चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अनु आणि आचार्य. Happy
Happy छान पोस्ट असामी. मला कल्पना नव्हती.

शेवटी जरा उद्दातीकरण वाटलं खरं, कारण प्रसंगांची साखळी जाणीवपूर्वक तशी जोडलेली असावी. निदान 'ॲनिमल' इतक्या थराला गेला नाही हेही मनात आले. स्वतंत्र कलाकृती म्हणून ती पोचते तरीही विकृतीचं स्पष्टिकरण दिल्यासारखे वाटले. मधेच कधीतरी आपल्यावरही कधीकधी एकापाठोपाठ संकटं ओढवतात तेव्हा कुणी 'जीवनगाणे गातच रहावे' वगैरे म्हटलं की Are you for real ? मनात येऊन मनापासून ठोसा मारावा वाटतो. तसं त्याचं ते विकट हास्य वाटू लागलं. इतकी विपरीत परिस्थिती बघतानाही जेव्हा तुम्ही स्वतःशी रिलेट करू शकता, ती कलाकृती जिंकलेली असते. आत काही तरी तुटतं आणि काही तरी चुकीचंही वाटतं असा खेळ सुरु रहातो.

मला कॉमिक बुक्स बद्दल काहीही माहित नव्हते आणि एकही बॅटमॅन सिनेमा पाहिलेला नाही त्यामुळे जोकर मी स्वतंत्र सिनेमा म्हणूनच पाहिला. त्यामुळे कदाचित ग्लोरिफाइड व्हिलन वगैरे असे न वाटता शोकांतिका जास्त दिसली, ते डिप्रेस्ड लाइफ अजून जास्त अंगावर आलं. हॉन्टेड मी फॉर डेज! वाकीन फीनिक्स ने कमाल काम केले आहे. त्याचे ते हसणे कानात वाजत राहिले कितीतरी दिवस.

मुज्याचे रिव्ह्यूज पाहताना सतत उल्लेख झाल्याने भेडिया सुरू केला आहे. कल्पनाच नव्हती असा सिनेमा आला आणि गेला तरी.
पाताललोक मधला हथोडा मॅन (स्त्री मधे होता तो) यातही आहे. वरूण धवन पहिल्यांदाच काम आवडले. कंगणाला लांडगा चावल्याने एव्हढ्या पावर्स येत असतील तर .. Happy
एक अक्षर इकडे तिकडे.

मला कॉमिक बुक्स बद्दल काहीही माहित नव्हते आणि एकही बॅटमॅन सिनेमा पाहिलेला नाही >> नोलानची बॅटमन सिरीज पाहिली नसशील तर जरुर पाहाच. कॉमिक बुक प्रत्यक्षात कसे उतरवायचे ह्याचे हे आदर्श उदाहरण आहे.

Are you for real ? मनात येऊन मनापासून ठोसा मारावा वाटतो >> मान्य अस्मिता ! नि ह्याच कारणामूळे ह्या सिनेमावर भरपूर गदारोळ झाला होता - ग्लोरिफिकेशनच्या मुद्द्यावर. जोकर हे कॅरॅक्टर ओळखीचे असल्यामूळे इथे वापरले गेले असावे. ते नसता कुठले तरी स्वतंत्र पात्र असते तर बराच फरक पडला असता ( विकृतीचं स्पष्टिकरण वगैरे मुद्द्यांमधे) पण मग परत जोकर ह्या व्हिलनचा काँटेक्स्ट संपूर्ण सिनेमाला वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवतोय.

नोलानची बॅटमन सिरीज पाहिली नसशील तर जरुर पाहाच. कॉमिक बुक प्रत्यक्षात कसे उतरवायचे ह्याचे हे आदर्श उदाहरण आहे.>> अगदी अगदी +१

जोकरला सहानुभूती मिळावी असे अजिबात वाटले नव्हते. हे म्हणजे हिंदी पिक्चर मध्ये "मुझे हालातने मजबूर करके गुनहगार बना दिया" दाखवतात तसे वाटले.

मधेच कधीतरी आपल्यावरही कधीकधी एकापाठोपाठ संकटं ओढवतात तेव्हा कुणी 'जीवनगाणे गातच रहावे' वगैरे म्हटलं की Are you for real ? मनात येऊन मनापासून ठोसा मारावा वाटतो. तसं त्याचं ते विकट हास्य वाटू लागलं. इतकी विपरीत परिस्थिती बघतानाही जेव्हा तुम्ही स्वतःशी रिलेट करू शकता, ती कलाकृती जिंकलेली असते. आत काही तरी तुटतं आणि काही तरी चुकीचंही वाटतं असा खेळ सुरु रहातो.>> मी सिनेमा बघितला नाही हा,पण हे भावलं Happy

Joaquin phoenix - चांगला अभिनेता आहे. ग्लॅडिएटरमध्येही लक्षात राहिला होता. जोकर पाहीन कि नाही माहित नाही. एवढ्या डिप्रेसिंग गोष्टी, लहान मुलांवर अत्याचार वगैरे सहन होत नाहीत .

समजलं असामी. थॅंक्स Happy
मूळ व्यक्तिरेखेशी आणि कथेशी प्रतारणा सुद्धा केली आहे हाही मुद्दा लक्षात आला.

नोलानची बॅटमन सिरीज पाहिली नसशील तर जरुर पाहाच. कॉमिक बुक प्रत्यक्षात कसे उतरवायचे ह्याचे हे आदर्श उदाहरण आहे.
>>> 'बॅटमॅन बिगिन्स' अर्धवट बघितला होता. आता सगळेच पूर्ण करेन. नोलन तर या जगातला नाहीच, असं कसं असू शकतं कुणी..!

वृषाली, Happy

माझेमन, लहानपणीचे अत्याचार माहितीच्या आणि धक्क्याच्या रूपात दाखवले आहेत. सरळ नाही दाखवले, तरीही अभिनयातून अंगावर येतातच.

जोकर भयंकर डार्क असेल असं वाटल्यामुळे त्या वाटेला गेले नाहीये. शिवाय जोकर म्हटल्यावर चित्रांगदाचं हे गाणं आठवणार्‍या जमातीतली आहे मी Proud

मी तो बॅटमॅन वाला जोकर पाहिलाच नाही.असा वेगळा पिक्चर आहे हेच आता रिसेंटली माहीत झालं.
मूळ जोकर पाहिला तो आवडला.

भेडिया हा खूप धमाल पिक्चर आहे.अगदी पूर्ण दोन तीन वेळा पाहण्यासारखा आहे.हातोडा त्यागी चे संवाद ताफा फारच भारी.

हा जोकर पहिल्यांदा थिएटरमधे पाहिलेला. ५-७ दिवस सुचत नव्हते काही इतकी उदासी आलेली. पुन्हा पहायची हिंमतच नाही झाली.

"जोकर" (२०१९) मधे आर्थर फ्लेकचं उदात्तीकरण वाटणं साहजिक आहे कारण चित्रपटाचा नायक (प्रोटॅगनिस्ट) तोच आहे. वाकिन फिनिक्स त्या रोल मधे ठिक-ठाक होता; माझ्या मते हीथ लेजर (डार्क नाइट) चं पोट्रेयल वाकिन पेक्षा सरस होतं. रिडली स्कॉटच्या "नेपोलियन" मधे तर वाकिन अतिशय थोराड, भिषण दिसला आहे, अभिनयहि सुमार. नेपोलियनचं टिपिकल बॉइश लूक असुनदेखील स्कॉटला वाकिन कुठल्या अँगलने नेपोलियन दिसला हे कोणितरी विचारायला हवं...

अस्मिता जोकर पोस्ट आवडली.
नंतरचे प्रतिसाद देखील आवडले.
जोकर बघण्याइतपत मन खंबीर झाल्यावरच बघणार आहे.
आता नकोच असे बऱ्याच वेळा वाटलं आहे.
नोलांनची बॅटमॅन triology पाहिली असल्याने जोकर ने केलेला उत्पात चांगलाच माहितीय.

मैदान:
मोठा कलाकार, पिरियड(1957) काळातला असल्यामुळे बनवायला आलेला खर्च, चांगली पब्लिसिटी असं असूनही पिक्चर अपेक्षेप्रमाणे चाललेला नाही.कारणं अनेक असतील, त्या आधी नुकताच देवगण चा आलेला शैतान, किंवा स्पोर्ट मुव्हीज चा लोकांना झालेला अतिरेक. जिथे तिथे मन नकळत चक दे इंडिया शी तुलना करतंच. पण खऱ्या कथेवर आधारित आहे.त्या दुर्दैवी कोच ला श्रद्धांजली आदरांजली म्हणून तरी एकदा ott वर नक्की पहा.
सर्व कलाकार आपला उत्तम अभिनय देत आहेत.मध्ये एक दोन ओल्ड स्कुल चालीची गाणी आहेत ती पण ऐकायला छान आहेत.अजय देवगण आता सतत 'दुखावलेला तरीही संयत बाप' वाली कवच कुंडलं अंगावर चढवूनच प्रत्येक भूमिका करतो.अर्थात त्या त्याला सूट होतात.निदान 40 वर्षं लहान नायिकेशी रोमान्स करत नाही ऑन स्क्रीन हे त्यातल्या त्यात बरं.
कार्तिक आर्यन ने पण चंदू चॅम्पियन साठी प्रचंड मेहनत केलीय.माझा थिएटरमध्ये स्पोर्ट मुव्हीज बघण्याचा पेशन्स 1 वर्षं तरी संपला आहे,ज्यांचा शिल्लक आहे त्यांनी अवश्य बघावा.

मी एकही बॅटमॅन कॉमिक-बुक वाचलेलं नाही. नोलनची सीरीज पाहिलेली नाही. सुपरहिरोज ही कन्सेप्ट मला विशेष झेपत नाही.
तरीही हा जोकर सिनेमा माझ्या विशलिस्टला आहे.
पण ही चर्चा वाचून पाहू की नको असा (पुन्हा) प्रश्न पडला.

जिथे तिथे मन नकळत चक दे इंडिया शी तुलना करतंच
>>>>

माझे सुद्धा ट्रेलर बघताना असेच होता होते. त्यामुळे अजून बघायचे टाळले आहे.

चंदू चॅम्पियन बद्दल कोणी चांगले सांगितले म्हणजे अंगावर शहारा रोमांच वगैरे येणारे सीन आहेत असे कळले तर थिएटर मध्ये जाऊन बघायला आवडेल. अन्यथा ओटीटी वर नक्की. कारण कार्तिक आर्यन आवडीचा कलाकार आहे.

Submitted by ललिता-प्रीति on 15 June, 2024 - 14:25 >>> +१
यामुळेच चर्चेत भाग घेतला नाही. सुपरमॅन,स्पायडरमॅन मुलांना दाखवले. बॅटमॅनचा तिसरा सिनेमाच थेट मुलांना दाखवला. आधीचे दोन आलेले माहितीच नव्हतं. त्यामुळं मागचे संदर्भ आले कि अज्ञात बेटावर आल्यासारखं वाटलं.

बॅटमॅन सुपरहिरो आहे, पण त्याच्याकडे एकही सुपरपॉवर नाही. बाकी सुपरहिरो बघत नसाल तरी नोलन सिरीज अवश्य बघा.

लप्रि - मलाही सुपर हिरो प्रकरण झेपत नाही. पण जोकर सिनेमात कसलेही सुपर हिरो प्रकार नाहीयेत. सांगितले नसते तर समजलाही नसता सुपर हिरो शी काही देणे घेणे आहे ते. एक डिस्टोपिअन बॅकड्रॉप वरचा साय्कॉलॉजिकल थ्रिलर अशा कॅटेगरीत येईल.
इथल्या सजेशन्स वरून नोलनची बॅटमॅन सीरीज लिस्ट वर टाकतेय तरी पण.

'जोकर' सुपरहिरो नाही, चित्रपट स्वतंत्र आणि गडद आहे.

सुपरहिरोज् कन्सेप्टबद्दल मम ललिता प्रीती. पण मी बघते सगळंच. आयर्न मॅन आणि डॉ स्ट्रेंज मला त्या-त्या व्यक्तिरेखांमुळे आणि त्यांच्या कामामुळे आवडले आहेत. कारण ती दोघं माणसं सुद्धा वाटतात. वान्डाही भारीच वाटलेली आहे. ती जेव्हा सूड घेते ती सूड घेणारी आईच असते. बाकी सिद्धीतर उगाच माध्यम असतात ते पोचवण्याचं. त्या शिवाय पण हे तिघेही 'पावरफुल' आहेतच.

नोलननी काहीही केलं तरी तो 'उतरतो' त्याच्या कलाकृतीत, विज्ञान सुद्धा नुसतं विज्ञान न रहाता त्याचं मानवी मूल्यांशी कनेक्शन होतं. मानवी भावभावनाच काढल्या तर विज्ञानावरील- सुपरहिरोज् वरील सिनेमेसुद्धा माहितीपटासारखे किंवा चक्क 'छोटा भीम' सारखे होतील. ट्रान्सफॉर्मर्स / ब्रह्मास्त्र ही उदाहरणं.

धन्यवाद झकासराव. Happy

'कटहल' बघितला. बरेच दिवस झाले ऐकून होते. मस्तच आहे! खूप आवडला.
'दहाड' आणि याच्यात थोडी साम्यं जाणवली. मुलींचं गायब होणं, मागासवर्गीय जातीची स्त्री पोलिस इन्स्पेक्टर, पोलिस खात्यातले विविध नमुने वगैरे.

पण त्याच्याकडे एकही सुपरपॉवर नाही.
>>
पैसा

जोकर सिडनी - सिंगापूर फ्लाईट मधे पाहिला होता. जाम डार्क होता. मग उतारा म्हणून कुठलासा टाईमपास सिनेमा पाहिला होता...

मैदान फारच संथ वाटतोय.

नोलननी काहीही केलं तरी तो 'उतरतो' त्याच्या कलाकृतीत, विज्ञान सुद्धा नुसतं विज्ञान न रहाता त्याचं मानवी मूल्यांशी कनेक्शन होतं >> चोक्कस एकदम ! ह्याच साठी नोलानची डार्क नाईट सिरीज अतुलनिय आहे. कॉमिक बुक्स फॅन्स नि मानवी भावभावनांसाठी बघणाअरे सगळ्यांना अपिल होउ शकते. अशी कसरत सहज करू शकणारे सुपरहिरो काँसेप्ट मधले सिनेमे विरळाच असतात. प्राईमवरची बॉईज हि सिरीयल पण ह्याच प्रकाराची आहे.

भेडीया भरपूर टीकेला वाव असूनही आवडला. स्त्री मधे हसत खेळत संदेश दिला तसाच यातही जंगल बचाव हा संदेश आहे. नॉर्थ ईस्ट च्या लोकांकडे पाहण्याचा मुख्य भूमीचा दृष्टीकोण छान घेतला आहे. दुसर्‍या भागाची तजवीज करताना अलिकडच्या ट्रेण्डप्रमाणे शेवट ताणलाय. छान आहे एकंदर.

अस्मिता
नोलानचा "जोकर" बघितला नसेल तर अवश्य बघा. बरेच "जोकर" होऊन गेले. परंतु ह्या सम हाच. ह्या जोकर चे काम करणारा नट -हीथ लेजर- ह्या भूमिकेत एवढा तन्मय झाला होता कि शेवटी मला वाटतं जोकरनेच त्याचा बळी घेतला. बिचारा वयाच्या २८ व्या वर्षी त्याचा दुःखद अंत झाला.
व्हिलनचे ग्लोरीफिकेशन म्हणाल तर नोलानचा तिसरा पिक्चर पहा. dark night rises. त्यातल्या व्हिलन मला प्रचंड अपील झाला.(होता)

जोकर बद्दल अस्मिता याना प्रचंड सहमत
अगदी अंगांवर येणारा असह्य सिनेमा आहे पण खिळवून ठेवतो शेवटपर्यंत
त्याचं हसणं हे अक्षरशः काटा येणाऱ्या प्रकारातले आहे
भयंकरच अस्वस्थ करतं ते हसणं

Pages