चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Malena (2000) एकदाचा पाहिला.
केव्हांपासून खटाटोप केला होता. शेवटी जुगाड करून पाहिला.
सार्थक झालं. मास्टरपीस आहे.

महाराज पाहिला काल...बकवास...कुठल्याही अँगल नी ही गोष्ट १८०० मध्ये घडतिये अस वाटत नाही...शालिनी पांडे अर्जुन रेड्डी (original कबीर सिंग) मध्ये जेवढी डोक्यात गेली होती त्यापेक्षा इथे जास्त जाते... ती खूपशी आलिया भट सारखी दिसते... जुनैद khan थेटर ॲक्टर आहे का? डायलॉग मोठ्याने आणि खूप तोंड उघडुन बोलतो..( आठवा.. शायनी आहुजा भूलभुलैया मधला) विचित्र वाटत ते..अमीर खान पेक्षा फारच वेगळा आहे.शर्वरी वाघ गोड दिसते आणि काम पण छान करते..तीच एक बघण्यासारखी आहे... जयदीप अहलावत ने हा रोल का केला त्याच त्यालाच ठाऊक.

आमिर खान पुत्र आणि सिनेमात येणार नाही, वेगळं काहीतरी काम करेन म्हणत होता ना?परत विचार कसा बदलला?
एकंदर महाराजा बघण्यात अर्थ नाही म्हणजे.

चांगला आहे "महाराज" चित्रपट; सत्य घटनेवर आधारीत धाडसी कलाकृती म्हणता येइल. धर्माच्या ठेकेदारांना शोषण करताना आपण काहि वावगं करतोय याची अजिबात जाणीव न्हवती, आणि समाज सुद्धा यात सामिल होता हि अतिशय चीड आणणारी गोष्ट आहे...

कांशी इन सर्च ऑफ गंगा नावाचा सिनेमा पहायला सुरू केलं आहे. खूप आधी दहा मिनिटे पाहून बंद केला होता.
पण ठीकठाक आहे. शर्मन जोशीने छान काम केलंय. कोर्टरूम ड्रामापासून इंटरेस्टींग आहे.
कोरूड्रा जास्त फिल्मी झाला आहे, नाहीतर सशक्त स्क्रीप्ट होतं. वेळेच्या मर्यादेत पण खटला अजून वास्तववादी करणे शक्य होते.
ट्रीटमेंट रिअ‍ॅलिस्टीक वाटावी यासाठी कलाकार नवखेच आहेत. लोकेशन्स खर्या खुर्या आहेत.
शेवट क्लिशे झाल्याने जरा अपेक्षाभंग झाला.

प्राईमवर आय एम सेलिन डिऑन बघतेय.
तिचं पॉवर ऑफ लव्ह आणि माय हार्ट विल गो ऑन सोडून इतर गाणी जास्त माहित नाहीत. टायटॅनिकच्या वेळी या गाण्याची पारायणं केलीयेत. तेव्हा ती इतकी फेमस सिंगर आहे हे माहित नव्हतं. नुकतेच कुठेतरी तिच्या आजाराबद्दल वाचले एकदम रेअर असा स्टीफ पर्सन सिंड्रोम तिला झालाय. एका सिंगरची लाईफस्टाईल, आजारामुळे आलेली हतबलता फार ओव्हरड्रेमेटीक न करता दाखवत आहेत. तिला हाय नोट लावता येत नाही म्हणून जे काय अश्रू येतात तिच्या डोळ्यात बघून फार कसंतरी वाटलं.
तिचे लहानपणीचे, नंतर अ‍ॅज अ सेलेब्रिटी असतानाचे, कॉन्सर्टचे, फॅमिलीसोबतचे क्लिप्स छान वाटले बघायला.

महाराज रियल स्टोरी आहे म्हणे. करसन दास मूलजी या माणसाने एका स्वघोषित धर्मगुरु ( महाराज) विरोधात दिलेला आणि जिंकलेला कायदेशीर लढा, त्याची ही गोष्ट. करसन ने दादाभाई नौरोजींनी सुरु केलेया अँग्लो गुजराती वृत्तपत्रात लेख लिहायला सुरुवात केली. नंतर कर्सन ने स्वतःचे वृत्तपत्र चालू केले.महाराज ने चालवलेल्या लैंगिक शोषणाबद्दल त्याने आवाज उठवायला सुरुवात केल्यानंतर त्या महाराज ने त्याला बराच त्रास दिला, समाजाने ही सुरुवातीला त्याला बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केला. अखेर कर्सन बाँबे सुप्रीम कोर्टात हा लढा जिंकला. बरेच साक्षीदार उलटले, धमकावून गप्प केले गेले, पण एक मराठी डॉक्टर- डॉ. लाड आणि नंतर पुढे आलेल्या ३० स्त्रिया यांची साक्ष यात मह्त्त्वाची ठरली.
सिनेमा मात्र बर्‍यापैकी बोअर झाला मला. पटकथा एकदम सपाट लिहिल्यामुळे फारसे नाट्य निर्माण करता आलेले नाही.

कांशी इन सर्च ऑफ गंगा >>> कांशी? या नावाचा पिक्चर माहितीच नाहीये मला Uhoh पण सिरिअस असेल तर माझा पास. सध्या भलतेसलते पिक्चर पहायचा मूड आहे Proud

ते दाग द फायर च्या चालीवर शीर्षक आहे.
फायर च्या ऐवजी नेहमी मिसाईल वाचले जाते.
सिरीयस पेक्षा सस्पेन्स आहे. जातकुळी वेगळी आहे.

कुणी फॉलो करत असेल तर..
राउतु का राज काही वेळा पूर्वी झी वर आला आहे.

राउतु का राज >> मला आधी वाटले "राऊत का राज". संजय राऊत यांच्याबद्दल प्रोपोगंडा पिक्चर आला असे वाटले Happy आणि अजून व्हॉट्सअ‍ॅप मधे कसे आले नाही विचार करत होतो Happy

राऊत का राज" >> Lol
मसुरीजवळ रौतु गावात एक खून होतो. पोलिस तपास भारी आहे. एकदम कॅज्युअल.

फायर च्या ऐवजी नेहमी मिसाईल वाचले जाते >>> Lol अगदी अगदी! राउतु का राज कसा आहे बाय द वे? पाहिलाय का? जस्ट वर वाचला प्रतिसाद.

"राऊत का राज". संजय राऊत यांच्याबद्दल प्रोपोगंडा पिक्चर >>> Rofl

"दुनिया झुकती है" एक "समग्र आसिफ शेख" करून टाक >>> विचार आहे Wink सध्या मला बहिणीकडून 'आजा मेरी जान' आणि 'घूँघट' ची सुपारी मिळाली आहे Lol 'देवता' आहेच लिस्ट मधे. 'बीस साल बाद' जस्ट पाहून संपवल्यामुळे तो डोक्यात आहे. पण त्याचा काही वेगळा धागा नाही काढणार.
मला 'बहार आनेतक' किंवा 'जीना तेरी गली में' हे पण याच गंगेत धुवून घ्यावेसे वाटतायत Proud

बहार आनेतक
>
है शाब्बास
काली तेरी चोटी है... ... ... होगी बडी मुश्किल...

लिष्टीत अजून टाक:
आओ प्यार करें (हाथोमे आ गया जो कल रुमाल आपका)
सलमा पे दिल आ गया
हम सब चोर है (सावली सलोनी तेरी झील सी आंखे)
हम है कमाल के

सिनेमा मात्र बर्‍यापैकी बोअर झाला मला. पटकथा एकदम सपाट लिहिल्यामुळे फारसे नाट्य निर्माण करता आलेले नाही. >> शर्वरी वाघ नसती तर पूर्ण पन बघितला नसता. सब्टायटल्स लावलेले होते. ती श नि स इंटरचेंज करून बोलते तेंव्हा सब टायटल्स मधे disorganized हा शब्द मुद्दामहून disHorganised असा वापरला आहे . मुद्दम कारण ती स काय नि श काय असे म्हणतो तेंव्हा दोन्ही शब्द दाखवले आहेत. मग जेंव्हा तो तेला स नाही श वगैरे सांगतो तेंव्हा बरोबर स्पेलिंग परत वापरले आहे. एव्हढे कष्ट घेऊन सबटायटल्स देणार्‍या माणसाच्या डेडीकेशनला त्रिवार सलाम !

मी सबटायटल्स बहुधा ऑन नव्हते केले किंवा लक्ष दिले नाही Happy शर्वरी वाघच्या कॅरेक्टर ला ( नाव विसरले) पण चरण सेवा करायला लागलेली असते ना? ती का साक्ष देत नाही ते कळले नाही.

पण चरण सेवा करायला लागलेली असते ना? >> ती आत जाते पण पळून जाते सेवा करायच्या आधी. परत तिची साक्ष बायस्ड मानली जाऊ शकत असेल.

दाग द फायर >> मला तो 'चुकीचा ऐकू आलेला पिक्चर' वाटायचा. आग द फायर असेल किंवा दाग द धब्बा असेल असं वाटलं होतं.

मैत्रेयी, हे डॉ. लाड म्हणजे प्रसिद्ध समाज सुधारक डॉ. भाऊ दाजी लाड. यांची ओळख इथे लिहिली आहे https://asa-asa-ghadala.blogspot.com/2024/04/4-1824-1874.html

चित्रपट बघायला हवा, थँक्स फॉर शेअरिंग

मला तो 'चुकीचा ऐकू आलेला पिक्चर' वाटायचा
>>>>
मलाही. हिंदी पिक्चरमध्येही लॉजिक शोधायची विचित्र सवय होती तोवर.
ते ‘न्युयॉर्क’ पिक्चरमधलं गाणं आहे त्यातपण असंच काहीतरी आहे.
बुझ गयी आग थी
दाग जलता रहा
गाणं आवडतं मला पण हे कोडं काय अजून सुटलं नाही.

'अगर कोई सिनेमा देखना चाहो तो पूरी कायनात तुम्हे उस पे क्लिक कराने में जुट जाती है'
या नियमानुसार काल मी 'हिरोपंती'वर क्लिक केलं. Biggrin

काय तो सिनेमा... काय ती स्टोरी... काय ते स्क्रिप्ट... Angry
गाणी आणि स्टुपिड सीन्स पुढे पळवत बघितला

काय तो टा.श्रॉ.... स्वॅग दाखवायचं म्हणजे दरवेळी मंदसं हसायचं, पांढरी दंतपंक्ती जराशी दिसायला हवी. सीन कोणताही असो, मी चिल असतो हे दाखवायला डोकं स्थिर ठेवून फक्त डोळे इकडून तिकडे हलवायचे आणि मंदसं हसायचं.
क्रिती सॅननचा सुद्धा हा पहिला सिनेमा. ती मला आवडते, पण यात दोघांमध्ये काही केमिस्ट्रीच नाही. लव्हस्टोरीचे अधूनमधून बुडबुडे, मध्येच ऑनर किलिंगचे झटके, सच्चे दोस्तच्या टोचण्या, विनोदाची करपलेली फोडणी
गाण्यांना आगापिछा नाही.
कशाच्या जोरावर सव्वादोन तासांचा सिनेमा काढतात ?? Angry
जुन्या 'हिरो'ची ट्यून 'मॉडर्न' (न चा उच्चार पूर्ण) करून वापरली आहे, पण ती कुठेही वाजते, अपेक्षित असते तिथे वाजतच नाही...
प्रकाश राजने बुडत्या सिनेमाला काडीचा आधार देण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय.

या नियमानुसार काल मी 'हिरोपंती'वर क्लिक केलं >> उपवासाला केळं , वनवासाला सीताफळं. मनुष्यप्राण्याला सर्व प्रकारचे सिनेमे सहन करता आले पाहिजेत या सामाजिक जाणिवेतून असे चित्रपट काही जण काढत असतात.

पांढरी दंतपंक्ती जराशी दिसायला हवी >> हिरोपंती हे नाव टाश्रॉ ने हिरोपंक्ती असेच ऐकले असणार.

Pages