चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरियन ग्लास स्कीन बद्दल +१०००
तिकडे वय १६+ झाले की आई च मुली/मुला ला सांगते आता ब्युटी सर्व्हिस/ऑप्रेशन वगैरे करण्या साठी पैसे गोळा करायला लाग बर्र्र्रररं का?
हर एक घरटी आई बाबा मुलं सर्व गुण्या गोविंदाने ब्युटी सर्जरी करतात & सांगतात देखिल. क्लायंट कडून कळाले & पेपरात वाचले.

कोरिया या देशाचे नाव आधी चिखलीस्तान होते. पण त्या देशात महिला भुवया कोरायला लागल्या. बसकं नाक कोरून सूंदर करू लागल्या.
पापण्या कोरू लागल्या. चेहराही काचेने कोरून कोरीव करू लागल्या. त्यावर काचेचा रस लावून चकचकीत करू लागल्या.
एकदा योगी आदित्यनाथ मागच्या जन्मात म्हणजे योगी अजयनाथ भिस्त असताना कोरियाला गेले होते. त्यांनी हे कोरीव काम पाहिले आणि ते म्हणाले " आज से तुम्हारे देश का नाम कोरिया"

- पु ल देशपांडे
( उदास कपस्टॉल या पुस्तकातून साभार)

नाही नाही. अयोध्येची एक राजकुमारी सुरीरत्ना साऊथ कोरियात जाऊन राणी झाली होती. तेव्हा तिथे कोरीव काम नव्हते. मग तिने कारागिरांना कोरी(व काम करायला) या सांगितले. म्हणून कोरिया झाले नाव.

भिस्त नाही ओ 'बिश्त'..

Huh Hwang-ok या राणीचे वंशज म्हणजे आपले पु ना ओक. त्यांनीच कोरियात जाऊन हा इतिहास सांगितला.

भिस्त नाही ओ 'बिश्त'. == नामांतरावर त्यांची भिस्त असल्याने..

Huh Hwang-ok या राणीचे वंशज म्हणजे आपले पु ना ओक. >> ते काय माहित नाही. मी आपले TOI मध्ये वाचले.

नामांतरावर त्यांची भिस्त असल्याने Lol

हा धागा आता असंबद्ध गप्पा व्हायला लागला आहे....

काल रात्री डंकी पाहिला

पाकाऊ वाटला
ॲक्च्युअल डंकी जर्नी वर जास्त फोकस द्यायला पाहिजे होता. पण अख्खा सिनेमा भर हिराणी स्टाईल मधे सगळ्या सीरियस प्रॉब्लेम्स ना एकदम साधं सोपं उत्तर देऊन चुटकी सरशी सॉल्व केलं होतं. अन् त्या नंतरच्या ही डेव्हलपमेंट वर झाकली मूठ. म्हणजे तापसी नी लंडन मधे २५ वर्ष काय केलं (हेअर कट अन् स्ट्रेटनिंग सोडून), सगळी जमीन, घर विकून डंकी साठी पैसे उभे केलेल्या शाहरूख नी परत आल्यावर काय दिवे लावले, त्या पुतळा बनलेल्या पोरानी टेलरिंग शॉप काढण्यासाठी काय कष्ट घेतले वगैरे सगळं पडद्या आड.
शाहरूख जर आधी आर्मीत होता तर त्याला बेसिक तोडकं मोडकं इंग्लिश ही न येणं अनाकलनीय होतं. तसंच कुणाकडेच कुठलं ही बेसिक स्किल नसणं, काही शिकण्याची अन् त्यावर बेस्ड करिअर करण्याची इच्छा नसणं आणि असं असताना केवळ लंडन ला गेलं की पैसे (पाऊंड्स) मिळतील ही अपेक्षा धरणं फारच बालिश वाटलं. कुणीही (पालकांनी सुद्धा) लंडन ला जाऊन काय उद्योग करणार याचा उल्लेख ही न करणं वगैरे टिपिकल हिराणी भाबडेपणा ही होता.

शेवटी टिपिकल सिस्टीम ला दूषणं देणं पण कांस्ट्रक्टिव सोल्यूशन न देणं ही आलंच

अपेक्षाभंग नाही झाला कारण हेच अपेक्षित होतं.
रादर नसतं तर सुखद धक्का बसला असता.

मनोरंजन ही नाही अन् काही सीरियस ही नाही. टोटल सपक

कसम उडान छल्ले की, आता जुन्या बडे मियां छोटे मियां ची नितांत गरज आहे...

आता जुन्या बडे मियां छोटे मियां ची नितांत गरज आहे...
>>> अमिताभ-गोविंदाचा ना? तो सुद्धा अ आणि अ सिनेमाच आहे की Uhoh

तो सुद्धा अ आणि अ सिनेमाच आहे की
>>
अर्थात
पण तिथे डोकं बाजूला ठेऊन जायचं आहे हे आधीच माहिती आहे. चार घटका करमणूक इतकंच अपेक्षित आहे.
उगाच काहीतरी महान करतोय ते बघा अन् थक्क व्हा वगैरे काही नाही...

काल रात्री मुन्नाभाई एमबीबीएस पाहिला
मुलांना दाखवायला छान आहे. लेकीला फार आवडला. जे अपेक्षित होतेच.
मलाही आठव्यांदा बघताना तितकीच मजा आली. कारण शेवटचा बघून बरीच वर्षे झाली होती.
पहिल्यांदा थिएटरला फर्स्ट डे लास्ट शो पाहिला होता. काय पिक्चर आहे याची काहीही कल्पना नसताना, नावही माहीत नसताना केवळ मित्रांसोबत म्हणून गेलेलो. आणि कायम आठवणीत राहील असा अनुभव घेऊन आलो होतो..

नेफिवर नवीन आलेला "हिट मॅन" पाहिला. पिक्चर ८०% मस्त आहे. पण शेवट जमलेला नाही. अशा पिक्चरचा शेवट स्मार्ट वाटणे आवश्यक आहे - गाय रिची च्या एक दोन पिक्चर्स मधे मस्त जमले होते ते. इथे एकदम underwhelming वाटला. त्यात ती हीरॉइन व हीरो जे करतात त्याला आपली सहानुभूती मिळाली पाहिजे तरच तो शेवट इफेक्टिव्ह वाटेल. पण यात कथेत ते नीट आलेले नाही. स्पॉइलर नको म्हणून आत्ता जास्त लिहीत नाही.

तरी पिक्चर बघण्यासारखा आहे. हीरो व हिरॉइन दोन्ही मस्त आहेत. ती अभिनेत्री कोण आहे माहीत नाही. दिसायला फार सुंदर वगैरे नाही. पण स्क्रीन प्रेझेन्स, बॉडी लँग्वेज व एकूण प्रचंड बोलका चेहरा वगैरे फार भारी आहे. एकदम बदाम गॉगल वर्दी Happy

मुंजा पाहून आलो. एकदम क्रिस्प २ तासांचा पिक्चर बनवलेला आहे. मुंजाच्या दंतकथेवर आधारित Horror comedy आहे. झोंबिवलीच्या दिग्दर्शकाने बनवलाय. CGI मुंजा मस्त जमलाय. नवीन नायक नायिकेचे काम चांगले झाले आहे. बाकी सहकलाकार सगळेच जवळ जवळ मराठी आहेत त्यामुळे भारी वाटते. कोकण आणि पुण्यातले चित्रीकरण सुखावह आहे. शेवट mid-credit शॉट चुकवू नका.

सुनिधी मध्यम वाटला????????????? Under Paris अत्यंत व्हाय्यात आहे. म्हणजे मनमोहन देसाई पण आत्महत्या करेल Proud मी तर काहीकाही सिन आठवून आठवून एकटाच हसत आहे. Proud इथल्या चिरफाड करणाऱ्या परीक्षकांनी जरूर बघावाच, अगदी नग आहे नग.

मला गॉडझिला मायनस वन पाहिल्यावर नेफिने अंडर पॅरिस सजेस्ट केला होता. अजून पाहिला नाही Happy

लापता लेडीजविषयी अजून एक निरिक्षण Happy

दीपक आणि फूलच्या लग्नानंतर दीपकच्या घरचे बाकी सगळे परत जातात पण दीपक आणि फूल दोन दिवस अजून फूलच्या माहेरी राहातात कारण फूलच्या आजीचे निधन झाले असते आणि त्यानिमित्त काहीतरी देवीला भोग चढवायचा असतो.
पुढे फूल मंजूमाईला दादी म्हणून संबोधिते आणि जाताना हा माझा दुसरा मायका असे म्हणते. एक नातं तिथे जोडलं जातं.

सारखी 'अशी पाखरे येती' या गाण्याची आठवण येत होती शेवट पाहून. फूल आणि जया यांचं अनोळखी माणसांबरोबर सुरेख भावबंध जमलं आहे Happy

इथे मुंज्याचा रिव्ह्यू वाचून मुलांना पाठवणार होतो मुंज्या पहायला (प्रौढांसाठी सर्टिफिकेट नसेल तर). पण पुन्हा अन्य रिव्ह्यू पाहिले.
आता हा चित्रपट हॉल मधे पहावा कि नाही याबद्दल गोंधळ आहे.

आचार्य>> आम्ही मुंजा थिएटर मध्ये पाहिला. तसा काही खूप भीतीदायक नाही. एक दोनच शॉट्स थोडे भीतीदायक वाटू शकतात. बरेच फनी सीन्स आहेत. आवाज आणि वातावरण निर्मिती मोठ्या स्क्रीनवर मजेदार वाटेल. हायस्कूलमध्ये असतील मुले तर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही

मुंज्या लहान(-10) मुलांना थिएटरला दाखवू नये असं वाटलं.जम्प स्केअर्स जास्त आहेत.मजेशीर आहे पण भुताचा आवाज खूप लाऊड आहे.
मला जरा जास्त झाला.तुंबड आणि कंतारा थिएटरमध्ये नीट पाहिले होते.

हिंदी भाषिकांच्या रिव्ह्यूज मधे बचकाना कॉमेडी असा शब्द आला आहे.
एकीने सांगितले कि मराठी चित्रसृष्टीच्या दबदब्यामुळे मुंज्या तुंबाड सारखा असेल ही अपेक्षा होती. तुंबाडशी तुलना केली नाही तरी स्त्री च्या तुलनेत मुंज्या कमी पडतो. सीजी बालीश आहेत. हॉरर मेक अप मधे माती खाल्ली आहे. पण एकदा बघायला हरकत नाही कारण अस्सल आणि वेगळी कथा आहे. एके काळी मराठी चित्रपटांना आपणच मदत केली पाहीजे म्हणून बरेच सिनेमे पाहिलेत. पण हा पाठिंबा असाच चालू ठेवायचा असेल तर रोजगार हमी योजनेवर कामाला जावे लागेल.
मराठी रिव्ह्यू
https://www.youtube.com/watch?v=4S2jjSkbTeI

हिंदी रिव्ह्यू
https://www.youtube.com/watch?v=1cojJ2A2BlM&t=302s

HBO जे आता अचानक Max झाले आहे, त्याने मला ती app पटकन ओळखू येत नाही.

जोकर - Joaquin phoenix, Robert De Niro

Joaquin phoenix ने जबरदस्त काम केले आहे. अतिशय डार्क, उदासवाणा सिनेमा आहे. यापूर्वी DC चे बघितलेले सिनेमे 'लो एनर्जी' वाटले होते, हा मात्र फक्त गडद वाटला. मुरत जाणारी विमनस्क अवस्था अस्वस्थ करते. सगळी कथा नायकाच्या मनोवस्थेच्या अवतीभवती घुमते, त्यामुळे ती घुसमट बघून त्यानी केलेली दुष्कृत्य ऑब्विह्यस वाटायला लागतात.

भ्रमिष्ट, वेड्यांचा इस्पितळात उपचार घेणाऱ्या एका बाईने अनाथ मूल दत्तक घेऊन, त्याच्यावर तिच्या मित्राकडून झालेला अनन्वित शारीरिक अत्याचार थंड मनाने बघितला असतो. मुलासमोर मात्र वेगळाचा बाबा रंगवलेला असतो. आणि सतत एक कृत्रिम हसू वागवायला लावलेलं असतं. त्याने त्याच्या मनावर परिणाम होऊन तो अस्वस्थ झाला की हसत सुटायचा आजार त्याला असतो. समाजात काडीचाही मान नाही, सगळे उठसूठ घालून पाडून बोलणार, bully करणार, कोणीही मनापासून प्रेम करणारे नाही, सततचा विश्वासघात, नोकरी पण जोकरची, घरी आल्यावर आईची शुश्रुषा, टिव्हीवर त्याच्या स्टँड अपची झालेली जीवघेणी थट्टा, अनुदान बंद झाल्या कारणाने अचानक बंद झालेली थेरपी आणि औषधोपचार - यातून आंतरिक स्फोट होऊन एक सिरिअल किलर जन्म घेतो.

काही जणांना हा प्रकार आदर्श वाटून कसे अराजक माजत जाते हे सगळंही दाखवलं आहे. त्याचं ते सापळ्यासारखं शरीर, डिल्युजनल, तिरसट, विक्षिप्त देहबोली, शुन्यात बघणारे डोळे आणि विकट हास्य - दबलेल्या वासना, जगावरचा आणि आईवरचा सूड वगैरे अंगावर येतात. ज्या दिवशी हे सोसायची 'बॅन्डविड्थ' असेल त्या दिवशीच बघा.

जोकर पाहिला.अस्मिताशी सहमत.परफेक्ट लिहिलंय.खरं तर मध्ये असं वाटतं की कथा वेगळ्या अंगाने जावी, सकारात्मक बनावी.पण ती तशी न बनण्यातच चित्रपटाचं यश आहे.
मुंज्या: स्त्री आणि रुही शी तुलना करू नका.त्यात 40% जंप स्केअर्स आणि बाकी कथा असेल तर यात 75% जंप स्केअर्स, भयावह मेकप आणि उरलेला 25 टक्के भाग कथा आणि विनोद आहे.म्हणजे, चिवड्यात शेंगदाणे आवडतात म्हणून कोणी फक्त तळलेल्या शेंगदाण्याचा कुरमुरे न घालता चिवडा बनवला तर कसं वाटेल?तसं.
पण तरी एक वेगळा प्रयत्न म्हणून मुंज्या बघा.हिरो क्युट आहे.कोकण चं चित्रण अतिशय सुंदर आहे.आणि सुहासिनी छोट्या रोलमध्ये असल्या तरी मस्त आहेत.मोना सिंग ने पण चांगलं काम केलंय.नायिकांना फार जास्त स्कोप दिला नाहीये.'कुबा' आवडला(कोण ते प्रत्यक्षात पहा)

अस्मिता, छान पोस्ट.
जिओचं फायबर सुरू झाल्यावर पाहीन. ( इतके दिवस पेड सबस्क्रीप्शन्स असूनही म हिनोन न महिने सिनेमे बघितले गेले नाहीत, मोफत असल्यावर कदाचित बघेन).

हिरो क्युट आहे >>> +१ अनु! Happy

मला आवडला मुंज्या. छान करमणूक झाली. बहुतांश कलाकार मराठी आहेत यात हा एक अजून आवडलेला पॉइंट. अजय पूरकर चे काम पण छान झाले आहे.
मुंज्या कसा दिसतो आहे हे प्रोमो मध्येच समजलं होतं. त्यामुळे काही अपेक्षाभंग वगैरे झाला नाही.

Joaquin phoenix ने जबरदस्त काम केले आहे. >> +१ अस्मिता. वाईट गोष्ट ही कि त्याच्या अफाट क्षमतेमूळे जोकरचे विनाकारण उदात्तीकरण झालेले आहे. मूळ कॉमिक्समधला जोकर हा सायको आहे (आठवा हेथ लेजर चा जोकर ) नि त्याच्या गत आयुष्यामूळे सायको वगैरे झालेला नाही. त्यापासून घेतली गेलेली हि फारकत खूपच खटकली. अगदी व्हायोलन्स ग्लोरीफिकेशन नकळत झालेले आहे हे मान्य करूनही ट्र्बल्ड माईंड पासून कॉमिक सुपर व्हिलनवाला प्रवास मला एक कॉमिक फॅन म्हणून जमला नाही असे वाटले. त्याचबरोबर एक सिनेमा म्हणून एक जबरदस्त कलाक्रूती आहे ह्याबद्दल यत्किंचितही दुमत नाही.

जोकर फार भारी सिनेमा आहे. दरवेळी अंगावर येतो. स्टोरी पण फॅक्ट आणि फिक्शन मध्ये वारंवार हेलकावे खात रहाते. डिल्युजनल आई, डिल्युजनल मुलगा, ट्रबल्ड बालपण... काय खरं काय खोटं आपण तर्क बांधतो आणि ते तसंच असेल का? हे सतत बदलत रहातं. ते फार ब्रिलियंटली दाखवलं आहे.

पण खरं आहे! बॅटमॅन मधला जोकर हा व्हिलनच आहे. जोकर मध्ये सहानुभूती मिळते.

Pages