चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

र आ, हे सर्व ओटीटी वाले चोर 'ऑटो रिन्यू' हा एकच पर्याय देतात पहिल्यांदा घेताना.आपल्याला लक्षात ठेवून ऑफ करावे लागते.कोणी विसरले तर त्यांना लक्षात येऊन ऑफ करेपर्यंत त्यांचा तितकाच फायदा. >> +१

मागे आमच्याकडे एक साऊथ इंडीयन डब्ड लाऊन ठेवलेला, कहानी मे ट्वीस्ट. काहीही होता. यमराजनगर का लोक वगैरे वगैरे. फनी होते सर्व.

यमराज नगर का लोक ? व्यंकटेशचा तर नाही ? कादरखान असरानीला हिंदी आवृत्तीत घेतलेले.
जितेंद्रचा लोक परलोक पण होता अशाच थीमवर..

आज शैतान पाहिला.
कनेक्ट न झाल्याने काय चाललंय पेक्षा काहीही चालू आहे असं सतत वाटत राहिलं. अशा सिनेमाला एंगेजिंग म्हणावं का ? काय दाखवतात बघू अजून म्हणून पाहिला. क्लायमॅक्स तर तद्दन भंपक.
आम्ही लहान असताना पुराना मंदीर पुराना मंदीर खेळायचो. सिनेमा पाहिलेले कुणीच नसायचे. कुणाच्याच घरचे रामसेचे सिनेमे पहायला जात नसत. मग एखाद्या जाणकाराने सांगितलेल्या स्टोरीवर आधारीत खेळ चालायचा. त्यात एकाने भूतासारखे कपडे घालून शेजार्‍यांना घाबरवायाचा प्रयत्न केला होता आणी जाम मार खाल्ला होता.
त्या आमच्या खेळात आम्ही जे करायचो ते भारी होतं यातल्या क्लायमॅक्स पेक्षा.
एका घमेल्यात एव्हढ्या सार्‍या काळा बाहुल्यांच गणित हे काळ काम वेग गणिताप्रमाणे नायकाला रस्ता हुडकत पोहोचण्यासाठीच होतं.
काळ्या बाहुल्यांची संख्या क्ष मानली तर एकून किती बाहुल्या घ्यायच्या हे आर माधवनने कुठल्या फॉर्म्युल्याने ठरवलं असेल ?
सांगा सांगा. कुणी तरी सांगा.

तो पिक्चर जुना नव्हता, तरुण मंडळी होती. कोणीही ओळखीचं नव्हतं माझ्या. व्यंकटेश नव्हता. पिक्चरचं नाव कहानी मे twist, नायिका मूळ यम कुळातली असते, तिचं लग्न ती लहान असतानाच तिच्या मामाशी ठरवलेलं असतं, तिला करायचं नसतं, मामा kidnap करून नेतो, हिरो मित्राला घेऊन सोडवायला जातो असं काही होतं. सगळं काहीही फनी फनी होतं, मी मधून मधून बघते, नवऱ्यानेही दोन चार दिवस थोडा थोडा बघितला. त्याने लावला की मी मधेच डोकावून जाते.

सोनी लिव वर असाच दिसतोय, पैसे न भरता. बघून कोणाला पिसे काढायची तर काढा, ती कला माझ्याकडे नाही.

कल्की 2898 AD अजिबात पाहू नका पैसे आणि वेळ वाचवा. चांगले व्हीफक्स आहेत पण हे सारं कशासाठी चाललंय हेच कळत नसेल तर काय फायदा ,सर्वात बिग बजेट सिनेमा आहे म्हणतात पण स्टोरी वर जरा पैसे खर्च केले असते तर बरं झालं असतं .बेकार स्टोरी लाईन उगाचच भारंभार ऍक्टर्स तेही वाया घालवलेत अमिताभ बच्चनचे डायलॉग बरे आहेत पण नीट बघायचा प्रयत्न केल्यानंतर थोड्यावेळाने कंटाळा यायला लागतो बच्चन तरी काय करणार त्यांनी तर ब्रम्हास्त्र ही केला होता. चित्रपट ब्रम्हास्त्र पेक्षाही वाईट आहे.त्यापेक्षा प्राईम वर आवेशम आणि मंजुमल बॉईज बघा.

कल्की 2898 AD अजिबात पाहू नका पैसे आणि वेळ वाचवा.>> हे कल्कीच सांगताहेत Proud

सहा दिवसात ७०० कोटी रूपये हे आकडे फेक असावेत असे वाटत होते. आता लोकांनीच शंका घ्यायला सुरूवात केली आहे. पठाण, जवान, कल्की यांचे सुरूवातीचे जे आकडे सांगितले गेले ते फेक होते.

कल्की 2898 AD अजिबात पाहू नका पैसे आणि वेळ वाचवा.>> हे कल्कीच सांगताहेत >>>> अच्छा! असंच नाव आहे होय पिक्चरचं! मला वाटलं तुका म्हणे नामा म्हणे प्रमाणे त्यांनी प्रतिसादाची सुरुवात आपल्या नावाने केली की काय

आकडे फेक नसतीलही.पण याचा अर्थ असा नाही की पिक्चर सोनं असतो.तो अनेक थिएटरमध्ये रोजचे अनेक शो डिस्ट्रीब्युट केलेला असतो.त्याबरोबर बाकी चित्रपट शोज मग दिवसाला 1, तेही गैरसोयीच्या वेळी हलवले जातात.मग बिग बजेट पिक्चरच बघण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढतं.
कल्की पाहिला.मधलं पंजाबी स्टाईल चॅन गाणं अगदीच विसंगत वाटलं.कथेत त्या बिघडलेल्या जगावर फोकस जास्त हवा होता.शेवटची अमिताभ प्रभास मारामारी (मला) वेळाने जास्त वाटली.15 मिनिटं 3डी चष्मा लावून डुलकी लागली.ही गोष्ट आवडली की आपल्या मायथॉलॉजी वर मोठ्या बजेट चे चित्रपट बनवतायत.
पण हा भाग बघून फक्त प्रस्तावना होते.हाती काही लागत नाही.दीपिका ला फार जास्त स्कोप आणि ऍक्शन रोल नाहीय.

आकडे फेक नसतीलही.पण याचा अर्थ असा नाही की पिक्चर सोनं असतो.तो अनेक थिएटरमध्ये रोजचे अनेक शो डिस्ट्रीब्युट केलेला असतो.त्याबरोबर बाकी चित्रपट शोज मग दिवसाला 1, तेही गैरसोयीच्या वेळी हलवले जातात.मग बिग बजेट पिक्चरच बघण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढतं. >> +१

चांगला चालत असलेला मुंज्या उतरवला.
https://www.indiaherald.com/Breaking/Read/994724712/Kalki-AD-Box-Office-...

जुना लॅपटॉप असेल तर..
इथे वाचून एक सिनेमा पाहिला. तो आपल्या प्राईम वर दिसत नाही.
अशा पद्धतीने बघायची इच्छा पूर्ण झाली. बकेट लिस्ट एकने कमी झाली.

HIT - The First Case (Netflix)

ट्रबल्ड पास्ट असणारा पोलीस हिरो - हे किती (अती) कॉमन आहे आता Uhoh पण चांगला क्राइम थ्रिलर आहे. राजकुमार रावसाठी बघाच. मस्त काम केलं आहे. (सिनेमा आहे)
सिक्वेल येणार हे शेवटी जाहीरच केलेलं आहे. त्यासाठी त्याच्या पास्टची स्टोरी फ्युचर टेन्समध्ये ढकलली आहे.

कल्की ने कल्की चित्रपट बघू नका सांगितले हे छान वाटले
Btw, कोविड नंतर थिएटर्स मध्ये असते का गर्दी?
मला तर आमच्या इथल्या fame थिएटर एरिया मध्ये आधीसारखी गर्दी दिसत नाही.
पठाण वेळी नव्हती आणि आता कल्की वेळी देखील नाही.
हे 2 चित्रपट बिग बजेट म्हणून नावं घेतली.
बारक्या सारख्या पिक्चर वेळी तर अजिबातच नसते.

आम्ही विशाल, पिंपरी ला पाहिला आणि भ र पू र गर्दी होती.छोट्या स्क्रीन ची सवय झाल्याने जरा एखाद्या राजकीय सभेला आल्या सारखं वाटलं.बाकी मुंज्या ला 5 रांगा होत्या.

HIT - The First Case (Netflix)
>>
तमिळ सिनेमाचा रेमेक आहे. (फ्रेम टू फ्रेम)
हवा तसा रिस्पॉन्स नाही मिळाला म्हणून पार्ट 2 येइल का नाही ते माहिती नाही.

महाराज पूर्ण बघितला, मध्ये मध्ये बोर झाल्यामुळे लक्ष नव्हतं. त्या यदुनाथला जेजे का म्हणतात? जदुनाथ जवळकर नाव असतं का त्याचं? व्याख्या विख्खी वाले?

महाराज बघायला घेतला.मला 2 गोष्टींबद्दल मुख्य समस्या आहे.आमिर पुत्राची चित्र रंगवल्यासारखी मिशी आणि त्याचं हिंदी.हा मुलगा बहुतेक इंग्लिश मीडियम चा असेल आणि हिंदी पिक्चर करायचे म्हणून शिकवणी लावून हिंदी शिकला असेल.त्याची मंगेतर मला मराठी सिरीयल मधल्या मृणाल दुसानिस सारखी वाटली.
बाकी जयदीप अहलावत फार म्हणजे फारच सॉलिड.

व्याख्या विख्खी वाले
>>
नवकोट नारायण, दिल्ली कलकत्ता मद्रास बेंगलोर इथली मोठ मोठी पंचतारांकित हॉटेल, इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनी, डॅझलिंग डायमंड ही हिऱ्यांचा व्यापार करणारी सगळ्यात मोठी कंपनी याचे मालक, दानवीर, कर्मवीर, धर्मवीर, आणि बरच काही, उद्योगभूषण यदुनाथ जवळकर

सिक्वेल येणार हे शेवटी जाहीरच केलेलं आहे. >>> सिक्वेल प्राइमवर आहे, पण तेलगू आहे. हिंदीत डब केलेला मला तरी सापडला नाही. तो पण एकदा बघायला चांगला आहे.

हिंदीत बहुतांश वेळा 'य' चा 'ज' होतो. >> अच्छा. म्हणजे जेजे = जदुनाथ जवळकर हे बरोबर आहे.

अनु, योग्य निरीक्षण. सिनेमात बऱ्याच गोष्टी खटकल्या. त्यावेळचे म्हणून दाखवलेले कपडे, इमारती, रस्ते, सगळे सॉरी आहेत. भाषाही.

शेवटच्या भाषणात तो करसन म्हणतो की आपण मुलींना घरात आणि बायकांना घुंघटमध्ये डांबून ठेवलंय. सिनेमात त्या आधी असं काही दाखवलं नाहीये. सगळ्या बायका आज काल वावरतात तश्याच दाखवल्यात. कपडे पण बऱ्यापैकी सध्या "कल्चरल डे ला घालावेत असे मॉडर्न" आहेत. पण त्याचं ते वाक्य तिथे आल्यामुळे तेवढ्यापुरत्या त्या कोर्टात घुंघट घेतलेल्या बायका दाखवल्या आहेत.

याला स्वयंभू,स्वन परि वर्तन म्हणतात. वर्ण परिवर्तन असेही म्हणतात.

यदुनाथ - जदुनाथ, योगी - जोगी, योगिनी - जोगन,
जव-यव, जाती-याती, जाधव-यादव, सूर्य-सूरज, राजा-राया
यशोदा-जसोदा, यशवंत-जसवन्त
ही काही अन्य उदाहरणं..

ती शर्वरी 'सबलोग लाईन मे खडे रहो' म्हणते, 1800 काहीतरी मध्ये लाईनमे वापरण्या इतकं इंग्लिश शब्द वापरणं कॉमन नसेल.
एकंदर याच्यापेक्षा आश्रम चं चित्रीकरण बरंच खरं वाटलं.कदाचित महाराज चा पिरियड अजून जुना असण्याचा भाग असेल.तसंच त्या काही ऑफिसात वापरायला पाश्चात्य स्टाइल चे कपडे, घरी काही वेगळे साधे कपडे असतील.आमिर पुत्र तिन्ही त्रिकाळ सुटाबुटात(म्हणजे पॅन्ट पांढरा शर्ट आणि ते जॅकेट ) मध्ये आहे.
जुनाईद आणि जयदीप चा इंटरव्ह्यू कम संभाषण पाहिलं.त्यात तो बराच नॉर्मल आणि चांगला बोलतोय.
मला यातले संवाद खूप आवडले.आणि शेवटी आमिरपुत्र कोर्टात संस्कृत बोलतो ते बरंच अभ्यासपूर्ण आणि उच्चार पण चांगले वाटले.

Pages