चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्यायला

कुठल्या ओटीटी वर आहे हा ??
अब तो देखणाईच पडेंगा

रमड _/\_ फारच भारी चाललाय रिव्ह्यु, आता यारा दिलदारा पाहावाच लागणार.
सगळी पोस्टच भारी आहे पण हा रेफरन्स बर्‍याच दिवसांनी पाहिला >> (याचं नाव रामय्या. घराला आणि गोठ्याला पत्रे लावायचं सोडून हे काय करतोय हा?) Lol
इच्छुकांसाठी टीप : रायव्हल गँग मधे अमिता नांगिया आहे. >> आणि हा खास दर्दी संदर्भ Proud

मुळात सोनु वालियाच गरीब … त्यात ही म्हणजे गरीब स्क्वेअर. >> MazeMan Lol
रोहिणी हट्टंगडी "अपने हाथ धो ले" म्हणायला लागली >> फा Biggrin

रच्याकने, आसिफ शेखची या सिनेमाविषयक टिप्पणी ( Proud ) >> https://youtu.be/FuJ0N1BOQbY

ओह, आणि रँडम सीन बघताना जाणवलेले >> ९०च्या चित्रपटांचे व्यवच्छेदक लक्षण, आऊट ऑफ नोव्हेअर इंडियन इकॉनॉमीवर कमेंट्स, या चित्रपटातही आहे. जसे गुप्तच्या ओपनिंग सीनमध्ये मनमोहन सिंगांच्या आर्थिक धोरणावर सखोल चर्चा आहे तसे इथे रोहिणी हट्टंगडीच्या एंट्री सीनमध्ये मिडलईस्ट क्रायसिसचा (१९९०-९१ चे गल्फ वॉर) भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल यावर चर्वण आहे. Happy

@रमड >>> खतरनाक रिव्ह्यू… आने दो.

याचं नाव रामय्या. घराला आणि गोठ्याला पत्रे लावायचं सोडून हे काय करतोय हा >>> Lol
रायव्हल गँग मधे अमिता नांगिया आहे. Lol Lol

इकडे राजेश फावड्याने गवताचे भारे तिच्या अंगावर टाकतो. हिरवीण आहे का घोडी>>> Lol
दिग्दर्शकाला एकंदरीतच हे कन्फ्युजन पिक्चरभर असावं. कारण बिन तेरे सनममध्ये पण गवताचा भारा उडवणे आहेच. किंवा मग आरेमध्ये शुटींग केलं असावं. तेवढंच कॉस्ट कटिंग.

तुम ही हमारी हो मंझिल…. यातलेच हे माहित नव्हते. दोन्ही गाणी तुफान गाजलेली पण पडद्यावर पाहायचे भाग्य आज रमड मुळे लाभले. थम्क्यु..

तो सगळा सेटप का लावलेला हे अर्थात चित्रपटात नसणारच..

किटलीतुन चहा ओतुन ती रिवाजाप्रमाणे हिरोला देणार असे वाटले होते पण तो घोड्यावर रिकिब वगैरे प्रकरणात गुंतल्याने कप ही हातात धरुन होती तेवढ्यात त्या गाढवाने हिला घोडी समजुन गवत हिच्या अंगावर टाकायला सुरवात केली… सगळा चहा फुकट गेला…. सकाळी असले सिन बघवत नाहीत, चहा फुकट घालवायचे सिन म्हणतेय मी.. चहा हे सकाळचे अमृत..

(असल्या किटल्या घेऊन कोण फिरते???)

अ आ च्या ऐवजी ईथेच धमाल सुरू झालिये Lol

अरे हाँ आहे तर मग विव्हळते कशाला? Lol ह्यावर खूप जोरात हसले
गरीब स्क्वेयर Rofl
rmd तुझ्यातली प्रतिभा ओसांडून वाहतेय...आता तिला बांध घालू नकोस Wink अस्मिता, फारेंड, पायस आता जोडीनं र्म्द कसं उच्चारायचं हे? Lol

अजून जान तेरे नाम हे ही १ रत्न आहे..त्यातले टायटल साँग महा फेमस झाले होते. लाल दुपट्टा मलमल का पण पीळ चित्रपट..

इथले वाचून बिन तेरे सनम काल युट्यूब वर बघण्याचा प्रयत्न केला। अयशस्वी झालो. काय तो हिरो, काय हिरोईन काय त्यो ड्यान्स Lol
अख्खा पिक्चर सहन करू शकणाऱ्या rmd चा विजय असो. Happy
त्याचा रीमिक्स गाण्याचा विडिओ बरा आहे आणि तो आधी पाहिला होता. त्या काळात 2000 ते 2003 रिमिक्स चे पेव फुटले होते.

र्मड (अरेच्चा आपोआप आलं कि) , मस्त खुसखुशीत लिहीलंय. धमाल चालू आहे.
आख्खा प्रतिसादच कोट करावा लागेल.
न हसता वाचणं अशक्य झालं. Lol
फारएण्ड, श्रद्धा यांच्या जोडीला अजून एक पिसूबाई येऊन बसल्या.
अस्मिता, अनु यांच्या पिसाच्या तोफाही धडाधडत असतातच.

Happy
काल जितेंद्र कुमार चा चमनबहार थोडा पाहिला.मस्त आहे.पंचायत आवडला असेल तर हा नक्की आवडेल.कोटा फॅक्टरी मधला उदय आणि फरजी मधला शाहिद चा मित्र पण आहे.हा, कटहल, मिथिला पालकर चा कारवा हे कम्फर्ट फूड म्हणून बाजूला ठेवलेत.

यारा दिलदारा/खिलाडी हे भयंकर पॉप्युलर काँबो होते जतिन ललित साठी. >>>> हो हो, हे काँबो माझ्याकडे पण होतं.

पुढचा भाग ब्रेक के बाद! >>>> ओ तै, ते सारखं सारखं ब्रेक के बाद नको, एका दमात लिहून टाका बघू ..... Lol

rmd यारा दिलदाराची संकलित चिरफाड एका वेगळ्या नविन धाग्यात करण्यात यावी ही णम्र विनंती.

rmd यारा दिलदाराची संकलित चिरफाड एका वेगळ्या नविन धाग्यात करण्यात यावी ही णम्र विनंती. >>>> अणुमोदण

RMD : मनावर घेच आता, आणि ब्रेकत ब्रेकत नको, सलग भाग टाक ...... Happy

सलग टाकायला सलग पाहायला लागेल ना! २० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त पाहूच शकत नाही तुम्ही एकावेळी. शिवाय तेवढ्या वेळात पण इतक्या गमती झालेल्या असतात की पूछो मत Proud

धागा काढायला हरकत नाही. पण आता इथे बाकीच्यांच्या पण धमाल ऑडिशन्स झाल्या आहेत, त्यांचं काय करायचं?

Lol असं करूया, पुढचा भाग लिहून झाला की आत्तापर्यंतचे २ आणि हा नवीन असे तिन्ही मिळून धाग्याची सुरूवात करते. आणि इथल्या अ‍ॅडिशन्स कॉपी पेस्ट करते तिकडे पोस्टस मधे. त्यानंतर माझे अपडेट्स पण पोस्ट्स मधे टाकत जाईन. होपफुली आज दुपारपर्यंत धागा काढू शकेन.
मात्र ब्रेकत ब्रेकत लिहायला पर्याय नाही. रेग्युलरली (शक्यतो रोज) पुढचे भाग टाकेन इतकं नक्की सांगते Happy

२० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त पाहूच शकत नाही तुम्ही एकावेळी. >>> Lol
धागा अप्रकाशित ठेवायची सोय आठवते अशा वेळी. (जन्माच्या आधीची गोष्ट).

असं करूया, पुढचा भाग लिहून झाला की आत्तापर्यंतचे २ आणि हा नवीन असे तिन्ही मिळून धाग्याची सुरूवात करते. आणि इथल्या अ‍ॅडिशन्स कॉपी पेस्ट करते तिकडे पोस्टस मधे. त्यानंतर माझे अपडेट्स पण पोस्ट्स मधे टाकत जाईन. होपफुली आज दुपारपर्यंत धागा काढू शकेन. >>>> ह्ये ब्येष्टच होइल बगा .... Happy

'यारा दिलदारा'ला वेगळ्या धाग्याचा 'सम्मान' मिळालाच पाहिजे, याला अनुमोदन. इथे बॅटमॅन वगैरे सामान्य (किंवा उद्योगभूषण यदुनाथ जवळकर म्हणतात तसं 'अतिसामान्य!!!') सिनेमांच्या गदारोळात त्या रत्नाला हरवून टाकू नका.

संसारात बंदिवान असलेल्या कमलला स्वतःचा स्वतंत्र बा फ (आणि सिनेमाला व्ह्यूज! 'यंग शेल्डन, पंचायत, वगैरे मालिकांना मागे टाकत 'ही' फिल्म झाली प्राईमवर ट्रेंड') मिळाला, मग केसउडवीला का नको? Proud

श्रद्धा Lol

केसउडवी हे विशेषण विसरलोच होतो Happy

काल थोडा पुढे पाहिला मीही. गवती चहा सीन सुद्धा.

आता तो तिला मी तुमच्यासारखे गरीब होऊनच दाखवतो म्हणतो असे काहीतरी दिसले मैप्याकि स्टाइल. मधे एक शक्त्ती कपूरचे गाणेही होते. फॉरवर्ड केले. नितिन मुकेशच्या आवाजात गाणे म्हणणारी व्यक्ती व्हिलन असू शकेल का हा विचार करतोय. कदाचित शक्ती कपूर पुढे मरणारा चांगला माणूस असावा.

https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/better-ott-dea...

Bollywood is pumping money in what has clearly been dubbed as a reckless and harmful practice by the trade--rigging the box office with perception control. Or, as the internet loosely calls it, corporate bookings and self buying.

मागच्या वर्शी तुफान चाललेल्या मुव्हिजच्या सक्सेसच रहस्य....मला अगदी वाटत होत की हे इतके बन्डल मुव्हिज जे १५ मिनिटही सलग बघवत नाहित (बॉयकॉट ट्रेन्ड वैगरेशी मला काहि देणघेण नाही, शाखा वयाला साजेशा उत्तम भुमिका करु शकतोच्,पण दोन्ही मुव्हित आणी डन्कित त्याच्याकडे बघवत पण नव्हत) ते १००० कोटिचा गल्ला आणतात??

चमन बहार नेटफ्लिक्स वर पहिला.(हा बऱ्याच जणांना टॉक्सिक मस्क्यूलाईन वाटला असं इंटरनेट वर वाचलं.पण मला नेहमीप्रमाणे जितेंद्र कुमार आवडला.कोटा फॅक्टरी मधला उदय पण चांगलं काम करतो आहे.)
यातली एकूण एक माणसं कथेत क्रिपी असली तरी नाक्यावर असे टोळभैरव पाहिले आहेत.त्यामुळं फार खोटी असेल कथा असं वाटलं नाही.

काश्मीर फाईल्स थोडा वेळ पाहिला. जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटे.
काश्मीर खोर्‍यात हिंसाचार झालेला आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. पण ज्या पद्धतीने चित्रपटात ते दखवलेले आहे, ते भयंकर आहे. दंगली पेटवण्याची ताकद दिग्दर्शकात आहे.

धन्यवाद अनु. आता महाराज व ट्रिगर वार्निन्ग पण हातासरशी पाहुन घे व सांग कसे वाटले Proud (म्हणजे कोणी पण पहा).

आणि इनहेरिटन्स पण कोणी पाहिलाय तर कसा वाटला लिहा.

सगळे नेटफ्लेक्सवर आलेत नवेनवे.

Pages