेमध्ये शुटींग केलं असावं. तेवढंच कॉस्ट कटिंग.
तुम ही हमारी हो मंझिल….
तुम ही हमारी हो मंझिल…. यातलेच हे माहित नव्हते. दोन्ही गाणी तुफान गाजलेली पण पडद्यावर पाहायचे भाग्य आज रमड मुळे लाभले. थम्क्यु..
तो सगळा सेटप का लावलेला हे अर्थात चित्रपटात नसणारच..
किटलीतुन चहा ओतुन ती रिवाजाप्रमाणे हिरोला देणार असे वाटले होते पण तो घोड्यावर रिकिब वगैरे प्रकरणात गुंतल्याने कप ही हातात धरुन होती तेवढ्यात त्या गाढवाने हिला घोडी समजुन गवत हिच्या अंगावर टाकायला सुरवात केली… सगळा चहा फुकट गेला…. सकाळी असले सिन बघवत नाहीत, चहा फुकट घालवायचे सिन म्हणतेय मी.. चहा हे सकाळचे अमृत..
(असल्या किटल्या घेऊन कोण फिरते???)
अ आ च्या ऐवजी ईथेच धमाल सुरू
अ आ च्या ऐवजी ईथेच धमाल सुरू झालिये
अरे हाँ आहे तर मग विव्हळते कशाला? ह्यावर खूप जोरात हसले
गरीब स्क्वेयर
rmd तुझ्यातली प्रतिभा ओसांडून वाहतेय...आता तिला बांध घालू नकोस अस्मिता, फारेंड, पायस आता जोडीनं र्म्द कसं उच्चारायचं हे?
अजून जान तेरे नाम हे ही १
अजून जान तेरे नाम हे ही १ रत्न आहे..त्यातले टायटल साँग महा फेमस झाले होते. लाल दुपट्टा मलमल का पण पीळ चित्रपट..
लाल दुपट्टाला स्टोरी पण होती
लाल दुपट्टाला स्टोरी पण होती का?? गाण्यांच्या मध्ये फिलर म्हणुन असावि. गाणी कसली गाजलेली.
इथले वाचून बिन तेरे सनम काल
इथले वाचून बिन तेरे सनम काल युट्यूब वर बघण्याचा प्रयत्न केला। अयशस्वी झालो. काय तो हिरो, काय हिरोईन काय त्यो ड्यान्स
अख्खा पिक्चर सहन करू शकणाऱ्या rmd चा विजय असो.
त्याचा रीमिक्स गाण्याचा विडिओ बरा आहे आणि तो आधी पाहिला होता. त्या काळात 2000 ते 2003 रिमिक्स चे पेव फुटले होते.
र्मड (अरेच्चा आपोआप आलं कि)
र्मड (अरेच्चा आपोआप आलं कि) , मस्त खुसखुशीत लिहीलंय. धमाल चालू आहे.
आख्खा प्रतिसादच कोट करावा लागेल.
न हसता वाचणं अशक्य झालं.
फारएण्ड, श्रद्धा यांच्या जोडीला अजून एक पिसूबाई येऊन बसल्या.
अस्मिता, अनु यांच्या पिसाच्या तोफाही धडाधडत असतातच.
काल जितेंद्र कुमार चा चमनबहार
काल जितेंद्र कुमार चा चमनबहार थोडा पाहिला.मस्त आहे.पंचायत आवडला असेल तर हा नक्की आवडेल.कोटा फॅक्टरी मधला उदय आणि फरजी मधला शाहिद चा मित्र पण आहे.हा, कटहल, मिथिला पालकर चा कारवा हे कम्फर्ट फूड म्हणून बाजूला ठेवलेत.
जान तेरे नाम च्या टायटल साँग
जान तेरे नाम च्या टायटल साँग बद्दल इथे खल झालाय
https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...
यारा दिलदारा/खिलाडी हे भयंकर
यारा दिलदारा/खिलाडी हे भयंकर पॉप्युलर काँबो होते जतिन ललित साठी. >>>> हो हो, हे काँबो माझ्याकडे पण होतं.
पुढचा भाग ब्रेक के बाद! >>>> ओ तै, ते सारखं सारखं ब्रेक के बाद नको, एका दमात लिहून टाका बघू .....
rmd यारा दिलदाराची संकलित
rmd यारा दिलदाराची संकलित चिरफाड एका वेगळ्या नविन धाग्यात करण्यात यावी ही णम्र विनंती.
rmd यारा दिलदाराची संकलित
rmd यारा दिलदाराची संकलित चिरफाड एका वेगळ्या नविन धाग्यात करण्यात यावी ही णम्र विनंती. >>>> अणुमोदण
RMD : मनावर घेच आता, आणि ब्रेकत ब्रेकत नको, सलग भाग टाक ......
सलग टाकायला सलग पाहायला लागेल
सलग टाकायला सलग पाहायला लागेल ना! २० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त पाहूच शकत नाही तुम्ही एकावेळी. शिवाय तेवढ्या वेळात पण इतक्या गमती झालेल्या असतात की पूछो मत
धागा काढायला हरकत नाही. पण आता इथे बाकीच्यांच्या पण धमाल ऑडिशन्स झाल्या आहेत, त्यांचं काय करायचं?
आम्ही परत टाकू की.
आम्ही परत टाकू की.
असं करूया, पुढचा भाग लिहून
असं करूया, पुढचा भाग लिहून झाला की आत्तापर्यंतचे २ आणि हा नवीन असे तिन्ही मिळून धाग्याची सुरूवात करते. आणि इथल्या अॅडिशन्स कॉपी पेस्ट करते तिकडे पोस्टस मधे. त्यानंतर माझे अपडेट्स पण पोस्ट्स मधे टाकत जाईन. होपफुली आज दुपारपर्यंत धागा काढू शकेन.
मात्र ब्रेकत ब्रेकत लिहायला पर्याय नाही. रेग्युलरली (शक्यतो रोज) पुढचे भाग टाकेन इतकं नक्की सांगते
२० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त
२० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त पाहूच शकत नाही तुम्ही एकावेळी. >>>
धागा अप्रकाशित ठेवायची सोय आठवते अशा वेळी. (जन्माच्या आधीची गोष्ट).
असं करूया, पुढचा भाग लिहून
असं करूया, पुढचा भाग लिहून झाला की आत्तापर्यंतचे २ आणि हा नवीन असे तिन्ही मिळून धाग्याची सुरूवात करते. आणि इथल्या अॅडिशन्स कॉपी पेस्ट करते तिकडे पोस्टस मधे. त्यानंतर माझे अपडेट्स पण पोस्ट्स मधे टाकत जाईन. होपफुली आज दुपारपर्यंत धागा काढू शकेन. >>>> ह्ये ब्येष्टच होइल बगा ....
'यारा दिलदारा'ला वेगळ्या
'यारा दिलदारा'ला वेगळ्या धाग्याचा 'सम्मान' मिळालाच पाहिजे, याला अनुमोदन. इथे बॅटमॅन वगैरे सामान्य (किंवा उद्योगभूषण यदुनाथ जवळकर म्हणतात तसं 'अतिसामान्य!!!') सिनेमांच्या गदारोळात त्या रत्नाला हरवून टाकू नका.
संसारात बंदिवान असलेल्या कमलला स्वतःचा स्वतंत्र बा फ (आणि सिनेमाला व्ह्यूज! 'यंग शेल्डन, पंचायत, वगैरे मालिकांना मागे टाकत 'ही' फिल्म झाली प्राईमवर ट्रेंड') मिळाला, मग केसउडवीला का नको?
श्रद्धा
श्रद्धा
केसउडवी हे विशेषण विसरलोच होतो
काल थोडा पुढे पाहिला मीही. गवती चहा सीन सुद्धा.
आता तो तिला मी तुमच्यासारखे गरीब होऊनच दाखवतो म्हणतो असे काहीतरी दिसले मैप्याकि स्टाइल. मधे एक शक्त्ती कपूरचे गाणेही होते. फॉरवर्ड केले. नितिन मुकेशच्या आवाजात गाणे म्हणणारी व्यक्ती व्हिलन असू शकेल का हा विचार करतोय. कदाचित शक्ती कपूर पुढे मरणारा चांगला माणूस असावा.
यारा दिलदाराचा नवीन अपडेट
यारा दिलदाराचा नवीन अपडेट सहित वेगळा धागा काढला आहे - https://www.maayboli.com/node/85285
इच्छुकांनी लाभ घ्यावा
पाहिला
पाहिला
मीअनु, चमन आणि कारवा कुठे
मीअनु, चमन आणि कारवा कुठे पाहिलेस?
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/better-ott-dea...
Bollywood is pumping money in what has clearly been dubbed as a reckless and harmful practice by the trade--rigging the box office with perception control. Or, as the internet loosely calls it, corporate bookings and self buying.
मागच्या वर्शी तुफान चाललेल्या मुव्हिजच्या सक्सेसच रहस्य....मला अगदी वाटत होत की हे इतके बन्डल मुव्हिज जे १५ मिनिटही सलग बघवत नाहित (बॉयकॉट ट्रेन्ड वैगरेशी मला काहि देणघेण नाही, शाखा वयाला साजेशा उत्तम भुमिका करु शकतोच्,पण दोन्ही मुव्हित आणी डन्कित त्याच्याकडे बघवत पण नव्हत) ते १००० कोटिचा गल्ला आणतात??
चमन बहार नेटफ्लिक्स वर पहिला.
चमन बहार नेटफ्लिक्स वर पहिला.(हा बऱ्याच जणांना टॉक्सिक मस्क्यूलाईन वाटला असं इंटरनेट वर वाचलं.पण मला नेहमीप्रमाणे जितेंद्र कुमार आवडला.कोटा फॅक्टरी मधला उदय पण चांगलं काम करतो आहे.)
यातली एकूण एक माणसं कथेत क्रिपी असली तरी नाक्यावर असे टोळभैरव पाहिले आहेत.त्यामुळं फार खोटी असेल कथा असं वाटलं नाही.
काश्मीर फाईल्स थोडा वेळ
काश्मीर फाईल्स थोडा वेळ पाहिला. जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटे.
काश्मीर खोर्यात हिंसाचार झालेला आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. पण ज्या पद्धतीने चित्रपटात ते दखवलेले आहे, ते भयंकर आहे. दंगली पेटवण्याची ताकद दिग्दर्शकात आहे.
काश्मीर खोर्यात हिंसाचार
….,
धन्यवाद अनु. आता महाराज व
धन्यवाद अनु. आता महाराज व ट्रिगर वार्निन्ग पण हातासरशी पाहुन घे व सांग कसे वाटले (म्हणजे कोणी पण पहा).
आणि इनहेरिटन्स पण कोणी पाहिलाय तर कसा वाटला लिहा.
सगळे नेटफ्लेक्सवर आलेत नवेनवे.
इनहेरिटन्स ठीकठाक आहे. शेवटी
इनहेरिटन्स ठीकठाक आहे. शेवटी थोडा ट्वीस्ट आहे पण तोपर्यंत मधेमधे संथ होतो. दुसरा काहीच पर्याय नसला तरच बघा.
Pages